Realme 5 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 29 Nov 2019 14:31:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 PUBG आणि Call Of Duty खेळण्याची घेता येईल मजा, 15000 रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या या दमदार स्मार्टफोन्स वर https://www.91mobiles.com/marathi/best-budget-gaming-smartphone-available-in-india-to-play-pubg-call-of-duty-under-rs-15000/ https://www.91mobiles.com/marathi/best-budget-gaming-smartphone-available-in-india-to-play-pubg-call-of-duty-under-rs-15000/#respond Fri, 29 Nov 2019 14:31:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5925 तुम्ही पण एखाद्या अशा फोनचा शोध घेत असाल जो 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येईल आणि तुम्ही त्यावर PUBG आणि Call Of Duty आरामात खेळू शकाल, तर पुढे आम्ही अश्याच स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे.

The post PUBG आणि Call Of Duty खेळण्याची घेता येईल मजा, 15000 रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या या दमदार स्मार्टफोन्स वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याआधी त्याचे स्पेसिफिकेशन्स, कॅमेरा आणि बॅटरी वर खास लक्ष दिले जाते. या सर्व आस्पेक्ट्स सोबतच सध्याचा तरुण नवीन स्मार्टफोनच्या आधी जणू इच्छितो कि त्यात PUBG आणि Call Of Duty सारखे गेम्स कसे चालतील. सध्या हे दोन्ही गेम इंडियाचे टॉप मोबाईल गेम बनले आहेत. हाईएंड स्पेसिफिकेशन्स असलेल्या स्मार्टफोन्स मध्ये हे मोबाईल गेम्स खूप सहज खेळता येतात. पण आजकाल टेक ब्रँड्स त्या यूजर्सना पण लक्षात ठेऊन आपले स्मार्टफोन लॉन्च करत आहेत, जे गेमचे चाहते आहेत परंतु हाय बजेट फोन विकत घेत नाहीत. सध्या भारतीय बाजारात अनेक असे स्मार्टफोन आहेत ज्यांची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास आहे आणि PUBG व Call Of Duty सारख्या गेमचा पण शानदार अनुभव देतात. जर तुम्ही पण एखाद्या अशा फोनचा शोध घेत असाल जो 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येईल आणि तुम्ही त्यावर PUBG आणि Call Of Duty आरामात खेळू शकाल, तर पुढे आम्ही अश्याच स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे.

Xiaomi Redmi Note 8 Pro

भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड पासून सुरवात करायची झाल्यास Redmi Note 8 Pro या बजेट मधील बेस्ट गेमिंग स्मार्टफोन्स पैकी एक आहे. हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होणारा पहिला डिवाईस आहे ज्यात मीडियाटेकचा हेलीयो जी90टी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी Redmi Note 8 Pro माली जी76 एमसी4 जीपीयूला सपोर्ट करतो. फोनची प्रोसेसिंग स्मूद करण्यासाठी यात ‘मी टर्बो’ आहे तर गेमिंगच्या वेळी परफॉर्मेंस फास्ट करण्यासाठी Redmi Note 8 Pro ‘गेम टर्बों 2.0’ टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला गेला आहे. टर्बो टेक्नोलॉजी Redmi Note 8 Pro मध्ये PUBG आणि Call Of Duty चा आनंद अनेक पटीने वाढवते.

Redmi Note 8 Pro चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 वर चालतो. यात 6.53 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो गेम एक्सपीरियंस अजून चांगला करतो. फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहेत. फोटोग्राफी साठी Redmi Note 8 Pro मध्ये 64MP + 8MP + 2MP + 2MP चा क्वॉड रियर कॅमेरा आणि 20MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. दीर्घकाळ गेम खेळता यावे म्हणून या फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग असलेली 4500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Realme 5 Pro

शाओमीचे कट्टर प्रतिस्पर्धी बनलेली Realme पण आपल्या फॅन्सना Realme 5 Pro च्या रूपाने चांगला गेमिंग डिवाईस देत आहे. Realme 5 Pro एंडरॉयड पाई आधारित कलर ओएस 6 सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 712 एआई चिपसेट वर चालतो. फोन मधील HyperBoost 2.0 फीचर सह PUBG आणि Call Of Duty सारखे गेम्स प्रो प्लेयर प्रमाणे खेळता येतात. Realme चे म्हणणे आहे कि या फीचर मुळे गेमिंग परफॉर्मेंस मध्ये 16.2 टक्के टच बूस्ट आणि 38 टक्के फ्रेम बूस्ट मिळतो. तर Realme 5 Pro मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह एड्रेनो 616 जीपीयू देण्यात आला आहे.

Realme 5 Pro चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोन मध्ये 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफी साठी Realme 5 Pro मध्ये पण मागे चार सेंसर आहेत ज्यात 48MP + 8MP + 2MP + 2MP च्या सेन्सरचा समावेश आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. जास्त बॅकअप साठी Realme 5 Pro मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सह एआई कूलिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,035एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M30s

Samsung ने ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या Galaxy M30s स्मार्टफोन द्वारे या लीग मध्ये आपली पकड मजबूत केली आहे. हा स्मार्टफोन 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालतो. PUBG किंवा Call Of Duty खेळताना फोन मधील Game Booster टेम्परेचर आणि मेमरी मोनिटर करत असतो. गेम बूस्टर टेक्नोलॉजी गेम खेळताना स्मूद ग्राफिक्स देते. Samsung Galaxy M30s चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M30s चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड पाईला सपोर्ट करतो. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 48MP + 5MP + 8MP चे तीन सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी हा डिवाईस 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मधील 15वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 6,000एमएएच च्या बॅटरी सह मन भरेस्तोवर PUBG आणि Call Of Duty सारखे मोबाईल गेम्स खेळता येतील.

