12जीबी रॅम आणि 5G सपोर्ट सह लॉन्च झाला Samsung Galaxy Note 10, बघा फुल स्पेसिफिकेशन्स

अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर आज Samsung ने आपला लेटेस्ट नोट 10 डिवाईस सादर केला आहे. कंपनीने अमेरिकेतील न्यू यार्क मध्ये या फोन साठी एका ईवेंटचे आयोजन केले होते आणि मोठ्या धुमधडाक्यात फोन लॉन्च केला. या इवेंटची सर्वात खास बाब अशी कि कंपनीने नोट सीरीज मध्ये यावेळी दोन मॉडेल सादर केले आहेत. Samsung Galaxy Note 10 सोबत Galaxy Note 10+ आणले आहेत. दोन्ही फोन मध्ये स्क्रीन साइज व्यतिरिक्त थोड्या स्पेसिफिकेशनचा पण फरक आहे. इथे आम्ही सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 बद्दल सविस्तर सांगितले आहे. तर Galaxy Note 10+ च्या माहिती साठी तुम्ही इथे क्लिक करू शकता.

डिस्प्ले आणि डायमेंशन

Samsung Galaxy Note 10 कंपनीचा पहिला नोट डिवाईस आहे जो इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. या डिवाईस मध्ये 2280 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.3-इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 401पीपीआई सह HDR10+ क्वॉलिटी सपोर्ट करतो. गॅलेक्सी नोट 10 च्या फ्रंट पॅनल वर अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. Galaxy Note 10 चे डायमेंशन 71.8 x 151.0 x 7.9एमएम आहेत व जन 168ग्राम आहे. विशेष म्हणजे Galaxy Note 10 सोबत येणाऱ्या S Pen चे वजन फक्त 3.04ग्राम आहे.

रॅम व स्टोरेज

Galaxy Note 10 Samsung ने दोन मॉडेल्स मध्ये सादर केला आहे. एक मॉडेल एलटीई ला सपोर्ट करतो तर दुसऱ्या मॉडेल मध्ये 5G सपोर्ट देण्यात आला आहे. नोट 10 च्या एलटीई मॉडेल मध्ये 8जीबी रॅम सह 256जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचबरोबर Galaxy Note 10 चा 5G मॉडेल 12जीबी रॅम मेमरी सह 128जीबी च्या मेमरीला सपोर्ट करतो. पण Galaxy Note 10 मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येणार नाही.

कॅमेरा सेग्मेंट

Samsung Galaxy Note 10 फोटोग्राफी साठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डिवाईसच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर वाली 16-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, एफ/1.5-एफ/2.4 अपर्चर वाली 12-मेगापिक्सलची वाइड लेंस आणि एफ/2.1 अपर्चर वाली 12-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. अशाप्रकारे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Galaxy Note 10 एफ/2.2 अपर्चर वाल्या 10-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

ओएस व प्रोसेसर

Samsung Galaxy Note 10 एंडरॉयड आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे. हा डिवाईस ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या सॅमसंगच्या एक्सनॉस 9825 चिपसेट वर चालतो.

कनेक्टिविटी व बॅटरी

Samsung Galaxy Note 10 4G LTE सोबत 5G ला सपोर्ट करतो. पण या दोन्ही कनेक्टिविटी एकाच मॉडेल मध्ये देण्यात आल्या नाहीत. त्याचप्रमाणे गॅलेक्सी नोट 10 मध्ये ब्लूटूथ 5, एनएफसी, जीपीएस व वाई-फाई सोबत यूएसबी टाईप-सी सारखे ऑप्शन्स उपलब्द आहेत. तसेच पावर बॅकअप साठी Samsung Galaxy Note 10 मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ दोन्ही डिवाईस Aura Glow, Aura White आणि Aura Black कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो अंर्तराष्ट्रीय बाजारात 23 ऑगस्ट पासून पहिल्या सेल साठी उपलब्ध होतील.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here