Ola Electric Scooter - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 12:48:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अरे बाप रे! 1.28 लाखांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत 87,298 रुपये, व्हायरल होत आहे बिल https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-battery-cost-upto-rs-90000-to-replace/ https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-battery-cost-upto-rs-90000-to-replace/#respond Mon, 20 Feb 2023 09:11:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17957 इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता भारतात वेगानं वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आता हाय-एन्ड ई-टूव्हीलर्स सादर करत आहेत. ईव्हीच्या किंमतीत सर्वात मोठं योगदान अजूनही बॅटरीचं आहे आणि ग्राहकांना नेहमीच जाणून घेण्याची उत्सुकता असते की बॅटरी बदलण्यासाठी किती वेळ लागेल. परंतु अलीकडेच व्हायरल झालेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत पाहून ग्राहकांना टेंशन आलं आहे. ओला एस1 प्रोच्या 4kWh […]

The post अरे बाप रे! 1.28 लाखांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत 87,298 रुपये, व्हायरल होत आहे बिल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Ola S1 electric scooter च्या बॅटरीची किंमत स्कूटरच्या 60 टक्के आहे.
  • Ola S1 Pro के 4kWh battery ची प्राइस Rs 87,298 आहे.
  • Ola S1 आणि S1 Pro च्या बॅटरीवर 3 years/unlimited–kilometer वॉरंटी मिळते.

इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता भारतात वेगानं वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आता हाय-एन्ड ई-टूव्हीलर्स सादर करत आहेत. ईव्हीच्या किंमतीत सर्वात मोठं योगदान अजूनही बॅटरीचं आहे आणि ग्राहकांना नेहमीच जाणून घेण्याची उत्सुकता असते की बॅटरी बदलण्यासाठी किती वेळ लागेल. परंतु अलीकडेच व्हायरल झालेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत पाहून ग्राहकांना टेंशन आलं आहे. ओला एस1 प्रोच्या 4kWh बॅटरी पॅकची किंमत व्हायरल होत आहे जी 87,298 रुपये आहे.

पाहा 4kWh Ola battery ची किंमत

तुम्ही खाली फोटोजमध्ये पाहू शकता की ओला एस1 प्रोसाठी ओला 4kWh (3.97kWh) बॅटरी पॅकची किंमत 87,298 रुपये आहे. तर ओला इलेक्ट्रिक 3 वर्ष किंवा अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी देते. बॅटरी पॅक बदलण्याचा खर्च वाहनाच्या किंमतीच्या 62 टक्के पर्यंत आहे. सध्या Ola S1 Pro डिस्काउंटसह विकली जात आहे आणि हिची किंमत 1.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. हे देखील वाचा: 1 मार्चला लाँच होईल Vivo V27 Series, पाहा कोण-कोणते फोन येणार बाजारात

बॅटरी पॅकच्या पॅकेजिंगवरील लेबलवर 66,549 रुपयांची एमआरपी लिहिण्यात आली आहे. तसेच, ओला एस1 प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. याचा अर्थ असा आहे की ओला एस1 इलेक्ट्रिक स्कूटरवर बॅटरी पॅकची किंमत ईव्हीच्या एकूण किंमतीच्या 66 टक्के आहे. गेल्यावर्षी, असाच एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता, कारण Tata Nexon EV च्या बॅटरी बदलण्याचा खर्च 7 लाख रुपये आला होता.

बॅटरी पॅक दीर्घकाळ चालतात. परंतु अनेकदा ही बदलण्याची आवश्यकता असते. परंतु बॅटरीची किंमत स्कूटरच्या किंमतीपेक्षा जास्त असल्यामुळे ग्राहक आता घाबरू लागले आहेत. तसेच पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याआधी विचार करत आहेत. हे देखील वाचा: iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले, 2-2 सेल्फी कॅमेरे; लाँचपूर्वीच Xiaomi 13 Lite ची किंमत लीक

OLA S1 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर 58Nm टार्क, 8.5kW च्या मोटरसह येते ज्यामुळे स्कूटर 3 सेकंदात 0-40kmph चा स्पीड गाठू शकते. याव्यतिरिक्त कंपनीचा दावा आहे की स्कूटरमध्ये ताशी 115 किमीचा टॉप स्पीड मिळेल. स्कूटरमध्ये पुढे आणि मागे एक डिस्क ब्रेक आहे आणि यात 36L अंडर-सीट बूट स्पेस मिळते. तसेच ओला एस1 प्रो बद्दल कंपनीनं दावा केला आहे की यात 181 किमी आणि जवळपास 135 किमीची वास्तविक रेंज मिळते. ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्ज होण्यास जवळपास 6.5 तास लागतात.

