Jio देत आहे 14000 पेक्षा पण जास्त कॉलिंग मिनिटे आणि 100GB पर्यंत डेटा, जाणून घ्या कसा मिळेल फायदा

भारतातील टेलिकॉम मार्केट मध्ये आपल्या मोफत सेवेने प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकणाऱ्या रिलायांस जियोने गेल्यावर्षी आपल्या ग्राहकांना झटका देत आउटगोइंग कॉलसाठी 6 पैसे प्रति मिनिट दराने चार्ज घेण्याचा निर्णय घेतला होता. सोप्प्या शब्दात सांगायचे तर कंपनीने जियो व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या नेटवर्क (एयरटेल, आइडिया आणि वोडाफोन) नेटवर्क्स वर कॉलिंग करण्यासाठी वेगळे आईयूसी टॉप-अप वाउचर सादर केले होते.

अजूनही कंपनी जियो-टू-जियो अनलिमिटेड कॉलिंग देत आहे. आणि वाउचर 10 ते 1000 रुपयांच्या आत येतात. या IUC टॉप-अप वाउचर्स मध्ये 14 हजार पेक्षा जास्त कॉलिंग मिनिटनांसह 100GB पर्यंत डेटा पण दिला जात आहे. पुढे तुम्हाला या वाउचर्स बद्दल सविस्तर माहिती देत आहोत.

10 रुपयांचा प्लान

या लिस्ट मध्ये कंपनीने सर्वात छोटा आईयूसी टॉप-अप वाउचर 10 रुपयांचा सादर केला आहे. या टॉप-अप मध्ये तुम्हाला 124 आईयूसी मिनिट्स मिळतील. यांचा वापर दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंगसाठी करता येईल. यात यूजर्सना 1 जीबी का 4G डेटा पण फ्री मिळेल.

20 रुपयांचा प्लान

कंपनीने 20 रुपयांचा प्लान पण सादर केला आहे. या प्लानची किंमत जास्त आहे तसेच यात मिळणारे बेनिफिट्स पण जास्त आहेत. या प्लान मध्ये तुम्हाला 249 आईयूसी मिनिट दिले जात आहेत. तसेच तुम्हाला 2 जीबी अतिरिक्त डेटा पण फ्री दिला जाईल.

50 रुपयांचा प्लान

जर तुम्ही दुसऱ्या नेटवर्क जास्त कॉल करत असाल तर 50 रुपयांचा रिचार्ज पण या लिस्ट मध्ये मिळेल. 50 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 656 मिनिटे मिळतात. त्याचबरोबर प्लान मध्ये 5 जीबी अतिरिक्त डेटा पण दिला जातो.

100 रुपयांचा प्लान

या लिस्ट मधील एक महाग आईयूसी टॉप-अप वाउचर 100 रुपयांचा आहे. या रिचार्ज मध्ये यूजर्सना 1,362 आईयूसी मिनिट्स आणि 10 जीबी 4G डेटा मिळेल.

500 रुपयांचा प्लान

जर तुम्ही जियोच्या 500 रुपयांच्या आईयूसी टॉप-अप वाउचरने टॉप-अप केला तर तुम्हाला 50 जीबी डेटा सह 420.73 रुपयांचा टॉक टाइम आणि दुसऱ्या नेटवर्क्स वर कॉलिंगसाठी 7,012 मिनिट्स मिळतील.

1000 रुपयांचा प्लान

तसेच जर तुम्ही 1000 रुपयांचा आईयूसी पॅकने रिचार्ज केला तर तुम्हाला 100जीबी डेटा, 844.46 रुपयांचा टॉक टाइम आणि 14,074 नॉन-जियो मिनिट्स मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here