Redmi Note 7 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi स्मार्टफोन्सच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या नवीन किंमती https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-increased-price-of-all-smartphones-due-to-gst-know-how-much-price-of-smartphone-know/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-increased-price-of-all-smartphones-due-to-gst-know-how-much-price-of-smartphone-know/#respond Wed, 01 Apr 2020 13:16:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6965 ओप्पो, वीवो, सॅमसंग सोबतच चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने पण आपल्या सर्व डिवाइसच्या किंमती वाढल्याची घोषणा केली आहे.

The post Xiaomi स्मार्टफोन्सच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या नवीन किंमती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला बातमी दिली होती कि जीएसटी वाढल्यामुळे मोबाईल इंडस्ट्री मध्ये गोंधळ उडणार आहे. आता तो दिवस आला आहे जेव्हा जवळपास सर्व मोबाईल फोन कंपन्या आपल्या डिवाइसच्या किंमती वाढवत आहेत. ओप्पो, वीवो, सॅमसंग सोबतच चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने पण आपल्या सर्व डिवाइसच्या किंमती वाढल्याची घोषणा केली आहे.

शाओमीने ट्वीट करून हि माहिती दिली होती कि जीएसटी मध्ये मोठा बदल झाला आहे. जो 12 वरून 18 टक्के करण्यात आला आहे. याच कारणांमुळे आम्ही आमच्या प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल सोर्स कडून शाओमीच्या सर्व फोन्सची नवीन किंवा असे म्हणूया वाढलेल्या किंमतींची माहिती मिळाली आहे.

Xiaomi ने भारतातील रेडमी आणि मी सीरीजच्या सर्व फोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. आम्ही पुढे तुम्हाला फोन्सच्या नवीन किंमतींची माहिती देत आहोत. Xiaomi ने आपल्या फोन्सच्या किंमतीत 2000 रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. तसेच कमीत कमी 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही फोन्स असे पण आहेत, ज्यांच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

शाओमी ने Redmi Go (1GB+16GB), Redmi Note 7 Pro आणि Mi A3 (6GB+128GB) च्या किंमतीत कोणतीही वाढ केली नाही. या फोन्स व्यतिरिक्त सर्व फोन्सच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. खाली दिलेल्या चार्ट मधून तुम्हाला सहज समजले कि फोन्सची जुनी किंमत किती होती आणि नवीन किती आहे.

विशेष म्हणजे नवीन जीएसटी दर फक्त आधी लॉन्च केलेल्या स्मार्टफोन्स वरच नाही तर आगामी स्मार्टफोन वर पण लागू होतील. त्यामुळे नवीन GST दरानंतर कोणत्या फोनची किंमत किती वाढते हे आता बघावे लागेल.

मोबाईल इंडस्ट्री एक्स्पर्ट्सने जीएसटी वाढल्यावर शंका व्यक्त केली होती की किंमत वाढल्यावर स्मार्टफोन मार्केट वर मोठा परिणाम होईल. याह परिणाम थेट मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिश्यावर पडेल. जीएसटी वाढल्यामुळे मोबाईल फोन निर्माता कंपन्यांना मजबुरीने किंमती वाढवाव्या लागत आहेत.

The post Xiaomi स्मार्टफोन्सच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या नवीन किंमती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-increased-price-of-all-smartphones-due-to-gst-know-how-much-price-of-smartphone-know/feed/ 0
अजून एका शाओमी फोन मध्ये झाला ब्लास्ट, Redmi Note 7 Pro मध्ये लागली आग https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-phone-blast-in-gurugram-haryana-india/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-phone-blast-in-gurugram-haryana-india/#respond Sat, 14 Mar 2020 07:49:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6781 Redmi Note 7 Pro मध्ये ब्लास्ट होण्याची हि घटना गुरुग्राम मधील आहे.

The post अजून एका शाओमी फोन मध्ये झाला ब्लास्ट, Redmi Note 7 Pro मध्ये लागली आग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. प्रत्येकजण फोन आपल्या सोबत सतत बाळगत असतो. पण सध्या मोबाईल फोन मध्ये ब्लास्ट होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत त्यामुळे मोबाईल यूजर्सच्या चिंतेत वाढ होत आहे. यात जर चूक युजरची असेल तर त्याला समजावले जाते आणि त्यातून इतर यूजर्सना पण शिकवण मिळते. पण जर चूक यूजरची नसेल तर? सर्व प्रकारची काळजी घेऊन पण जर मोबाईल मध्ये ब्लास्ट होत असेल तर काय करावे? अशीच एक घटना गुरुग्राम हरियाणा मध्ये घडली आहे. जिथे योग्य ती काळजी घेऊन पण फोन मध्ये ब्लास्ट झाला आहे. आणि हा फोन होता Xiaomi चा Redmi Note 7 Pro!

Redmi Note 7 Pro मध्ये ब्लास्ट होण्याची हि घटना गुरुग्राम मधील आहे. विकेश कुमार नावाचा तरुण हा Redmi Note 7 Pro फोन वापरत होता. विकेश यांनी डिसेंबर मध्ये चिनी कंपनीचा हा फोन घेतला होता आणि तेव्हा पासून त्याने फोनची योग्य ती काळजी घेतली होती. Redmi Note 7 Pro पण आता पर्यंत अगदी चांगला चालू होता.

