JioBook Laptop - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 14:21:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 टेलिकॉम क्षेत्रानंतर आता लॅपटॉप सेगमेंटची बारी; Reliance च्या स्वस्त लॅपटॉप JioBook ची विक्री सुरु https://www.91mobiles.com/marathi/jiobook-sale-on-reliance-digital-price-specification-video-photos/ https://www.91mobiles.com/marathi/jiobook-sale-on-reliance-digital-price-specification-video-photos/#respond Fri, 21 Oct 2022 10:29:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14229 JioBook Laptop Sale: टेलीकॉम विश्वात नवी क्रांती घडवणारी कंपनी Reliance Jio आता Laptop मार्केटवर राज्य करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी मध्ये IMC 2022 (इंडियन मोबाइल कांग्रेस 2022) दरम्यान JioBook सादर केल्यानंतर कंपनीनं गुपचुप हा लॅपटॉप सेलसाठी उपलब्ध केला आहे. जर तुम्ही देखील हा स्वस्त लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा Reliance Digital […]

The post टेलिकॉम क्षेत्रानंतर आता लॅपटॉप सेगमेंटची बारी; Reliance च्या स्वस्त लॅपटॉप JioBook ची विक्री सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
JioBook Laptop Sale: टेलीकॉम विश्वात नवी क्रांती घडवणारी कंपनी Reliance Jio आता Laptop मार्केटवर राज्य करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी मध्ये IMC 2022 (इंडियन मोबाइल कांग्रेस 2022) दरम्यान JioBook सादर केल्यानंतर कंपनीनं गुपचुप हा लॅपटॉप सेलसाठी उपलब्ध केला आहे. जर तुम्ही देखील हा स्वस्त लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा Reliance Digital च्या साइटवर सेलसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हा लॅपटॉप सरकारी ई-कॉमर्स पोर्टलवर देखील उपलब्ध झाला होता. चला जाणून घेऊया या लॅपटॉपच्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती.

JioBook Laptop Price

JioBook Price ची किंमत पाहता या लॅपटॉपची MRP 35,605 रुपये आहे. परंतु Reliance Digital वर बेस्ट डील दरम्यान हा लॅपटॉप 15,799 वर विकला जात आहे. तसेच, क्रेडिट कार्ड (Yes Bank, Kotak Mahindra Bank, Axis Bank इत्यादी बँक) द्वारे खरेदी केल्यास डिस्काउंटही मिळेल. इतकेच नव्हे तर 758.56 रुपयांच्या EMI ऑप्शन वर देखील हा लॅपटॉप विकत घेता येईल. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त सीरिजमध्ये नव्या Samsung स्मार्टफोनची एंट्री; 4GB रॅम आणि 5,000mAh च्या बॅटरीसह Galaxy A04e लाँच

JioBook सध्या Reliance Digital वर सेलसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच हा लॅपटॉप सिंगल कलर ऑप्शन-Jio Blue मध्ये विकत घेता येईल. कंपनीकडून JioBook वर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा लॅपटॉप https://gem.gov.in/ वेबसाइटवर 19,500 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला होता, जिथून फक्त सरकारी डिपार्टमेंट्सना खरेदी करता येते

JioBook specifications आणि features

JioBook ची बॉडी प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे आणि यात 4जी सपोर्ट देण्यात आला आहे. Jio Book च्या कीबोर्डमध्ये विंडोज बटनच्या जागी Jio लिहिण्यात आलं आहे. तसेच, Jio Book च्या बॅक पॅनलवर जियोची ब्रँडिंग आहे. या लॅपटॉपमध्ये 11.6 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. तसेच यात कंपनीनं क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरचा वापर केला आहे. हा प्रोसेसर याआधी अनेक Smartphone मध्ये देखील दिसला आहे. ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो आणि याचा कमाल क्लॉक स्पीड 2.0GHz आहे.

Jiobook sale on reliance digital price specification video photos

1.2 किलोग्राम वजन असलेल्या जियो लॅपटॉपमध्ये 2 जीबी रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज देण्यात आली आहे, जी 128GB पर्यंत मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. प्रथमदर्शनी Jio Book क्रोमबुक सारखा वाटतो. तसेच यात विंडोज असलेला कीबोर्ड देखील आहे. Jio Book मध्ये विंडोजचे काही आवश्यक अ‍ॅप्स आहेत, परंतु ऑपरेटिंग सिस्टम जियो (JioOS) ची आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एचडी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हे देखील वाचा: Airtel Sim हरवल्यास किंवा चोरी झाल्यास त्वरित करा ब्लॉक; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