The post अरे बाप रे! 1.28 लाखांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीची किंमत 87,298 रुपये, व्हायरल होत आहे बिल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-battery-cost-upto-rs-90000-to-replace/feed/ 0
Ola चा नवा धमाका, नवीन अवतार आणि कमी किंमतीत आल्या S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर https://www.91mobiles.com/marathi/ola-launch-new-variant-of-s1-s1-air-range-price-and-more/ https://www.91mobiles.com/marathi/ola-launch-new-variant-of-s1-s1-air-range-price-and-more/#respond Fri, 10 Feb 2023 07:47:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17699 Ola Electric नं आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाइनअपचा विस्तार करत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स जोडल्या आहेत. कंपनीनं electric scooters S1 आणि S1 Pro चे नवीन व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. OLA S1 Air तीन नवीन व्हेरिएंटमध्ये आणि OLA S1 एका नवीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. सादर करण्यात आलेल्या Ola S1 Air scooter च्या नवीन लो बॅटरी व्हेरिएंटची […]

The post Ola चा नवा धमाका, नवीन अवतार आणि कमी किंमतीत आल्या S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Ola S1 आणि S1 Pro चे नवीन व्हेरिएंट बाजारात आणले आहेत.
  • ओला एस1 एयर 2 kWh व्हेरिएंटसाठी रिजर्वेशन विंडो खुली करण्यात आली आहे.
  • भाविश अग्रवाल यांनी कंपनीची आगामी इलेक्ट्रिक बाइक टीज केली आहे.

Ola Electric नं आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाइनअपचा विस्तार करत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स जोडल्या आहेत. कंपनीनं electric scooters S1 आणि S1 Pro चे नवीन व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. OLA S1 Air तीन नवीन व्हेरिएंटमध्ये आणि OLA S1 एका नवीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. सादर करण्यात आलेल्या Ola S1 Air scooter च्या नवीन लो बॅटरी व्हेरिएंटची प्रारंभिक किंमत 84,999 रुपये आणि S1 scooter च्या नवीन व्हेरिएंटची किंमत 99,999 रुपये (एक्स शोरूम) आहे. पुढे आम्ही तुम्हाला दोन्ही स्कूटर lच्या नवीन व्हेरिएंटची संपूर्ण माहिती दिली आहे.

कधी सुरु होईल बुकिंग

बुकिंग पाहता ओला इलेक्ट्रिकनं काल आपल्या ओला एस1 एयर 2 kWh व्हेरिएंटसाठी रिजर्वेशन विंडो खुली केली आहे. स्कूटरची डिलिव्हरी यावर्षी जुलैपासून सुरु केली जाणार आहे. तसेच कंपनीनं आपल्या S1 2kWh स्कूटर्ससाठी परचेज विंडो देखील खुली केली आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हटलं आहे की रिवाइज्ड बॅटरी पॅकमुळे डिलिव्हरी तीन महीने उशिरा झाली आहे. हे देखील वाचा: आता 7 हजारांपेक्षा कमीमध्ये मिळणार Realme C30s; कंपनीनं कमी केली किंमत

