Jio 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio यूजर्सना अजून एक झटका: अकाउंट मधून गायब झाले 50 रुपयांचे कॅशबॅक वाउचर https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-50-cash-back-voucher-expired/ https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-50-cash-back-voucher-expired/#respond Fri, 27 Mar 2020 15:27:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6926 याचाच फायदा कंपनीला झाला आणि कोणत्याही नोटिफिकेशनविना हे वाउचर सर्वांच्या अकाउंट मधून गायब झाले.

The post Jio यूजर्सना अजून एक झटका: अकाउंट मधून गायब झाले 50 रुपयांचे कॅशबॅक वाउचर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
माझ्याकडे जियोचा एक नंबर आहे आणि त्याची वैधता संपली होती. मी रिचार्ज करत होतो आणि मी रोज 2जीबी 4जी डेटा प्लान घेतला ज्याची किंमत 444 रुपये आहे. प्लान आधी महाग झाले होते तरी देखील होते मी खुश होतो कारण यात अजून 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. कारण माझ्या जियो अकाउंट मध्ये 20 पेक्षा जास्त कॅशबॅक वाउचर उरले होते. परंतु जेव्हा मी रिचार्ज करायला गेलो तेव्हा माझा आनंद हवेत विरून गेला. कारण रिचार्ज करताना कॅशबॅक कूपन रिडीम करण्याचा ऑप्शनच येत नव्हता. मला वाटले कदाचित या प्लान मध्ये कॅशबॅक मिळत नसेल म्हणून मी चेक करण्यासाठी यापेक्षा महाग आणि स्वस्त दोन्ही प्लान बदलून बघितले आणि तेव्हा मला समजले कि कोणत्याही प्लान मध्ये 50 रुपयांचा कॅशबॅक असलेले वाउचर नाही येत आहेत.

त्यानंतर मी माझ्या जियो अकाउंट मध्ये जाऊन जियो 50 रुपयांच्या कॅशबॅक वाउचरची माहिती घेतील तेव्हा तिथे मेसेज होता कि तुमचे कूपन एक्सपायर अर्थात संपले आहेत. 20 वाउचर म्हणजे जवळपास 2,000 रुपयांचे नुकसान मला झाले होते. त्यानंतर मी माझी माहितीतील सर्व लोक ज्यांच्याकडे जियो सिम आहे त्यांना याविषयी विचारले आणि प्रत्येकाकडून तेच उत्तर मिळाले. सर्वांच्या अकाउंट मधून जियो कॅशबॅक वाउचर गायब झाले होते. तेव्हा समजले कि कंपनीने हे वाउचर काढून टाकले आहेत.

कंपनी काय बोलली

त्यानंतर मी जियो कडे याविषयी विचारणा केली तेव्हा आम्हाला संपूर्ण माहिती सांगण्यात आली. आम्हाला सांगण्यात आले कि जियोच्या कॉम्लिमेंटरी कॅशबॅक वाउचरचा कालावधी संपला होता. त्यामुळे ते आपोतुम्ही यूजरच्या अकाउंट मधून गायब झाले. आम्हाला एक स्क्रीनशॉट मिळाला ज्यात जियो कस्टमर एक्जिक्यूटिवने एका यूजरला उत्तर देताना हे सांगितले होते.

आम्हाला असे पण सांगण्यात आले कि जियोचे कॅशबॅक वाउचर गेल्यावर्षी अक्टूबर म्हणजे कि 2019 मधेच संपले होते. परंतु कंपनीने तेव्हा आईओसी चार्ज सुरु केला होता आणि प्लान पण महाग झाले होते. त्यामुळे संपलेली वैधता चार महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती. परंतु हि वैधता पण 29 फेब्रुवारी 2020 ला पुन्हा संपली. आता यूजर हीच लाभ घेऊ शकणार नाहीत.

कोणालाच नव्हती याची खबर

जियोने जेव्हापासून शुल्क घेण्यास सुरवात केली होती तेव्हापासून कॅशबॅक वाउचर दिले जात होते आणि हे वाउचर 303 रुपयांपेक्षा वरच्या रिचार्ज वर वापरता येत होते. हे तुम्ही इतरांना ट्रांसफर करू शकत नव्हता आणि जच्याही वाउचर आहेत तोच रिडीम करू शकत होता. यूजरच्या अकाउंट मध्ये याची माहिती देण्यात आली नव्हती कि हे कधी संपणार. याचाच फायदा कंपनीला झाला आणि कोणत्याही नोटिफिकेशनविना हे वाउचर सर्वांच्या अकाउंट मधून गायब झाले. आम्ही खूप शोध घेतला पण तेव्हा एका जागी कंपनीच्या वेबसाइट वर याची माहिती देण्यात आली आहे.

आता काय स्थिती आहे

खास बाब अशी आहे कि मी जवळपास 10 लोकांना जियो कॅशबॅक वाउचर बाबत विचारणा केली आणि प्रत्येकाकडे जवळपास 20 कूपन होते जे आता दिसत नाहीत.

जियो कूपनची वैधता संपल्यामुळे यूजर्सना दुप्पट नुकसान झाले आहे. एकीकडे सर्व प्लान महाग झाले आहेत तर दुसरीकडे मिळणारी ऑफर पण संपली आहे. याव्यतिरिक्त जियो यूजर्सना आईयूसी चार्ज पण द्यावा लागत आहे. जरी प्रत्येक मंथली प्लान मध्ये कंपनी दुसऱ्या नेटवर्कसाठी कॉलिंग मिनट देत आहे पण एयरटेल किंवा वोडाफोन आईडिया प्रमाणे अनलिमिटेड फ्री असे प्लॅन्स नाहीत.

The post Jio यूजर्सना अजून एक झटका: अकाउंट मधून गायब झाले 50 रुपयांचे कॅशबॅक वाउचर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-50-cash-back-voucher-expired/feed/ 0
Jio ने दिला अजून एक झटका, या प्लानची वैधता कमी करून केली 24 दिवस https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-149-plan-revised-all-in-one-plan-24-days-validity-iuc-minutes/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-149-plan-revised-all-in-one-plan-24-days-validity-iuc-minutes/#respond Mon, 11 Nov 2019 09:58:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5738 आता हा 149 रुपयांचा प्लान फक्त 24 दिवसांसाठी वैध असेल.

The post Jio ने दिला अजून एक झटका, या प्लानची वैधता कमी करून केली 24 दिवस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने दीर्घकाळ आपल्या यूजर्सना फ्री सर्विस आणि खूप कमी टॅरिफ वर बेनिफिट्स दिले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून Jio आपल्या कठोर आणि छुप्या निर्णयांमुळे टेलीकॉम यूजर्सच्या टीकेस पात्र ठरली आहे. अनलिमिटेड फ्री वॉयस कॉलिंगच्या वाचनानंतर जेव्हा Jio ने आईयूसी च्या नावावर लोकांकडून नॉन जियो नंबर वर कॉल करण्याचे पैसे घेतले तेव्हा अनेक Jio यूजर्सना हे आवडले नाही. आपल्या या कठोर कारवाईनंतर आता Jio ने आपल्या यूजर्सना अजून एक झटका दिला आहे. कंपनीने अपने 149 रुपयांच्या प्रसिद्ध JIO ALL-IN-ONE PLAN ची वैधता 4 दिवस कमी केली आहे.

Jio ने IUC चार्ज सहित म्हणजे नॉन जियो नंबर्स वर कॉलिंग साठी काही खास प्लान सादर केले आहेत, ज्यात 149 रुपयांचा प्लान खूप महत्वाचा आहे. हा प्लान कंपनीने 28 दिवसांच्या वैधतेसह सादर केला गेला होता, ज्यात यूजर्सना 4जी इंटरनेट डेटा आणि एसएमएस सह ऑननेटवर्क तसेच ऑफनेटवर्क कॉलिंगची सुविधा पण मिळत होती. हा प्लान कंपनीने 28 दिवसांसाठी सादर केला होता. पण आता Reliance Jio ने प्लानची वैधता 4 दिवस कमी केली आहे. म्हणजे आता हा 149 रुपयांचा प्लान फक्त 24 दिवसांसाठी वैध असेल.

