Airtel 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio 555 प्लान vs Airtel 558 प्लान, जाणून घ्या कोणती कंपनी देत आहे जास्त बेनिफिट https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-rs-555-plan-bharti-airtel-rs-558-plan-comparison-benefits-data-voice-calling-free-iuc-offer/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-rs-555-plan-bharti-airtel-rs-558-plan-comparison-benefits-data-voice-calling-free-iuc-offer/#respond Mon, 04 Nov 2019 13:19:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5667 Jio चा 555 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो तर Airtel ने आपला प्लान 82 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे.

The post Jio 555 प्लान vs Airtel 558 प्लान, जाणून घ्या कोणती कंपनी देत आहे जास्त बेनिफिट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम कंपन्यांमधील स्पर्धा काही लपून राहिलेली नाही. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या स्वस्तात जास्त बेनिफिट मिळणारे प्लान्स देतात तसेच स्वतःला इतरांपेक्षा चांगला बनवण्याची संधी सोडता नाहीत. देशातील दोन मोठ्या टेलीकॉम कंपन्या Reliance Jio आणि Bharti Airtel सुरवातीपासूनच स्पर्धेत पुढे आहेत. जेव्हा नेटवर्क निवडण्याची वेळ येते तेव्हा सामान्य माणूस गोंधळात पडतो कि Jio निवडावी कि Airtel. तसे पाहता या दोन्ही कंपन्यांकडे चांगले प्लान्स आहेत, पण Reliance Jio च्या 555 रुपये आणि Bharti Airtel च्या 558 रुपयांचा प्लान सध्या खूप चर्चेत आहे. जर तुम्ही पण दोन्ही नेटवर्कचे हे प्लान्स निवडणार असाल तर पुढे आम्ही दोन्ही कंपन्यांच्या प्लॅन्सची तुलना केली आहे कि कोणत्या नेटवर्क वर जास्त बेनिफिट मिळत आहे.

किंमत

सर्वात आधी प्लान्सची किंमत पाहता हे दोन्ही प्लान 500 रुपयांपेक्षा जास्तीच्या बजेट मध्ये येतात. Reliance Jio च्या प्लानची किंमत 555 रुपये आहे तर Bharti Airtel ने आपला प्लान 558 रुपयांमध्ये सादर केला आहे. म्हणजे Airtel च्या प्लानची किंमत Jio च्या प्लान पेक्षा 3 रुपये जास्त आहे.

वॅलिडिटी

Reliance Jio आणि Bharti Airtel दोन्ही कंपन्यांचे प्लान दीर्घ वैधतेसह येतात, म्हणजे यूजर एका रिचार्ज नंतर पुढील अडीच महिन्यांपेक्षा पण जास्त वेळ कोणत्याही अडचणीविना हे प्लान्स वापरू शकतात. Jio चा 555 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो तर Airtel ने आपला प्लान 82 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे.

हे देखील वाचा: Jio चे 8 प्लान ज्यात गरज लागत नाही वेगळ्या कॉलिंग रिचार्जची, जाणून घ्या सविस्तर

इंटरनेट डेटा

आजकाल एखादा प्लान निवडण्यासाठी सर्वात आधी इंटरनेट डेटा बघितला जातो. Reliance Jio आपल्या 555 रुपयांच्या प्लान मध्ये रोज 2 जीबी 4G इंटरनेट डेटा देत आहे. म्हणजे संपूर्ण प्लानच्या वॅलिडिटी मध्ये यूजर्सना एकूण 168 जीबी (84 x 2 = 168) इंटरनेट डेटा मिळेल. तर Airtel आपल्या यूजर्सना 558 रुपयांच्या प्लान मध्ये Jio पेक्षा जास्त रोज 3 जीबी 4G डेटा देत आहे. एयरटेलच्या प्लान मध्ये संपूर्ण वॅलिडिटी साठी एकूण जीबी (82 x 3 = 246) 4जी इंटरनेट डेटा मिळेल.

कॉलिंग

Reliance Jio आणि Bharti Airtel ने आपल्या यूजर्सना फ्री अनलिमिटेड वॉयस कॉलिंग देण्याचा शब्द दिला आहे. पण Jio च्या प्लान मध्ये ऑननेटवर्क कॉलिंग तर पूर्णपणे फ्री आहे परंतु ऑफनेटवर्क कॉल करण्यासाठी कंपनी कडून फक्त 3000 मिनिटे देण्यात आली आहेत. तर Airtel ने आपल्या यूजर्ससाठी हे वॉयस कॉल पूर्णपणे मोफत ठेवले आहेत. ऑननेटवर्क व ऑफनेटवर्क दोन्हीवर अनलिमिटेड वॉयस कॉल करता येतील.

हे देखील वाचा: Jio ची दिवाळी अजूनही चालू, 699 रुपयांमध्ये JioPhone विकत घेण्याची ऑफर एक महीना अजून सुरु राहणार

कोणाचा प्लान आहे चांगला

Reliance Jio चा प्लान जरी Bharti Airtel च्या प्लानच्या तुलनेत 3 रुपयांनी स्वस्त असला तरी बेनिफिट्सच्या बाबतीती Airtel चा 558 रुपयांचा प्लान Jio च्या 555 रुपयांच्या प्लान पेक्षा कितीतरी जास्त फायदे देत आहे. प्रतिदिन डेटाच्या बाबतीती Airtel यूजर्सना Jio च्या पेक्षा रोज 1 जीबी 4G डेटा जास्त मिळेल. तर संपूर्ण प्लान मध्ये Airtel नेटवर्क वर Jio च्या तुलनेत 78 जीबी डेटा जास्त मिळत आहे.

