Bharti Airtel अनेक वर्षांपासून इंडियन टेलीकॉम मार्केट मध्ये आपली सेवा देत आहे. देशात इंटरनेटच्या सुरवातीपासून आज 4G पर्यंत एयरटेल ने सतत आपल्या ग्राहकांना बेस्ट सर्विस देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. Airtel देशातील पहिली खाजगी टेलीकॉम कंपनी आहे जिने भारतात 3G नेटवर्कची सुरवात केली होती. कंपनीने 3G नेटवर्क बेंगलुरु पासून सुरु केला होता जो आज देशातील कानाकोपऱ्यात उपलब्द आहे. पण आता Airtel ने आपली 3G सर्विस बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने देशात आपला 3G नेटवर्क हटवण्यास सुरवात केली आहे आणि Airtel च्या या निर्णयामुळे इंडियन टेलीकॉम मार्केटचा चेहरा पूर्णपणे बदलणार आहे.
Airtel ने घोषणा केली आहे कि कंपनी भारतात आपली 3G सर्विस बंद करणार आहे. Airtel ने 3G नेटवर्क हटवण्यास सुरवात कोलकात्यापासून केली आहे. कंपनीने सांगिलते आहे कि कोलकात्यात Airtel ची 3G टेक्नोलॉजी हटवण्याचे काम सुरु झाले आहे जे काही दिवसात पूर्ण होईल. एयरटेल द्वारा कोलकात्यामधून 3G हटवल्यानंतर तिथे या कनेक्टिविटी वर कोणताही फोन व सिम कार्ड चालणार नाही. Airtel नुसार 3G सर्विस हटवण्यासोबतच हा 4G नेटवर्क वर शिफ्ट केला जाईल.
Airtel नुसार वरील सर्कल मध्ये 3G 4G नेटवर्क वर अपग्रेड केला जाईल. आता पर्यंत कंपनी सर्कल मध्ये 3G नेटवर्क देण्यासाठी 900 MHz band spectrum चा वापर केला जात होता. पण आता 3जी नेटवर्क बंद केल्यानंतर हेच बँड स्पेक्ट्रम नव्याने फ्रेम केले जातील. Airtel म्हणते कि 900 MHz फ्रीक्वेंसी वर चालणाऱ्या या band spectrum च्या फ्रीक्वेंसी मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही आणि 900 MHz वरच कंपनी 4G कनेक्टिविटी देईल.
असा आहे Airtel चा प्लान
3G साठी वापरात असलेल्या 900 MHz band spectrum ला अपग्रेड करण्यासाठी Airtel कंपनी L900 टेक्नोलॉजीचा वापर करेल. या टेक्नॉलॉजी द्वारे स्पेक्ट्रम बंद करून फ्रिक्वेंसी तीच असेल पण या फ्रिक्वेंसी वर 3G ऐवजी 4G सिग्लन मिळतील. विशेष म्हणजे एखाद्या बँड स्पेक्ट्रमची फ्रिक्वेंसी जितकी जास्त असते त्याची पावर तेवढीच कमी होते. त्यामुळे 900 MHz फ्रिक्वेंसी वाला हा स्पेक्ट्रम जास्त ताकदवान 4G सिग्नल देऊ शकेल.
विशेष म्हणजे Airtel सध्या 2300 Mhz आणि 1800 Mhz बँड वर आपली 4G सर्विस देत आहे. पण आता 900 MHz फ्रिक्वेंसी वाले बँड स्पेक्ट्रम पण कोलकात्यात पूर्णपणे 4G नेटवर्क देतील. 900 MHz बँड वर 4G नेटवर्क दिल्यामुळे घरात, बेसमेंट मध्ये किंवा कोणत्याही इंडोर जागी फोन नेटवर्क जास्त क्लियर व चांगल्या पद्धतीने येईल. म्हणजे एकीकडे Airtel आपली 3G सर्विस बंद करेल तर दुसरीकडे एयरटेल नेटवर्क वर 4G सर्विस आधीपेक्षा जास्त फास्ट होईल.
Airtel यूजर्स वर पडणारा प्रभाव
कंपनी नुसार Airtel द्वारा 3G सर्विस बंद केल्यामुळे ग्राहकांवर सकारात्मक प्रभावच पडेल. कपंनीने सर्व 3G कस्टमर्सना वेळोवेळी मेसेज व नोटिफिकेशन्स पाठवल्या जातील आणि त्यांना सिम अपग्रेड करणे किंवा मोबाईल हँडसेट अपग्रेड करण्यास सांगितले जाईल. तसेच ज्या 3जी ग्राहकांकडे आधीपासूनच 4जी हँडसेट आणि सिम आहे त्यांचा नेटवर्क आपोआप अपग्रेड केला जाईल.
विशेष म्हणजे Airtel कोलकात्यात 3G सर्विस बंद करत आहे तर दुसरीकडे कंपनी सर्कल मध्ये आपली 2G सर्विस सध्या कायम ठेवणार आहे. भारतात सध्या Reliance Jio हीच एक अशी कंपनी आहे जी फक्त 4G सर्विस देते. तसेच Airtel द्वारा 3G पूर्णपणे बंद केल्यानंतर या कंपनीच्या यूजर्सना आधीपेक्षा जास्त चांगली 4G कनेक्टिविटी मिळेल.