आता बदलेल स्मार्टफोनचे जग, भारतात लॉन्च झाला 64-Megapixel कॅमेरा असलेला फोन Realme XT

वर्षभरापूर्वी एखाद्या सामान्य स्मार्टफोन यूजरला असे सांगण्यात आले असते कि आता स्मार्टफोन्स मध्ये 64-Megapixel चा कॅमेरा पण येईल, तर त्याला खोटे वाटले असते. पण आता हे सत्यात आले आहे. ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होते ते आज वास्तवात आले आहे. वेगाने इंडियन स्मार्टफोन यूजर्स मध्ये प्रसिद्ध होत असलेल्या टेक ब्रँड Realme ने आज आपला 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme XT सादर केला आहे. Realme XT भारतात ऑफिशियल झाला आहे आणि त्याचबरोबर हा देशातील पहिला स्मार्टफोन बनला आहे जो 64-Megapixel कॅमेरा सह येतो. Realme XT येत्या काही दिवसांत बाजारात येईल आणि कंपनी सेलच्या आधी या फोनची किंमत सांगेल.

Realme XT लुक व डिजाईन

सर्वात आधी बहुप्रतीक्षित स्मार्टफोनच्या लुक बद्दल बोलायचे तर कंपनीने आपला फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वरच्या बाजूला छोटीशी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. Realme ने याला ‘ड्यूड्रॉप नॉच’ चे नाव दिले आहे. Realme XT कंपनीने ग्लॉस बॅक पॅनल वर सादर केला जो दिसायला प्रीमियम वाटतो.

Realme XT क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये चारही सेंसर एकाच रिंग मध्ये आहेत तसेच सर्वात वर देण्यात आले कॅमेरा सेंसरच्या चारही बाजूला पिवळ्या रंगाची आउट लाईन आहे. या सेंसरच्या खाली 64MP लिहिण्यात आले आहे. रियर कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. बॅक पॅनल वर खाली Realme ची ब्रँडिंग आहे. Realme XT च्या साईड पॅनल वर पावर बटण व वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे तर खालच्या बाजूला यूएसबी पोर्ट आहे.

कॅमेऱ्याची कमाल

Realme XT भारतातील पहिला 64-Megapixel कॅमेरा असलेला स्मार्टफोन म्हणून ओळखलं जाईल. या फोनची सर्वात मोठी यूएसपी याचा कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने या फोन मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजी ची वापरली जाईल. या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशन वाली अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर करता येईल. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 64-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

त्याचबरोबर Realme XT 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो. रियर पॅनल वरच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme XT 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनचा कॅमेरा नाइटस्केप मोड आणि क्रोमकॉस्ट सारख्या फीचर्स सह येतो जो चांगले फोटो कॅप्चर करतो.

Realme XT स्पेसिफिकेशन्स

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Realme XT 6.4-इंचाच्या सुपर एमोलेड ड्यूड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. हा फोन ग्लॉस बॉडी वर बनला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी कंपनीने Realme XT च्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची कोटिंग आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 712 एआई चिपसेट देण्यात आला आहे.

Realme ने भारतात Realme XT स्मार्टफोन तीन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे तसेच हा वेरिएंट पण 64जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. त्याचप्रमाणे Realme XT चा सर्वात मोठा वेरिएंट कंपनीने 8जीबी रॅम मेमरी वर सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Realme XT डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. अशाप्रकारे पावर बॅकअप साठी हा स्मार्टफोन 20वॉट चार्जिंगला सपोर्ट आणि VOOC 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी यूएसबी टाईप-सी ने चार्ज करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here