त्याचप्रमाणे Jio नंबर वरून IUC द्वारे जास्त कॉलिंग करता येईल तर Airtel यूजर्स पूर्णपणे मोफत अनलिमिटेड कॉल करू शकतील. विशेष म्हणजे Jio यूजर्सना PayTm वरून रिचार्ज केल्यास 555 रुपयांच्या प्लान मध्ये 50 रुपयांचा कॅशबॅक पण मिळत आहे.

The post Jio 555 प्लान vs Airtel 558 प्लान, जाणून घ्या कोणती कंपनी देत आहे जास्त बेनिफिट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-rs-555-plan-bharti-airtel-rs-558-plan-comparison-benefits-data-voice-calling-free-iuc-offer/feed/ 0
मोठी बातमी : Airtel बंद करत आहे 3G सर्विस, बदलेल टेलीकॉम बाजाराचा चेहरामोहरा https://www.91mobiles.com/marathi/airtel-shuts-down-3g-network-in-kolkata-india-l900-technology-900-mhz-4g-network/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-shuts-down-3g-network-in-kolkata-india-l900-technology-900-mhz-4g-network/#respond Fri, 28 Jun 2019 12:17:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4685 एकीकडे Airtel आपली 3G सर्विस बंद करेल तर दुसरीकडे एयरटेल नेटवर्क वर 4G सर्विस आधीपेक्षा जास्त फास्ट होईल.

The post मोठी बातमी : Airtel बंद करत आहे 3G सर्विस, बदलेल टेलीकॉम बाजाराचा चेहरामोहरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Bharti Airtel अनेक वर्षांपासून इंडियन टेलीकॉम मार्केट मध्ये आपली सेवा देत आहे. देशात इंटरनेटच्या सुरवातीपासून आज 4G पर्यंत एयरटेल ने सतत आपल्या ग्राहकांना बेस्ट सर्विस देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. Airtel देशातील पहिली खाजगी टेलीकॉम कंपनी आहे जिने भारतात 3G नेटवर्कची सुरवात केली होती. कंपनीने 3G नेटवर्क बेंगलुरु पासून सुरु केला होता जो आज देशातील कानाकोपऱ्यात उपलब्द आहे. पण आता Airtel ने आपली 3G सर्विस बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने देशात आपला 3G नेटवर्क हटवण्यास सुरवात केली आहे आणि Airtel च्या या निर्णयामुळे इंडियन टेलीकॉम मार्केटचा चेहरा पूर्णपणे बदलणार आहे.

Airtel ने घोषणा केली आहे कि कंपनी भारतात आपली 3G सर्विस बंद करणार आहे. Airtel ने 3G नेटवर्क हटवण्यास सुरवात कोलकात्यापासून केली आहे. कंपनीने सांगिलते आहे कि कोलकात्यात Airtel ची 3G टेक्नोलॉजी हटवण्याचे काम सुरु झाले आहे जे काही दिवसात पूर्ण होईल. एयरटेल द्वारा कोलकात्यामधून 3G हटवल्यानंतर तिथे या कनेक्टिविटी वर कोणताही फोन व सिम कार्ड चालणार नाही. Airtel नुसार 3G सर्विस हटवण्यासोबतच हा 4G नेटवर्क वर शिफ्ट केला जाईल.

Airtel नुसार वरील सर्कल मध्ये 3G 4G नेटवर्क वर अपग्रेड केला जाईल. आता पर्यंत कंपनी सर्कल मध्ये 3G नेटवर्क देण्यासाठी 900 MHz band spectrum चा वापर केला जात होता. पण आता 3जी नेटवर्क बंद केल्यानंतर हेच बँड स्पेक्ट्रम नव्याने फ्रेम केले जातील. Airtel म्हणते कि 900 MHz फ्रीक्वेंसी वर चालणाऱ्या या band spectrum च्या फ्रीक्वेंसी मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही आणि 900 MHz वरच कंपनी 4G कनेक्टिविटी देईल.

असा आहे Airtel चा प्लान

3G साठी वापरात असलेल्या 900 MHz band spectrum ला अपग्रेड करण्यासाठी Airtel कंपनी L900 टेक्नोलॉजीचा वापर करेल. या टेक्नॉलॉजी द्वारे स्पेक्ट्रम बंद करून फ्रिक्वेंसी तीच असेल पण या फ्रिक्वेंसी वर 3G ऐवजी 4G सिग्लन मिळतील. विशेष म्हणजे एखाद्या बँड स्पेक्ट्रमची फ्रिक्वेंसी जितकी जास्त असते त्याची पावर तेवढीच कमी होते. त्यामुळे 900 MHz फ्रिक्वेंसी वाला हा स्पेक्ट्रम जास्त ताकदवान 4G सिग्नल देऊ शकेल.

विशेष म्हणजे Airtel सध्या 2300 Mhz आणि 1800 Mhz बँड वर आपली 4G सर्विस देत आहे. पण आता 900 MHz फ्रिक्वेंसी वाले बँड स्पेक्ट्रम पण कोलकात्यात पूर्णपणे 4G नेटवर्क देतील. 900 MHz बँड वर 4G नेटवर्क दिल्यामुळे घरात, बेसमेंट मध्ये किंवा कोणत्याही इंडोर जागी फोन नेटवर्क जास्त क्लियर व चांगल्या पद्धतीने येईल. म्हणजे एकीकडे Airtel आपली 3G सर्विस बंद करेल तर दुसरीकडे एयरटेल नेटवर्क वर 4G सर्विस आधीपेक्षा जास्त फास्ट होईल.