असे आहेत बेनिफिट

Reliance Jio च्या 149 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर आता पासून हा प्लान 24 दिवसांच्या वैधतेसह येईल. या प्लान अंतर्गत कंपनी यूजर्सना रोज 1.5जीबी 4जी इंटरनेट डेटा देत आहे. या हिशोबाने यूजर्सना एका रिचार्ज मध्ये एकूण 36 जीबी 4जी डेटा मिळेल. तसेच कंपनी या प्लान मध्ये जियो नंबर वर तर अनलिमिटेड वॉयस कॉल देत आहे पण जियो व्यतिरिक्त इतर नेटवर्क वर कॉल करण्यासाठी Jio ग्राहकांना 300 मिनिट मिळतील. कंपनी प्लान मध्ये रोज 100 एसएमएस पण देत आहेत.

JIO ALL-IN-ONE PLANS

Jio च्या 222 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर हा प्लान पण प्रीपेड ग्राहकांसाठी आहे जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. कंपनी या प्लान मध्ये पण यूजर्सना रोज साठी 2 जीबी इंटरनेट डेटा देत आहे जो 4जी स्पीड वर वापरता येतो. या प्लान मध्ये ऑन नेटवर्क वॉयस कॉलिंग फ्री आहे तर ऑफ नेटवर्क कॉल साठी 1000 मिनिट्स दिले जातात.

Reliance Jio च्या प्लान्स बद्दल बोलायचे तर कंपनीने 333 रूपये, 444 रूपये आणि 555 रुपयांचे प्लान लॉन्च केले आहेत. जियो आपल्या प्लान मध्ये 1000 आईयूसी मिनिट्स देईल. कंपनीच्या 399 रुपयांच्या प्लान मध्ये 56 दिवसांच्या वैधतेसह रोज 2 जीबी डेटा मिळतो. त्याचप्रमाणे 444 रुपये आणि 555 रुपयांच्या प्लान मध्ये पण रोज 2 जीबी डेटा मिळत आहे. Jio चा 444 रुपयांचा प्लान 84 दिवसांसाठी येतो तर 555 रुपयांच्या प्लानची वैधता पण 84 दिवस आहे पण या प्लान मध्ये यूजर्सना 3000 आईयूसी मिनिट्स मिळतील.

The post Jio ने दिला अजून एक झटका, या प्लानची वैधता कमी करून केली 24 दिवस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-149-plan-revised-all-in-one-plan-24-days-validity-iuc-minutes/feed/ 0
Jio 555 प्लान vs Airtel 558 प्लान, जाणून घ्या कोणती कंपनी देत आहे जास्त बेनिफिट https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-rs-555-plan-bharti-airtel-rs-558-plan-comparison-benefits-data-voice-calling-free-iuc-offer/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-rs-555-plan-bharti-airtel-rs-558-plan-comparison-benefits-data-voice-calling-free-iuc-offer/#respond Mon, 04 Nov 2019 13:19:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5667 Jio चा 555 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो तर Airtel ने आपला प्लान 82 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे.

The post Jio 555 प्लान vs Airtel 558 प्लान, जाणून घ्या कोणती कंपनी देत आहे जास्त बेनिफिट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम कंपन्यांमधील स्पर्धा काही लपून राहिलेली नाही. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या स्वस्तात जास्त बेनिफिट मिळणारे प्लान्स देतात तसेच स्वतःला इतरांपेक्षा चांगला बनवण्याची संधी सोडता नाहीत. देशातील दोन मोठ्या टेलीकॉम कंपन्या Reliance Jio आणि Bharti Airtel सुरवातीपासूनच स्पर्धेत पुढे आहेत. जेव्हा नेटवर्क निवडण्याची वेळ येते तेव्हा सामान्य माणूस गोंधळात पडतो कि Jio निवडावी कि Airtel. तसे पाहता या दोन्ही कंपन्यांकडे चांगले प्लान्स आहेत, पण Reliance Jio च्या 555 रुपये आणि Bharti Airtel च्या 558 रुपयांचा प्लान सध्या खूप चर्चेत आहे. जर तुम्ही पण दोन्ही नेटवर्कचे हे प्लान्स निवडणार असाल तर पुढे आम्ही दोन्ही कंपन्यांच्या प्लॅन्सची तुलना केली आहे कि कोणत्या नेटवर्क वर जास्त बेनिफिट मिळत आहे.

किंमत

सर्वात आधी प्लान्सची किंमत पाहता हे दोन्ही प्लान 500 रुपयांपेक्षा जास्तीच्या बजेट मध्ये येतात. Reliance Jio च्या प्लानची किंमत 555 रुपये आहे तर Bharti Airtel ने आपला प्लान 558 रुपयांमध्ये सादर केला आहे. म्हणजे Airtel च्या प्लानची किंमत Jio च्या प्लान पेक्षा 3 रुपये जास्त आहे.

वॅलिडिटी

Reliance Jio आणि Bharti Airtel दोन्ही कंपन्यांचे प्लान दीर्घ वैधतेसह येतात, म्हणजे यूजर एका रिचार्ज नंतर पुढील अडीच महिन्यांपेक्षा पण जास्त वेळ कोणत्याही अडचणीविना हे प्लान्स वापरू शकतात. Jio चा 555 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो तर Airtel ने आपला प्लान 82 दिवसांच्या वॅलिडिटी सह सादर केला आहे.

हे देखील वाचा: Jio चे 8 प्लान ज्यात गरज लागत नाही वेगळ्या कॉलिंग रिचार्जची, जाणून घ्या सविस्तर

इंटरनेट डेटा

आजकाल एखादा प्लान निवडण्यासाठी सर्वात आधी इंटरनेट डेटा बघितला जातो. Reliance Jio आपल्या 555 रुपयांच्या प्लान मध्ये रोज 2 जीबी 4G इंटरनेट डेटा देत आहे. म्हणजे संपूर्ण प्लानच्या वॅलिडिटी मध्ये यूजर्सना एकूण 168 जीबी (84 x 2 = 168) इंटरनेट डेटा मिळेल. तर Airtel आपल्या यूजर्सना 558 रुपयांच्या प्लान मध्ये Jio पेक्षा जास्त रोज 3 जीबी 4G डेटा देत आहे. एयरटेलच्या प्लान मध्ये संपूर्ण वॅलिडिटी साठी एकूण जीबी (82 x 3 = 246) 4जी इंटरनेट डेटा मिळेल.

कॉलिंग

Reliance Jio आणि Bharti Airtel ने आपल्या यूजर्सना फ्री अनलिमिटेड वॉयस कॉलिंग देण्याचा शब्द दिला आहे. पण Jio च्या प्लान मध्ये ऑननेटवर्क कॉलिंग तर पूर्णपणे फ्री आहे परंतु ऑफनेटवर्क कॉल करण्यासाठी कंपनी कडून फक्त 3000 मिनिटे देण्यात आली आहेत. तर Airtel ने आपल्या यूजर्ससाठी हे वॉयस कॉल पूर्णपणे मोफत ठेवले आहेत. ऑननेटवर्क व ऑफनेटवर्क दोन्हीवर अनलिमिटेड वॉयस कॉल करता येतील.

हे देखील वाचा: Jio ची दिवाळी अजूनही चालू, 699 रुपयांमध्ये JioPhone विकत घेण्याची ऑफर एक महीना अजून सुरु राहणार

कोणाचा प्लान आहे चांगला

Reliance Jio चा प्लान जरी Bharti Airtel च्या प्लानच्या तुलनेत 3 रुपयांनी स्वस्त असला तरी बेनिफिट्सच्या बाबतीती Airtel चा 558 रुपयांचा प्लान Jio च्या 555 रुपयांच्या प्लान पेक्षा कितीतरी जास्त फायदे देत आहे. प्रतिदिन डेटाच्या बाबतीती Airtel यूजर्सना Jio च्या पेक्षा रोज 1 जीबी 4G डेटा जास्त मिळेल. तर संपूर्ण प्लान मध्ये Airtel नेटवर्क वर Jio च्या तुलनेत 78 जीबी डेटा जास्त मिळत आहे.