Vivo Z1 Pro

Z1 Pro Vivo ने खासकरून PUBG प्लेयर्स साठी लॉन्च केला होता. विशेष म्हणजे या फोनचा लॉन्च ईवेंट पण पूर्णपणे PUBG च्या थीम वर होता. PUBG आणि Call Of Duty सारख्या गेम्स साठी या फोन सह Vivo ने Multi-Turbo Engine टेक्नॉलॉजी सादर केली होती. मल्टी टर्बो सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर दोन्ही सोबत समन्वयाने चांगला गेमिंग एक्सपीरियंस देते. या इंजन मध्ये Game Turbo, Centre Turbo, Cooling Turbo आणि AI Turbo समावेश आहे. हे सर्व फॅक्टर मिळून गेम खेळताना FPS म्हणजे फ्रेम पर सेकेंड रेट 78 टक्के कमी होतो तर गेम लोड स्पीड आणि ग्राफिक्स पण फास्ट होतात.

Vivo Z1 Pro एंडरॉयड आधारित फनटच ओएस 9.0 सह 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720 एआई चिपसेट वर चालतो तर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. Vivo Z1 Pro 6.53-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 16MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन मधील 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी दीर्घकाळ गेमचा आनंद देते. फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OPPO A5 2020

OPPO ‘ए सीरीज’ चा A5 2020 स्मार्टफोन पण गेम लवर्स साठी बेस्ट निवड ठरू शकतो. कंपनीने हा डिवाईस Game Boost 2.0 टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जो PUBG किंवा Call Of Duty खेळताना फ्रेम आणि टच तर बूस्ट करतो सोबतच फोनची परफॉर्मेंस स्मूद करून पावर कन्जम्पशन पण 20 टक्क्यांपर्यंत कमी करतो. हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी OPPO A5 2020 मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

OPPO A5 2020 एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन 6.5-इंचाच्या नॅनो वॉटरड्रॉप नॉच एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर 12MP + 8MP + 2MP + 2MP चा क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी हा स्मार्टफोन 8MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. दीर्घकाळ PUBG किंवा Call Of Duty खेळण्यासाठी फोन मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी आहे. OPPO A5 2020 चा 4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Moto G8 Plus

15,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या गेमिंग स्मार्टफोन्स मध्ये Motorola चे नाव पण आहे. ऑक्टोबर मध्ये लॉन्च झालेला Moto G8 Plus पण गेमिंगच्या बाबतीत शानदार आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. Motorola ने आपला फोन AI engine सह आणला आहे जो गेमिंगच्या वेळी फोनची परफॉर्मेंस सुधारतो. तर ग्राफिक्स साठी Moto G8 Plus एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो.

इतर स्पेसिफिकेशन्स पाहता Moto G8 Plus 6.3 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48MP + 16MP + 5MP + मॅक्रो लेंस आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन 25MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Moto G8 Plus मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. फोनचा 4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post PUBG आणि Call Of Duty खेळण्याची घेता येईल मजा, 15000 रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या या दमदार स्मार्टफोन्स वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-budget-gaming-smartphone-available-in-india-to-play-pubg-call-of-duty-under-rs-15000/feed/ 0
48 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 20 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होईल Realme 5s, लो बजेट मध्ये देईल Xiaomi ला टक्कर https://www.91mobiles.com/marathi/realme-5s-with-48-mp-quad-rear-camera-launching-in-india-20-november-with-x2-pro/ https://www.91mobiles.com/marathi/realme-5s-with-48-mp-quad-rear-camera-launching-in-india-20-november-with-x2-pro/#respond Wed, 13 Nov 2019 11:23:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5764 हा स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल

The post 48 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 20 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होईल Realme 5s, लो बजेट मध्ये देईल Xiaomi ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme संबंधित बातमी कालच समोर आली होती ज्यात समजले होते कि कंपनी भारतीय बाजारात आपल्या ‘रियलमी 5 सीरीज’ चा अजून एक नवीन फोन Realme 5s नावाने लॉन्च करणार आहे. या फोनची माहिती शॉपिंग साइट फ्लिपकार्ट कडून समोर आली होती जिथे Realme च्या आगामी डिवाईस Realme X2 Pro च्या प्रोडक्ट पेज वरच “realme 5s Coming Soon” लिहिण्यात आले होते. आज फ्लिपकार्टने Realme 5s चा वेगळा प्रोडक्ट पेज पण बनवला आहे. या पेज वर फोनच्या लॉन्च डेटची माहिती तर दिली आहे सोबत फोनच्या फोटोसह याच्या स्पेसिफिकेशनचा पण खुलासा केला आहे.

Realme 5s चा प्रोडक्ट पेज सध्या फक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरच लाईव आहे. Realme ब्रँड कडून या फोनच्या लॉन्चची घोषणा करण्यात आलेली नाही पण फ्लिपकार्टने सांगितले आहे कि येत्या 20 नोव्हेंबरला रियलमीचा हा आगामी डिवाईस Realme 5s पण इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे या दिवशी रियलमी आपला 64 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme X2 Pro पण लॉन्च करेल.

Realme 5s

फ्लिपकार्ट वर 20 नोव्हेंबरला Realme 5s लॉन्चची माहिती तर देण्यात आली आहे तसेच सोबत फोनच्या प्रोडक्ट पेज वर Realme 5s चा फोटो पण दिसत आहे. पेज वर Realme 5s चा बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे ज्यावरून फोनच्या डिजाईनचा खुलासा झाला आहे. या फोनचा रियर लुक या सीरीज मधील स्मार्टफोन Realme 5 सारखा आहे. Realme 5s पण सीरीज मधील स्मार्टफोन्स प्रमाणे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल जो बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये असेल. सर्वात खास बाब अशी कि या कॅमेरा सेटअप मध्ये पहिल्या सेंसरच्या खाली त्याची MP पावर पण लिहिण्यात आली आहे.