Airtel यूजर्स वर पडणारा प्रभाव

कंपनी नुसार Airtel द्वारा 3G सर्विस बंद केल्यामुळे ग्राहकांवर सकारात्मक प्रभावच पडेल. कपंनीने सर्व 3G कस्टमर्सना वेळोवेळी मेसेज व नोटिफिकेशन्स पाठवल्या जातील आणि त्यांना सिम अपग्रेड करणे किंवा मोबाईल हँडसेट अपग्रेड करण्यास सांगितले जाईल. तसेच ज्या 3जी ग्राहकांकडे आधीपासूनच 4जी हँडसेट आणि सिम आहे त्यांचा नेटवर्क आपोआप अपग्रेड केला जाईल.

विशेष म्हणजे Airtel कोलकात्यात 3G सर्विस बंद करत आहे तर दुसरीकडे कंपनी सर्कल मध्ये आपली 2G सर्विस सध्या कायम ठेवणार आहे. भारतात सध्या Reliance Jio हीच एक अशी कंपनी आहे जी फक्त 4G सर्विस देते. तसेच Airtel द्वारा 3G पूर्णपणे बंद केल्यानंतर या कंपनीच्या यूजर्सना आधीपेक्षा जास्त चांगली 4G कनेक्टिविटी मिळेल.

The post मोठी बातमी : Airtel बंद करत आहे 3G सर्विस, बदलेल टेलीकॉम बाजाराचा चेहरामोहरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-shuts-down-3g-network-in-kolkata-india-l900-technology-900-mhz-4g-network/feed/ 0
हे आहेत एयरटेल प्रीपेड यूजर्स साठी बेस्ट प्लान, ज्यात डेटा सोबत मिळते कॉलिंग फ्री https://www.91mobiles.com/marathi/best-plan-for-airtel-prepaid-user-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/best-plan-for-airtel-prepaid-user-in-marathi/#respond Mon, 15 Oct 2018 12:19:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2499 खाली दिलेली प्लान संपूर्ण भारतातील एयरटेल च्या प्रीपेड यूजर्स साठी आहेत. या प्लान मध्ये भरपूर 2जी, 3जी आणि 4जी डेटा सह कॉलिंग फ्री आहे.

The post हे आहेत एयरटेल प्रीपेड यूजर्स साठी बेस्ट प्लान, ज्यात डेटा सोबत मिळते कॉलिंग फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही एयरटेल यूजर असाल आणि तुमच्यासाठी एखादा बेस्ट प्लान शोधत असाल ज्यात कॉलिंग, मेसेजिंग आणि डेटा पण मिळेल तर तुमच्यासाठी 4 प्लान बेस्ट आहेत ज्यांची माहित आम्ही खाली दिली आहे. खाली दिलेली प्लान संपूर्ण भारतातील एयरटेल च्या प्रीपेड यूजर्स साठी आहेत. या प्लान मध्ये भरपूर 2जी, 3जी आणि 4जी डेटा सह कॉलिंग फ्री आहे.

एयरटेल 199 प्लान
हा एयरटेल चा मासिक प्लान आहे. 199 रुपयांच्या या प्लान मध्ये तुम्हाला रोज 1.4जीबी डेटा मिळेल. एयरटेल चा हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. या प्लान अंतर्गत अनलिमिटेड कॉलिंग फ्री आहे आणि तुम्ही फ्री इनकमिंग आणि आउट गोइंग रोमिंग कॉल्सचा लाभ घेऊ शकता. याचबरोबर तुम्हाला रोज 100 एसएमएस मोफत मिळतील. खास बाब म्हणजे या प्लानचा वापर 2जी, 3जी आणि 4जी सहित कोणत्याही डिवाइस वर केला जाऊ शकतो.

एयरटेल 399 प्लान
एयरटेल के 399 रुपयांच्या प्लान मध्ये डेटा बेनिफिट खूप चांगले आहेत. या प्लानची वैधता 70 दिवस आहे आणि या प्लान मध्ये तुम्हाला रोज 1.4जीबी डेटा मिळेल. म्हणजेच तुम्ही 70 दिवसांत 98जीबी डेटा वापरू शकाल. डेटा सोबत सर्व लोकल आणि एसटीडी कॉलिंग यात मोफत आहे. तसेच रोमिंग मध्ये पण इन कमिंग किंवा आउट गोइंग कॉल वर कोणताही चार्ज लागणार नाही . या प्लान मध्ये रोज तुम्हाला 100 एसएमएस मोफत मिळतील. एयरटेल च्या या प्लानचा लाभ पण तुम्ही 2जी, 3जी आणि 4जी फोन वर घेऊ शकता.

एयरटेल 448 प्लान
जर तुम्ही एखादा जास्त चालणार प्लान शोधात असाल तर एयरटेल चा 448 रुपयांचा प्लान तुम्ही घेऊ शकता. एयरटेलचा 448 रुपयांच्या प्लानची वैधता 82 दिवस आहे आणि या प्लान मध्ये पण तुम्हाला रोज 1.4 जीबी डेटा मिळेल. अर्थात 82 दिवसांत तुम्ही 114.8जीबी डेटा वापरू शकता. प्लान मध्ये सर्व नॅशनल कॉलिंग सहित रोमिंग मध्ये पण इन कमिंग किंवा आउट गोइंग कॉल वर कोणताही चार्ज लागणार नाही. सोबतच रोज तुम्हाला 100 एसएमएस मोफत मिळतील.