त्याचप्रमाणे Jio नंबर वरून IUC द्वारे जास्त कॉलिंग करता येईल तर Airtel यूजर्स पूर्णपणे मोफत अनलिमिटेड कॉल करू शकतील. विशेष म्हणजे Jio यूजर्सना PayTm वरून रिचार्ज केल्यास 555 रुपयांच्या प्लान मध्ये 50 रुपयांचा कॅशबॅक पण मिळत आहे.

The post Jio 555 प्लान vs Airtel 558 प्लान, जाणून घ्या कोणती कंपनी देत आहे जास्त बेनिफिट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-rs-555-plan-bharti-airtel-rs-558-plan-comparison-benefits-data-voice-calling-free-iuc-offer/feed/ 0
Reliance Jio चे 3 वर्ष पूर्ण, जाणून घ्या 3 वर्षांतील 30 मोठे कारनामे https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-3rd-anniversary-india-jio-fiber-broadband-jiophone-volte-4g-data-free-voice-call-ott-dth-set-top-box/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-3rd-anniversary-india-jio-fiber-broadband-jiophone-volte-4g-data-free-voice-call-ott-dth-set-top-box/#respond Fri, 06 Sep 2019 15:09:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5251 आम्ही तुम्हाला कंपनीच्या 30 मोठे कारनामे सांगणार आहोत ज्यांच्यामुळे Reliance Jio फक्त भारतात नाही तर जागतिक स्थरावर प्रसिद्ध झाली आहे.

The post Reliance Jio चे 3 वर्ष पूर्ण, जाणून घ्या 3 वर्षांतील 30 मोठे कारनामे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आज पासून 3 वर्षांपूर्वी भारतीय मोबाईल यूजर्सनि असा विचार पण केला नव्हता कि त्यांना फ्री कॉलिंग, खुप स्वस्त दराने इंटरनेट आणि मोफत लाइव टीव्ही सारख्या सेवा मिळतील. 3 वर्षांपूवी 2GB 3G डेटा साठी महिन्याला 700 रुपयांपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागत होते पण आज 500 रुपयांपेक्षा पण कमी रुपयांत 91 दिवस रोज 2GB 4G डेटा दिला जात आहे. इतकेच नव्हे तर फ्री कॉलिंग आणि रोमिंग सह टीव्ही आणि मूवी सारख्या सेवा मोफत आहेत. आणि हे सर्व शक्य झाले आहे Reliance Jio मुळे. कंपनीने 5 सेप्टेंबर 2016 मध्ये आपल्या 4G सर्विसची सुरवात केली होती आणि त्यानंतर संपूर्ण भारतीय मोबाईल बाजार बदलला. Jio ला आज 3 वर्ष झाली आहेत आणि या 3 वर्षात कंपनीने असे कारनामे केले आहेत जे अनेक कंपन्या अनेक वर्षांत करू शकल्या नाहीत. Jio ला 3 वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून आम्ही तुम्हाला कंपनीच्या 30 मोठे कारनामे सांगणार आहोत ज्यांच्यामुळे Reliance Jio फक्त भारतात नाही तर जागतिक स्थरावर प्रसिद्ध झाली आहे.

1. 6 महिन्यांपर्यंत फ्री सर्विस

Jio ची एंट्री एखाद्या हीरो सारखीच झाली होती. बाजारात येताच Reliance Jio ने घोषणा केली होती कि कंपनीची प्रत्येक सर्विस लोकांना 6 महिन्यांपर्यंत पूर्णपणे फ्री दिली जाईल. तुमच्या लक्षात असेल कि तेव्हा कशाप्रकारे Jio सिम मिळवण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. फक्त 26 दिवसांत कंपनीने एक कोटी यूजर बेसचा आकडा गाठला होता. अशाप्रकरची सर्विस जगात आतापर्यंत कुठेच दिसली नाही.

2. Free कॉलिंग

Reliance Jio भारतातील पहली टेलीकॉम कंपनी आहे जिने आपल्या यूजर्सना फ्री वॉयस कॉलिंगची सुविधा दिली. Jio नेटवर्क वरून 6 महिन्यांपर्यंत लोकांनी अगदी मोफत कॉलिंग केली तर नंतर पण कंपनीने स्पष्ट केले कि ते फक्त डेटाचे पॅसे घेतील आणि वॉयस कॉलिंग आयुष्यभरासाठी फ्री असेल.

3. Free रोमिंग

Jio चे वॉयस कॉल पूर्णपणे निशुल्क आहेतच तसेच या फ्री कॉलिंग सेवेचा वापर रोमिंग मध्ये पण मोफत आहे. जियो नेटवर्क वर सर्व नॅशनल रोमिंग फ्री आहे.

4. स्वस्त डेटा

Jio चे सुरवातीचे 6 महीने यूजर्स साठी पूर्णपणे फ्री होते. तर 6 महिने झाल्यावर पण Reliance Jio ने आपले प्लान्स खुप स्वस्तात सादर केले होते. Jio चे डेटा प्लान इतर टेलीकॉम कंपन्यांपेक्षा सर्वात स्वस्त होते. आधी 1 जीबी डेटा साठी 400 रुपये द्यावे लागायचे. तर आज 400 मध्ये 84 दिवस रोज 1.5जीबी डेटा मिळत आहे.

5. फक्त 4G

Reliance Jio भारतातील एकमेव टेलीकॉम कंपनी आहे जी फक्त 4G नेटवर्क वर चालते. Jio ने थेट 4G पासून सुरवात केली होती. या कंपनी कडे 2G किंवा 3G नेटवर्क नाही.

6. Free VAS

फ्री कॉलिंग आणि रोमिंग सोबत जियो ने आपल्या यूजर्सना फ्री वॅस सर्विस पण दिल्या आहेत ज्यासाठी आधी यूजर्स 45 रुपये महिन्याला देत होते. कॉलर ट्यून यातील एक सर्विस आहे. आधी एका ट्यून साठी तुम्हाला 45 रुपये द्यावे लागत होते पण आज तुम्ही प्रत्येक मिनिटाला ट्यून बदलू शकता तेही मोफत.

7. Free मूवी

Reliance Jio ने आपल्या यूजर्सना मोबाईल वर मोफत मध्ये मूवी बघण्याची सुविधा पण दिली आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही तसेच हे चित्रपट कंपनीच्या इंटरनेट डेटा वरच चालतात. जियो सिनेमा ऍप वरून तुम्ही हे ऑनलाईन बघू शकता. तर काही मूवी ऑफलाइन डाउनलोड करता येतात.

8. Free म्यूजिक

जियो सर्विस लॉन्च सोबत कंपनीने जियो म्यूजिकची सुरवात केली होती. सध्या हि जियो सावन नावाने ओळखील जाते. यात तुम्ही मोफत ऑन लाइन म्यूजिक स्ट्रीम करू शकता.

9. Free लाईव टीव्ही

Reliance Jio आपल्या युजर्सना मोबाईल वर मोफत लाईव टीव्ही बघण्याची सुविधा पण देते. यासाठी यूजर्सना फक्त Jio TV ऍप फोन मध्ये घ्यावे लागेल.

10. होम सिम डिलीवरी

साहजिक आहे Jio चे इतके फायदे बघून अनेकांना कंपनीशी जोडले जायचे असेल. अशाच यूजर्स साठी Reliance Jio ने मोफत सिम डिलीवरी सर्विस पण सुरु केली होती, ज्यात यूजर्सना घरी जाऊन त्यांचा Jio SIM दिला जात होता.

11. VoLTE सर्विस

वर सांगितल्याप्रमाणे Reliance Jio भारतात फक्त 4G नेटवर्क देते. कंपनीने भारतात पहिल्यांदा 4जी वोएलटीई ची सर्विस दिली. या नेटवर्क वर हाईडेफिनेशन कॉलिंग दिली. नंतर दुसऱ्या कंपन्यांनी पण आपली 4जी वोएलटीई कॉलिंग सर्विस सुरु केली.

