Samsung चा सर्वात पावरफुल डिवाईस Galaxy Note 10+ झाला लॉन्च, याच्या ताकदीला नाही तोड

आधी दिलेल्या माहितीप्रमाणे 8 ऑगस्टला Samsung चा Galaxy Note 10 येणार होता आणि आज अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये झालेल्या एका इवेंट मध्ये कंपनीने हा लॉन्च केला. सॅमसंगने नोट सीरीज मध्ये यावेळी दोन मॉडेल लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी एस सीरीज प्रमाणे Samsung Galaxy Note 10 सोबत Galaxy Note 10+ सादर केला गेला आहे. दोन्ही फोन मध्ये डिस्प्ले व्यतिरिक्त स्पेसिफिकेशनचा पण थोडा फरक आहे. प्लस मॉडेल थोडा ऍडव्हान्स आहे. पुढे आम्ही Samsung Galaxy Note 10+ बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच जर तुम्हाला Galaxy Note 10 बद्दल जर वाचायचे असेल तर इथे क्लिक करा.

डिस्प्ले व डिजाईन

Samsung Galaxy Note 10+ कंपनीने एज-टू-एज इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर सादर केला आहे. या डिवाईस मध्ये 3040 × 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.8-इंचाचा क्वॉड एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. नोट 10 प्लस चा डिस्प्ले 498पीपीआई सह HDR10+ सर्टिफाइड आहे. Galaxy Note 10+ अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. Galaxy Note 10+ चे डायमेंशन 7.2 x 162.3 x 7.9एमएम आणि वजन 196ग्राम आहे.

रॅम व स्टोरेज

Samsung ने Galaxy Note 10+ 12जीबी रॅम मेमरी वर सादर केला आहे. हा नोट डिवाईस 12जीबी रॅम सह अंर्तराष्ट्रीय बाजारात 256जीबी इंटरनल स्टोरेज आणि 512जीबी इंटरनल मेमरीच्या दोन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. चांगली बाब अशी कि Galaxy Note 10+ मध्ये सिम सोबत माइक्रोएसडी कार्ड पण वापरता येईल.

फोटोग्राफी

Samsung Galaxy Note 10+ क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाल्या 16-मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस सह एफ/1.5-एफ/2.4 अपर्चर वाली 12-मेगापिक्सलची वाइड लेंस, एफ/2.1 अपर्चर वाली 12-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि डेफ्थ विजन वीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. अशाप्रकारे Galaxy Note 10+ एफ/2.2 अपर्चर वाल्या 10-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेरा सपोर्ट करतो.

ओएस व प्रोसेसर

Samsung Galaxy Note 10+ एंडरॉयड आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9.0 पाई वर सादर केला गेला आहे. हा डिवाईस 64बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या सॅमसंगच्या एक्सनॉस 9825 चिपसेट वर चालतो. विशेष म्हणजे भारतात Galaxy Note 10+ इतर चिपसेट सह पण येऊ शकतो.

कनेक्टिविटी व बॅटरी

Samsung Galaxy Note 10+ मध्ये ब्लूटूथ 5, एनएफसी, जीपीएस व वाई-फाई सोबतच यूएसबी टाईप-सी सारखे ऑप्शन्स आहेत. तसेच पावर बॅकअप साठी Samsung Galaxy Note 10+ मध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करते.

किंमत

Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ दोन्ही डिवाईस Aura Glow, Aura White आणि Aura Black कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जे अंर्तराष्ट्रीय बाजारात 23 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here