Yesterday my MI NOT 7 PRO is blast due to battery explode. I have no any major injury,hurt but no any positive response…

Vikesh Kumar यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, १३ मार्च, २०२०

13 मार्चला हि दुर्घटना घडली. फोन विकेश यांच्या खिश्यात होता आणि फोन हळू हळू गरम होऊ लागला. नेहमीच फोन गरम होत असल्याने आधी त्यांनी फोन कडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा फोनचे तापमान असह्य होऊ लागले तेव्हा त्यांनी फोन खिशातून बाहेर काढला तेव्हा फोन मधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच फोन मधून दुर्गंध येत होता, लगेच त्यांनी फोन आपल्या बॅगेच्या दिशेने फेकला. तेव्हा फोन मध्ये ब्लास्ट झाला फोनच्या बॅक पॅनलचे तुकडे तुकडे झाले आणि विकेश यांची बॅग पण जाळली.

91मोबाईल्स मराठीशी बोलताना विकेश म्हणाले कि ते मरता मरता वाचले आहेत, थोडा उशीर झाला असता तर कदाचित ते जखमी झाले असते. तसेच जेव्हा त्यांनी सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधला तेव्हा फोनच्या जॉब शीट मध्ये पावर ऑन फौल्ट असल्याचा शेरा देण्यात आला आहे. याविषयी शाओमी कडे आम्ही चौकशी केली आहे पण अधिकृत प्रतिसाद अजून मिळू शकलेला नाही. काही दिवसांपूर्वी पण शाओमी Redmi Note 7S फोन मध्ये आग लागल्याची बातमी महाराष्ट्रातून आली होती. वारंवार अश्या घटना समोर येत असल्यामुळे शाओमीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

The post अजून एका शाओमी फोन मध्ये झाला ब्लास्ट, Redmi Note 7 Pro मध्ये लागली आग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-phone-blast-in-gurugram-haryana-india/feed/ 0
Mi Super Sale मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi Note 7 Pro सह अनेक स्मार्टफोन्स वर मिळत आहे धमाकेदार सूट https://www.91mobiles.com/marathi/mi-super-sale-1-8-january-2020-via-mi-com-discount-on-redmi-k20-redmi-k20-pro-redmi-note-7pro/ https://www.91mobiles.com/marathi/mi-super-sale-1-8-january-2020-via-mi-com-discount-on-redmi-k20-redmi-k20-pro-redmi-note-7pro/#respond Fri, 03 Jan 2020 11:27:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6183 Redmi K20 Pro चा 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 24,999 रुपये आणि या डिवाइस के 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Mi Super Sale मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi Note 7 Pro सह अनेक स्मार्टफोन्स वर मिळत आहे धमाकेदार सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नवीन वर्ष सुरु होताच रियलमी सोबतच शाओमीने पण आपल्या ग्राहकांसाठी सेलचे आयोजन केले आहे. Xiaomi च्या यावर्षीच्या Mi Super Sale ची सुरवात झाली आहे. Realme च्या एक दिवस आधी शाओमीच्या मी सुपर सेलची 1 जानेवारी पासून सुरवात झाली आहे जो 8 जानेवारी पर्यंत चालू राहील.

Mi Super सेल शाओमीच्या वेबसाइट वर सुरु झाला आहे. या सेल मध्ये कंपनी आपल्या अनेक शानदार स्मार्टफोन्स वर डिस्काउंट देत आहे, ज्यात Redmi Note 7 Pro, Redmi K20, Redmi K20 Pro आणि Poco F1 चा समावेश आहे.

डिस्काउंट व्यतिरिक्त हे फोन्ससह झिरो इंटरेस्ट ईएमआई ऑप्शन वर पण विकत घेता येतील. तसेच कंपनीच्या लो बजेट ग्राहकांसाठी Redmi 8A, Redmi Go, Redmi Y3 आणि Redmi 7A सारखे स्मार्टफोन स्वस्तात विकले जात आहेत.

सर्वात आधी बोलूया Xiaomi च्या रेडमी के20 बद्दल, ज्याच्या किंमतीत 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनचा 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेल 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच डिवाइसचा 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 22,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

दुसरीकडे Redmi K20 Pro चा 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 24,999 रुपये आणि या डिवाइस के 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या डिवाइसच्या किंमतीत 3 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

रेडमी के20 व्यतिरिक्त शाओमीच्या लोकप्रिय Poco F1 वर पण शानदार सूट दिली जात आहे. या डिवाइसचा 64 जीबी वेरिएंट 14,999 रुपये आणि 256 वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या डिवाइसच्या किंमतीत 4,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

कंपनीचा प्रसिद्ध Redmi Note 7 Pro चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर रेडमी नोट 7 प्रो चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेल 12,999 रुपये आणि 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 14,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

रेडमी नोट 7एस चा 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मॉडेल 8,999 रुपये, 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेल 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर रेडमी वाई3 ग्राहक 4,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 7,999 रुपयांमध्ये विकत शकता.

शाओमी रेडमी के20 प्रो वीडियो

The post Mi Super Sale मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi Note 7 Pro सह अनेक स्मार्टफोन्स वर मिळत आहे धमाकेदार सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-super-sale-1-8-january-2020-via-mi-com-discount-on-redmi-k20-redmi-k20-pro-redmi-note-7pro/feed/ 0
Mi No. 1 Fan Sale: Redmi Note 7 Pro आणि Redmi K20 Pro सह Xiaomi च्या या प्रोडक्ट्स वर मिळत आहे धमाकेदार सूट https://www.91mobiles.com/marathi/mi-no-1-fan-sale-start-today-discounts-on-redmi-k20-pro-redmi-note-7-pro-and-more/ https://www.91mobiles.com/marathi/mi-no-1-fan-sale-start-today-discounts-on-redmi-k20-pro-redmi-note-7-pro-and-more/#respond Thu, 19 Dec 2019 12:03:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6085 किंमत कमी असण्यासोबतच बँक कडून मिळणारा डिस्काउंट, कॅशबॅक ऑफर्स आणि बिनव्याजी ईएमआई चा ऑप्शन तुम्हाला मिळेल.