एयरटेल 509 प्लान
एयरटेल कडे संपूर्ण तीन महिन्यांचा पण एक प्लान आहे ज्याची किंमत 509 रुपये आहे . एयरटेलच्या 509 रुपयांच्या प्लानची वैधता 90 दिवस आहे आणि यात तुम्हाला रोज 1.4जीबी डेटा मिळेल. संपूर्ण प्लान मध्ये तुम्ही एकूण 126जीबी डेटा वापरू शकाल. कंपन च्या अन्य प्लान प्रमाणे यात पण लोकल आणि नॅशनल कॉलिंग फ्री असेल. त्याचबरोबर रोज तुम्हाला 100 एसएमएस पण दिले जातील. विशेष म्हणजे एयरटेलचा हा प्लान सर्व 2जी, 3जी आणि 4जी प्रीपेड यूजर साठी उपलब्ध आहे.

एयरटेल प्रीपेड यूजर्सनी कसा करावा बॅलेन्स चेक

जर तुम्ही एयरटेल प्रीपेड यूजर असाल आणि तुमच्या नंबरचा बॅलेन्स आणि वैधता बघायची असेल तर तुम्हाला तुमच्या फोन वरून *121# डायल करावे लागेल. त्यामुळे फोन वर तुमच्या नंबर संबंधित माहिती येईल. जसे कि माय आॅफर, डेटा आॅफर आणि टॉक टाइम आॅफर इत्यादी. तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही हि माहिती मिळवू शकता. तसेच 121 वर कॉल करून पण माहिती मिळवता येते.

The post हे आहेत एयरटेल प्रीपेड यूजर्स साठी बेस्ट प्लान, ज्यात डेटा सोबत मिळते कॉलिंग फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-plan-for-airtel-prepaid-user-in-marathi/feed/ 0
जियो ला टक्कर देण्यासाठी एयरटेल ने आणला 398 रुपयांचा प्लान, 70 दिवस मिळतील अनलिमिटेड वॉयस कॉल आणि 1.5जीबी 4जी डेटा रोज https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-398-prepaid-plan-offer-unlimited-voice-call-1-5-gb-4g-data-for-70-days-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-398-prepaid-plan-offer-unlimited-voice-call-1-5-gb-4g-data-for-70-days-in-marathi/#respond Thu, 11 Oct 2018 13:41:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2456 साधारणतः वॉयस कॉल एफयूपी लिमिट सह येतात पण या प्लान मध्ये कोणतीही दैनिक किंवा साप्ताहिक मर्यादा देण्यात आली नाही.

The post जियो ला टक्कर देण्यासाठी एयरटेल ने आणला 398 रुपयांचा प्लान, 70 दिवस मिळतील अनलिमिटेड वॉयस कॉल आणि 1.5जीबी 4जी डेटा रोज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम बाजारात दूरसंचार कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेचा फायदा सामन्यांना होत आहे. यूजर्सना आकर्षित करण्यासाठी कंपन्या असे प्लान्स घेऊन येत आहेत ज्यांची किंमत कमी आणि त्यातील फायदे जास्त आहेत.याच हेतूने एयरटेल ने पण आपल्या यूजर्स साठी पण नवीन प्लान सादर केला आहे. एयरटेल ने आणलेला हा नवीन प्लान 398 रुपयांचा आहे जो जास्त वॅलिडिटी सह अनलिमिटेड वॉयस कॉल आणि भरपूर इंटरनेट बेनिफिट देतो.

एयरटेल द्वारा लॉन्च करण्यात आलेला 398 रुपयांचा हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. हा प्लान 70 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. प्लान मध्ये मिळणारे फायदे पाहता कंपनी कडून ग्राहकांना रोज 1.5जीबी इंटरनेट डेटा देण्यात येईल. अशा प्रकारे संपूर्ण प्लान मध्ये एकूण 105जीबी इंटरनेट डेटा मिळेल. या डेटाचा वापर 4जी सोबतच 3जी वर पण करता येईल.

त्याचबरोबर एयरटेल 398 रुपयांच्या प्लान मध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा पण देत आहे. साधारणतः वॉयस कॉल एफयूपी लिमिट सह येतात पण या प्लान मध्ये कोणतीही दैनिक किंवा साप्ताहिक मर्यादा देण्यात आली नाही. एयरटेल ग्राहक लोकल व एसटीडी प्रत्येक नंबर वर अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण पूर्णपणे फ्री असतील. तसेच एयरटेल 70 दिवस रोज 90 एसएमएस पण देईल.

विशेष म्हणजे 398 रुपयांच्या प्लानच्या आधी एयरटेल ने 399 रुपयांचा पण एक प्लान सादर केला आहे. हा प्लान 84 दिवसांच्या वैधते सह येतो. पण या प्लान मध्ये इंटरनेट डेटा 1.4जीबी प्रतिदिन मिळत आहे. तसेच रोज मिळणारे एसएमएस 100 आहेत. अर्थात हा प्लान वॅलिडिटी एसएसएस बेनिफिट मध्ये जरी पुढे असला तरी इंटरनेट डेटाच्या बाबतीती मागे आहे.