OLA Electric Scooter Price

सर्वप्रथम OLA S1 Air च्या तिन्ही नवीन व्हेरिएंटची किंमत पाहूया. OLA S1 Air च्या 2kWh battery pack variant ची किंमत 84,999 रुपये, 3kWh व्हेरिएंटची प्राइस 99,999 रुपये आणि 4kWh व्हेरिएंटची प्राइस 1,09,999 रुपये आहे. S1 Air आधी ऑक्टोबर 2022 मध्ये 2.5kWh च्या बॅटरीसह लाँच करण्यात आली होती जी आता डिस्कंटिन्यू करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे कंपनीनं OLA S1 चा नवीन 2 kWh बॅटरी कपॅसिटी व्हेरिएंट 99,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. तसेच OLA S1 चा 3 kWh व्हेरिएंट 1,09,999 रुपये व OLA S1 Pro 4 kWh व्हेरिएंट 1,29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
नोट: सर्व प्राइस एक्स शोरूम आहेत.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर की रेंज आणि फीचर्स

ओलाच्या नवीन इलेक्ट्रिक स्कटूरची बॅटरी रेंज पाहता OLA S1 Airt Scooter च्या 2kWh, 3kWh आणि 4kWh battery pack variant मध्ये अनुक्रमे 85km, 125km व 165km IDC (Indian Driving Cycle) ranges मिळेल. तसेच जर तुम्ही आधी 2.5kWh व्हेरिएंट बुक केला असेल तर काळजी नसावी कारण तुम्हाला 3kWh व्हेरिएंट एक रुपया जास्त न देता अपग्रेड म्हणुन मिळेल. तिन्ही व्हेरिएंटमध्ये 85 KM चा टॉप स्पीड व 4kw ची मोटर देण्यात आली आहे.

त्याचबरोबर S1 सीरीजचे मिड-स्पेक मॉडेल पाहता यात देखील एक नवीन व्हेरिएंट आला आहे. ओला एस1 आता 2kWh बॅटरी पॅक व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. या व्हेरिएंटमध्ये 91 किमी (आयडीसी) रेंज आणि ताशी 90 किमीचा टॉप स्पीड मिळेल.हे देखील वाचा: लाँच झाला नाही तरी समोर आली iQOO Neo 7 ची किंमत; 16 फेब्रुवारीला येतोय भारतात

येतेय ओला इलेक्ट्रिक बाइक

इलेक्ट्रिक स्कूटर व्यतिरिक्त भाविश अग्रवाल यांनी कंपनीची आगामी इलेक्ट्रिक बाइक टीज करण्यासाठी पठाण स्टाइल वापरली आहे. अग्रवाल म्हणाले, “कुर्सी पेटी बांध लो क्यूंकी, मौसम बिगडने असलेला आहे.” इव्हेंटमध्ये कंपनीनं आपली ओला इलेक्ट्रिक बाइक टीज केली. दरम्यान बाइकच्या डिजाइन व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post Ola चा नवा धमाका, नवीन अवतार आणि कमी किंमतीत आल्या S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-launch-new-variant-of-s1-s1-air-range-price-and-more/feed/ 0
OLA Scooter बुकिंगच्या नावाखाली फसवणूक; 20 आरोपींना अटक https://www.91mobiles.com/marathi/ola-electric-scooter-booking-fraud-delhi-police-arrested-20-criminals/ https://www.91mobiles.com/marathi/ola-electric-scooter-booking-fraud-delhi-police-arrested-20-criminals/#respond Tue, 15 Nov 2022 07:30:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14945 देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर्स पैकी एक खरेदी करण्याआधी बुक करावी लागते. परंतु, जर तुम्ही या ई-स्कूटरची बुकिंग करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण कदाचित तुम्ही ज्या वेबसाइटवरून OLA Scooter ची बुकिंग करत असाल ती फेक असू शकते त्यामुळे तुमची बुकिंग अमाउंट कंपनीकडे न जाता थेट सायबर गुन्हेगारांच्या अकाऊंटमध्ये पोहोचू शकते. […]

The post OLA Scooter बुकिंगच्या नावाखाली फसवणूक; 20 आरोपींना अटक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर्स पैकी एक खरेदी करण्याआधी बुक करावी लागते. परंतु, जर तुम्ही या ई-स्कूटरची बुकिंग करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण कदाचित तुम्ही ज्या वेबसाइटवरून OLA Scooter ची बुकिंग करत असाल ती फेक असू शकते त्यामुळे तुमची बुकिंग अमाउंट कंपनीकडे न जाता थेट सायबर गुन्हेगारांच्या अकाऊंटमध्ये पोहोचू शकते. ओला स्कूटर बुक करण्याच्या नावावर कोट्यवधींची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. सायबर गुन्हेगारांनी आतापर्यंत ओला इलेक्ट्रिक स्कूटर बुक करण्याच्या नावाखाली अनेक ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे.