12. सर्वात जास्त डेटा वापर

Reliance Jio ने स्वस्तात डेटा पॅक दिल्यामुळे थोड्या वेळात जियो नंबर वन नेटवर्क ठरला ज्यावर सर्वात जास्त इंटरनेट डेटा वापरला गेला. 2017 च्या एका रिपोर्ट नुसार Jio नेटवर्क वर प्रत्येक महिन्याला सरासरी 110 कोटी जीबी पेक्षा पण जास्त डेटा वापरला गेला होता आणि Jio नेटर्वक वर एका महिन्यात 220 कोटी मिनिटांपेक्षा पण जास्त वेळ लोकांनी घालवला होता जो जगात सर्वात जास्त आहे आणि एक रेकॉर्ड आहे.

13. नंबर वन चा खिताब

4G नेटवर्क, फ्री सर्विस, स्वस्त डेटा आणि मोफत कॉलिंग सारख्या सेवांमुळे Reliance Jio जलद गतीने वाढली आहे. रिलायंस जियो ने स्वतःला सिद्ध करत कंपनीला 3 वर्ष पूर्ण होण्याआधीच स्वतःला नंबर वन इंडियन टेलीकॉम कंपनी बनवले आहे. आज Jio चा युजरबेस भारतात सर्वात जास्त आहे.

14. सर्वात बड़ा 4G नेटवर्क

Reliance Jio फक्त युजर जोडत नाही तर 4जी नेटवर्क कवरेज मध्ये पण देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. कंपनीचा दावा आहे कि 99 टक्के भारतीय लोकसंख्येपर्यंत जियो नेटवर्कचे कवरेज आहे.

15. डाउनलोड स्पीड

‘फक्त फ्री किंवा स्वस्त डेटा सर्विस देणे पुरेसे नाही तर त्या सर्विस मध्ये इंटरनेट स्पीड पण फास्ट असावा’, हे Reliance Jio ला चांगलेच माहित आहे. इंडियन टेलीकॉम रेग्यूलेटरी अथारिटी ट्राई ने आपल्या रिपोर्ट मध्ये अनेकदा सांगितले आहे कि Jio भारतात सर्वात वेगवान 4G डाउनलोड स्पीड देते.

16. सर्वप्रथम KYC आधारित वेरिफिकेशन

आधी सिम घेण्यासाठी भलीमोठी प्रक्रिया कारवी लागत होती. परंतु जियो ने फक्त आधार नंबर द्वारे सिम देण्यास सुरवात केली आणि देशात हि पहिली कंपनी होती जिने आधार द्वारे KYC सर्विस दिली आणि फार्म न भरता आणि फोटो न देता सिम दिले.

17. 10 कोटी ऍप डाउनलोड

Reliance Jio ने आपल्या अनेक सेवा एकाच प्लॅटफॉर्म वर देत My Jio App ची सुरवात केली होती. हि ऍप सर्विस यूजर्सना इतकी आवडली कि My Jio App पहिला भारतीय ऍप बनला जो 10 कोटी पेक्षा पण जास्त वेळा डाउनलोड केला गेला.

18. Jio Phone

टेलीकॉम क्षेत्रात कमाल दाखवल्यानंतर रिलायंस जियो ने मोबाईल बाजारात पण पाऊल टाकले आणि Jio Phone लॉन्च केला. Jio Phone ग्रामीण भागातील लोकांना लक्षात ठेऊन बनवण्यात आला होता जो खूप लोकप्रिय ठरला. याची मार्केटिंग पण कंपनीने अनोख्या पद्धतीने केली.

19. 4G फीचर फोन

Jio Phone लॉन्च करणे Reliance Jio चा मोठा कारनामा होता पण या मोबाईलच्या रूपात इंडियन यूजर्सना देशातील पहिला 4जी फीचर फोन मिळाला. Jio Phone असा फीचर फोन आहे जो 4G नेटवर्क वर चालतो.

20. सर्वात स्वस्त मासिक कॉलिंग आणि डेटा प्लान

Jio Phone साठी कंपनीने 49 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे ज्यात महिनाभर फ्री कॉलिंग सह तुम्हाला 2 जीबी 4जी डेटा मोफत मिळतो. डेटा आणि कॉलिंग साठी हा सर्वात स्वस्त मासिक प्लान आहे.

21. Free Jio Phone

रिलायंस जियो सर्विस प्रमाणे जियो 4जी फोन पण मोफत दिला जात होता. जियो फोन साठी शुल्क 1,500 रुपये ठेवण्यात आले होते पण हे सिक्योरिटी डिपॉजिट होते. हे पैसे 3 वर्षांनंतर परत दिले जातील आणि फोन पूर्णपणे मोफत होईल.

22. Jio बनली सर्वात मोठी फीचर फोन निर्माता

Jio Phone कंपनी साठी मोठे यश घेऊन आला. हा 4जी फीचर फोन लोकांना इतका आवडला कि Jio Phone चे करोडो यूनिट विकले गेले. Reliance Jio भारतातील नाही तर जगातील सर्वात जास्त फीचर फोन विकणारी कंपनी बनली.

23. Jio Fiber

Reliance Jio ची लेटेस्ट सर्विस आहे Jio Fiber. जियो फाइबर सह रिलायंस जियो ने देशातील ब्रॉडबँड बाजारात एंट्री केली आहे. Jio Fiber ऑप्टिल फाइबर केबल द्वारे अल्ट्रा फास्ट स्पीड इंटरनेट आणि अनेक अतिरिक्त सुविधा मिळतात. हि 5 सेप्टेंबरला Reliance Jio ला तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे बाजारात आली आहे.

24. 1 GBPS स्पीड

रिलायंस जियोच्या Jio Fiber सर्विसची सर्वात मोठी खासियत याची सुपर फास्ट इंटरनेट आहे. कंपनीच्या दाव्यानुसार Jio Fiber वर यूजर्सना 1GBPS पर्यंतचा इंटरनेट स्पीड मिळेल. या स्पीडने सेकंदात संपूर्ण मूवी डाउनलोड होईल. भारतात आतापर्यंत 1जीबीपीएस स्पीड देणारी हि पहिली सर्विस आहे.

25. Free Set-Top Box

Jio Fiber चे कनेक्शन घेणाऱ्या यूजर्सना Reliance Jio मोफत Set-Top Box पण देत आहे. कंपनी ‘Jio Forever Annual Plan’ घेणाऱ्या यूजर्सना हि मोफत सुविधा मिळेल. सेट-टॉप बॉक्स सोबत कपंनी डीटीएच सर्विस पण देईल. या सर्विस मध्ये OTT ऍप्स पण असतील ज्या सोबत मोफत सब्सक्रिप्शन पण दिले जाईल.

26. Free TV

जेव्हा कंपनीने फ्री कॉलिंग, फ्री रोमिंग आणि फ्री फोन नंतर मोफत टीव्ही देण्याची घोषणा केली तेव्हा हद्दच झाली. Reliance Jio Jio Fiber यूजर्सना Set-Top Box व्यतिरिक्त HD/4K LED TV पण मोफत देईल. Jio Fiber चे वार्षिक प्लान्स घेणाऱ्या लोकांना कपंनी मोफत टेलीविजन देईल.

27. VR सर्विस

Jio Fiber सोबत Reliance Jio यूजर्सना VR म्हणजे वर्चुअल रियालिटी सर्विस पण दिली जाईल. या सर्विसचा वापर अभ्यास, मनोरंजन आणि शॉपिंग साठी करता येईल. रिलायंस जियो या सर्विस साठी VR हँडसेट पण विकेल जे स्वस्तात विकत घेता येतील.

28. Free मल्टी यूजर वीडियो कॉफ्रेंसिंग

Reliance Jio आपल्या Jio Fiber सर्विस मध्ये मल्टी यूजर वीडियो कॉफ्रेंसिंगची सुविधा पण देईल. या सर्विस मुळे कोणत्याही शुल्काविना यूजर्स कुठूनही आपल्या नातेवाईक व मित्रांशी लाईव वीडियो चॅट करू शकतील. खास बाब अशी कि हि वीडियो चॅट मोबाईल वर नाही तर TV वर होईल.