The post जियो ला टक्कर देण्यासाठी एयरटेल ने आणला 398 रुपयांचा प्लान, 70 दिवस मिळतील अनलिमिटेड वॉयस कॉल आणि 1.5जीबी 4जी डेटा रोज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-398-prepaid-plan-offer-unlimited-voice-call-1-5-gb-4g-data-for-70-days-in-marathi/feed/ 0
एयरटेल यूजर्सना धक्का! बंद होऊ शकतात फ्री इनकमिंग कॉल https://www.91mobiles.com/marathi/airtel-incoming-voice-call-might-ban-mute-soon-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-incoming-voice-call-might-ban-mute-soon-in-marathi/#respond Mon, 08 Oct 2018 06:45:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2391 रिलायंज जियोच्या एंट्री मुळे इंडियन टेलीकॉम बाजार पूर्णपणे बदलला आहे. स्वस्त डेटा पॅक्स मुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे तसेच सामन्य माणसांसाठी वॉयस कॉलिंग जणू मोफत झाली आहे. बाजारात असे प्लान आहेत ज्यात इंटरनेट डेटा, एसएमएस आणि वॉयस कॉलिंग एक साथ मिळतात. एक वेळ होती जेव्हा इन​कमिंग कॉलचे पण पैसे द्यावे लागत होते. पण आता इनकमिंग […]

The post एयरटेल यूजर्सना धक्का! बंद होऊ शकतात फ्री इनकमिंग कॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंज जियोच्या एंट्री मुळे इंडियन टेलीकॉम बाजार पूर्णपणे बदलला आहे. स्वस्त डेटा पॅक्स मुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे तसेच सामन्य माणसांसाठी वॉयस कॉलिंग जणू मोफत झाली आहे. बाजारात असे प्लान आहेत ज्यात इंटरनेट डेटा, एसएमएस आणि वॉयस कॉलिंग एक साथ मिळतात. एक वेळ होती जेव्हा इन​कमिंग कॉलचे पण पैसे द्यावे लागत होते. पण आता इनकमिंग कॉल सोबत आउटगोइंग कॉल पण फ्री झाले आहेत. पण असे असताना एयरटेल ने आपल्या यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. एयरटेल ने असे काही दिशा-निर्देश लागू केले आहेत ज्यामुळे एयरटेल यूजर्सची फ्री इन​कमिंग बंद होऊ शकते.

एयरटेल सोबत देशातील सर्वच कंपन्यांनी इनकमिंग कॉल फ्री ठेवल्या आहेत. म्हणजे कोणत्याही रिचार्ज विना यूजर कमीत कमी इनकमिंग कॉल रिसीव करू शकतात. पण आता एयरटेल यूजर्सची ही फ्री ची सुविधा संपणार आहे. अशी माहिती मिळाली आहे की एयरटेल कंपनी आपली फ्री इनकमिंग बंद करणार आहे. ही फ्री इनकमिंग कॉल बंद होण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला इन​कमिंग साठी ​​पैसे द्यावे लागतील. पण जर तुम्ही एका महिन्यासाठी तुमच्या फोन नंबर वर कोणताही रिचार्ज केला नाही तर त्या नंबरची इनकमिंग सर्विस बंद केली जाईल.

एयरटेल यूजर्सना 28 दिवसांतून कमीत कमी 20 रुपयांचा एक रिचार्ज करावा लागेल. या रिचार्ज ने तुमचा नंबर चालू राहील आणि तुम्ही इन​कमिंग सोबत आउटगोइंग कॉल व इंटरनेटचा वापर करू शकाल. जर 28 दिवसांत एयरटेल यूजर्सनी आपल्या नंबर वर कोणताही रिचार्ज केला नाही तर त्या नंबर वर येणारे वॉयस कॉल बंद केले जातील. फक्त एवढेच नाही तर काही ठरावीक काळा नंतर एयरटेल तो नंबर कायमस्वरूपी सस्पेंड म्हणजे बॅन करेल.

एयरटेल ने हे निर्देश आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी आणले आहेत. हा नियम आल्यामुळे दोन​ ​नंबर वापरणाऱ्या लोकांची अडचण होईल. कारण अनेक यूजर आपल्या फोन मध्ये दोन नंबर ठेवतात. एक नंबर वरून इंटरनेट वापरली वापरली जाते आणि त्याच इंटरनेट ने व्हाट्सॅप व अन्य वॉयस तसेच वीडियो कॉल केले जातात. तर दुसरा नंबर फक्त कॉल रिसीव करण्यासाठी ठेवला जातो.

पण आता एयरटेल चे नवीन नियम आल्यामुळे लोकांना दोन्ही नंबर्स वर रिचार्ज करावा लागेल. विशेष म्हणजे एयरटेल च्या आधी रिलायंस जियो ने पण हा नियम आणला आहे. जियो ने निर्देश दिले आहेत ज्यात यूजर्सना आपल्या नंबर वर न्यूनतम रिचार्ज करणे अनिवार्य आहे.

The post एयरटेल यूजर्सना धक्का! बंद होऊ शकतात फ्री इनकमिंग कॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-incoming-voice-call-might-ban-mute-soon-in-marathi/feed/ 0
एयरटेल नंबर वर 289 रुपयांमध्ये मिळेल 42 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि 4जी डाटा https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-289-plan-vs-idea-rs-295-plan-4g-data-voice-call-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-289-plan-vs-idea-rs-295-plan-4g-data-voice-call-in-marathi/#respond Tue, 11 Sep 2018 14:35:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2031 एयरटेल ने 289 रुपयांचा नवीन प्लान आणला गेला आहे जो आइडिया च्या 295 रुपयांच्या प्लानला टक्कर देतो.

The post एयरटेल नंबर वर 289 रुपयांमध्ये मिळेल 42 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि 4जी डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम कंपन्यां मधील स्पर्धेत देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने अजून एक नवीन प्रीपेड प्लान सादर केला आहे. एयरटेल ने 289 रुपयांचा नवीन प्लान आणला गेला आहे जो आइडिया च्या 295 रुपयांच्या प्लानला टक्कर देतो. एयरटेलचा हा प्लान जास्त वॅलिडिटी सह 4जी इंटरनेट डाटा आणि वॉयस कॉलिंगची सुविधा देतो.

