चार कॅमेरा आणि 128जीबी स्टोरेज सह लॉन्च झाले Realme 5 आणि Realme 5 Pro, सुरवाती किंमत फक्त 9,999 रुपये

चिनी स्मार्टफोन कंपनी रियलमीने आज भारतात आपली Realme 5 सीरीज सादर केली आहे. नवीन सीरीज मध्ये कंपनीने भारतात Realme 5 आणि Realme 5 Pro स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. दोन्ही डिवाइसची विक्री फ्लिपकार्ट वर केली जाईल. चला जाणून घेऊया फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स संबंधित सर्व माहिती.

किंमत आणि उपलब्धता

कंपनीने Realme 5 आणि Realme 5 Pro तीन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. Realme 5 चा 3जीबी रॅम+32जीबी स्टोरेज वेरीएंट 9,999 रुपये, 4जीबी+64जीबी स्टोरेज वेरीएंट 10,999 रुपये आणि 4जीबी रॅम+128जीबी स्टोरेज वेरीएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच Realme 5 Pro च्या 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये, 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 8जीबी रॅम +128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे.

दोन्ही डिवाइस कंपनी ई-कॉर्मस वेबसाइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध केले जातील. Realme 5 Pro कंपनी आपल्या साइट आणि फ्लिपकार्ट वर 4 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता सेल साठी येईल. तसेच Realme 5 कंपनी 27 ऑगस्टला दुपारी 12 वाजता सेल साठी येईल. त्याचबरोबर दोन्ही फोन सह अनेक लॉन्च ऑफर्स सादर केल्या गेल्या आहेत. तसेच कंपनी ने Realme Buds 2 सादर केले आहेत, ज्यांची किंमत 599 रुपये आहे. जे 4 सप्टेंबरला कंपनीच्या वेबसाइट वर सेल साठी येतील.

डिजाइन

Realme च्या फोन्स मध्ये आतापर्यंत ‘वी’ शेप नॉच होती. आता Realme 5 आणि Realme 5 Pro मध्ये नॉच आधीपेक्षा छोटी आणि ‘यू’ शेप मध्ये आहे. दोन्ही फोन मध्ये फोन क्वॉड-कॅमेरा सेटअप आहे, ज्यात प्राइमरी सेंसर लार्ज पिक्सल साइज आणि लार्ज अपर्चर आहे.

कॅमेरा आहे खास

फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर रियलमी 5 सीरीज मध्ये 119 डिग्री फील्ड ऑफ व्यू सह एक अल्ट्रा वाइड सेंसर आणि एक 4cm माइक्रोस्कोपिक फोकल लेंस सह सुपर मॅक्रो सेंसर आहे. या तीन व्यतिरिक्त या कॅमेरा सेटअप मध्ये एक पोर्ट्रेट लेंस पण असेल जी याचा चौथा सेंसर आहे.

Realme 5 चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता Realme 5 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 665 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. हँडसेट कंपनीने दोन रॅम व तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्यात 3+32GB, 4+64GB, 4+128GB वेरिएंटचा समावेश आहे.

फोटोग्राफी साठी Realme 5 च्या मागे चार सेंसर आहेत. यात 12+8+2+2एमपी कॅमेऱ्याचा कॉम्बिनेशन देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

Realme 5 Pro

Realme 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा Realme 5 पेक्षा वेगळा आहे. यात 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 712 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. हँडसेट कंपनीने तीन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्यात 4+64GB, 6+64GB, 8+128GB वेरिएंटचा समावेश आहे.

फोटोग्राफी साठी Realme 5 Pro मध्ये पण चार सेंसर आहेत. यात 48+8+2+2एमपी कॅमेऱ्यांचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सह 4,035mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here