20 आरोपींना अटक

माहितीनुसार सर्व आरोपी देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बसून ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या नावाखाली फसवणूक करत होते. अशा घटना वाढत असल्यामुळे पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या 20 Cyber criminals ना अटक करण्यात आलं. हे देखील वाचा: चुटकीसरशी फुल चार्ज! 200W Fast Charging च्या शक्तीसह iQOO 11 Pro येतोय भारतात, लाँच डेट लीक

1000 लोकांना कोट्यवधींचा चुना लावला

दिल्ली पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे की सायबर गुन्हेगारांच्या एका गँगनं कमीत कमी 1,000 लोकांना फसवलं आहे. माहितीनुसार, बंगळुरूमध्ये राहून दोन आरोपींनी ओलाची एक फेक वेबसाइट डिजाइन केली होती, जिच्या माध्यमातून वेबसाइटवर विजिट करणाऱ्या लोकांना फसवून आपल्या जाळ्यात ओढत होते. दिल्ली पोलिसांनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर स्कॅम करण्याच्या आरोपाखाली 20 आरोपींना अटक केलं आहे.

अशी होते ओला स्कूटर बुकिंगच्या नावाखाली फसवणूक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्राहक ओला ई-स्कूटीची माहिती घेण्यासाठी गुगलवर सर्च करत होते, तेव्हा त्यांना ही नकली वेबसाइट दिसत होती. त्यानंतर या गँगचे आपणच कंपनी असून ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करत होते. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची डोकेदुखी वाढली; चीनी ब्रँड्सना मिळणार स्वस्त Samsung Galaxy M04 कडून तगडे आव्हान

चार्जेसच्या नावाखाली एक्स्ट्रा पैसे

बातम्यांनुसार ग्राहक या गुन्हेगारांची नकली वेबसाइट ओपन करून आपले डिटेल सबमिट करत होते. त्यानंतर ग्राहकांना फोन करून त्यांच्याकडे 499 रुपये बुकिंग अमाउंटची मागणी केली जायची. एकदा का ही बुकिंग अमाऊंट म्हणून 499 रुपये ट्रांसफर झाले की त्यानंतर स्कूटरच्या इंश्योरेंस, टॅक्स आणि ट्रांसपोर्टेशन चार्जेसच्या नावाखाली एका ग्राहकाकडून 50,000 ते 70,000 रुपये घेतले जात होते. अशा जवळपास 1,000 ग्राहकांची फसवणूक करून या सायबर गुन्हेगारांनी कोट्यावधी रुपये कमवले होते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post OLA Scooter बुकिंगच्या नावाखाली फसवणूक; 20 आरोपींना अटक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-electric-scooter-booking-fraud-delhi-police-arrested-20-criminals/feed/ 0
101 किमी रेंजसह लाँच झाली Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/101-km-range-ola-s1-air-electric-scooter-launch-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/101-km-range-ola-s1-air-electric-scooter-launch-in-india/#respond Tue, 25 Oct 2022 05:43:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14256 भारतातील प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ओलानं भारतीय बाजारात आपला सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air लाँच केला आहे. या स्कूटरची किंमत 79,999 रुपये (एक्स शोरूम प्राइस) ठेवण्यात आली आहे. ही फक्त लिमिटेड पीरियड ऑफर आहे आणि काही काळानंतर या स्कूटरची किंमत 84,999 रुपये होईल. नवीन ओला एस1 एयर मध्ये प्राइस कमी झाली आहे […]

The post 101 किमी रेंजसह लाँच झाली Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतातील प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ओलानं भारतीय बाजारात आपला सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air लाँच केला आहे. या स्कूटरची किंमत 79,999 रुपये (एक्स शोरूम प्राइस) ठेवण्यात आली आहे. ही फक्त लिमिटेड पीरियड ऑफर आहे आणि काही काळानंतर या स्कूटरची किंमत 84,999 रुपये होईल. नवीन ओला एस1 एयर मध्ये प्राइस कमी झाली आहे तसेच जुन्या एस1 मॉडेलच्या तुलनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. सध्या कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरची प्री बुकिंग घेत आहे आणि डिलिव्हरी पुढील वर्षी 2023 च्या पहिल्या सहामहिन्यात होईल.

