4,230 एमएएच बॅटरी, नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा सह लॉन्च झाला रियलमी सी1, किंमत 6,999 रुपये

असे वाटते आहे ओपो ब्रँड रियलमी प्रत्येक सेग्मेंट मध्ये शाओमी ला टक्कर देणार आहे. रियलमी 1 आणि रियलमी 2 च्या माध्यमातून कंपनी ने 10 हजारच्या सेग्मेंट मध्ये शाओमी ला आव्हान दिले आहे. तर रियलमी 2 प्रो लॉन्च करून आता ​कंपनी रेडमी नोट 5 प्रो आणि मी ए2 च्या समोर उभी ठाकली आहे. त्याचबरोबर रियलमी सी1सह कंपनी ने बजट सेग्मेंट मध्ये पण पाऊल टाकून रेडमी 6ए च्या अडचणी वाढवल्या आहेत. ​कंपनी ने रियलमी सी1 सादर केला आहे जो कमी किंमतीती नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. भारतात रियलमी सी1 ची किंमत 6,999 रुपये आहे आणि हा फोन पण 11 ऑक्टोबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

रियलमी सी1 मध्ये तुम्हाला 6.2-इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. कपंनी ने हा 19:5 आसपेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. पण स्क्रीन कोटिंग ची माहिती अजून देण्यात आली नाही. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 1.8गीगाहट्र्ज चा कोर्टेक्स ए53 आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत एड्रीनो 506 ​जीपीयू आहे.

फोन मध्ये 2जीबी रॅम तेच ज्या सोबत 16जीबी इंटरनल मेमरी आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही माइक्रोएचडी कार्ड पण वापरू शकता. चांगल्या स्पेसिफिकेशन सोबतच कंपनी ने यात शानदार कॅमेरा पण दिला आहे. फोन मध्ये तुम्हाला डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात एक सेंसर 13-मेगापिक्सलचा आहे ता दुसरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे.

सेल्फी साठी रियलमी सी1 मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. जरी फोन मध्ये ​फिंगरप्रिंट सेंसर नसला तरी यात फेस अनलॉक चा वापर करता येईल. बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे तर कंपनी ने यात मोठी बॅटरी दिली आहे. या फोन मध्ये 4,230 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

रियलमी सी1 मध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे आणि यात 4जी वोएलटीई चा वापर करता येतो. या सोबत वाईफाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि वाईफाई हॉट स्पॉट पण मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here