29. Free लँडलाईन

Jio Fiber मध्ये Reliance Jio यूजर्सना कंपनी कडून लँडलाईन सेट दिला जाईल जो फाइबर केबलशी कनेक्टड असेल. या सर्विस मध्ये कंपनी सुपर फास्ट इंटरनेट डेटा तर देत आहे त्याचबरोबर लँडलाईनने यूजर्स मोफत वॉयस कॉल पण करू शकतील आणि खास बाब अशी कि लँडलाइन फोन मध्ये लोकल आणि एसटीडी कॉल पूर्णपणे फ्री आहेत.

30. स्वस्त इंटरनॅशनल कॉल

Reliance Jio ने Jio Fiber यूजर्स साठी खुपच स्वस्त इंटरनॅशनल रोमिंग पॅक पण सादर केला आहे. Jio ची हि सर्विस वापरणारे लोक अमेरिका आणि कॅनडात फक्त 500 रुपयांमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील. आतापर्यंत हि सर्वात स्वस्त इंटरनॅशनल कॉलिंग सर्विस आहे.

The post Reliance Jio चे 3 वर्ष पूर्ण, जाणून घ्या 3 वर्षांतील 30 मोठे कारनामे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-3rd-anniversary-india-jio-fiber-broadband-jiophone-volte-4g-data-free-voice-call-ott-dth-set-top-box/feed/ 0
मोठी बातमी : Airtel बंद करत आहे 3G सर्विस, बदलेल टेलीकॉम बाजाराचा चेहरामोहरा https://www.91mobiles.com/marathi/airtel-shuts-down-3g-network-in-kolkata-india-l900-technology-900-mhz-4g-network/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-shuts-down-3g-network-in-kolkata-india-l900-technology-900-mhz-4g-network/#respond Fri, 28 Jun 2019 12:17:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4685 एकीकडे Airtel आपली 3G सर्विस बंद करेल तर दुसरीकडे एयरटेल नेटवर्क वर 4G सर्विस आधीपेक्षा जास्त फास्ट होईल.

The post मोठी बातमी : Airtel बंद करत आहे 3G सर्विस, बदलेल टेलीकॉम बाजाराचा चेहरामोहरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Bharti Airtel अनेक वर्षांपासून इंडियन टेलीकॉम मार्केट मध्ये आपली सेवा देत आहे. देशात इंटरनेटच्या सुरवातीपासून आज 4G पर्यंत एयरटेल ने सतत आपल्या ग्राहकांना बेस्ट सर्विस देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. Airtel देशातील पहिली खाजगी टेलीकॉम कंपनी आहे जिने भारतात 3G नेटवर्कची सुरवात केली होती. कंपनीने 3G नेटवर्क बेंगलुरु पासून सुरु केला होता जो आज देशातील कानाकोपऱ्यात उपलब्द आहे. पण आता Airtel ने आपली 3G सर्विस बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने देशात आपला 3G नेटवर्क हटवण्यास सुरवात केली आहे आणि Airtel च्या या निर्णयामुळे इंडियन टेलीकॉम मार्केटचा चेहरा पूर्णपणे बदलणार आहे.

Airtel ने घोषणा केली आहे कि कंपनी भारतात आपली 3G सर्विस बंद करणार आहे. Airtel ने 3G नेटवर्क हटवण्यास सुरवात कोलकात्यापासून केली आहे. कंपनीने सांगिलते आहे कि कोलकात्यात Airtel ची 3G टेक्नोलॉजी हटवण्याचे काम सुरु झाले आहे जे काही दिवसात पूर्ण होईल. एयरटेल द्वारा कोलकात्यामधून 3G हटवल्यानंतर तिथे या कनेक्टिविटी वर कोणताही फोन व सिम कार्ड चालणार नाही. Airtel नुसार 3G सर्विस हटवण्यासोबतच हा 4G नेटवर्क वर शिफ्ट केला जाईल.

Airtel नुसार वरील सर्कल मध्ये 3G 4G नेटवर्क वर अपग्रेड केला जाईल. आता पर्यंत कंपनी सर्कल मध्ये 3G नेटवर्क देण्यासाठी 900 MHz band spectrum चा वापर केला जात होता. पण आता 3जी नेटवर्क बंद केल्यानंतर हेच बँड स्पेक्ट्रम नव्याने फ्रेम केले जातील. Airtel म्हणते कि 900 MHz फ्रीक्वेंसी वर चालणाऱ्या या band spectrum च्या फ्रीक्वेंसी मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही आणि 900 MHz वरच कंपनी 4G कनेक्टिविटी देईल.

असा आहे Airtel चा प्लान

3G साठी वापरात असलेल्या 900 MHz band spectrum ला अपग्रेड करण्यासाठी Airtel कंपनी L900 टेक्नोलॉजीचा वापर करेल. या टेक्नॉलॉजी द्वारे स्पेक्ट्रम बंद करून फ्रिक्वेंसी तीच असेल पण या फ्रिक्वेंसी वर 3G ऐवजी 4G सिग्लन मिळतील. विशेष म्हणजे एखाद्या बँड स्पेक्ट्रमची फ्रिक्वेंसी जितकी जास्त असते त्याची पावर तेवढीच कमी होते. त्यामुळे 900 MHz फ्रिक्वेंसी वाला हा स्पेक्ट्रम जास्त ताकदवान 4G सिग्नल देऊ शकेल.

विशेष म्हणजे Airtel सध्या 2300 Mhz आणि 1800 Mhz बँड वर आपली 4G सर्विस देत आहे. पण आता 900 MHz फ्रिक्वेंसी वाले बँड स्पेक्ट्रम पण कोलकात्यात पूर्णपणे 4G नेटवर्क देतील. 900 MHz बँड वर 4G नेटवर्क दिल्यामुळे घरात, बेसमेंट मध्ये किंवा कोणत्याही इंडोर जागी फोन नेटवर्क जास्त क्लियर व चांगल्या पद्धतीने येईल. म्हणजे एकीकडे Airtel आपली 3G सर्विस बंद करेल तर दुसरीकडे एयरटेल नेटवर्क वर 4G सर्विस आधीपेक्षा जास्त फास्ट होईल.

Airtel यूजर्स वर पडणारा प्रभाव

कंपनी नुसार Airtel द्वारा 3G सर्विस बंद केल्यामुळे ग्राहकांवर सकारात्मक प्रभावच पडेल. कपंनीने सर्व 3G कस्टमर्सना वेळोवेळी मेसेज व नोटिफिकेशन्स पाठवल्या जातील आणि त्यांना सिम अपग्रेड करणे किंवा मोबाईल हँडसेट अपग्रेड करण्यास सांगितले जाईल. तसेच ज्या 3जी ग्राहकांकडे आधीपासूनच 4जी हँडसेट आणि सिम आहे त्यांचा नेटवर्क आपोआप अपग्रेड केला जाईल.

विशेष म्हणजे Airtel कोलकात्यात 3G सर्विस बंद करत आहे तर दुसरीकडे कंपनी सर्कल मध्ये आपली 2G सर्विस सध्या कायम ठेवणार आहे. भारतात सध्या Reliance Jio हीच एक अशी कंपनी आहे जी फक्त 4G सर्विस देते. तसेच Airtel द्वारा 3G पूर्णपणे बंद केल्यानंतर या कंपनीच्या यूजर्सना आधीपेक्षा जास्त चांगली 4G कनेक्टिविटी मिळेल.

The post मोठी बातमी : Airtel बंद करत आहे 3G सर्विस, बदलेल टेलीकॉम बाजाराचा चेहरामोहरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-shuts-down-3g-network-in-kolkata-india-l900-technology-900-mhz-4g-network/feed/ 0
सर्व जियो यूजर्ससाठी हि ट्रिक आहे मोठ्या कामाची https://www.91mobiles.com/marathi/how-to-receive-voice-call-on-reliance-jio-4g-volte-in-low-network-free-by-call-forward-in-marathi-2/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-receive-voice-call-on-reliance-jio-4g-volte-in-low-network-free-by-call-forward-in-marathi-2/#respond Wed, 13 Feb 2019 10:09:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3621 जियो नंबर वापरत असाल आणि तुमचा स्मार्टफोन डुअल सिम असेल तर जियो नंबर वर येणारे कॉल दुसऱ्या सिम नेटवर्क वर रिसीव केले जाऊ शकतात.