Ola S1 Air चे स्पेसिफिकेशन

ओला एस1 एयरचे स्पेसिफिकेशन पाहता, पहिल्या नजरेत जास्त बदल दिसत नाहीत. परंतु छोट्या-छोट्या गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. कंपनीनं ही ड्युअल कलर बॉडीसह सादर केली आहे. वरचा भाग सफेद किंवा लाल रंगात देण्यात आला आहे तर खाली काळ्या रंगाचा अनपेंटेड प्लास्टिक आहे. तर बूट स्पेस यावेळी खूप फ्लॅट झाली आहे आणि इथे तुम्हाला 34 लिटरची जागा मिळते. हे देखील वाचा: Battery Swapping म्हणजे काय? या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार Electric Vehicle ची किंमत

समोरच्या लाइट आणि हँडलिंग स्टाइल तीच आहे. परंतु सीट थोडी वेगळी आहे आणि कंपनीनुसार त्यांनी स्कल्पटेड सीटचा वापर केला आहे जी खूप आरामदायक आहे. तसेच सहज उभी करण्यासाठी, स्टॅन्डवर लावण्यासाठी किंवा पुढे मागे करण्यासाठी ग्रॅब हँडल देण्यात आलं आहे.

उभे तुम्हाला टेलिस्कोपिक फोर्क्स मिळतात तर कम्फर्ट ड्राईव्हिंगसाठी यात ड्युअल सस्पेंशन देण्यात आलं आहे. कंपनीनं डिजिटल स्पीडोमीटरसह अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच स्क्रीन विजेट्स कस्टमाइज करता येतील. कंपनीनं यात 10 वॉटचे स्पिकर देण्यात आले आहेत जे गाडी चालवताना तुम्हाला नेव्हिगेशनमध्ये मदत करतील.

ओला एस1 एयरमध्ये 4.5 किलोवॉटची मोटर देण्यात अली आहे. कंपनीचा दावा आहे की ही अधिकतम 85 किलोमीटरचा स्पीड देऊ शकते तर फक्त 4.3 सेकंदात 40 किलोमीटर प्रति तास आणि 9.8 सेकंदात 60 किलोमीटर प्रति तास स्पीड गाठू शकते. एकदा चार्ज केल्यास स्कूटर 101 किलोमीटरची रेंज देऊ शकते. हे देखील वाचा: फक्त स्वस्त प्लॅन नव्हे तर स्पीडही मिळणार; BSNL 4G ची लाँच डेट कंफर्म, टेलीकॉम मंत्र्यांनी दिली खुशखबर

स्कूटरचे दूसरे फीचर्स पाहता यात तुम्हाला 17.78 सेंटीमीटरची स्क्रीन मिळते. तसेच कंपनीनं यात ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे ज्याचा मॅक्सिमम क्लॉक स्पीड 2.2 गीगाहर्ट्ज आहे. कंपनीनं यात 3 जीबी रॅम दिला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एलटीई, वायफाय आणि जीपीएस फीचर्सनी सुस्सज आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 101 किमी रेंजसह लाँच झाली Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/101-km-range-ola-s1-air-electric-scooter-launch-in-india/feed/ 0
Ola Electric Offer: या इलेक्ट्रिक स्कूटीवर पहिल्यांदाच मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/10000-rs-discount-on-ola-electric-s1-pro-festive-offer/ https://www.91mobiles.com/marathi/10000-rs-discount-on-ola-electric-s1-pro-festive-offer/#respond Tue, 27 Sep 2022 09:11:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13480 Ola Electric offers festive discount on S1 Pro: दिवाळी सुरु होण्यास एक महिन्यापेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. परंतु त्याआधी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तामिळनाडुमधील इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी Ola Electric (ओला इलेक्ट्रिक) नं पहिल्यांदाच आपल्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटरवर जबरदस्त डिस्काउंटची घोषणा केली आहे. फेस्टिव सीजनच्या निमित्ताने कंपनीनं Ola S1 Pro वर 10,000 रुपयांची सूट देण्याची घोषणा […]

