64MP कॅमेरा असलेला स्वस्त Realme 7i भारतात करेल 7 ऑक्टोबरला एंट्री, Xiaomi ला आव्हान मिळणे निश्चित

Realme 7i भारतात लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. फोनच्या लॉन्चचा इशारा रियलमी इंडियाचे प्रमुख माधव सेठ यांच्याकडून दिला जात होता. आता Realme ने ट्वीट करून याची माहिती दिली आहे कि कंपनी 7 ऑक्टोबरला Realme 7i लॉन्च करेल. या फोन सोबतच कंपनी Realme 7 Pro Sun Kissed Leather स्पेशल एडिशन पण सादर करेल. भारतीय मार्केट मध्ये Realme 7 आणि Realme 7 Pro आधीची लॉन्च झाले आहेत. तसेच Realme 7i इंडोनेशियान मार्केट मध्ये सादर करण्यात आला आहे.

Realme 7i चे इंडियन रॅम व स्टोरेज वेरिएंट

भारतातील प्रसिद्ध टिप्सटर मुकुल शर्माने ट्विट करून Realme 7i च्या इंडियन रॅम व स्टोरेज वेरिएंट सोबतच कलर ऑप्शनची पण माहिती दिली आहे. या लीकनुसार Realme 7i चे इंडियन वेरिएंट 4GB/64GB आणि 4GB/128GB सह येतील. तसेच फोन Fusion Blue आणि Fusion Green कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. इंडोनेशिया मध्ये फोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंट सादर केला गेला होता त्यामुळे भारतात रियलमी 7आय ची किंमत पण कमी असेल.

Realme 7 Pro चा स्पेशल एडिशन

Realme 7 Pro Sun Kissed Leather वेरिएंट ओरेंज-कलर लेदर फिनिश मध्ये दिसला आहे. या फोनची कोणतीही जास्त माहिती समोर आली नाही. आशा आहे कि डिजाइन व्यतिरिक्त या फोन मध्ये अजून कोणताही बदल मिळणार नाही.

Realme 7i चे स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोन मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले (720×1600 पिक्सल्स) रेजोल्यूशन सह मिळेल, ज्याचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 82.3 टक्के आणि हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट सह येईल. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर असेल. फोन मध्ये Android 10 बेस्ड Realme UI देण्यात आला आहे.

फोटोग्राफी पाहता फोनच्या क्वॉड रियर कॅमेरा मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर मिळेल. तसेच 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस 119 डिग्री फील्ड ऑफ व्यू सह 2 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर मिळेल. सेल्फी आणि विडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये मोठी 5000mAh ची बॅटरी मिळते, जो 18W फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here