iQOO Neo 7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 05 Apr 2023 05:30:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 iQOO Neo 6 च्या किंमतीत 5,000 रुपयांची मोठी कपात; जाणून घ्या नवी प्राइस https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-6-price-in-india-slashed-rs-5000/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-6-price-in-india-slashed-rs-5000/#respond Wed, 05 Apr 2023 05:29:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20044 चिनी स्मार्टफोन निर्माता ब्रँड आयकूनं काही दिवसांपूर्वी आपला नवीन फोन iQOO Neo 7 भारतात लाँच केला होता. आणि आता लागेचच कंपनीनं आपल्या जुन्या iQOO Neo 6 स्मार्टफोनची किंमत भारतात 5,000 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे आता फोनचा बेस व्हेरिएंट 24,999 रुपयांमध्ये घरी घेऊन येत येईल. कंपनीनं ही कपात स्टॉक संपवण्यासाठी केली असली तरी या प्राइस […]

The post iQOO Neo 6 च्या किंमतीत 5,000 रुपयांची मोठी कपात; जाणून घ्या नवी प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO Neo 6 च्या किंमतीत 5000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
  • आता 24,999 रुपयांमध्ये 8GB/128GB मॉडेल आणि 29,999 रुपयांमध्ये 12GB/256GB मॉडेल मिळेल.
  • नवीन किंमत आयकू आणि अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर लागू झाली आहे.

चिनी स्मार्टफोन निर्माता ब्रँड आयकूनं काही दिवसांपूर्वी आपला नवीन फोन iQOO Neo 7 भारतात लाँच केला होता. आणि आता लागेचच कंपनीनं आपल्या जुन्या iQOO Neo 6 स्मार्टफोनची किंमत भारतात 5,000 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे आता फोनचा बेस व्हेरिएंट 24,999 रुपयांमध्ये घरी घेऊन येत येईल. कंपनीनं ही कपात स्टॉक संपवण्यासाठी केली असली तरी या प्राइस रेंजमध्ये अजूनही iQOO Neo 6 एक चांगला पर्याय म्हणता येईल. हा फोन मे 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता आणि याचे रिव्युज चांगले आहेत. चला जाणून घेऊया iQOO Neo 6 ची नवी किंमत.

आयकू नियो 6 ची नवीन किंमत

iQOO Neo 6 जेव्हा लाँच झाला होता तेव्हा 29,999 रुपयांमध्ये 8GB/128GB मॉडेल आणि 33,999 रुपयांमध्ये 12GB/256GB व्हर्जन सादर करण्यात आला होता. आता कपातीनंतर हे मॉडेल्स अनुक्रमे 24,999 रुपये आणि 29,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाले आहेत. ही नवीन किंमत अ‍ॅमेझॉन आणि आयकूच्या वेबसाइटवर लागू झाली आहे. तसेच हा फोन नो-कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेता येईल. iQOO Neo 6 स्मार्टफोन भारतात डार्क नोवा, सायबर रेज आणि मॅव्हरीक ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध झाला आहे. हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 Lite 5G झाला भारतात लाँच; फोनमध्ये 108MP कॅमेऱ्यासह 16GB रॅम

आयकू नियो 6 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.62″ FHD AMOLED Display
  • Snapdragon 870 SoC
  • 64MP Triple rear camera
  • 80W, 4700mAh Battery

iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा फुलएचडी+ ई4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, एचडीआर10+, 1,300 निट्झ ब्राइटनेस आणि मध्यभागी पंचकट होलला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, जोडीला ग्राफिक्ससाठी एड्रेनो 650 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी आयकू नियो 6 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा सॅमसंग जीडब्लू1पी सेन्सर मुख्य कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे, जो ओआयएस आणि एफ 1.89 अपर्चरसह येतो. जोडीला 8 मेगापिक्सलची लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हे देखील वाचा: 60MP Selfie कॅमेऱ्यासह Motorola Edge 40 Pro ग्लोबली लाँच; क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरची ताकदही यात

आयकू नियो 6 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएसवर चालतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,700एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 80वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर या डिवाइसमध्ये लिक्विड कुलिंग, स्टिरियो स्पिकर्स, सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि हाय-फाय ऑडिओ असे फीचर्स देखील मिळतात.