The post Mi No. 1 Fan Sale: Redmi Note 7 Pro आणि Redmi K20 Pro सह Xiaomi च्या या प्रोडक्ट्स वर मिळत आहे धमाकेदार सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2019 संपायला आता काही दिवस उरले आहेत आणि त्याआधी चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने आपल्या “No. 1 Mi Fan Sale” ची घोषणा केली आहे. या सेल मध्ये वेगवेगळ्या किंमतीचे प्रोडक्ट्स स्वस्तात विकले जातील. “No. 1 Mi Fan Sale” मध्ये शाओमीच्या स्मार्टफोन सोबत वियरेबल आणि स्मार्ट होम एक्सेसरीज डिस्काउंट सह सेल केले जातील.

सेलची सुरवात 19 डिसेंबर म्हणजे आज पासून होईल आणि हा 25 डिसेंबर पर्यंत चालेल. हा सेल मी डॉट कॉम, मी होम स्टोर्स, फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि अधिकृत रिटेल स्टोर्स मध्ये आयोजित केला जात आहे. शाओमी आपल्या काही एक्सेसरीज साठी फ्लॅश सेल पण आयोजित करेल.

शाओमीच्या एक्सेसरीज आणि स्मार्ट होम प्रोडक्टचा फ्लॅश सेल रोज 10 वाजता, संध्याकाळी 4 वाजता आणि 6 वाजता आयोजित केला जाईल. हा सेल 23 डिसेंबर पर्यंत चालू राहील. पण मी नंबर वन फॅन सेल 25 डिसेंबर पर्यंत सुरु असेल. किंमत कमी असण्यासोबतच बँक कडून मिळणारा डिस्काउंट, कॅशबॅक ऑफर्स आणि बिनव्याजी ईएमआई चा ऑप्शन तुम्हाला मिळेल.

या सेल मध्ये Redmi K20 Pro 24,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल. तर जुना फोन देऊन 2000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट मिळवता येईल. कंपनीचा प्रसिद्ध फोन Redmi Note 7 Pro 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल जे याच्या लॉन्च किंमतीपेक्षा आहेत. इतकेच नव्हे तर या सेल मध्ये ग्राहक Redmi 7A, Redmi K20, Poco F1 आणि Xiaomi Mi A3 सारखे फोन स्वस्तात विकत घेऊ शकतील.

स्मार्टफोन्स व्यतिरिक्त Xiaomi आपला मी स्मार्ट बल्ब, मी स्पोर्ट्स ब्लूटूथ इयरफोन्स बेसिक आणि मी बॅंड 3 मी नंबर वन फॅन सेल मध्ये आतापर्यंतच्या स्वस्त किंमतीत विकत आहे. पुढे एक तक्ता दिला आहे ज्यात कोणता फोन कोणत्या किंमतीत तुमच्यासाठी उपलब्ध असेल याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 Phone Discount No. 1 Mi Fan Sale Price Additional Offers
Redmi Note 7 Pro4GB+64GB

6GB+64GB

6GB+128GB

INR 4,000

INR 2,000

INR 2,000

INR 9,999

INR 12,999

INR 14,999

INR 1,000 BUPINR 1,000 BUP
Redmi K20 Pro6GB+128GB

8GB+256GB

INR 3,000

INR 3,000

INR 24,999

INR 27,999

INR 2,000 BUPINR 2,000 BUP
Redmi K206GB+64GB

6GB+128GB

INR 2,000INR 1,000 INR 19,999INR 22,999 INR 2,000 BUP

INR 2,000 BUP

Redmi 7A2GB+16GB

2GB+32GB

INR 1,000

INR 700

 

INR 4,999

INR 5,499

 

 

Mi A34GB+64GB

6GB+128GB

INR 500INR 500 INR 12,499INR 15,499 INR 1,000 BUPINR 1,000 BUP
POCO F16GB+128GB

8GB+256GB

INR 4,000

INR 4,000

INR 14,999

INR 18,999

Redmi Note 7S3GB+32GB

4GB+64GB

INR 1,000INR 2,000 INR 8,999INR 9,999
Redmi Y33GB+32GB

4GB+64GB

INR 1,000INR 2,000 INR 7,999INR 9,999
Redmi 72GB+32GB

3GB+32GB

INR 500INR 500 INR 6,999INR 7,999
 Redmi 7A

2GB+16GB

2GB+32GB

 

INR 700

INR 700

 

INR 5,299

INR 5,499

 Redmi Go

1GB+8GB

1GB+16GB

 

INR 200

INR 300

 

INR 4,299

INR 4,499

 

The post Mi No. 1 Fan Sale: Redmi Note 7 Pro आणि Redmi K20 Pro सह Xiaomi च्या या प्रोडक्ट्स वर मिळत आहे धमाकेदार सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-no-1-fan-sale-start-today-discounts-on-redmi-k20-pro-redmi-note-7-pro-and-more/feed/ 0
Redmi Note 7 Pro ठरला मानकरी, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीती बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-is-the-best-selling-smartphone-above-rs-10000/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-is-the-best-selling-smartphone-above-rs-10000/#respond Thu, 29 Aug 2019 13:13:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5168 ग्लोबली Redmi Note 7 सीरीजचे दोन कोटींपेक्षा जास्त हँडसेट विकले गेले आहेत

The post Redmi Note 7 Pro ठरला मानकरी, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीती बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने यावर्षी भारतात सादर केलेला Redmi Note 7 Pro लॉन्च पासूनच नवनवीन रेकॉर्ड करत आहे. तर आता ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म (IDC) च्या रिपोर्ट नुसार Redmi Note 7 Pro भारतात 10,000+ च्या कॅटगरी मध्ये बेस्ट सेलिंग स्मार्टफोन आहे.