Jio Book सह जियोचे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतील. यात जियो क्लाउड पीसीचा देखील सपोर्ट आहे. Jio Book मध्ये मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजर प्री-इंस्टॉल मिळतो. तसेच कॅमेऱ्यासाठी शॉर्टकट बार देखील आहे. ड्युअल स्पिकर्ससह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटी ऑप्शन पाहता JioBook वाय-फाय (802.11ac), LTE (B3, B5, B40), ब्लूटूथ v5, एचडीएमआय मिनी पोर्ट, एक 3.5 मिमी ऑडियो जॅक आणि मायक्रोयूएसडी कार्ड रीडर आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post टेलिकॉम क्षेत्रानंतर आता लॅपटॉप सेगमेंटची बारी; Reliance च्या स्वस्त लॅपटॉप JioBook ची विक्री सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jiobook-sale-on-reliance-digital-price-specification-video-photos/feed/ 0
स्वस्त Jio Laptop ची विक्री झाली सुरु; कोणताही गाजावाजा न करता मार्केट प्लेसवर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/jio-laptop-available-for-sale-price-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/jio-laptop-available-for-sale-price-specifications-and-features/#respond Mon, 03 Oct 2022 12:26:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13663 गेले कित्येक दिवस जियोच्या किफायशीर लॅपटॉपच्या बातम्या येत आहेत. अखेरीस आज हा JioBook विक्रीसाठी उपलब्ध झाला झाला आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानात सुरु असलेल्या इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) मध्ये रिलायन्स जियो (Reliance Jio) नं आपल्या पहिल्या लॅपटॉप JioBook ची पहिली झलक दाखवली. आता सेलसाठी लिस्ट झालेला हा लॅपटॉप सर्वप्रथम 91मोबाइल्सच्या टीमनं स्पॉट केला आहे. स्वस्त […]

The post स्वस्त Jio Laptop ची विक्री झाली सुरु; कोणताही गाजावाजा न करता मार्केट प्लेसवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेले कित्येक दिवस जियोच्या किफायशीर लॅपटॉपच्या बातम्या येत आहेत. अखेरीस आज हा JioBook विक्रीसाठी उपलब्ध झाला झाला आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानात सुरु असलेल्या इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) मध्ये रिलायन्स जियो (Reliance Jio) नं आपल्या पहिल्या लॅपटॉप JioBook ची पहिली झलक दाखवली. आता सेलसाठी लिस्ट झालेला हा लॅपटॉप सर्वप्रथम 91मोबाइल्सच्या टीमनं स्पॉट केला आहे. स्वस्त जियो लॅपटॉप ई-कॉमर्स साइटवर सेलसाठी लिस्ट करण्यात आला आहे. जर तुम्ही देखील हा विकत घेण्याची योजना बनवत असाल तर खरेदी करण्यापूर्वी प्राइस आणि फीचर्स जाणून घ्या.

Jio Laptop ची विक्री

Jio Laptop सरकारी वेबसाइटवर विकला जात आहे, ज्याचा अ‍ॅड्रेस – gem.gov.in. आहे. कंपनीनं गुपचूप या साइटवर आपल्या लॅपटॉपची विक्री सुरु केली आहे. या सरकारी साइटवर Resellers च्या माध्यमातून हा लॅपटॉप विकला जात आहे जो सामान्य लोकांसाठी नाही. ही सरकारी मार्केट प्लेस आहे आणि इथे सरकारी डिपार्टमेंट्सच खरेदी करू शकतात. तसेच कंपनी हा लॅपटॉप सामान्य ग्राहकांसाठी सादर करणार आहे की फक्त बिजनेसेससाठी याचा वापर केला जाईल, हे देखील अजून स्पष्ट झालं नाही. हे देखील वाचा: दोन दिवस टिकेल या Samsung फोनची बॅटरी; अत्यंत कमी किंमतीत 50MP कॅमेरा असलेला फाडू फोन

Jio Laptop Available For Sale Price Specifications And Features

JioBook लॅपटॉपची किंमत

https://gem.gov.in/ वर विकला जाणारा JioBook लॅपटॉप 19,500 रुपयांमध्ये विकत घेता येईल. बातमी लिहताना सरकारी साइटवर दिलेल्या माहितीनुसार या प्रोडक्टचे फक्त 10 युनिट्सच स्टॉकमध्ये आहेत. रिलायन्स जियोच्या अधिकृत साइटवर मात्र हा लॅपटॉप अजूनतरी विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला नाही.