Realme 5s च्या कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. फोटो मध्ये फोन डायमंड कट डिजाईन वर बनलेला दिसत आहे तसेच समोर आलेल्या फोटो मध्ये Realme 5s चा कलर रेड आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण दिसत आहे. त्यामुळे वाल्यूम रॉकर फोनच्या डाव्या पॅनल वर असू शकतो. बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला Realme ची ब्रँडिंग आहे.

48 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा

Realme 5s चा बॅक पॅनल दाखवण्यासोबतच फ्लिपकार्टच्या प्रोडक्ट पेज वर असा पण खुलासा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रियर कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर्स असतील तसेच सर्वात वरचा कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. या प्रोडक्ट पेज वर “Ultra Detailed Pictures, that remain sharp even when zoomed in” लिहिण्यात आले आहे, जो ईशारा करतो Realme 5s च्या क्वॉड कॅमेरा सेटअप मधील एका ‘टेलीफोटो लेंस’ कडे.

Realme 5 सीरीज

या सीरीज मध्ये Realme 5 आणि Realme 5 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्याच सेल मध्ये 1,20,000 पेक्षा जास्त यूनिट विकून नवीन रिकॉर्ड बनवला होता. Realme 5 आणि Realme 5 Pro भारतीय बाजारात लोकांना खूप आवडले. Realme 5 Pro भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे ज्यात 4 जीबी + 64 जीबी, 6 जीबी + 64 जीबी आणि 8 जीबी + 128 जीबी चा समावेश आहे.

Realme 5 Pro चा 4 जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तर ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर हा 14,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर Realme 5 Pro चा 6 जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकला जात आहे पण ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर हा वेरिएंट 15,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. Realme 5 Pro च्या सर्वात मोठ्या 8 जीबी रॅम वेरिएंटची ऑनलाईन किंमत16,999 रुपये तर ऑफलाईन किंमत17,499 रुपये आहे.

Realme 5 च्या किंमतीबद्दल बोलायचे तर Realme 5 चा 3जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये, 4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण मागे झालेल्या प्राइज कट नंतर हे तिन्ही फोन वेरिएंट 1,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. फोनचा 3जीबी + 32जीबी वेरिएंट 8,999 रुपये, 4जीबी + 64जीबी वेरिएंट 9,999 रुपये तर 4जीबी + 128जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 48 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 20 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होईल Realme 5s, लो बजेट मध्ये देईल Xiaomi ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-5s-with-48-mp-quad-rear-camera-launching-in-india-20-november-with-x2-pro/feed/ 0
क्वॉड रियर कॅमेरा आणि 5000एमएएच बॅटरी असलेला Realme 5 झाला अजून स्वस्त, फक्त 8,999 रुपयांमध्ये मिळेल हा दमदार फोन https://www.91mobiles.com/marathi/realme-5-price-slashed-in-india-by-inr-1000-every-variant-sale-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-5-price-slashed-in-india-by-inr-1000-every-variant-sale-specifications/#respond Fri, 01 Nov 2019 14:13:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5655 Realme 5 ची किंमत कमी होणे हा Realme 5s च्या येण्याचाच ईशारा म्हणता येईल.

The post क्वॉड रियर कॅमेरा आणि 5000एमएएच बॅटरी असलेला Realme 5 झाला अजून स्वस्त, फक्त 8,999 रुपयांमध्ये मिळेल हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात Realme 5 सीरीज सादर केली. या सीरीज अंतर्गत Realme 5 आणि Realme 5 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले होते, ज्यांनी आपल्या पहिल्याच सेल मध्ये 1,20,000 पेक्षा जास्त यूनिट विकून नवीन रेकॉर्ड बनवला होता. Realme 5 आणि Realme 5 Pro भारतीय बाजारात पण लोकांना आवडत आहे. सीरीजचे यश पाहून Realme ने आपला स्वस्त स्मार्टफोन Realme 5 अजून स्वस्त केला आहे. या स्मार्टफोनचे सर्व वेरिएंट थेट 1,000 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहेत.

Realme 5 प्राइज कट सह कपंनीच्या अधिकृत वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे. इथे फोनचे सर्व वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहेत. किंमत पाहता Realme 5 चा 3जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये, 4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण प्राइज कट नंतर हे तिन्ही फोन 1,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत फोनचा 3जीबी + 32जीबी वेरिएंट 8,999 रुपये, 4जीबी + 64जीबी वेरिएंट 9,999 रुपये तर 4जीबी + 128जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा सह लीक झाला Xiaomi Mi MIX 4 चा फोटो, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली मोठी माहिती

Realme 5

स्पेसिफिकेशन्स पाहता Realme 5 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 665 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. फोटोग्राफीसाठी Realme 5 च्या मागे चार सेंसर आहेत. यात 12+8+2+2एमपी कॅमेऱ्यांचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. तर फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तर डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

Realme 5s

काही दिवसांपूर्वी रियलमीचा एक नवीन स्मार्टफोन इंटरनेट वर गाजला होता, ज्याचे नाव Realme 5s सांगण्यात आले होते. हा डिवाईस RMX1925 मॉडेल नंबर सह इंडियन वेबसाइट ब्यूरो ऑफ इंडिया स्टॅंडर्ड (BIS) वर लिस्ट झाला होता. तसेच Realme 5s नावाचाच एक स्मार्टफोन थायलंड नॅशनल ब्रॉडकास्टिंग एंड टेलीकम्युनिकेशन एजेंसी (NBTC) वर पण दिसला होता. त्यामुळे आशा आहे कि रियलमी लवकरच Realme 5s स्मार्टफोन बद्दल एखादी घोषणा करू शकते तसेच हा डिवाईस याच महिन्यात भारतीय बाजारात येऊ शकतो. Realme 5 ची किंमत कमी होणे हा Realme 5s च्या येण्याचाच ईशारा म्हणता येईल.