ग्लोबल मार्केट मध्ये 6 महिन्यांपूर्वी हा फोन सादर केला गेला होता. शाओमी इंडिया हेड मनु कुमार जैन ने नुकतेच ट्विट करून याचा आनंद व्यक्त केला आहे. तसेच कंपनीने खाई दिवसांपूर्वी सांगितले होते कि ग्लोबली Redmi Note 7 सीरीजचे दोन कोटींपेक्षा जास्त हँडसेट विकले गेले आहेत, ज्यात Redmi Note 7, Redmi Note 7S आणि Redmi Note 7 Pro चा समावेश आहे.

कंपनीने भारतात काही दिवसांपूर्वी Redmi Note 7 बंद करून Redmi Note 7s लॉन्च केला होता. आता कंपनी Redmi Note 7s आणि Redmi Note 7 Pro स्मार्टफोन विकत आहे.

Redmi Note 7s आणि Redmi Note 7 Pro चे स्पेसिफिकेशंस पाहता दोन्ही स्मार्टफोन एक सारखे आहेत. दोन्ही फोन मध्ये तुम्हाला 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले नॉच सह मिळतो. तसेच Redmi Note 7s स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आहे जो 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज सह येतो. तर Redmi Note 7 Pro स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 675 एसओसी सह येतो ज्यात 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज आहे.

फोटोग्राफी साठी दोन्ही स्मार्टफोनच्या मागे 48-मेगापिक्सल + 5 मेगिपिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप आहे. पण या दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात थोडा फरक आहे. Redmi Note 7s मध्ये सॅमसंगचा ISOCELL GM1 सेंसर आहे तर Redmi Note 7 Pro मध्ये सोनी IMX586 सेंसर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे ज्यात यूएसबी टाइप-सी सह 18 वॉट ची फास्ट चार्जिंग आहे.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो वीडियो

The post Redmi Note 7 Pro ठरला मानकरी, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीती बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-7-pro-is-the-best-selling-smartphone-above-rs-10000/feed/ 0
Xiaomi ने केली कमाल, फक्त 6 महिन्यांत विकले 1.5 कोटी पेक्षा जास्त Redmi Note 7 सीरीजचे फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-globally-sells-15-million-devices-of-redmi-note-7-series-smartphones/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-globally-sells-15-million-devices-of-redmi-note-7-series-smartphones/#respond Wed, 10 Jul 2019 11:30:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4770 तुम्ही भाग्यशाली असाल तर Redmi Note 7S किंवा Redmi Note 7 Pro पैकी कोणताही एक फोन तुम्हाला मोफत मिळू शकतो.

The post Xiaomi ने केली कमाल, फक्त 6 महिन्यांत विकले 1.5 कोटी पेक्षा जास्त Redmi Note 7 सीरीजचे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात शाओमी आपली वेगळी ओळख बनवण्यात आणि ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाली आहे. कंपनीने फक्त 6 महिन्यांत ग्लोबली रेडमी नोट 7 सीरीजचे 1.5 कोटी पेक्षा जास्त स्मार्टफोन विकण्यात यश मिळवले आहे यावरूनच याचा अंडज लावता येतो.

शाओमीचे इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी याची माहिती देत ट्विट केले आहे. तसेच हा आनंद साजरा करण्यासाठी कंपनीने मोफत Redmi Note 7 Pro व Redmi Note 7s देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी तुम्हाला मनु कुमार जैन यांच्या ट्विटला रीट्वीट करावे लागेल. जर तुम्ही भाग्यशाली असाल तर Redmi Note 7S किंवा Redmi Note 7 Pro पैकी कोणताही एक फोन तुम्हाला मोफत मिळू शकतो. Redmi Note 7 Pro ची सुरवाती किंमत 13,999 रुपये आणि अलीकडेच लॉन्च केलेल्या Redmi Note 7s स्मार्टफोनची 10,999 रुपये आहे.

हे देखील वाचा: जगातील पहिला 5 रियर कॅमेरे असलेला Nokia 9 भारतात झाला लॉन्च, बघा किंमत आणि लॉन्च ऑफर्स

विशेष म्हणजे कंपनीने काही दिवसांपूर्वी Redmi Note 7 डिस्कंटीन्यू करत Redmi Note 7s लॉन्च केला होता. आता कंपनी Redmi Note 7s आणि Redmi Note 7 Pro स्मार्टफोन विकत आहे.

Redmi Note 7s आणि Redmi Note 7 Pro चे स्पेसिफिकेशंस पाहता दोन्ही स्मार्टफोन एकसारखेच आहेत. दोन्ही फोन मध्ये तुम्हाला 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले नॉच सह मिळेल. तसेच Redmi Note 7s स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आहे जो 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज सह येतो. तसेच Redmi Note 7 Pro स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 675 एसओसी सह येतो ज्यात 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम सह 128जीबी ची स्टोरेज आहे.