एयरटेल 289 रुपयांचा प्लान
एयरटेल च्या या लेटेस्ट प्लान बद्दल बोलायचे झाले तर कंपनी ने हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी आणला आहे. एयरटेल ने प्लान 42 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे. सर्वात आधी इंटरनेट डेटा बद्दल बोलू, एयरटेल च्या या प्लान मध्ये यूजर्सना 42 दिवसांसाठी एकूण 1 जीबी डेटा मिळेल. या डेटा चा वापर 4जी सोबत 3जी व 2जी स्पीड वर पण केला जाऊ शकतो.

आशा प्रकारे एयरटेल आपल्या प्लान मध्ये 42 दिवस अनलिमिटेड वॉयस कॉलिंग ची सुविधा पण देत आहे. या वॉयस कॉल चा वापर रोमिंग मध्ये पण केला जाऊ शकतो. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांना प्लानच्या वॅलिडिटी पर्यंत रोज 100 एसएमएस देईल.

आइडिया 295 रुपयांचा प्लान
आइडिया चा प्लान पाहता हा प्लान पण 42 दिवसांच्या वैधते सह येतो. या प्लान मध्ये यूजर्सना संपूर्ण वॅलिडिटी साठी एकूण 5जीबी इंटरनेट डेटा देण्यात येतो. 5जीबी डेटा संपल्यानंतर यूजर्सना अतिरिक्त डेटा साठी पैसे द्यावे लागतील. प्लान मध्ये रोज 250 मिनिट वॉयस कॉलिंग साठी फ्री मिळतील तसेच यूजर्सना एका दिवसासाठी 100 एसएमएस देण्यात येतील.

दोन्ही प्लान्सची तुलना केल्यास इंटरनेट डेटा च्या बाबतीत आइडिया आपल्या यूजर्सना जास्त बेनिफिट देत आहे तर वॉयस कॉलिंग च्या बाबतीत एयरटेल यूजर्सना जास्त फायदा मिळेल.

The post एयरटेल नंबर वर 289 रुपयांमध्ये मिळेल 42 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि 4जी डाटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-289-plan-vs-idea-rs-295-plan-4g-data-voice-call-in-marathi/feed/ 0
​जियो च्या मॉनसून हंगामा आॅफर ला टक्कर देईल एयरटेल ची ही नवीन आॅफर, मिळेल 6 महीने मोफत सर्विस https://www.91mobiles.com/marathi/airtel-lava-feature-phone-offer-unlimited-calling-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-lava-feature-phone-offer-unlimited-calling-in-marathi/#respond Tue, 24 Jul 2018 12:48:49 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1396 एयरटेल ने ‘मेरा नया फीचर फोन’ आॅफर सादर केली आहे जी पूर्णपणे जियो च्या आॅफर ला टक्कर देत आहे.

The post ​जियो च्या मॉनसून हंगामा आॅफर ला टक्कर देईल एयरटेल ची ही नवीन आॅफर, मिळेल 6 महीने मोफत सर्विस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ने काही दिवसांपूर्वी आपली नवीन आर्कषक आॅफर ‘जियो मॉनसून हंगामा आॅफर’ सुरू केली आहे. या आॅफर अंतर्गत कोणत्याही जुन्या फोनच्या बदल्यात जियो चा 4जी फीचर फोन जियोफोन एक्सचेंज आॅफर सह फक्त 501 रुपयांमध्ये मिळवू शकता. या आॅफर सोबत जियो ने 99 रुपयांचा पॅक पण सादर केला आहे जो इंटरनेट व कॉलिंग सुविधा देतो. जियो ची ही नवीन चाल मोडून काढण्यासाठी एयरटेल ने पण पाऊल उचलले आहे. एयरटेल ने ‘मेरा नया फीचर फोन’ आॅफर सादर केली आहे जी पूर्णपणे जियो च्या आॅफर ला टक्कर देत आहे.

एयरटेल ने मेरा नया फीचर फोन आॅफर लावा सोबत मिळून सादर केली आहे. एयरटेल कोणत्याही नवीन लावा फीचर फोन च्या खरेदीवर 6 महिन्यांसाठी सर्व सेवा मोफत देत आहे. एयरटेल च्या या आॅफर लाभ घेण्यासाठी जुना फोन एक्सचेंज करावा लागणार नाही. कोणत्याही किंमतीचा कोणताही लावा फोन विकत घेतल्यास एयरटेल 6 महिन्यांसाठी म्हणजे 168 दिवस टेलीकॉम सुविधा देईल.

लावा फीचर फोन विकत घेतल्यानंतर त्यात नवीन किंवा जुना कोणताही एयरटेल नंबर वापरता येईल. लावा फोन मधील एयरटेल नंबर वर यूजर्सना 597 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. या रिचार्ज नंतर एयरटेल नंबर वर अनलिमिटेड वॉयस कॉल ची सर्विस ए​क्टिवेट होईल. एयरटेल ग्राहक लोकल व एसटीडी आॅननेटवर्क किंवा आॅफनेटवर्क कोणत्याही नंबर वर मोफत कॉल करू शकतील. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील.

