Realme 6 चा रिटेल बॉक्स आला समोर, 5 रियर कॅमेऱ्यांसह होऊ शकतो लॉन्च

Realme ब्रँड खूप वेगाने भारतीय बाजारात उदयास येत आहे. भारतीय बाजारातील Realme 5 आणि Realme 5 Pro स्मार्टफोन ब्रँडच्या हिट स्मार्टफोन्स पैकी आहेत जे यूजर्सना खूप आवडले. काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि Realme हि स्मार्टफोन सीरीज वाढवण्यासाठी तयारी करत आहे आणि सीरीजचा आगामी फोन Realme 5s असेल. तर आता Realme संबंधित अजून एक धमाकेदार बातमी येत आहे ज्यात ब्रँडच्या आगामी स्मार्टफोन Realme 6 चा रिटेल बॉक्स दाखवण्यात आला आहे.

Realme संबंधित हा लीक स्लॅशलीकच्या माध्यमातून समोर आला आहे. या वेबसाइट वर Realme 6 च्या रिटेल बॉक्सचा फोटो शेयर केला गेला आहे. Realme ने अजूनतरी Realme 6 संबंधित कोणतीही माहिती दिली नाही पण लीक झालेल्या फोटो वर विश्वास ठेवल्यास रियलमी ब्रँडने आपल्या नवीन फोन Realme 6 वर काम करायला सुरवात केली आहे आणि लवकरच हा स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला जाऊ शकतो.

Realme 6

रियलमी 6 च्या या रिटेल बॉक्सने फक्त कंपनी Realme 6 नावाच्या नवीन फोन वर काम करत आहे याकडे ईशारा केला नाही तर या रिटेल बॉक्स वर फोनचे काही स्पेसिफिकेशन्स पण लिहिण्यात आले आहेत. या बॉक्स वर Realme 6 सोबतच फोनच्या कॅमेरा डिपार्टमेंट आणि प्रोसेसरची माहिती लिहिण्यात आलेली आहे. रिटेल बॉक्स वर ‘Penta Lens’ लहिलेले आहे ज्यावरून समजते कि Realme 6 स्मार्टफोन मध्ये पाच रियर कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात.

हे देखील वाचा: Redmi ला पुन्हा आव्हान देईल Realme, Realme 5s मॉडेलची करत आहे तयारी

विशेष म्हणजे Nokia 9 PureView स्मार्टफोन मध्ये आपण अशा प्रकारचा कॅमेरा सेटअप बघितला आहे. या फोन मध्ये पाच रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहोत जे राउंड शेप मध्ये आहेत. रियलमी बॉक्स नंतर बोलले जात आहे कि Realme 6 मध्ये पण अशाप्रकारचा कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तसेच Realme 6 च्या बॉक्स वर स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट पण लिहिण्यात आले आहे ज्यातून फोन मधील क्वालकॉम 700 सीरीजच्या चिपसेटचा खुलासा होतो.

Realme 5 Pro

Realme 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 712 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. फोटोग्राफी साठी रियलमी 5 सीरीज क्वॉड रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करते. फोनच्या बॅक पॅनल वर 119 डिग्री फील्ड ऑफ व्यू सह एक अल्ट्रा वाइड सेंसर आणि एक 4cm माइक्रोस्कोपिक फोकल लेंथ सह सुपर मॅक्रो सेंसर आहे. या तीन व्यतिरिक्त या कॅमेरा सेटअप मध्ये एक पोर्ट्रेट लेंस पण आहे जी याचा चौथा सेंसर आहे.

हे देखील वाचा: Redmi Note 8 Pro vs Realme XT, कोणत्या फोनला द्याल पहिली पसंती?

फोटोग्राफीसाठी Realme 5 Pro मध्ये पण मागे चार सेंसर आहेत. यात 48 + 8 + 2 + 2 मेगापिक्सल कॅमेऱ्यांचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. तर फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सोबत 4,035mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here