हे देखील वाचा: Galaxy A50s फोन पण लॉन्च करेल Samsung, बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट

फोटोग्राफी साठी दोन्ही स्मार्टफोनच्या मागे 48-मेगापिक्सल + 5 मेगिपिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. पण या दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात थोडा फरक आहे. Redmi Note 7s मध्ये सॅमसंगचा ISOCELL GM1 सेंसर आहे तर Redmi Note 7 Pro मध्ये सोनी IMX586 सेंसर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे ज्यात यूएसबी टाइप-सी सह 18 वॉटची फास्ट चार्जिंग आहे.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो वीडियो

The post Xiaomi ने केली कमाल, फक्त 6 महिन्यांत विकले 1.5 कोटी पेक्षा जास्त Redmi Note 7 सीरीजचे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-globally-sells-15-million-devices-of-redmi-note-7-series-smartphones/feed/ 0
Vivo Z1 Pro 14,990 – Redmi Note 7 Pro 13,999 = 991, बघा काय मिळाले आणि काय गमवावे लागते https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-redmi-note-7-pro-comparison-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-redmi-note-7-pro-comparison-price-specifications/#respond Fri, 05 Jul 2019 13:44:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4737 आम्ही दोन्ही स्मार्टफोन एक साथ वापरल्यानंतर हेच सांगितले आहे कि Redmi Note 7 Pro च्या तुलनेत लेटेस्ट Vivo Z1 Pro मध्ये काय मिळते आणि गमवावे लागते.

The post Vivo Z1 Pro 14,990 – Redmi Note 7 Pro 13,999 = 991, बघा काय मिळाले आणि काय गमवावे लागते first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आज भारतीय बाजरात नवीन दाव खेळाला आहे. वीवो ने देशात आपले स्मार्टफोन्स वाढवत नवीन डिवाईस Z1 Pro लॉन्च केला आहे. Vivo Z1 Pro भारतात लॉन्च झालेला वीवो चा पहिला स्मार्टफोन आहे जो पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. Vivo Z1 Pro मीड बजेट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो शानदार फीचर्स सोबतच दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतो. या सेग्मेंट मध्ये Vivo Z1 Pro ची पहिली टक्कर Xiaomi च्या Note 7 Pro शी आहे. एकीकडे देशात Xiaomi ची फॅन फॉलोइंग दमदार आहे तर दुसरीकडे Vivo फोन आवडणारे लोक पण काही कमी नाहीत. Vivo Z1 Pro ची किंमत 14,990 रुपयांपासून सुरु होत आहे तर Redmi Note 7 Pro ची स्टार्टिंग प्राइस 13,999 रुपये आहे. त्यामुळे प्रश्न असा उद्भवतो कि Vivo फोन घ्यावा कि Xiaomi. पुढे आम्ही दोन्ही स्मार्टफोन एक साथ वापरल्यानंतर हेच सांगितले आहे कि Redmi Note 7 Pro च्या तुलनेत लेटेस्ट Vivo Z1 Pro मध्ये काय मिळते आणि गमवावे लागते.

लुक व डिजाईन

Vivo Z1 Pro कंपनीचा पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. Redmi Note 7 Pro वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला गेला होता तर Vivo Z1 Pro ने मार्केट मधील सर्वात नवीन ट्रेंड सह एंट्री घेतली आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप सोबत रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Z1 Pro साईजच्या बाबतीत Note 7 Pro पेक्षा मोठा आहे.

गमवावे लागते

Vivo Z1 Pro च्या रुंद डिस्प्ले मुळे वन-हँड वापर कठीण वाटू लागतो.

रियर फिंगरप्रिंट साठी हात जास्त ताणावा लागेल.

मिळते

पंच-होल डिस्प्ले Vivo Z1 Pro ला खास बनवतो.

फोनचा कलर ग्रेडिएंट मित्रांमध्ये दिखावा करण्याच्या कमी येतो.

फुलव्यू डिस्प्ले फोनला आकर्षक करतो.

डिस्प्ले

Vivo Z1 Pro कंपनी द्वारा 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. तर Redmi Note 7 Pro याच रेज्ल्यूशन सह 6.3-इंचाच्या स्क्रीनला सपोर्ट करतो. शाओमीने फोन स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 कोटेड ठेवली तर वीवो जेड1 प्रो मध्ये प्रोटेक्शन नाही.

गमवावे लागते

Vivo Z1 Pro मध्ये स्क्रीन प्रोटेक्शन नसणे मोठी कमतरता आहे.

मिळते

मोठा डिस्प्ले असलेल्या फोन मध्ये वीडियो व गेमिंग एक्सपीरियंस शानदार मिळतो.

……..

प्रोसेसर

Vivo Z1 Pro आणि Redmi Note 7 Pro दोन्ही फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केले गेले आहेत. Vivo Z1 Pro 10एनएम टेक्नॉलजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720 एआई चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे तर Redmi Note 7 Pro स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो जो 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनला आहे. हे दोन्ही फोन ग्राफिक्स साठी एड्रेनो 612जीपीयू ला सपोर्ट करतात.

गमवावे लागते

प्रोसेसिंगच्या बाबतीत Vivo Z1 Pro मध्ये गमवण्यासाठी काहीच नाही.

मिळते

Vivo Z1 Pro मध्ये Redmi Note 7 Pro पेक्षा लेटेस्ट चिपसेट मिळेल.