हे देखील वाचा: Redmi ला पुन्हा आव्हान देईल Realme, Realme 5s मॉडेलची करत आहे तयारी

जगातील 7वा सर्वात मोट स्मार्टफोन ब्रँड Realme

Realme ने सांगितले आहे कि साल 2019 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने ग्लोबल मार्केट मध्ये 10 मिलियन म्हणजे 1 कोटी स्मार्टफोन्सची शिपमेंट केली आहे. फक्त 3 महिन्यात इतके मोबाईल फोन विकून Realme ने गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 808 टक्केची अविश्वसनीय वाढ नोंदवली आहे. या सेलमुळे Realme जगातील 7वी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी बनली आहे. हैराणीची बाब म्हणजे मागच्यावर्षी याच कालावधीत Realme जगभरात 47व्या क्रमांकावर होती.

The post क्वॉड रियर कॅमेरा आणि 5000एमएएच बॅटरी असलेला Realme 5 झाला अजून स्वस्त, फक्त 8,999 रुपयांमध्ये मिळेल हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-5-price-slashed-in-india-by-inr-1000-every-variant-sale-specifications/feed/ 0
Realme 6 चा रिटेल बॉक्स आला समोर, 5 रियर कॅमेऱ्यांसह होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-6-retail-box-leaked-penta-lens-qualcomm-snapdragon-710/ https://www.91mobiles.com/marathi/realme-6-retail-box-leaked-penta-lens-qualcomm-snapdragon-710/#respond Thu, 31 Oct 2019 10:25:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5634 Realme 6 च्या बॉक्स वर स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट पण लिहिण्यात आले आहे ज्यातून फोन मधील क्वालकॉम 700 सीरीजच्या चिपसेटचा खुलासा होतो.

The post Realme 6 चा रिटेल बॉक्स आला समोर, 5 रियर कॅमेऱ्यांसह होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ब्रँड खूप वेगाने भारतीय बाजारात उदयास येत आहे. भारतीय बाजारातील Realme 5 आणि Realme 5 Pro स्मार्टफोन ब्रँडच्या हिट स्मार्टफोन्स पैकी आहेत जे यूजर्सना खूप आवडले. काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि Realme हि स्मार्टफोन सीरीज वाढवण्यासाठी तयारी करत आहे आणि सीरीजचा आगामी फोन Realme 5s असेल. तर आता Realme संबंधित अजून एक धमाकेदार बातमी येत आहे ज्यात ब्रँडच्या आगामी स्मार्टफोन Realme 6 चा रिटेल बॉक्स दाखवण्यात आला आहे.

Realme संबंधित हा लीक स्लॅशलीकच्या माध्यमातून समोर आला आहे. या वेबसाइट वर Realme 6 च्या रिटेल बॉक्सचा फोटो शेयर केला गेला आहे. Realme ने अजूनतरी Realme 6 संबंधित कोणतीही माहिती दिली नाही पण लीक झालेल्या फोटो वर विश्वास ठेवल्यास रियलमी ब्रँडने आपल्या नवीन फोन Realme 6 वर काम करायला सुरवात केली आहे आणि लवकरच हा स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला जाऊ शकतो.

Realme 6

रियलमी 6 च्या या रिटेल बॉक्सने फक्त कंपनी Realme 6 नावाच्या नवीन फोन वर काम करत आहे याकडे ईशारा केला नाही तर या रिटेल बॉक्स वर फोनचे काही स्पेसिफिकेशन्स पण लिहिण्यात आले आहेत. या बॉक्स वर Realme 6 सोबतच फोनच्या कॅमेरा डिपार्टमेंट आणि प्रोसेसरची माहिती लिहिण्यात आलेली आहे. रिटेल बॉक्स वर ‘Penta Lens’ लहिलेले आहे ज्यावरून समजते कि Realme 6 स्मार्टफोन मध्ये पाच रियर कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात.

हे देखील वाचा: Redmi ला पुन्हा आव्हान देईल Realme, Realme 5s मॉडेलची करत आहे तयारी

विशेष म्हणजे Nokia 9 PureView स्मार्टफोन मध्ये आपण अशा प्रकारचा कॅमेरा सेटअप बघितला आहे. या फोन मध्ये पाच रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहोत जे राउंड शेप मध्ये आहेत. रियलमी बॉक्स नंतर बोलले जात आहे कि Realme 6 मध्ये पण अशाप्रकारचा कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तसेच Realme 6 च्या बॉक्स वर स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट पण लिहिण्यात आले आहे ज्यातून फोन मधील क्वालकॉम 700 सीरीजच्या चिपसेटचा खुलासा होतो.

Realme 5 Pro

Realme 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 712 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. फोटोग्राफी साठी रियलमी 5 सीरीज क्वॉड रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करते. फोनच्या बॅक पॅनल वर 119 डिग्री फील्ड ऑफ व्यू सह एक अल्ट्रा वाइड सेंसर आणि एक 4cm माइक्रोस्कोपिक फोकल लेंथ सह सुपर मॅक्रो सेंसर आहे. या तीन व्यतिरिक्त या कॅमेरा सेटअप मध्ये एक पोर्ट्रेट लेंस पण आहे जी याचा चौथा सेंसर आहे.