The post iQOO Neo 6 च्या किंमतीत 5,000 रुपयांची मोठी कपात; जाणून घ्या नवी प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-6-price-in-india-slashed-rs-5000/feed/ 0
12GB रॅम आणि 120W फास्ट चार्जिंग; गेमर्ससाठी iQOO Neo 7 झाला भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-launched-in-india-check-price-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-launched-in-india-check-price-specifications-sale-offer/#respond Thu, 16 Feb 2023 07:35:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17872 चिनी कंपनी आयकूचा दिवसेंदिवस भारतीय बाजारावरील आपली पकड मजबूत करत आहे. कंपनी बजेट, मिडरेंज आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करून ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. आज कंपनीनं भारतात मिडरेंजमध्ये पावरफुल मोबाइल फोन iQOO Neo 7 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गेमिंगसाठी खास आहे जो 12GB RAM आणि MediaTek Dimensity 8200 वर चालतो. या फोनमध्ये 120W fast charging […]

The post 12GB रॅम आणि 120W फास्ट चार्जिंग; गेमर्ससाठी iQOO Neo 7 झाला भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO Neo 7 गेमिंग फोन म्हणून भारतात लाँच झाला आहे.
  • 12GB RAM सह हा MediaTek Dimensity 8200 वर चालतो.
  • आयकू नियो 7 मध्ये 120W fast charging आणि 64MP Camera सारखे फीचर्स मिळतात.

चिनी कंपनी आयकूचा दिवसेंदिवस भारतीय बाजारावरील आपली पकड मजबूत करत आहे. कंपनी बजेट, मिडरेंज आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करून ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. आज कंपनीनं भारतात मिडरेंजमध्ये पावरफुल मोबाइल फोन iQOO Neo 7 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गेमिंगसाठी खास आहे जो 12GB RAM आणि MediaTek Dimensity 8200 वर चालतो. या फोनमध्ये 120W fast charging आणि 64MP Camera सारखे फीचर्स मिळतात. आयकू नियो 7 इंडिया प्राइस, सेल आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

iQOO Neo 7 Price

आयकू नियो 7 5जी फोन भारतीय बाजारात दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये आला आहे. 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 33,999 रुपयांमध्ये विकला जाईल. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय कार्डवर कंपनी 1500 रुपयांचा डिस्काउंट देत ज्यामुळे आयकू नियो 7 ची किंमत 28,499 रुपये आणि 32,499 रुपये होईल. हे देखील वाचा: 108Km रेंज सह येतेय 2023 Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर! लवकरच होणार लाँच

iQOO Neo 7 Specifications

  • 6.78″ AMOLED 120Hz Display
  • 12GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Dimensity 8200
  • 64MP Triple Camera
  • 120W fast charging
  • 5,000mAh Battery

आयकू नियो 7 स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 300हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. या स्क्रीनवर 1300निट्स ब्राइटनेस आणि 388पीपीआयचा सपोर्ट मिळतो जी 2डी ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आली आहे.

iQOO Neo 7 मध्ये प्रोसेसिंगसाठी 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 8200 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. गेमिंगसाठी हा फोन Large Vapor Chamber + multi-layer graphite 3D cooling सिस्टम टेक्नॉलॉजीसह येतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एआरएम माली-जी610 जीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो ओआयएस फीचरसह येतो. त्याचबरोबर रियर पॅनलवर एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची बोका लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: स्वस्तात 6GB RAM आणि 5000mAh ची बॅटरी; POCO C55 च्या भारतीय लाँचचा मार्ग मोकळा