Jio Laptop Available For Sale Price Specifications And Features

नोट: रिलायन्स जियोनं या लॅपटॉपच्या उपलब्धतेची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु दिवाळीच्या निमिताने Jio Book ग्राहकांच्या भेटीला येईल, अशी चर्चा आहे.

JioBook चे स्पेसिफिकेशन्स

JioBook ची बॉडी प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे आणि यात 4जी सपोर्ट देण्यात आला आहे. Jio Book च्या कीबोर्डमध्ये विंडोज बटनच्या जागी Jio लिहिण्यात आलं आहे. तसेच, Jio Book च्या बॅक पॅनलवर जियोची ब्रँडिंग आहे. या लॅपटॉपमध्ये 11.6 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. तसेच यात कंपनीनं क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरचा वापर केला आहे. हा प्रोसेसर याआधी अनेक Smartphone मध्ये देखील दिसला आहे. ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो आणि याचा कमाल क्लॉक स्पीड 2.0GHz आहे.

Jio Laptop Available For Sale Price Specifications And Features

1.2 किलोग्राम वजन असलेल्या जियो लॅपटॉपमध्ये 2 जीबी रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज देण्यात आली आहे. प्रथमदर्शनी Jio Book क्रोमबुक सारखा वाटतो. तसेच यात विंडोज असलेला कीबोर्ड देखील आहे. Jio Book मध्ये विंडोजचे काही आवश्यक अ‍ॅप्स आहेत, परंतु ऑपरेटिंग सिस्टम जियो (JioOS) ची आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एचडी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हे देखील वाचा: भारतातील सर्वात स्वस्त 5G Phone लाँच! चायनीज कंपनीच्या नाकावर टिच्चून स्वदेशी कंपनीची कामगिरी

Jio Book सह जियोचे अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल मिळतील. यात जियो क्लाउड पीसीचा देखील सपोर्ट आहे. Jio Book मध्ये मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजर प्री-इंस्टॉल मिळतो. तसेच कॅमेऱ्यासाठी शॉर्टकट बार देखील आहे. ड्युअल स्पिकर्ससह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय आणि ब्लूटूथचा ऑप्शन मिळतो.

The post स्वस्त Jio Laptop ची विक्री झाली सुरु; कोणताही गाजावाजा न करता मार्केट प्लेसवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-laptop-available-for-sale-price-specifications-and-features/feed/ 0
15 हजारांत लॅपटॉप! वायफायची गरज नाही 4G सिम स्लॉटसह येईल स्वस्त JioBook लॅपटॉप https://www.91mobiles.com/marathi/jio-low-cost-laptop-launch-at-rs-15000-with-4g-enabled-sim-reports/ https://www.91mobiles.com/marathi/jio-low-cost-laptop-launch-at-rs-15000-with-4g-enabled-sim-reports/#respond Mon, 03 Oct 2022 07:29:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13646 JioBook Laptop Launch: टेलीकॉम क्षेत्रात धुमाकूळ घालणारी कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) आपली 5G सर्व्हिस भारतात दिवाळीच्या आधी लाँच करणार आहे. Jio 5G लाँच सोबतच JioBook laptop ची माहिती देखील समोर येऊ लागली आहे. रिपोर्ट्सनुसार मुकेश अंबानी ह्यांची कंपनी रिलायन्स जियो आता 4 जी सिमसह एक बजेट लॅपटॉप लाँच करणार आहे, ज्याची किंमत 15000 रुपये […]

The post 15 हजारांत लॅपटॉप! वायफायची गरज नाही 4G सिम स्लॉटसह येईल स्वस्त JioBook लॅपटॉप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
JioBook Laptop Launch: टेलीकॉम क्षेत्रात धुमाकूळ घालणारी कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) आपली 5G सर्व्हिस भारतात दिवाळीच्या आधी लाँच करणार आहे. Jio 5G लाँच सोबतच JioBook laptop ची माहिती देखील समोर येऊ लागली आहे. रिपोर्ट्सनुसार मुकेश अंबानी ह्यांची कंपनी रिलायन्स जियो आता 4 जी सिमसह एक बजेट लॅपटॉप लाँच करणार आहे, ज्याची किंमत 15000 रुपये असेल. Reuters च्या बातमीनुसार हा लॅपटॉप स्वस्त किंमतीच्या जोरावर ग्राहकांना आकर्षित करेल.

JioBook Laptop

रायटर्सनं सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे की हा बजेट लॅपटॉप बनवण्यासाठी रिलायन्स जियोनं क्वॉलकाम आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या बड्या टेक कंपन्यांशी भागेदारी केली आहे. क्वॉलकाम कंपनी आर्म लिमिटेडच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आलेला चिपसेट लॅपटॉपमध्ये वापरला जाईल. लॅपटॉपमध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज ओएसला सपोर्ट देखील दिला जाईल. काही रिपोर्ट्सनुसार या लॅपटॉपमध्ये क्रोम ओएस किंवा अँड्रॉइड ओएस देखील मिळू शकतो.