हे देखील वाचा: Redmi Note 8 Pro vs Realme XT, कोणत्या फोनला द्याल पहिली पसंती?

फोटोग्राफीसाठी Realme 5 Pro मध्ये पण मागे चार सेंसर आहेत. यात 48 + 8 + 2 + 2 मेगापिक्सल कॅमेऱ्यांचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. तर फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सोबत 4,035mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

The post Realme 6 चा रिटेल बॉक्स आला समोर, 5 रियर कॅमेऱ्यांसह होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-6-retail-box-leaked-penta-lens-qualcomm-snapdragon-710/feed/ 0
Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/#respond Fri, 11 Oct 2019 15:18:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5510 Realme आपल्या लो बजेट स्मार्टफोन Realme 2 Pro वर 1991 रुपयांचा प्राइज कट देत आहे.

The post Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सणासुदीचे दिवस येताच टेक कंपन्या कामाला लागतात. सर्व ब्रॅण्ड्स आपल्या फॅन्सना खुश करण्यासाठी आणि स्मार्टफोन यूजर्सना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आर्कषक ऑफर देत आहेत. एकीकडे शॉपिंग साइट्स वर हे स्मार्टफोन डिस्काउंट आणि आर्कषक ऑफर्स सह विकले जात आहेत. तसेच स्मार्टफोन ब्रँड पण आपल्या प्रोडक्ट्सची विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किंमती कमी करून ते डिस्काउंट सह विकत आहेत. खूप वेगाने प्रसिद्ध झालेली टेक कंपनी Realme ने पण आज आपल्या दिवाळी सेलची की घोषणा केली आहे.

Realme ने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले आहे कि 12 ऑक्टोबर पासून कंपनी भारतात दिवाळी सेलची सुरवात करत आहे. Realme चा हा सेल रात्री 12 वाजता सुरु होऊन 16 ऑक्टोबर मध्यरात्री पर्यंत चालेल. Realme ने आपला सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण सुरु केला आहे. या सेल मध्ये Realme फोन भरभक्कम डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध होतील.

अश्या आहेत ऑफर

Realme C2 चा 2जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 5,999 रुपये आणि फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे Realme 3 स्मार्टफोन वर कंपनी 500 रुपयांचा डिस्काउंट देत आहे ज्यामुळे हा डिवाईस 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. दिवाळी ऑफर मध्ये Realme 3 Pro पण 1,000 रुपये स्वस्त मिळेल, फोन 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme 5 पाहता, ब्रँड या फोन वर पण 1,000 रुपयांची सूट देत आहे. या डिस्काउंट नंतर फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपये तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Realme आपल्या लो बजेट स्मार्टफोन Realme 2 Pro वर 1991 रुपयांचा प्राइज कट देत आहे. डिस्काउंट नंतर हा फोन 8,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

त्याचबरोबर Realme X, Realme 3i आणि Realme 5 Pro सोबत Realme XT कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वरून एचडीएफसी कार्डने विकत घेतल्यास 10 टक्क्यांची सूट मिळेल. तसेच हे फोन फ्लिपकार्ट वरून विकत घेतल्यास एसबीआई क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. कंपनी निवडक स्मार्टफोन्स वर नो कॉस्ट ईएमआई ऑफर पण देत आहे.

The post Realme ने सुरु केला दिवाळी सेल, 9 स्मार्टफोन्स वर मिळेल भरभक्कम डिस्काउंट आणि फ्री ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-diwali-sale-realme-5-pro-3i-x-xt-c2-discount-offer-price/feed/ 0
Realme 5 Pro आता विकला जाईल रिटेल स्टोर्स वर पण, जाणून घ्या फोनची ऑफलाईन किंमत https://www.91mobiles.com/marathi/realme-5-pro-sale-starts-offline-store-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-5-pro-sale-starts-offline-store-price-specifications/#respond Mon, 16 Sep 2019 15:20:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5316 कंपनीने या फोनची ऑफलाईन किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे.

The post Realme 5 Pro आता विकला जाईल रिटेल स्टोर्स वर पण, जाणून घ्या फोनची ऑफलाईन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्या महिन्यात भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन डिवाईस Realme 5 आणि Realme 5 Pro लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन रियलमी ब्रँडचे असे पहिले स्मार्टफोन होते जे क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. हे दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीने तीन वेरिएंट मध्ये लॉन्च केले होते जे आतापर्यंत फक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येत होते. पण आता आपल्या फॅन्सना भेट देत Realme ने Realme 5 Pro ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर पण सेल साठी उपलब्ध केले आहेत. म्हणजे हा शानदार स्मार्टफोन आता जवळच्या रिटेल स्टोर वरून पण विकत घेता येईल.

अशी असेल नवीन किंमत

Realme 5 Pro भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे ज्यात 4 GB + 64 GB, 6 GB + 64 GB आणि 8 GB + 128 GB चा समावेश आहे. कंपनीने या फोनची ऑफलाईन किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. Realme 5 Pro चा 4 जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर हा 14,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

त्याचप्रमाणे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर Realme 5 Pro चा 6 जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकला जात आहे पण ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर हा वेरिएंट 15,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. Realme 5 Pro चा सर्वात मोठा 8 जीबी रॅम वेरिएंट कंपनीने 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता, पण आता ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर हा फोन वेरिएंट 17,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme 5 Pro

Realme 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा Realme 5 पेक्षा वेगळा आहे. यात 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 712 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. हँडसेट कंपनीने तीन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्यात 4+64GB, 6+64GB, 8+128GB वेरिएंटचा समावेश आहे.