11,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आॅनर 9एन, शाओमी रेडमी नोट 5 ला मिळेल चांगलीच टक्कर

एयरटेल कडून लावा फीचर फोन वर मिळणारे वॉयस कॉल 6 महीने फ्री असतील. एयरटेल या आॅफर अंतर्गत कोणतीही डेटा ची सुविधा देत नाही. तसेच कंपनी कडून एसएमएस ​सर्विस बद्दल पण माहिती मिळाली नाही. दुसरीकडे जियो मॉनसून हंगामा आॅफर अंर्तगत कंपनी रोज 500एमबी इंटरनेट डेटा देत आहे. जियो आॅफर बद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post ​जियो च्या मॉनसून हंगामा आॅफर ला टक्कर देईल एयरटेल ची ही नवीन आॅफर, मिळेल 6 महीने मोफत सर्विस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-lava-feature-phone-offer-unlimited-calling-in-marathi/feed/ 0
90जीबी डाटा वाला एयरटेलचा ‘हा’ प्लान देईल जियो-वोडाफोन ला टक्कर https://www.91mobiles.com/marathi/bharti-airtel-rs649-postpaid-plan-offer-90-gb-data-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/bharti-airtel-rs649-postpaid-plan-offer-90-gb-data-in-marathi/#respond Fri, 29 Jun 2018 12:31:13 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1113 एयरटेल चा हा 90जीबी डाटा रोल ओवर सुविधे सह येतो. म्हणजे एक महिन्यात सर्व 90 जीबी न संपल्यास उरलेले डाटा पुढील महिन्याच्या ​90जीबी डाटा मध्ये जोडला जाईल.

The post 90जीबी डाटा वाला एयरटेलचा ‘हा’ प्लान देईल जियो-वोडाफोन ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल आपल्या प्लान्स आणि आॅफरच्या जोरावर देशातील टेलीकॉम बाजारात मजबूत स्थितीत आहे. बाजारातील परिस्थिती बघून आणि अन्य कंपन्यांना उत्तर देण्यासाठी एयरटेल वेळोवेळी आपल्या टॅरिफ प्लान्स मध्ये बदल करत असते. आता पुन्हा एकदा आपल्या जुना प्लान अपडेट करत एयरटेल जियो, वोडाफोन व आयडिया सारख्या कंपन्यांना टक्कर दिली आहे. एयरटेल आता आपल्या प्लान मध्ये एक महिन्यासाठी 90जीबी 4जी डाटा देत आहे.

एयरटेल ने ‘माय प्लान इनफिनिटी’ अंतर्गत 649 रुपयांचा प्लान जाहीर केला आहे. हा एक पोस्ट पेड प्लान आहे जो एयरटेल ने अपडेट केला आहे. या प्लान अंतर्गत ग्राहकांना आधी एक बिलिंग सायकल म्हणजे एक महिन्यासाठी एकूण 50जीबी डाटा दिला जात होता जो 4जी व 3जी स्पीड वर वापरता येत होता. अवहाला नुसार आता नवीन बदलांनंतर एयरटेल यूजर्सना या प्लान मध्ये एक महिन्यासाठी 90जीबी इंटरनेट डाटा मिळेल.

एयरटेल चा हा 90जीबी डाटा रोल ओवर सुविधे सह येतो. म्हणजे एक महिन्यात सर्व 90 जीबी न संपल्यास उरलेले डाटा पुढील महिन्याच्या ​90जीबी डाटा मध्ये जोडला जाईल. इंटरनेट डाटा सोबत या प्लान मध्ये पूर्ण महिन्यासाठी मोफत नॅशनल वॉयस कॉल मिळतात जे रोमिंग मध्ये पण वापरता येतात. यासोबतच एयरटेल आपल्या प्लान मध्ये रोज 100एसएमएस पण देत आहे.

विशेष म्हणजे याच आठवड्यात ट्राई चा एक अहवाल समोर आला होता ज्यात एप्रिल मध्ये वेगवेगळ्या टेलीकॉम कंपन्यांनी मिळवलेल्या सब्सक्राइबर्स चे आकडे आहेत. या अहवालात सांगण्यात आले आहे की एप्रिल मध्ये जियो ने 96 लाख सब्सक्राइबर्स मिळवले होते. तसेच या लिस्ट मध्ये आयडिया ने 55 लाख सब्सक्राइबर्स मिळवले तर एयरटेल 45 लाख सब्सक्राइबर्स सह तिसर्‍या नंबर वर आहे.

The post 90जीबी डाटा वाला एयरटेलचा ‘हा’ प्लान देईल जियो-वोडाफोन ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bharti-airtel-rs649-postpaid-plan-offer-90-gb-data-in-marathi/feed/ 0
82 दिवसांसाठी रोज 3जीबी 4जी डाटा देत आहे एयरटेल, लॉन्च केला हा धमाकेदार प्लान https://www.91mobiles.com/marathi/airtel-558-prepaid-recharge-plan-3gb-data-per-day-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-558-prepaid-recharge-plan-3gb-data-per-day-in-marathi/#respond Mon, 11 Jun 2018 08:18:39 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=853 एयरटेल यूजर्स माय एयरटेल अॅप वर जाऊन या प्लान ची उपलब्धता जाणून घेऊ शकतात.

The post 82 दिवसांसाठी रोज 3जीबी 4जी डाटा देत आहे एयरटेल, लॉन्च केला हा धमाकेदार प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एयरटेल ने भारतीय टेलीकॉम बाजारातील स्मार्टफोन यूजर्सना आपल्या नेटवर्क सोबत जोडण्यासाठी आपल्या 28 दिवसांची वॅलिडिटी असणार्‍या 149 रुपयांच्या प्लान मध्ये बदल केले आहेत. यात 1जीबी ऐवजी आता 2जीबी डाटा मिळेल. या अपडेट नंतर लगेचच एयरटेल ने जास्त वॅलिडिटी हवी असणार्‍या यूजर्स साठी पण एक खुपच शानदार प्लान सादर केला आहे. एयरटेल ने 82 दिवसांच्या वैधता असलेला प्लान आणला आहे जो रोज 3जीबी 4जी इंटरनेट डाटा देईल.