iQOO Neo 7 अँड्रॉइड 13 ओएसवर बनलेला आहे तसेच फनटच ओएस 13 वर चालतो. या फोनमध्ये 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येतं. पावर बॅकअपसाठी आयकू नियो 7 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post 12GB रॅम आणि 120W फास्ट चार्जिंग; गेमर्ससाठी iQOO Neo 7 झाला भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-launched-in-india-check-price-specifications-sale-offer/feed/ 0
16GB RAM आणि 120W चार्जिंगसह iQOO Neo 7 Racing Edition लाँच https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-120w-fast-charging-smartphone-iqoo-neo-7-racing-edition-launched-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-120w-fast-charging-smartphone-iqoo-neo-7-racing-edition-launched-know-price-specifications/#respond Fri, 30 Dec 2022 06:22:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16525 आयकू ब्रँडनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये नवीन स्मार्टफोन iQOO Neo 7 Racing Edition लाँच केला आहे. याआधी कंपनीनं या सीरीजमध्ये iQOO Neo 7 5G आणि Neo 7 SE 5G फोन पण मार्केटमध्ये सादर केला आहे. हा नवीन रेसिंग एडिशन देखील पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येतो ज्यात 16GB RAM, Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट आणि 120W fast […]

The post 16GB RAM आणि 120W चार्जिंगसह iQOO Neo 7 Racing Edition लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आयकू ब्रँडनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये नवीन स्मार्टफोन iQOO Neo 7 Racing Edition लाँच केला आहे. याआधी कंपनीनं या सीरीजमध्ये iQOO Neo 7 5G आणि Neo 7 SE 5G फोन पण मार्केटमध्ये सादर केला आहे. हा नवीन रेसिंग एडिशन देखील पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येतो ज्यात 16GB RAM, Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट आणि 120W fast charging मिळते. पुढे आम्ही नवीन आयकू स्मार्टफोनची संपूर्ण माहिती दिली आहे.

iQOO Neo 7 Racing Edition Specifications

  • 6.78 FHD+ AMOLED डिस्प्ले
  • 16GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 120W fast charging

आयकू नियो 7 रेसिंग एडिशन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 6.78 इंचाच्या फुलएचडी+ ला सपोर्ट करतो. ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी पंच-होल स्टाईलसह येते. हा आयकू मोबाइल 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो तसेच यात एचडीआर10+ सारखे फीचर्स देखील मिळतात. या स्मार्टफोनची थिकनेस फक्त 8.5एमएम आहे तसेच वजन 197ग्राम आहे. हे देखील वाचा: सर्वात शानदार कॅमेरा फोनवर 17,000 रुपयांची सूट; आताच खरेदी करा स्वस्त Google Pixel 6a

iQOO Neo 7 Racing Edition अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो ओरिजन ओएससह चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी हा एड्रेनो 730 जीपीयूला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी वर चालतो.

फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 रेसिंग एडिशनच्या बॅक पॅनलवर एफ/1.88 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 6GB RAM सह समोर आला Samsung Galaxy A34 5G; लवकरच येणार बाजारात

iQOO Neo 7 Racing Edition Price

चीनमध्ये आयकू नियो 7 रेसिंग एडिशन चार स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. यात बेस मॉडेल 8GB RAM+128GB storage ला सपोर्ट करतो ज्याची किंमत CNY 2799 म्हणजे जवळपास 33,000 रुपये आहे. तसेच 12GB+256GB व्हेरिएंट CNY 2999 (जवळपास 35,500 रुपये), 16GB+256GB व्हेरिएंट CNY 3299 (जवळपास 39,000 रुपये) तर सर्वात मोठा 16GB RAM + 512GB storage व्हेरिएंट CNY 3599 म्हणजे जवळपास 42,800 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.

The post 16GB RAM आणि 120W चार्जिंगसह iQOO Neo 7 Racing Edition लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-120w-fast-charging-smartphone-iqoo-neo-7-racing-edition-launched-know-price-specifications/feed/ 0
मीडियाटेक डिमेन्सिटी 8200 प्रोसेसरसह येऊ शकतो iQOO Neo 7 SE; लीक झाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-and-512gb-storage-phone-iqoo-7-se-specification-leak/ https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-and-512gb-storage-phone-iqoo-7-se-specification-leak/#respond Wed, 23 Nov 2022 03:33:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15246 गेल्याच महिन्यात iQOO Neo 7 चीनमध्ये लाँच करण्यात आला होता आणि हा फोन त्या बजेटमध्ये एक शानदार डिवाइस असल्याचं म्हटलं जातं. आता कंपनी याचा स्वस्त व्हेरिएंट सादर करणार आहे. लवकरच कंपनी iQOO Neo 7 SE सादर करू शकते, अशी बातमी आली आहे. या फोनबद्दल एक पोस्टर लीक झाला आहे त्यानुसार फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरसह […]