Jio Low Cost Laptop Launch At Rs 15000 With 4G Enabled SIM Reports

रिलायन्स जियोनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु तुम्हाला आठवत असेल की यंदा रिलायन्सनं 45th Annual General Meeting (AGM) दरम्यान आपल्या Jio 5G लाँचची माहिती देत असताना गुपचूप JioBook laptop देखील टीज केला होता, ज्यामुळे लॅपटॉप मार्केटमध्ये ‘जियोबुक’ लॅपटॉप येण्याच्या चर्चाना उधाण आलं होतं. हे देखील वाचा: 210GB डेटा आणि 105 दिवसांची वैधता असलेला BSNL चा स्वस्त प्लॅन; Airtel-Jio कडे नाही असा प्लॅन

JioBook चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Reliance JioBook किफायशीर कंप्यूटिंग सेगमेंटला लक्ष्य करेल आणि त्यामुळे या लॅपटॉप मधील हार्डवेयर देखील त्यानुसार देण्यात येईल. JioBook मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 665 (SM6125) चिपसेट दिला जाऊ शकतो, तसेच हा डिवाइस Android ऑपरेटिंग सिस्टमच्या नवीन मॉडिफाइड व्हर्जनवर काम करू शकतो. ज्याला JioOS असं नाव दिलं जाऊ शकतं, इथे कंपनीची गुगल सोबत केलेली भागेदारी कामी येऊ शकते.

Jio Low Cost Laptop Launch At Rs 15000 With 4G Enabled SIM Reports

लीक रिपोर्ट्सनुसार या लॅपटॉपच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन 1366×768 पिक्सल असण्याची शक्यता आहे आणि डिवाइसमध्ये 2GB LPDDR4X रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज मिळू शकते. 4GB रॅम आणि 64GB eMMC 5.1 स्टोरेज असलेला एक हाय एन्ड व्हेरिएंट देखील ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. तसेच JioBook मध्ये व्हिडीओ आउटपुटसाठी एक मिनी एचडीएमआय कनेक्टर, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, एक थ्री-अ‍ॅक्सिस एक्सेलेरोमीटर आणि एक क्वॉलकॉम ऑडियो चिप देखील मिळू शकते. हे देखील वाचा: प्रतीक्षा संपली! 5जी भारतात लाँच! आता रॉकेट स्पीडनं चालेल इंटरनेट

स्वस्त जियो 5G फोन येतोय बाजारात

लॅपटॉपसह कंपनी नवीन स्वस्त 5G फोन देखील बाजारात लाँच करू शकते ज्याची किंमत 8 ते 12 हजारांच्या आत असू शकते. जियो फोन 5जी फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह मिळे. हा फोन Snapdragon 480 प्रोसेसर, 4GB LPPDDR4X RAM आणि 32GB स्टोरेजसह बाजारात येईल. फोनच्या मागे 13MP + 2MP असा कॅमेरा सेटअप मिळेल. तर फ्रंटला 8MP चा सेन्सर असेल. Android 12 वर चालणाऱ्या Jio Phone True 5G मध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाईल, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

The post 15 हजारांत लॅपटॉप! वायफायची गरज नाही 4G सिम स्लॉटसह येईल स्वस्त JioBook लॅपटॉप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-low-cost-laptop-launch-at-rs-15000-with-4g-enabled-sim-reports/feed/ 0
स्वस्त Jio 5G Phone सोबतच लाँच होईल खिशाला परवडणारा JioBook लॅपटॉप; अंबानींनी दाखवली झलक https://www.91mobiles.com/marathi/jiobook-laptop-launching-soon-mukesh-ambani-teased-during-reliance-agm-2022/ https://www.91mobiles.com/marathi/jiobook-laptop-launching-soon-mukesh-ambani-teased-during-reliance-agm-2022/#respond Wed, 31 Aug 2022 10:20:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12679 टेलीकॉम क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) नं काही दिवसांपूर्वी आयोजित 45th Annual General Meeting (AGM) दरम्यान आपल्या Jio 5G लाँच बाबत माहिती दिली आहे. कंपनीनं 5G Service च्या घोषणेसोबतच गुपचूप JioBook laptop देखील टीज केला, जो आता लॅपटॉप मार्केटमध्ये ‘जियोबुक’ नावानं येण्याची शक्यता वाढली आहे. या लॅपटॉप (Reliance Jio Laptop) ची सर्वात […]