एयरटेल ने 558 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे. हा प्लान फक्त प्री-पेड ग्राहकांसाठी आहे. असे यूजर ज्यांना जास्त वॅलिडिटी वाले प्लान हवे आहेत आणि जास्त डाटा वापरतात, त्यांच्यासाठी एयरटेल चा हा प्लान खूपच चांगली आॅफर ठरू शकते. एयरटेल चा हा प्लान 82 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान मध्ये रोज 3जीबी 4जी इंटरनेट डाटा मिळेल.

3जीबी डाटा रोज या हिशोबाने एयरटेल यूजर्सना 82 दिवसांसाठी एकूण 246जीबी 4जी डाटा मिळेल. इंटरनेट डाटा व्यतिरिक्त अन्य सेवा पाहता एयरटेल या प्लान अंतर्गत 82 दिवसांसाठी अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉलिंग ची सुविधा देत आहे. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील. त्याचबरोबर एयरटेल यूजर्सना 82 दिवस रोज 100 एसएमएस पण मिळतील.

एयरटेल ने हा नवीन प्लान सध्य काही निवडक सर्कल्स मध्ये सादर केला आहे जो काही दिवसांमध्ये संपूर्ण देशात रोलआउट केला जाईल. एयरटेल यूजर्स माय एयरटेल अॅप वर जाऊन या प्लान ची उपलब्धता जाणून घेऊ शकतात. अजून एक बातमी म्हणजे प्रतिदिन 3जीबी डाटा सह एयरटेल ने आपला जुना 349 रुपयांचा प्लान पण अपडेट केला आहे जो 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो.

The post 82 दिवसांसाठी रोज 3जीबी 4जी डाटा देत आहे एयरटेल, लॉन्च केला हा धमाकेदार प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-558-prepaid-recharge-plan-3gb-data-per-day-in-marathi/feed/ 0
एयरटेल देत आहे जियो पेक्षा मोठी आॅफर, 149 रुपयांमध्ये मिळेल 56जीबी 4जी डाटा आणि वॉयस कॉल मोफत https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs149-plan-offer-2gb-data-per-day-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs149-plan-offer-2gb-data-per-day-in-marathi/#respond Mon, 11 Jun 2018 06:14:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=850 हा पॅक कोणत्याही प्लान च्या वॅलिडिटी सोबत जोडला जातो आणि त्या प्लान मध्ये रोज 1जीबी अतिरिक्त डाटा देतो.

The post एयरटेल देत आहे जियो पेक्षा मोठी आॅफर, 149 रुपयांमध्ये मिळेल 56जीबी 4जी डाटा आणि वॉयस कॉल मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी सध्या आपल्या यूजर्स साठी एका पेक्षा एक प्लान सादर करत आहे. कुठे ना कुठे तरी सर्वांना माहिती आहे की हे चांगले प्लान्स आणून कंपनी बाजारातील स्पर्धेत टिकून राहू इच्छिते. बाजारातील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी एयरटेल काही दिवसांपूर्वी 193 रुपयांचा स्पेशल पॅक सादर केला होता तर आता कपंनी ने आपल्या जुन्या 149 रुपयांचा प्लान अपडेट केला आहे.

एयरटेल चा 149 रुपयांचा प्लान 28 दिवसांच्या वैधता सह येतो. या प्लान मध्ये आधी रोज 1जीबी डाटा मिळत होता पण अपडेट नंतर ग्राहकांना 2जीबी डाटा प्रतिदिन मिळेल. म्हणजे जिथे आधी एकूण 28जीबी डाटा मिळत होता तिथे आता 56जीबी डाटा मिळेल. डाटा सह अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉल मिळतील तसेच रोज 100एसएमएस पण मिळतील.

एयरटेल चा 193 रुपयांचा प्लान एक अॅड आॅन पॅक आहे. हा पॅक कोणत्याही प्लान च्या वॅलिडिटी सोबत जोडला जातो आणि त्या प्लान मध्ये रोज 1जीबी अतिरिक्त डाटा देतो. जर एयरटेल कस्टमर कडे 28 दिवस वॅलिडिटी वाला प्लान आहे ज्यात रोज 1 जीबी डाटा मिळत आहे, त्या प्लान सोबत 193 रुपयांचा अॅड आॅन पॅक घेतल्यास 28 दिवसांसाठी रोज 2जीबी डाटा मिळायला सुरवात होईल.

त्याचप्रमाणे ग्राहकांनी एयरटेल चा 509 रुपयांचा प्लान घेतला असेल जो 90 दिवसांसाठी 1.4जीबी डाटा प्रतिदिन देत असेल आणि या प्लान सोबत 193 रुपयांचा अॅड आॅन पॅक घेतला गेल्यास कस्टमरला 90 दिवसांसाठी रोज 2.4जीबी 4जी डाटा मिळणे सुरू होईल.

The post एयरटेल देत आहे जियो पेक्षा मोठी आॅफर, 149 रुपयांमध्ये मिळेल 56जीबी 4जी डाटा आणि वॉयस कॉल मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs149-plan-offer-2gb-data-per-day-in-marathi/feed/ 0