The post सर्व जियो यूजर्ससाठी हि ट्रिक आहे मोठ्या कामाची first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम बाजारात जर ​आज कम किंमतीत इंटरनेट डेटा आणि मोफत वॉयस कॉल मिळत आहेत तर याचे श्रेय रिलायंस जियोलाच जाते. जियोच्या फ्री सर्विस नंतरच त्यांना टक्कर देण्यासाठी इत्तर टेलीकॉम कंपन्या पण खूप कमी किंमतीत भरपूर सर्विसेज देत आहेत. जियोच्या अनेक स्वस्त सेवा असतानाही कंपनीबद्दल तक्रारी येत असतात कि जियोचे नेटवर्क कमी येते आणि कॉल ड्रॉप सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जियो ग्राहक ज्यांना अशी समस्या येत आहे, त्यांना आम्ही आज असा उपाय सांगणार आहोत कि कशाप्रकारे जियो नंबर वर कोणत्याही अडचणी विना किंवा कॉल ड्रॉप विना बोलता येते.

जियो मोफत 4जी वोएलटीई कॉल देत आहे. जर तुमच्याकडे वोएलटीई इनेबल स्मार्टफोन असेल तर तुम्ही कॉल ड्रॉप किंवा नेटवर्कच्या समस्येविना जियो नंबर वरील कॉल वर बोलू शकता.

4जी वोएलटीई स्मार्टफोन मध्ये जर तुम्ही जियो नंबर वापरत असाल आणि तुमचा स्मार्टफोन डुअल सिम असेल तर जियो नंबर वर येणारे कॉल दुसऱ्या सिम नेटवर्क वर रिसीव केले जाऊ शकतात.

यासाठी तुम्हाला तुमच्या जियो नंबर वर कॉल डायवर्ट किंवा कॉल फॉरवर्ड इनेबल करावा लागेल. हि सर्विस जियो नंबर वर सुरु करून स्मार्टफोन मधील दुसऱ्या सिम नेटवर्क वर जियो नंबरचा कॉल रिसीव केला जाऊ शकतो आणि तेही अगदी मोफत. यासाठी :

शाओमी रेडमी नोट 7 आणि नोट 7 प्रो, इंडिया लॉन्चच्या आधीच जाणून घ्या फोनची संपूर्ण माहिती

जियो नंबर वरून दुसऱ्या नंबर वर कॉल फारवर्ड (अनकंडिशनल) करण्यासाठी आपल्या जियो नंबर वरून *401* डायल करा. या फीचर मुळे जियो नंबर वर येणार कॉल आपोआप दुसऱ्या नंबर वर येईल आणि दुसऱ्या ऑपरेटरच्या नटवर्क सिग्नल वरून तुमचे बोलणे होईल.

कॉल फारवर्ड (नो आन्सर) आपल्या फोन मध्ये ए​क्टिवेट करण्यासाठी जियो नंबर वरून *403* डायल करा. या फीचर मध्ये तो कॉल जियो नंबर वरून फारवर्ड होईल ज्याची रिंग वाजल्यावरही तुम्ही उत्तर देणार नाही.

जर जियो नंबर वरून एखाद्याशी बोलत असाल किंवा समोरील व्यक्तिला तुमचा नंबर बीजी येत असेल तर अशावेळी जियो नंबर वर येणारे कॉल आपोआप दुसऱ्या नंबर वर डायवर्ट होतील. यासाठी तुम्हाला *405* डायल करावा लागेल.

जर तुमच्या जियो नंबर वर कोणाला कॉल कारण्याइतकाही नेटवर्क नसेल, किंवा तुमचा जियो नंबर नॉट रिचेबल येत असेल तर अशावेळी *409* डायल करा. यात नॉट रिचेबल असतानाही जियो नंबर वाटली वॉयस कॉल तुमच्या दुसऱ्या नंबर वर येतील आणि तुम्ही कोणत्याही अडचणी विना बोलु शकाल.

The post सर्व जियो यूजर्ससाठी हि ट्रिक आहे मोठ्या कामाची first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-receive-voice-call-on-reliance-jio-4g-volte-in-low-network-free-by-call-forward-in-marathi-2/feed/ 0
जियो युजर्संनी एका महिन्यात बघितले 460 कोटी तासांचे वीडियो आणि केले 63 हजार कोटी मिनिटांचे कॉल्स, वाचा सविस्तर https://www.91mobiles.com/marathi/ril-jio-q3-fy-2018-19-performance-report-280-1-million-consumer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/ril-jio-q3-fy-2018-19-performance-report-280-1-million-consumer-in-marathi/#respond Fri, 18 Jan 2019 07:09:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3407 ऑक्टोबर 2018 पासून डिसेंबर 2018 पर्यंत जियो नेटवर्क वर 864 कोटी जीबी चा इंटरनेट डेटा वापरला गेला आहे.

The post जियो युजर्संनी एका महिन्यात बघितले 460 कोटी तासांचे वीडियो आणि केले 63 हजार कोटी मिनिटांचे कॉल्स, वाचा सविस्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सर्वात जास्त चर्चित टेलीकॉम कंपनी रिलायंस जियो ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे कि ती का इतर कंपन्यांपेक्षा वेगळी आणि लोकप्रिय आहे. रिलायंस जियो ने आज आर्थिक वर्ष 2018-19 च्या तिसऱ्या तिमाहीचे आकडे शेयरकेले आहेत ज्यात कपंनीच्या नेटवर्क व डेटा यूज सोबत युजरबेसची माहिती देण्यात आली आहे. जियोचे हे आकडे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे आहेत. जियो द्वारा शेयर करण्यात आलेल्या या आकड्यांवरून स्पष्ट झाले आहे कि ​रिलायंस जियो लवकरच भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनेल.

​रिलायंस जियो ने सांगितले आहे कि डिसेंबर 2018 वर्यंत कंपनीचा एकूण युजरबेस 280.1 मिलियन झाला आहे. म्हणजे 280,000,000 पेक्षा जास्त स्मार्टफोन युजर जियोचे नेटवर्क वापरत आहेत.

ऑक्टोबर 2018 पासून डिसेंबर 2018 पर्यंत जियो नेटवर्क वर 864 कोटी जीबी चा इंटरनेट डेटा वापरला गेला आहे.

साल 2018 च्या शेवटच्या महिन्यात जियो नेटवर्क वर एकूण 63 हजार 406 कोटी मिनिटे कॉल्स करण्यात आले आहेत.

गेल्या तीन महिन्याच्या सरासरी पाहता जियो नेटवर्क वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तिने 10.8 जीबी 4जी डेटा वापरला आहे.

तसेच जियो सिम वर एका महिन्यात 794 मिनिटांचे वॉईस कॉल प्रत्येक युजरने केले आहेत.

इंटरनेट वापर पाहता भारतीयांनी जियो इंटरनेटच्या मदतीने एका महिन्यात 460 कोटी तास वीडियो बघतिले आहेत.

रिलायंस जियोची जियोफोन मॉनसून हंगामा ऑफर कंपनीने सर्वात फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे ट्राईच्या रिपोर्ट अनुसार डिसेंबर महिन्यात रिलायंस जियो ने इतर सर्व टेलीकॉम कंपन्यांपेक्षा सर्वात वेगवान 4जी डाउनलोड स्पीड दिला आहे. जियो ने चांगला स्पीड देऊन सर्व टेलीकॉम कंपन्यांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.

The post जियो युजर्संनी एका महिन्यात बघितले 460 कोटी तासांचे वीडियो आणि केले 63 हजार कोटी मिनिटांचे कॉल्स, वाचा सविस्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ril-jio-q3-fy-2018-19-performance-report-280-1-million-consumer-in-marathi/feed/ 0
जियोचे 4 दीर्घ वैधता असलेले प्लान, आहेत का फायदेशीर? https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-4-worst-plan-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-4-worst-plan-in-marathi/#respond Wed, 16 Jan 2019 14:09:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3394 जियोच्या सर्वच ऑफर्स चांगल्या आहेत असेही नाही असे अनेक प्रीपेड टॅरिफ प्लान आहेत जे महाग आहेत.