फोटोग्राफी साठी Realme 5 Pro मध्ये पण चार सेंसर आहेत. यात 48+8+2+2एमपी कॅमेऱ्यांचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सह 4,035mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

The post Realme 5 Pro आता विकला जाईल रिटेल स्टोर्स वर पण, जाणून घ्या फोनची ऑफलाईन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-5-pro-sale-starts-offline-store-price-specifications/feed/ 0
Realme Q मध्ये असेल 20W VOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलेली 4,035एमएएच ची बॅटरी, 5 सप्टेंबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-q-20w-vooc-4035-mah-battery-snapdragon-712-chipset-launch-date-5th-september/ https://www.91mobiles.com/marathi/realme-q-20w-vooc-4035-mah-battery-snapdragon-712-chipset-launch-date-5th-september/#respond Mon, 02 Sep 2019 13:22:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5200 Realme आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम आणण्याची योजना बनवत आहे आणि Realme Q ओएस सह येणारा पहिला प्रोडक्ट असू शकतो.

The post Realme Q मध्ये असेल 20W VOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलेली 4,035एमएएच ची बॅटरी, 5 सप्टेंबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने घोषणा केली आहे कि कपंनी येत्या 5 सप्टेंबरला आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये ‘Realme Q’ सीरीज सुरु करणार आहे. कपंनीने लॉन्च डेट सोबतच सीरीजच्या स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती पण दिली आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर्स मधून Realme Q सीरीज मधील चिपसेट आणि कॅमेरा सेटअपची माहिती देण्यात आली होती तर आता Realme च्या अधिकाऱ्यांनी Realme Q चे बॅटरी डिटेल पण सार्वजनिक केले आहेत.

Realme चायनाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर (CMO), Xu Qi Chase यांनी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट शेयर करत सांगितले आहे कि 5 सप्टेंबरला लॉन्च होणाऱ्या Realme Q स्मार्टफोन मध्ये 4,035एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाईल. पावरफुल असण्यासोबतच स्मार्टफोन बॅटरी 20W VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करेल, ज्यामुळे काही मिनिटांतच फोनची बॅटरी फुल चार्ज करता येईल.

विशेष म्हणजे Realme Q Series 5 सप्टेंबरला कंपनी 4 नवीन प्रोडक्ट लॉन्च करेल. या डिवाईसेजची नावे अजूनतरी समोर आले नाहीत पण Realme ने दिलेल्या माहिती नुसार यातील एका प्रोडक्ट मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट मिळेल. त्याचबरोबर या डिवाईसच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल. आशा आहे कि हा Sony IMX586 सेंसर असेल जो क्चॉड कॅमेरा सेटअप मध्ये येईल. असे बोलले जात आहे कि Realme आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम आणण्याची योजना बनवत आहे आणि Realme Q ओएस सह येणारा पहिला प्रोडक्ट असू शकतो.

Realme 5 Pro

Realme 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा Realme 5 पेक्षा वेगळा आहे. यात 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 712 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. हँडसेट कंपनीने तीन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्यात 4+64GB, 6+64GB, 8+128GB वेरिएंटचा समावेश आहे.

फोटोग्राफी साठी Realme 5 Pro मध्ये पण चार सेंसर आहेत. यात 48+8+2+2एमपी कॅमेऱ्यांचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सह 4,035mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

Realme 5

स्पेसिफिकेशन्स पाहता Realme 5 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 665 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. हँडसेट कंपनीने दोन रॅम व तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्यात 3+32GB, 4+64GB, 4+128GB वेरिएंटचा समावेश आहे.

फोटोग्राफी साठी Realme 5 च्या मागे चार सेंसर आहेत. यात 12+8+2+2एमपी कॅमेऱ्याचा कॉम्बिनेशन देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

रियलमी 5 प्रो वीडियो

The post Realme Q मध्ये असेल 20W VOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलेली 4,035एमएएच ची बॅटरी, 5 सप्टेंबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-q-20w-vooc-4035-mah-battery-snapdragon-712-chipset-launch-date-5th-september/feed/ 0
आता बदलेल स्मार्टफोनचे जग, भारतात लॉन्च झाला 64-Megapixel कॅमेरा असलेला फोन Realme XT https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-official-in-india-with-64mp-quad-rear-camera-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-official-in-india-with-64mp-quad-rear-camera-specifications-details/#respond Wed, 28 Aug 2019 13:06:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5149 Realme XT येत्या काही दिवसांत बाजारात येईल आणि कंपनी सेलच्या आधी या फोनची किंमत सांगेल.

The post आता बदलेल स्मार्टफोनचे जग, भारतात लॉन्च झाला 64-Megapixel कॅमेरा असलेला फोन Realme XT first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वर्षभरापूर्वी एखाद्या सामान्य स्मार्टफोन यूजरला असे सांगण्यात आले असते कि आता स्मार्टफोन्स मध्ये 64-Megapixel चा कॅमेरा पण येईल, तर त्याला खोटे वाटले असते. पण आता हे सत्यात आले आहे. ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होते ते आज वास्तवात आले आहे. वेगाने इंडियन स्मार्टफोन यूजर्स मध्ये प्रसिद्ध होत असलेल्या टेक ब्रँड Realme ने आज आपला 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme XT सादर केला आहे. Realme XT भारतात ऑफिशियल झाला आहे आणि त्याचबरोबर हा देशातील पहिला स्मार्टफोन बनला आहे जो 64-Megapixel कॅमेरा सह येतो. Realme XT येत्या काही दिवसांत बाजारात येईल आणि कंपनी सेलच्या आधी या फोनची किंमत सांगेल.