The post स्वस्त Jio 5G Phone सोबतच लाँच होईल खिशाला परवडणारा JioBook लॅपटॉप; अंबानींनी दाखवली झलक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) नं काही दिवसांपूर्वी आयोजित 45th Annual General Meeting (AGM) दरम्यान आपल्या Jio 5G लाँच बाबत माहिती दिली आहे. कंपनीनं 5G Service च्या घोषणेसोबतच गुपचूप JioBook laptop देखील टीज केला, जो आता लॅपटॉप मार्केटमध्ये ‘जियोबुक’ नावानं येण्याची शक्यता वाढली आहे. या लॅपटॉप (Reliance Jio Laptop) ची सर्वात खास बाब म्हणजे याची किंमत खूप किफायशीर ठेवण्यात येईल, अशी चर्चा आहे. पुढे आम्ही या स्वस्त लॅपटॉपबाबत आतापर्यंत समोर आलेली माहिती दिली आहे ती जाणून घेऊया.

परवडणाऱ्या किंमतीत येईल JioBook Laptop

JioBook लॅपटॉपमध्ये क्वॉलकॉमच्या एआरएम चिपसेटचा वापर केला जाण्याची शक्यता आहे आणि आशा आहे की हा Android ओएसच्या नवीन व्हर्जनसह बाजारात येईल. तसेच हा डिवाइस कंपनी आपल्या Mobile Phone प्रमाणेच कमी किंमतीत सादर करू शकते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हा भारतीय स्टँडर्ड ब्यूरोच्या सर्टिफिकेशन वेबसाइट आणि गीकबेंचवर दिसला होता. हे देखील वाचा: वायरविना मिळणार 2 जीबीपीएसचा भन्नाट स्पीड; अशाप्रकारे Jio AirFiber देईल वेगवान 5G इंटरनेट

रिलायन्सनं आपल्या 45व्या एजीएममध्ये आगामी 5जी सेवेची माहिती देताना एका व्हिडीओच्या माध्यमातून JioBook देखील टीज केला, ज्याची माहिती गेले कित्येक दिवस समोर येत आहे. व्हिडीओमध्ये Reliance JioBook लॅपटॉप एका टेबलवर दिसला आहे.

JioBook चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Reliance JioBook बजेट फ्रेंडली कंप्यूटिंग सेगमेंटला लक्ष्य करेल आणि त्यामुळे त्या दर्जाचे हार्डवेयर वापरण्यात येईल. JioBook मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 (SM6125) चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. तसेच हा डिवाइस Android ऑपरेटिंग सिस्टमच्या एका नवीन मॉडिफाइड व्हर्जनवर काम करू शकतो. ज्याला JioOS असं नाव दिलं जाऊ शकतं.

लीक रिपोर्ट्सनुसार लॅपटॉपच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन 1366×768 असू शकतं. आणि डिवाइसमध्ये 2GB LPDDR4X रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज मिळू शकते. 4GB रॅम आणि 64GB eMMC 5.1 स्टोरेज असलेला एक हाय व्हेरिएंट देखील येऊ शकतो. तसेच JioBook मध्ये व्हिडीओ आउटपुटसाठी एक मिनी एचडीएमआय कनेक्टर, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, एक थ्री-अ‍ॅक्सिस अ‍ॅक्सेलेरोमीटर आणि एक क्वॉलकॉम ऑडियो चिप देण्यात येईल. हे देखील वाचा: जगातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल, 1 जीबी स्पीड असलेलं इंटरनेट; Jio सादर करणार ‘हे’ शानदार प्रॉडक्टस

Jio Cloud PC ची घोषणा

Cloud PC कोणत्याही मोठ्या हार्डवेयरविना हा पीसी वापरता येईल. हा एक वर्चुअल पीसी आहे. ही सेवा वेगवान 5G नेटवर्क स्पीडमुळे यूजर्सना रिमोट सर्वर लोकेशनवरून देखील सर्व कंप्यूटेशंस स्ट्रीम करण्यास मदत करेल. यात वारंवार पीसी अपग्रेड करण्याचं झंझट राहणार नाही. तसेच यामुळे एक नव्हे एकाच वेळी अनेक पीसीची ताकद वापरू शकता.

The post स्वस्त Jio 5G Phone सोबतच लाँच होईल खिशाला परवडणारा JioBook लॅपटॉप; अंबानींनी दाखवली झलक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jiobook-laptop-launching-soon-mukesh-ambani-teased-during-reliance-agm-2022/feed/ 0