The post जियोचे 4 दीर्घ वैधता असलेले प्लान, आहेत का फायदेशीर? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ने भारतीय मोबाईल बाजाराची दिशा बदलून टाकली आहे यात शंका नाही. कंपनी सुरवातीपासूनच भारतात आक्रमक होती. कंपंनीने पहिल्या सहामहिन्यांपर्यंत लोकांना मोफत डेटा व कॉलिंग दिली. नंतर जेव्हा शुल्क लागू केले तेव्हा खूप कमी होते. इतकेच नव्हे तर जियो नेटवर्क वर कॉलिंग कायमची फ्री आहे फक्त डेटाचा रिचार्ज करायचा असतो. रिलायंस जियो द्वारा देण्यात येणाऱ्या या सेवांमुळे लोकांनी जियो सिम हातोहात घेतले आणि लॉन्च नंतर अवघ्या वर्षभरात कंपनी ने 10 कोटी यूजरचा आंकडा पार केला. आता तीन वर्षे होणार आहेत आणि 30 कोटी यूजर बेस होणार आहे. आता पण जियो सर्वात कमी किंमतीती डेटा आणि कॉलिंग सेवा देत आहे. परंतु जियोच्या सर्वच ऑफर्स चांगल्या आहेत असेही नाही असे अनेक प्रीपेड टॅरिफ प्लान आहेत जे महाग आहेत. विशेष म्हणजे हे दीर्घ वैधतेसह सादर केले गेले आहेत पण हे यूजर्ससाठी फायेदशीर आहेत का? चला खाली बघूया आणि याची सविस्तर चर्चा करूया.

जियोचा 999 रुपयांचा प्लान

रिलायंस जियो ने दीर्घ वैधतेसह प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे ज्यात पहिला प्लान आहे 999 रुपयांचा. या प्लान अंतर्गत तुम्हाला 60जीबी चा डेटा 90 दिवसांच्या वैधते सह मिळतो. सोबत अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच नॅशनल रोमिंग तर फ्री आहेच सोबत कंपनी रोज 100 मेसेज पण देते. जर प्रति महिन्याचा विचार केला तर या प्लानची किंमत तुम्हाला 333 रुपये पडेल आणि प्रतिदिनच्या हिशोबाने 1 दिवसात फक्त 666एमबी डेटा मिळेल जो आजच्या हिशोबाने थोडा महाग म्हणता येईल.

परंतु तुम्हाला माहिती असेल कि जियोच्या 399 के प्लानची वैधाता 84 दिवस आहे आणि या प्लान मध्ये तुम्हाला रोज 1.5जीबी 4जी डेटा मिळतो. एकूण 126जीबी डेटा दिला जातो जो 999 रुपयांच्या 60जीबी डेटा पेक्षा भरपूर जास्त आहे. इतकेच नव्हे तर 399 रुपयांच्या प्लान मध्ये पण कॉलिंग अनलिमिटेड आहे.

पण 999 रुपयांच्या प्लानची चांगली बाजू अशी कि तुम्ही 60जीबी डेटाचा वापर कधी करू शकता तर 399 रुपयांमध्ये तुम्ही एक दिवसात 1.5जीबी डेटाचा वापर करू शकता. पण जेव्हा जास्त डेटाची गरज असेल तेव्हा तुम्ही डेटा टॉप अप घेऊ शकता.

जियो 1,999 रुपयांचा प्लान

जियोचा दीर्घ वैधतेसह येणार हा प्लान पण तेवढाच तोट्याचा आहे. जियोच्या या प्लानची किंमत 1,999 रुपये आहे, ज्यात तुम्हाला 180 दिवसांची वैधता मिळते. या टॅरिफ प्लान मध्ये यूजर्सना 125जीबी हाई-स्पीड 4जी डेटा मिळतो. तसेच 125जीबी डेटा लिमिट संपल्यानंतर पण यूजर्स 64केबीपीएस स्पीड मध्ये डेटाचा वापर करू शकतात. नॅशनल कॉलिंग, नॅशनल रोमिंग फ्री आहे सोबत रोज 100 एसएमएस पण दिले जातात. या पण जर महिन्याच्या आधारावर पहिला तर जवळपास 333 रुपये तुम्ही देता आणि रोजचा 694एमबी व महिन्याच्या हिशोबाने जवळपास 41जीबी डेटा मिळतो जो महागच आहे.

परंतु रिलायंस जियोचा एक प्लान 498 रुपयांचा आहे जो 91 दिवस वैधतेसह येतो. यात तुम्हाला 91 दिवसांत 182जीबी डेटा मिळतो. रोज 2जीबी आणि कॉलिंग व रोमिंग यात पण मोफत आहे. पण जर तुम्हाला दीर्घ वैधतेचा प्लान हवा असेल तर 1,699 रुपयांचा पॅक घेऊ शकता जो वर्षभरासाठी आहे.

जियो 4,999 रुपयांचा प्लान

हा प्लान तर अजून महाग पडतो. 360 दिवस अर्थात जवळपास वर्षभराची वैधता असणाऱ्या या प्लान साठी कंपनी ने 4,999 रुपयांची किंमत ठेवली आहे. यात यूजर्सना 350जीबी हाईस्पीड 4जी डेटा मिळतो, जो संपल्यानंतर यूजर्स 64केबीपीएस स्पीड मध्ये अनलिमिटेड डेटाचा वापर करू शकतात. याचा अर्थ असा कि तुम्हाला जवळपास रोज 1जीबी डेटा मिळेल आणि याची महिन्याची किंमत 416 रुपये पडेल. जी थोडी महाग म्हणू शकतो. हो पण चांगली गोष्ट अशी कि तुम्ही संपूर्ण डेटाचा वापर कधीही करू शकता कोणतीही कॅप नाही.

परंतु वर्षभरासाठी 1,699 रुपयांचा पॅक खूप चांगला आहे आणि डेटाची जास्त गरज असल्यास तुम्ही टॉपअप ची मदत घेऊ शकता. जवळपास अर्ध्या किंमतीती तुमचा वर्षभराचा मोबाईलचा खर्च आवरू शकतो.

जियोचा 9,999 रुपयांचा रिचार्ज

जियोचा हा प्लान सर्वात जास्त घाट्याचा सौदा आहे. या प्लानची किंमत 9,999 रुपये आहे. टॅरिफ मध्ये यूजर्सना 360 दिवसांच्या वैधतेसह 750जीबी हाई-स्पीड डेटा मिळेल. कॉलिंग व्यतिरिक्त रोमिंग सहित एसएमएस पण मोफत आहेत.

परंतु जर तुम्हाला रोज भरपूर डेटाचा हवा असेल तर तुम्ही 4जीबी डेली डेटा असलेला मंथली प्लान ज्याची किंमत 509 रुपये आहे, रिचार्ज केल्यास तो पण तुम्हाला स्वस्त पडेल. यात वर्षभरासाठी तुमचे जवळपास 6,000 रुपये खर्च होतील पण फक्त 1,344 जीबी 4जी डेटा मिळेल. नॅशनल कॉलिंग, रोमिंग आणि एसमएस यात पण मोफत आहे.

The post जियोचे 4 दीर्घ वैधता असलेले प्लान, आहेत का फायदेशीर? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-4-worst-plan-in-marathi/feed/ 0
जियोची ‘रिचार्ज करा या दिवाळीला आणि फायदा मिळवा वर्षभर’, एक वर्ष फ्री कॉल आणि 547जीबी 4जी डेटा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-diwali-offer-100-percent-cashback-rs-1699-plan-with-547-gb-4g-data-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-diwali-offer-100-percent-cashback-rs-1699-plan-with-547-gb-4g-data-in-marathi/#respond Mon, 22 Oct 2018 14:18:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2590 जियो ग्राहक लोकल व एसटीडी आॅननेटवर्क तसेच आॅफनेटवर्क नंबर्स वर अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील.