Realme XT लुक व डिजाईन

सर्वात आधी बहुप्रतीक्षित स्मार्टफोनच्या लुक बद्दल बोलायचे तर कंपनीने आपला फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वरच्या बाजूला छोटीशी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. Realme ने याला ‘ड्यूड्रॉप नॉच’ चे नाव दिले आहे. Realme XT कंपनीने ग्लॉस बॅक पॅनल वर सादर केला जो दिसायला प्रीमियम वाटतो.

Realme XT क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये चारही सेंसर एकाच रिंग मध्ये आहेत तसेच सर्वात वर देण्यात आले कॅमेरा सेंसरच्या चारही बाजूला पिवळ्या रंगाची आउट लाईन आहे. या सेंसरच्या खाली 64MP लिहिण्यात आले आहे. रियर कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. बॅक पॅनल वर खाली Realme ची ब्रँडिंग आहे. Realme XT च्या साईड पॅनल वर पावर बटण व वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे तर खालच्या बाजूला यूएसबी पोर्ट आहे.

कॅमेऱ्याची कमाल

Realme XT भारतातील पहिला 64-Megapixel कॅमेरा असलेला स्मार्टफोन म्हणून ओळखलं जाईल. या फोनची सर्वात मोठी यूएसपी याचा कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने या फोन मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी ची वापरली जाईल. या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशन वाली अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर करता येईल. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 64-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

त्याचबरोबर Realme XT 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो. रियर पॅनल वरच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme XT 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनचा कॅमेरा नाइटस्केप मोड आणि क्रोमकॉस्ट सारख्या फीचर्स सह येतो जो चांगले फोटो कॅप्चर करतो.

Realme XT स्पेसिफिकेशन्स

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Realme XT 6.4-इंचाच्या सुपर एमोलेड ड्यूड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. हा फोन ग्लॉस बॉडी वर बनला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी कंपनीने Realme XT च्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची कोटिंग आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 712 एआई चिपसेट देण्यात आला आहे.

Realme ने भारतात Realme XT स्मार्टफोन तीन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे तसेच हा वेरिएंट पण 64जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. त्याचप्रमाणे Realme XT चा सर्वात मोठा वेरिएंट कंपनीने 8जीबी रॅम मेमरी वर सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Realme XT डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. अशाप्रकारे पावर बॅकअप साठी हा स्मार्टफोन 20वॉट चार्जिंगला सपोर्ट आणि VOOC 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी यूएसबी टाईप-सी ने चार्ज करता येईल.

The post आता बदलेल स्मार्टफोनचे जग, भारतात लॉन्च झाला 64-Megapixel कॅमेरा असलेला फोन Realme XT first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-official-in-india-with-64mp-quad-rear-camera-specifications-details/feed/ 0
काही मिनिटांत विकले गेले 1 लाख 20 हजार Realme 5 फोन, आज रात्री 8 वाजता होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/realme-5-sells-out-within-30-minutes-120000-units-sold-during-the-first-sale/ https://www.91mobiles.com/marathi/realme-5-sells-out-within-30-minutes-120000-units-sold-during-the-first-sale/#respond Tue, 27 Aug 2019 12:34:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5141 पहिल्या सेल मध्ये मिळाला शानदार प्रतिसाद पाहून आता रियलमी 5 चा पुढला सेल आज रात्री 8 वाजता होईल.

The post काही मिनिटांत विकले गेले 1 लाख 20 हजार Realme 5 फोन, आज रात्री 8 वाजता होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने या महिन्यात आपली Realme 5 सीरीज सादर केली होती, ज्यात Realme 5 आणि 5 Pro चा समावेश होता. आज Realme 5 च्या पहिल्या सेल मध्ये या डिवाइसला ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रियलमीने अधिकृतपणे माहिती दिली आहे कि पहिल्या सेल मध्ये रियलमी 5 चे 1,20,000 पेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत.

पहिल्या सेल मध्ये मिळाला शानदार प्रतिसाद पाहून आता रियलमी 5 चा पुढला सेल आज रात्री 8 वाजता होईल. गेल्या आठवड्यात रियलमी ने Realme 5 Pro सह रियलमी 5 पण भारतात लॉन्च केला होता. रियलमी 5 सेल ई-कॉमर्स साइट Flipkart आणि Realme.com वर होईल. Realme 5 Pro चा पहिला सेल 4 सप्टेंबरला आयोजित केला जाईल. त्याचबरोबर कंपनीच्या सीईओ ने यूट्यूब वर 9व्या #AskMadhav सीरीज मध्ये अशी माहिती दिली कि मिड-सप्टेंबर मध्ये Realme 5 आणि Realme 5 Pro सादर केले जातील.

Realme 5 च्या किंमतीबद्दल बोलायचे तर याच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर फोनचा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये सेल केला जाईल. तसेच स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे.

Realme 5 चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता Realme 5 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 665 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. हँडसेट कंपनीने दोन रॅम व तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्यात 3+32GB, 4+64GB, 4+128GB वेरिएंटचा समावेश आहे.

फोटोग्राफी साठी Realme 5 च्या मागे चार सेंसर आहेत. यात 12+8+2+2एमपी कॅमेऱ्याचा कॉम्बिनेशन देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

रियलमी 5 वीडियो

The post काही मिनिटांत विकले गेले 1 लाख 20 हजार Realme 5 फोन, आज रात्री 8 वाजता होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-5-sells-out-within-30-minutes-120000-units-sold-during-the-first-sale/feed/ 0
Realme 5 vs Xiaomi Mi A3, चार पाऊले पुढे तर दोन पाउले मागे https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-realme-5-pro-specification-features-price-camera-comparison-detail-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-realme-5-pro-specification-features-price-camera-comparison-detail-in-marathi/#respond Thu, 22 Aug 2019 13:58:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5093 Realme 5 मध्ये रियर कॅमेरा सेंसर्स जास्त आहेत तर Mi A3 मध्ये रियर मेगापिक्सल जास्त आहे.