स्नॅपड्रॅगॉन 720 आर्टिफिशियल इंटेलिजेंस सह प्रोसेसिंग अजून चांगली करतो.

……..

फोटोग्राफी

Vivo Z1 Pro ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो पण Redmi Note 7 Pro मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo Z1 Pro मध्ये तुम्हाला एफ/1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर + एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा वाइड एंगल लेंस + एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळेल. तसेच Redmi Note 7 Pro मध्ये एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर + 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे.

गमवावे लागते

Vivo Z1 Pro चा प्राइमरी सेंसर Redmi Note 7 Pro पेक्षा छोटा वाटतो.

मिळते

ट्रिपल कॅमेरा सेटअप कोणत्याही सेंसरची मेगापिक्सल पावर कमी करत नाही.

Vivo Z1 Pro मध्ये वाइड एंगल लेंस पॅनोरमा व लँडस्केप शॉट्स शानदार बनवतो.

……..

सेल्फी

Vivo Z1 Pro मध्ये सेल्फी साठी 32-मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे वहीं Redmi Note 7 Pro को 13-मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला होता.

गमवावे लागते

फक्त Pout करण्याची स्टाईल तुम्हाला शिकावी लागेल.

मिळते

32-एमपी फ्रंट कॅमेरा सेल्फी लवर्स साठी खूप काही घेऊन आला आहे.

बॅटरी

Vivo Z1 Pro कंपनीने 5,000एमएएच बॅटरी वर लॉन्च केला आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच Redmi Note 7 Pro मध्ये क्वालकॉम क्विक चार्ज 4 टेक्नोलॉजी वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

गमवावे लागते

मोठ्या बॅटरीमुळे फोनचे वजन पण थोडे वाढते.

मिळते

5,000एमएएच ची पावर संपूर्ण दिवस चालते.

18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मुळे मिनिटांत फोन चार्ज होतो.

……..

वेरिएंट्स आणि प्राइस

Vivo Z1 Pro

4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 14,990 रुपये

6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 16,990 रुपये

6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज = 17,990 रुपये

Redmi Note 7 Pro

4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 13,999 रुपये

6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज = 15,999 रुपये

6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज = 16,999 रुपये

सध्या शब्दात म्हणायचे तर इथे Vivo Z1 Pro विकत घेतल्यास गमवण्यासाठी फक्त 991 रुपये आहेत तर त्या बदल्यात आकर्षक लुक, शानदार सेल्फी, फास्ट प्रोसेसर आणि ताकदवान बॅटरी मिळते.

The post Vivo Z1 Pro 14,990 – Redmi Note 7 Pro 13,999 = 991, बघा काय मिळाले आणि काय गमवावे लागते first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-z1-pro-redmi-note-7-pro-comparison-price-specifications/feed/ 0
Xiaomi Redmi Note 7 Pro चा नवीन वेरिएंट आला समोर, 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज सह झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-6gb-ram-64gb-storage-variant-launch-in-india-at-rs-15999/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-6gb-ram-64gb-storage-variant-launch-in-india-at-rs-15999/#respond Tue, 02 Jul 2019 11:52:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4716 Redmi Note 7 Pro चा हा नवीन वेरिएंट पण कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून पण विकत घेता येईल.

The post Xiaomi Redmi Note 7 Pro चा नवीन वेरिएंट आला समोर, 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज सह झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने फेब्रुवारी मध्ये भारतात आपली रेडमी नोट सीरीज वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro लॉन्च केले होते. यातील Redmi Note 7 Pro मोठा वर्जन होता जो 48-मेगापिक्सलच्या डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये बाजारात आणला होता. पण आज आपल्या फॅन्सची गरज बघून Xiaomi ने Redmi Note 7 Pro चा अजून एक नवीन वेरिएंट भारतात लॉन्च केला आहे.

Xiaomi ने Redmi Note 7 Pro च्या या नवीन वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. Redmi Note 7 Pro चा हा नवीन वेरिएंट शाओमी ने 15,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो उद्यापासून देशात सेल साठी उपलब्ध होईल. Redmi Note 7 Pro चा हा नवीन वेरिएंट पण कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून पण विकत घेता येईल.

डिजाईन

Redmi Note 7 Pro ग्लॉस बॉडी वर बनवण्यात आला आहे ज्याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केले गेले आहेत. या फोन मध्ये 19.9:5 आस्पेक्ट रेशियो असलेला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. Redmi Note 7 Pro मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी शाओमी ने यात गोरिल्ला ग्लास 5 दिली आहे.

Redmi Note 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

शाओमी Redmi Note 7 Pro चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने Redmi Note 7 Pro चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःच अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: TikTok बेकायदेशीररीत्या भारतीयांचा डेटा पाठवत आहे चीनला : शशी थरूर

Redmi Note 7 Pro एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे ज्याचा वापर कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह शानदार होतो. प्रोसेसिंग साठी Redmi Note 7 Pro मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. Redmi Note 7 Pro 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

शाओमी Redmi Note 7 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच Redmi Note 7 Pro फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. Redmi Note 7 Pro मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Redmi Note 7 Pro मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन नेबुला रेड, नेप्चुन ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा: PUBG खेळू न दिल्याने मोठ्या भावाला कैची घुसवून मारले!

किंमत

Redmi Note 7 Pro ची किंमत पाहता फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता तसेच Redmi Note 7 Pro चा 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये बाजारात आला होता.