The post Ola Electric Offer: या इलेक्ट्रिक स्कूटीवर पहिल्यांदाच मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Ola Electric offers festive discount on S1 Pro: दिवाळी सुरु होण्यास एक महिन्यापेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. परंतु त्याआधी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तामिळनाडुमधील इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी Ola Electric (ओला इलेक्ट्रिक) नं पहिल्यांदाच आपल्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटरवर जबरदस्त डिस्काउंटची घोषणा केली आहे. फेस्टिव सीजनच्या निमित्ताने कंपनीनं Ola S1 Pro वर 10,000 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जर तुम्ही एखादी इलेक्ट्रिक स्कूटी विकत घेण्याची योजना बनवत असाल तर ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेता येईल. चला जाणून घेऊया या ऑफरची लास्ट डेट आणि Electric Scooter चे फीचर्स व किंमत.

10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घ्या इलेक्ट्रिक स्कूटर

ओला इलेक्ट्रिकनं फेस्टिव ऑफरची घोषणा आपल्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून केली आहे. कंपनीनं आपल्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे की, “ओलाच्या फेस्टिव ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि ओला एस 1 प्रोवर 10,000 रुपयांच्या डिस्काउंटचा आनंद मिळवा. अन्य फायन्यासिंग ऑप्शन देखील तुमची वाट पाहत आहेत.” हे देखील वाचा: Netflix Upcoming Series: तब्बूच्या ‘खुफिया’ पासून Rana Daggubati च्या ‘राणा नायडू’; नेटफ्लिक्सवर येतायत या जबरदस्त Movies आणि Web Series

ऑफरची लास्ट डेट

ही ऑफर दसरा, 5 ऑक्टोबर पर्यंत वैध आहे. त्यामुळे जर तुम्हाला 10,000 रुपयांचा डिस्काउंट हवा असेल तर ही इलेक्ट्रिक स्कूटर दसऱ्याच्या आधी खरेदी करावी लागेल. तसेच फेस्टिव डिस्काउंटसाठी शॉपिंग विंडो आधीच ओपन करण्यात आली आहे.

10000 Rs Discount On Ola Electric S1 Pro Festive Offer

अशाप्रकारे खरेदी करा इलेक्ट्रिक स्कूटर

ओला इलेक्ट्रिकच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कंपनीच्या साइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर साइटवर दिसणाऱ्या फेस्टिव ऑफर टॅबवर क्लिक केल्यानंतर, एस1 प्रो सवलतीच्या दरात विकत घेण्याचा पर्याय निवडा. 10,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर ही इलेक्ट्रिक स्कूटी तुम्हाला 1.30 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) मिळेल. हिची मूळ किंमत 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे देखील वाचा: जगातील सर्वात स्वस्त 5G Phone! Jio Phone 5G ची किंमत आली समोर, जाणून घ्या

10000 Rs Discount On Ola Electric S1 Pro Festive Offer

OLA S1 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

ओला एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटर 58Nm टार्क, 8.5kW च्या मोटरसह येते ज्यामुळे स्कूटर 3 सेकंदात 0-40kmph चा स्पीड गाठू शकते. याव्यतिरिक्त कंपनीचा दावा आहे की स्कूटरमध्ये ताशी 115 किमीचा टॉप स्पीड मिळेल. स्कूटरमध्ये पुढे आणि मागे एक डिस्क ब्रेक आहे आणि यात 36L अंडर-सीट बूट स्पेस मिळते. तसेच ओला एस1 प्रो बद्दल कंपनीनं दावा केला आहे की यात 181 किमी आणि जवळपास 135 किमीची वास्तविक रेंज मिळते. ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्ज होण्यास जवळपास 6.5 तास लागतात.

The post Ola Electric Offer: या इलेक्ट्रिक स्कूटीवर पहिल्यांदाच मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/10000-rs-discount-on-ola-electric-s1-pro-festive-offer/feed/ 0