The post मीडियाटेक डिमेन्सिटी 8200 प्रोसेसरसह येऊ शकतो iQOO Neo 7 SE; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्याच महिन्यात iQOO Neo 7 चीनमध्ये लाँच करण्यात आला होता आणि हा फोन त्या बजेटमध्ये एक शानदार डिवाइस असल्याचं म्हटलं जातं. आता कंपनी याचा स्वस्त व्हेरिएंट सादर करणार आहे. लवकरच कंपनी iQOO Neo 7 SE सादर करू शकते, अशी बातमी आली आहे. या फोनबद्दल एक पोस्टर लीक झाला आहे त्यानुसार फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरसह 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. अलीकडेच या फोनची काही माहिती लीक झाली होती. आज पोस्टर समोर आल्यामुळे स्पष्ट झाला आहे की कंपनी या फोनची योजना बनवत आहे.

iQOO Neo 7 SE चे लीक स्पेसिफिकेशन

वर सांगितल्याप्रमाणे एसई मॉडेल थोडा स्वस्त असेल. त्यामुळे अलीकडेच आलेल्या आयकू नियो 7 प्रमाणे मीडियाटेक डिमेन्सिटी 900 प्रोसेसर ऐवजी iQOO Neo 7 SE मध्ये कंपनी मीडियाटेक डिमेन्सिटी 8200 प्रोसेसरसह सादर करणार आहे. मीडियाटेक डिमेन्सिटी सीरीजचे प्रोसेसर 5G सह येतात त्यामुळे या फोनमध्ये तुम्हाला 5जी सपोर्ट नक्कीच मिळेल. तसेच हा फोन चार मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. फोन 8GB RAM सह 256GB स्टोरेज, 12GB RAM सह 256GB स्टोरेज आणि 12GB RAM सह 512GB स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. हे देखील वाचा: सॅमसंगचा नवा budget 5G Smartphone! सिम कार्ड न टाकताच मिळणार रेंज, स्वस्तात वॉटरप्रूफ फोन

फोनची डिजाइन पाहता हा फोन नियो 7 सारखाच दिसेल. फोनच्या मागे चौकोनी शेपमध्ये कॅमेरा ब्रॅकेट असेल, ज्यात दोन कॅमेरा एकीकडे आणि एक कॅमेरा वेगळा मिळेल. तसेच फोनची बॉडी ग्लासमध्ये आहे आणि फ्रंटला पंच होल स्क्रीन बघायला मिळेल. महत्वाची बाब म्हणजे कंपनी स्वस्त मॉडेलमध्ये देखली AMOLED E5 डिस्प्ले पॅनलचा वापर करत आहे. या फोनची स्क्रीन साइज 6.78 इंच असू शकते.

आयकू नियो 7 एसई चा पावर बॅकअप पाहता हा फोन 5,000mAh ची बॅटरीसह 120W चार्जिंग स्पीडसह उपलब्ध होईल. कॅमेरा बाबत कोणतीही खास माहिती आली नाही परंतु रुमरनुसार हा फोन 50 एमपीच्या ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह उपलब्ध होऊ शकतो. यात तुम्हाला कॅमेऱ्यासह ओआयएस सपोर्ट मिळेल, हे विशेष. हे देखील वाचा: Chup OTT Release: ‘सीता रामम’ नंतर Dulquer Salmaan चा नवा चित्रपट OTT वर; ‘चुप’ मूव्ही येतोय ऑनलाइन

iQOO Neo 7 सीरीज

iQOO Neo 7 सीरीजचा पहिला फोन चीनमध्ये लाँच हो चुका आहे आणि आशा आहे की पुढील महिन्याच्या सुरुवातीला हा भारतात देखील लाँच होईल. तसेच iQOO Neo 7 SE आणि Neo 7S बद्दल काही लीक आले आहेत. कंपनी या सीरीजमध्ये 3 मॉडेल सादर करणार आहे, अशी चर्चा आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post मीडियाटेक डिमेन्सिटी 8200 प्रोसेसरसह येऊ शकतो iQOO Neo 7 SE; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-and-512gb-storage-phone-iqoo-7-se-specification-leak/feed/ 0