The post Xiaomi Redmi Note 7 Pro चा नवीन वेरिएंट आला समोर, 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज सह झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-pro-6gb-ram-64gb-storage-variant-launch-in-india-at-rs-15999/feed/ 0
48-मेगापिक्सल कॅमेरा सह येणारे हे स्मार्टफोन आहेत भारतात सेल साठी उपलब्ध, किंमत होते 10,999 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/smartphone-in-india-with-48mp-camera-oppo-reno-oneplus-7-pro-xiaomi-redmi-note-7-honor-vivo/ https://www.91mobiles.com/marathi/smartphone-in-india-with-48mp-camera-oppo-reno-oneplus-7-pro-xiaomi-redmi-note-7-honor-vivo/#respond Fri, 31 May 2019 15:42:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4479 आज आम्ही इंडियन मार्केट मधील त्या सर्व स्मार्टफोनची लिस्ट बनवली ज्यात तुम्हाला 48-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

The post 48-मेगापिक्सल कॅमेरा सह येणारे हे स्मार्टफोन आहेत भारतात सेल साठी उपलब्ध, किंमत होते 10,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बाजारा साठी साल 2019 खूप खास होता. यावर्षी अनेक नवीन टेक्नॉलॉजी टेक मंचा सादर झाल्या. स्मार्टफोन डिजाईन पासून कॅमेरा सेटअप व स्पेसिफिकेशन्स पर्यंतच्या क्षेत्रात टेक ब्रँड्सनी खूप शानदार स्मार्टफोन सादर केले आहेत. इंडियन यूजर्सना पण हि एडवांस टेक्नॉलॉजी खूप भावली आहे. यावर्षी फक्त हाईएंड फ्लॅगशिप बजेट नाही तर लो बजेट सेग्मेंट मध्ये पण पावर कॅमेरा असलेले असे फोन लॉन्च झाले आहेत ज्यात 48-मेगापिक्सल पर्यंतचा कॅमेरा सेंसर्स आहे. आज आम्ही इंडियन मार्केट मधील त्या सर्व स्मार्टफोनची लिस्ट बनवली ज्यात तुम्हाला 48-मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

Xiaomi Redmi Note 7S
शाओमी ने Redmi Note 7S लॉन्च करून पुन्हा एकदा सिद्ध केले कि हि कंपनी एवढ्या कमी किंमतीत जे स्पेसिफिकेशन्स देऊ शकते ते इतर कोणताही ब्रँड देऊ शकत नाही. Redmi Note 7S भारतातील सर्वात स्वस्त 48-एमपी रियर कॅमेरा असलेला फोन आहे. हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्याच्या बॅक पॅनल वर 5-एमपी चा सेकेंडरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 13-एमपी च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 7S गोरिल्ला ग्लास 5 ने कोटेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 सह हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर व क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन क्विक चार्ज 4 सपोर्ट वाल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. Redmi Note 7S च्या 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Redmi Note 7 Pro
शाओमी रेडमी नोट सीरीज मध्ये लॉन्च झालेला हा डिवाईस पण 48-एमपी पावर असलेल्या कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Redmi Note 7 Pro डुअल कॅमेरा वर सादर केला गेला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 7 Pro गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई 10 सह हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर व 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. पावर बॅकअप साठी यात क्विक चार्ज 4 सपोर्ट वाली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OPPO F11 / F11 Pro
ओपो ने एफ सीरीजचे लेटेस्ट स्मार्टफोन F11 आणि F11 Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपार्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. तसेच 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO F11 Pro 6जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.0 सह हा फोन आक्टा-कोर प्रोसेसर व मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी सह येणाऱ्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनचा 64जीबी स्टोरेज वेरिएंट 24,990 रुपये तर 128जीबी स्टोरेज वेरिएंट 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता.

Vivo V15 Pro
वीवो चा हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोन मध्ये दुसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे तर तिसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी V15 Pro 32-मेगापिक्सलच्या पॉप-अप फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo V15 Pro 6.39-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला गेला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबत हा फोन 3,700एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. 28,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला हा फोन 26,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

OnePlus 7 Pro
OnePlus 7 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा मेन सेंसर एफ/1.6 अपर्चर वाला आहे आणि कंपनीने हा 48-मेगापिक्सलच्या Sony IMX5867पी लेंस ने सुसज्ज केला आहे. हा सेंसर ऑप्टिकल ईमेज स्टेबलाईजेशन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. सोबतच दुसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे जी टेलीफोटो लेंस आहे. यात तिसरा सेंसर 16-मेगापिक्सलचा आहे तो वाइड-एंगल साठी देण्यात आला आहे. हा सेंसर 117-डिग्री फिल्ड ऑफ व्यू ला सपोर्ट करतो. सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा देण्यात आला आहे.

यात 6.7-इंचाचा क्यूएचडी+ फ्लूइड ऐमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो. तसेच अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सोबत फोन मध्ये Wrap चार्ज 30 फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 6जीबी रॅम/ 128जीबी इंटरनल स्टोरेज, 8जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 12जीबी रॅम/256जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत 48,999 रुपयांपासून सुरु होत आहे.

OnePlus 7
OnePlus 7 Pro चा छोटा मॉडेल OnePlus 7 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा 0.8-माइक्रोन कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन एफ/2.4 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फी कॅमेरा पाहता OnePlus 7 च्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus 7 6.41-इंचाच्या आप्टिक एमोलेड वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन पण एंडरॉयड 9 पाई आधारित आक्सिजन ओएस सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो. हा फोन पण अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी 20वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. OnePlus 7 चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 32,999 रुपये तर 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये 4 जून पासून विकत घेता येईल.

