बघा सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 चे एक्सक्लूसिव फोटो आणि 360डिग्री वीडियो

सॅमसंग च्या हिट स्मार्ट डिवाईस गॅलेक्सी नोट 8 च्या यशानंतर आता कंपनी या सीरीज च्या पुढील स्मार्टफोन गॅलेक्सी नोट 9 च्या तयारीला लागली आहे. गॅलेक्सी नोट 8 द्वारे फ्लॅगशिप चे नवे पायंडे घालणारी ही कोरियन कंपनी गॅलेक्सी नोट 9 सोबत पण स्मार्टफोन यशाचे नवीन रेकॉर्ड बनवणार आहे. सॅमसंग च्या या आगामी डिवाईस चा लुक कसा असेल तसेच हा स्मार्टफोन कोणत्या डिजाईन वर बनेल, अशा सर्व माहिती सह 91मोबाईल्स सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 चा एक्सक्लूसिव 360डिग्री वीडियो आणि काही हाई रेज्ल्यूशन फोटो तुमच्यासाठी घेऊन आला आहे.

91मोबाईल्स ने सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 च्या या एक्सक्लूसिव मीडिया कंटेंट साठी प्रख्यात टिप्सटर आॅनलीक्स शी हात मिळवणी केली आहे आणि सॅमसंग च्या येणार्‍या हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस चा पहिला लुक ​तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 पाहता हा डिवाईस 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या क्यूएचडी+ डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. 161.9 x 76.3एमएम डायमेंशन सह या फोन ची जाडी 8.8एमएम पर्यंत असेल तसेच फोन 6.3-इंच स्क्रीन सह सादर केला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 च्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन नाही. याच्या डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहेत तर उजव्या पॅनल वर ‘बिक्सबे बटन’ फोटो मध्ये दिसत आहे. फोन च्या खालील पॅनल वर 3.5एमएम आॅडियो जॅक सह यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे तसेच इथे स्पीकर आणि एस पेन चा स्लॉट पण आहे. गॅलेक्सी नोट 9 चा कॅमेरा सेटअप नोट 8 पेक्षा थोडा वेगळा आहे. यात हॉरिजॉन्टल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅश आणि हार्टरेट सेंसर आहे. कॅमेरा सेटअप च्या खाली फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 बद्दल माहिती मिळाली आहे की हा फोन वेगवेगळ्या बाजारांमध्ये एक्सनॉस 9810 किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. या फोन मध्ये 6जीबी रॅम असेल तसेच यात 256जीबी इंटरनल मेमरी मिळू शकते. तसेच पावर बॅकअप साठी गलेक्सी नोट 9 मध्ये 3,850एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. सॅमसंग च्या या फ्लॅगशिप डिवाईस बद्दल बोलले जात आहे की कंपनी 9 ऑगस्ट ला गॅलेक्सी नोट 9 टेक बाजारात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here