The post Realme 5 vs Xiaomi Mi A3, चार पाऊले पुढे तर दोन पाउले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन मार्केट मधील नंबर वन कंपनी असलेल्या Xiaomi ने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Mi A3 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 12,999 रुपयांच्या बेस किंमतीत बाजारात आला आहे जो ट्रिपल रियर कॅमेरा आणि गूगल एंडरॉयड वन सारख्या फीचर्स सह येतो. भारतात यशस्वीरीत्या एक वर्ष पूर्ण करणाऱ्या टेक कंपनी Realme ला Xiaomi चे मोठे स्पर्धक मानले जाते. Realme पण Xiaomi प्रमाणे कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन घेऊन येते. कालच Realme ने भारतात आपले दोन नवीन डिवाईस Realme 5 आणि Realme 5 Pro लॉन्च केले आहेत. लो बजेट सेग्मेंट मध्ये Realme 5 Xiaomi Mi A3 साठी धोकादायक ठरू शकतो असे बोलले जात आहे. हे दोन्ही फोन या महिन्यात प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल. त्यामुळे जर तुम्ही पण एखादा नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि गोंधळात असाल कि Xiaomi Mi A3 घ्यावा किंवा Realme 5 तर खाली आम्ही दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची तुलना केली आहे, ज्यातून कळेल कि Xiaomi Mi A3 बेस्ट आहे कि Realme 5 चांगला आहे.

डिस्प्ले व डिजाईन

Xiaomi Mi A3 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.08-इंचाच्या एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Mi A3 7व्या जेनरेशनच्या इन-डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर सह येतो. तर दुसरीकडे Realme 5 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्ट केला गेला आहे. हे दोन्ही ही स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो.

Mi A3 व Realme 5 दोन्हीच्या बॅक पॅनल वर रियर कॅमेरा सेटअप डावीकडे वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. Realme 5 मध्ये 4 रियर कॅमेरा सेंसर आहे तर Mi A3 च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये 3 सेंसर्स आहे. Realme 5 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तर Mi A3 तो नाही. Xiaomi Mi A3 मध्ये वाल्यूम रॉकर व पावर बटण उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत तर Realme 5 मध्ये डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे.

ओएस व प्रोसेसर

Xiaomi Mi A3 एंडरॉयड 9 पाई आधारित एंडरॉयड वन ओएस वर सादर केला गेला आहे जो एंडरॉयड 10 भारतात रोलआउट होताच त्यावर उपडेट होईल. तर Realme 5 एंडरॉयड 9.0 पाई वर सादर झाला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 एआईई चिपसेट वर चालतो. त्याचप्रमाणे ग्राफिक्स साठी पण Realme 5 आणि Xiaomi Mi A3 दोन्ही फोन एड्रेनो 610 जीपीयू ला सपोर्ट करतात.

रॅम व स्टोरेज

Xiaomi Mi A3 कंपनी द्वारा दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी की इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो तथा दूसरे वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी की इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

Realme 5 भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे जो 64जीबी इंटरनल स्टोरेज आणि 128जीबी इंटरनल मेमरी सह लॉन्च झाला आहे. या फोन मध्ये पण 256जीबी पर्यंतचा कार्ड वापरता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट

Xiaomi Mi A3 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.79 अपर्चर वाला 48-मेगापिक्सल Sony IMX586 प्राइमरी सेंसर + एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस + 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तर वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी Mi A3 एफ/2.0 अपर्चर वाल्या 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme 5 कंपनीने क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर + एफ/2.25 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस + 2-मेगापिक्सलचा पोर्टरेट + 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी साठी Realme 5 एफ/2.0 अपर्चर वाल्या 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी

Xiaomi Mi A3 कंपनीने 4,030mAh बॅटरी वर लॉन्च केला आहे. फोनची बॅटरी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी सह 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे Mi A3 बॉक्स सह 10वॉट चा चार्जर पण मिळेल. Realme 5 बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीला सपोर्ट करतो जी 10वॉट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत

Xiaomi Mi A3

4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज = 12,999 रुपये

6जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 15,999 रुपये

Realme 5

3जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज = 9,999 रुपये

4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज = 10,999 रुपये

4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 11,999 रुपये

फक्त स्पेसिफिकेशन्सचा सार काढला तर Realme 5 आणि Xiaomi Mi A3 चा चिपसेट एक सारखा आहे. Realme 5 मध्ये रियर कॅमेरा सेंसर्स जास्त आहेत तर Mi A3 मध्ये रियर मेगापिक्सल जास्त आहे. सेल्फी कॅमेरा मध्ये Xiaomi Mi A3 पुढे तर बॅटरी व डिस्प्ले मध्ये Realme 5 वर आहे. दोन्ही फोनच्या 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये Realme 5 Xiaomi Mi A3 पेक्षा 2,000 रुपयांनी स्वस्त आहे.

Mi A3 या 23 ऑगस्ट पासून शॉपिंग साइट अमेजन वर सेल साठी उपलब्ध होईल तर Realme 5 येत्या ऑगस्ट 27 पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post Realme 5 vs Xiaomi Mi A3, चार पाऊले पुढे तर दोन पाउले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-realme-5-pro-specification-features-price-camera-comparison-detail-in-marathi/feed/ 0