The post जियोची ‘रिचार्ज करा या दिवाळीला आणि फायदा मिळवा वर्षभर’, एक वर्ष फ्री कॉल आणि 547जीबी 4जी डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो ने नुकताच आपला रिपोर्ट शेयर केला होता ज्यात कंपनी ने सांगितले होते की जियो ने फक्त 25 महिन्यात 25,00,00,000 यूजर जोडले आहेत. एवढ्या वेगाने हा प्रगती करत जियो इंडियन टेलीकॉम बाजारात नवीन रेकॉर्ड केला आहे. हा पराक्रमाचे श्रेय जियो ने आपल्या यूजर्सना दिले आहे. तर आता दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना भेट देत जियो ने ‘रिचार्ज करा या दिवाळीला आणि फायदा मिळवा वर्षभर’ नावाची अनोखी आॅफर सादर केली आहे. या आॅफर मध्ये वर्षभरासाठी डेटा बेनिफिट आणि अनलिमिटेड कॉलिंग सोबतच रिचार्ज वर 100 टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे.

रिलायंस जियोचा स्पेशल प्लान पाहता कंपनी ने दिवाळीच्या निमित्ताने 1699 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे. हा प्लान 365 दिन म्हणजे एका वर्षाच्या वैधतेसह येतो. या प्लान मध्ये एक वर्ष मोफत कॉलिंग करता येईल. जियो ग्राहक लोकल व एसटीडी आॅननेटवर्क तसेच आॅफनेटवर्क नंबर्स वर अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील.

जियोच्या या दिवाळी धमाका मध्ये मिळणारा इंटरनेट डेटा पाहता 1699 रुपयांच्या प्लान मध्ये कंपनी आपल्या यूजर्सना रोज 1.5जीबी 4जी इंटरनेट डेटा देईल. या हिशोबाने यूजर्सना वर्षभरात एकूण 547जीबी 4जी डेटा मिळेल. सोबतच जियो ग्राहकांना रोज 100एसएमएस पण मिळतील आणि कंपनी कडून माय जियो अॅप चे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल.

या सर्व बेनिफिट सोबतच कंपनी 100 टक्के कॅशबॅक पण या प्लान वर देत आहे. हा कॅशबॅक वाउचर स्वरुपात ग्राहकांना मिळेल. 1699 रुपयांच्या प्लान ने रिचार्ज केल्यास 500 रुपयांचे 2 वाउचर तर एक 200 रुपयांचा वाउचर मिळेल. या वाउचर्सचा वापर माय जियो अॅप सोबतच रिलायंस डिजीटल स्टोर्स वर पण करता येईल. ज्यातून फोन रिचार्ज सोबतच आॅनलाईन खरेदी पण करता येईल. ​

रिलायंस जियो कडून मिळणारे हे वाउचर 31 डिसेंबर पर्यंत वापरावे लागतील. पण जियोच्या या शानदार दिवाळी आॅफरचा लाभ घेण्यासाठी 30 नोव्हेंबरच्या आधी रिचार्ज करावा लागेल.

The post जियोची ‘रिचार्ज करा या दिवाळीला आणि फायदा मिळवा वर्षभर’, एक वर्ष फ्री कॉल आणि 547जीबी 4जी डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-diwali-offer-100-percent-cashback-rs-1699-plan-with-547-gb-4g-data-in-marathi/feed/ 0
जियो देत आहे 8जीबी डेटा अगदी मोफत आणि प्रत्येक डेयरी मिल्क चॉकलेट वर 1जीबी डेटा एक्स्ट्रा, बघा कसे ते https://www.91mobiles.com/marathi/jio-celebration-pack-offering-8gb-4g-data-and-1-gb-on-dairy-milk-chocolate-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-celebration-pack-offering-8gb-4g-data-and-1-gb-on-dairy-milk-chocolate-in-marathi/#respond Fri, 07 Sep 2018 11:17:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1991 या आॅफर अंतर्गत कमीत कमी 5 रुपयांचे कॅडबरी चॉकलेट विकत घेऊन त्याचा बारकोड जियो अॅप वर स्कॅन करावा लागेल आणि स्कॅन केल्यानंतर काही दिवसांनी यूजर्सना 1जीबी 4जी डेटा मिळेल.

The post जियो देत आहे 8जीबी डेटा अगदी मोफत आणि प्रत्येक डेयरी मिल्क चॉकलेट वर 1जीबी डेटा एक्स्ट्रा, बघा कसे ते first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशात सर्वात वेगाने पुढे जात असलेली टेक कंपनी ​रिलायंस जियो आपल्या ग्राहकांची काळजी घेत असते. दोन वर्षांपूर्वी भारतीय टेलीकॉम यूजर्स इंटरनेट डेटा आणि रोमिंग साठी महाग प्लान्स साठी पैसे देत होते. पण रिलायंस जियो ने आपली फ्री सर्विस देऊन देशातील मोबाईल बाजाराचा चेहरामोहरा बदलून टाकला. जियो खुप कमी किंमतीत चांगले फायदे देते. रिलायंस​ जियो येऊन दोन वर्षे होणार आहेत आणि हाच आनंद कंपनी आपल्या यूजर्स सोबत शेयर करत आहे. जियो आपल्या ग्राहकांना फ्री मध्ये 8जीबी इंटरनेट डेटा देत आहे.

रिलायंस जियो ने ‘जियो सेलिब्रेशन पॅक’ सुरू केला आहे. हा पॅक यूजर्सना पूर्णपणे मोफत मिळत आहे. या पॅक अंतर्गत जियो ग्राहकांना एका दिवसात 2जीबी 4जी डेटा मिळेल. हा पॅक 4 दिवसांच्या वैधते सह येतो. म्हणजे 4 दिवसांत एकूण 8जीबी 4जी डेटा. जियो कडून हा 8जीबी डेटा अगदी मोफत मिळत आहे ज्याचा वापर तुम्ही तुमच्या मर्जी नुसार करू शकता.

जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की तुम्हाला फ्री 8जीबी डेटा मिळाला आहे की नाही तर..

1. सर्वात आधी तुमच्या फोन मधील माय जियो अॅप ओपन करा

2. माय जियो अॅप मध्ये ‘माय प्लान्स’ ओपन करा

3. माय प्लान्स मध्ये सर्वात वर तुमचा करंट प्लान दिसेल आणि त्याखाली तुम्हाला तुमच्या इतर आॅफर्स सोबत ‘जियो सेलिब्रेशन पॅक’ मिळेल.

4. जियो सेलिब्रेशन पॅक सोबत तुम्हाला या पॅकची एक्सपायरी डेट पण सांगण्यात येईल, म्हणजे हा फ्री इंटरनेट डेटा कधी पर्यंत मिळेल याची माहिती असेल.

पण जियो ने हा पॅक सर्व यूजर्सना एक साथ दिला नाही. वेगवेगळ्या सर्कल्सच्या यूजर्सना 8जीबी डेटा वाली आॅफर सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये मिळेल. एक यूजर फक्त एकदाच जियो सेलिब्रेशन पॅक वापरू शकतो.

विशेष म्हणजे रिलायंस जियो ‘जियो सेलिब्रेशन पॅक’ सोबत कॅडबरीच्या डेयरी मिल्क चॉकलेटच्या खरेदीवर पण 1जीबी इंटरनेट डेटा देत आहे. जियोची ही आॅफर फक्त 30 सप्टेंबर पर्यंत वैध आहे. या आॅफर अंतर्गत कमीत कमी 5 रुपयांचे कॅडबरी चॉकलेट विकत घेऊन त्याचा बारकोड जियो अॅप वर स्कॅन करावा लागेल आणि स्कॅन केल्यानंतर काही दिवसांनी यूजर्सना 1जीबी 4जी डेटा मिळेल. या आॅफरचा लाभ पण जियो यूजर एकदाच घेऊ शकतात.

जियो आॅफरच्या सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा

The post जियो देत आहे 8जीबी डेटा अगदी मोफत आणि प्रत्येक डेयरी मिल्क चॉकलेट वर 1जीबी डेटा एक्स्ट्रा, बघा कसे ते first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-celebration-pack-offering-8gb-4g-data-and-1-gb-on-dairy-milk-chocolate-in-marathi/feed/ 0