OPPO Reno 10x Zoom Edition
OPPO Reno 10x Zoom ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच एफ/3.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल तिसरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप शार्कफिन फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 6.6-इंचाच्या एमलोड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. एंडरॉयड पाई आधारित हा फोन कलरओएस 6 सह हा फोन पण क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह हा फोन वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,065एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनचा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 39,990 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 49,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

OPPO Reno
Oppo Reno चा स्टँडर्ड मॉडेल डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच हा 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो पॉप-अप शार्क फिन डिजाईन वर बनला आहे.

हा फोन 6.4-इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित हा फोन कलर ओएस 9 सह हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,765 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. तसेच याचा एक 8जीबी रॅम वाला मॉडेल आहे जो 256जीबी स्टोरेज सह येतो.

Honor View 20
या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनचा दुसरा कॅमेरा टीओएफ आहे जो डेफ्थ सेंसिंग आणि 3डी डिटेक्शन साठी आहे. सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा कॅमेरा डिस्प्ले वरील पंच-होल मध्ये देण्यात आला आहे.

या फोन मध्ये 6.4-इंचाचा सुपर फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड 9 पाई सह हा हुआवई किरीन 980 चिपसेट वर चालतो. पावर बॅकअप साठी ऑनर व्यू20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. Honor View 20 चा 6जीबी रॅम वाल्या मॉडेलची किंमत 37,999 रुपये आहे. तर 8जीबी रॅम वाला मॉडेल 45,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Black Shark 2
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Black Shark 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे हा एक गेमिंग फोन आहे जो लिक्विड कूल 3.0 टेक्नोलॉजी सह येतो.

Black Shark 2 6.39-इंचाच्या ट्रू व्यू ऐमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सोबत या फोन मध्ये क्वालकॉम चा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 27वॉट चार्जला सपॉर्ट करते. शाओमीच्या या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर फोनचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा डिवाइस 4 जूनला सेल साठी येईल.

The post 48-मेगापिक्सल कॅमेरा सह येणारे हे स्मार्टफोन आहेत भारतात सेल साठी उपलब्ध, किंमत होते 10,999 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/smartphone-in-india-with-48mp-camera-oppo-reno-oneplus-7-pro-xiaomi-redmi-note-7-honor-vivo/feed/ 0
1 कोटी पेक्षा जास्त Redmi Note 7 सीरीजचे डिवाइस विकून Xiaomi ने केला गजबचा रेकॉर्ड https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-and-redmi-note-7-pro-10-million-smartphones-unit-globally-sold/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-and-redmi-note-7-pro-10-million-smartphones-unit-globally-sold/#respond Mon, 27 May 2019 14:55:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4418 भारतात पण 2 महिन्यात Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro चे 20 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत.

The post 1 कोटी पेक्षा जास्त Redmi Note 7 सीरीजचे डिवाइस विकून Xiaomi ने केला गजबचा रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रान्ड बनली आहे. कंपनी द्वारा लॉन्च केला जाणारा जवळपास प्रत्येक फोन लोक हातोहात विकत घेतात. मागे शाओमीने भारतात रेडमी नोट 7 सीरीज अंतर्गत स्मार्टफोन Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन इंडियन मोबाईल यूजर्सना खूप आवडले. Xiaomi द्वारा आणण्यात आलेले हे स्मार्टफोन फक्त भारतात नाही तर चीन समवेत ग्लोबल मंचावर लोकांना इतके आवडले कि त्यांनी एक अनोखा रेकॉर्ड शाओमीच्या नावे केला आहे.

Xiaomi Redmi Note 7 सीरीज ग्लोबल मंचावर हिट झाली आहे. या सीरीज अंतर्गत लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्स बद्दल स्वतः कंपनीचे को-फाउंडर लेई जून यांनी खुलासा केला आहे कि या सीरीजचे जगभर 10 मिलियन म्हणजे 1 कोटी पेक्षा पण जास्त यूनिट्सच्या विक्रीची नोंद करत नवीन रेकॉर्ड केला आहे. चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट शेयर करत लेई जून यांनी म्हटले आहे कि रेडमी नोट 7 सीरीज ने हा आकडा फक्त 129 दिवसांत पार केला आहे.

विशेष म्हणजे उद्या म्हणजे 28 मे ला Xiaomi चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून कंपनी एक नवीन स्मार्टफोन सीरीज Redmi K नावाने सादर करणार आहे. या सीरीज अंतर्गत शाओमी द्वारा Redmi K20 आणि Redmi K20 Pro लॉन्च केले जातील. या स्मार्टफोन्स बद्दल लेई जून म्हणले कि, ‘ रेडमी नोट 7 सीरीजला तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, आता हाई प्राइस रेंज मध्ये आमच्या नवीन फोनला असाच सकारत्मक प्रतिसाद मिळतो कि नाही, हे बघावे लागेल’. विशेष म्हणजे भारतात पण 2 महिन्यात Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro चे 20 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत.

Redmi Note 7 Pro स्पेसिफिकेशन्स
शाओमी Redmi Note 7 Pro चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने Redmi Note 7 Pro चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःच अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi Note 7 Pro एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे ज्याचा वापर कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह शानदार होतो. प्रोसेसिंग साठी Redmi Note 7 Pro मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. Redmi Note 7 Pro 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

शाओमी Redmi Note 7 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच Redmi Note 7 Pro फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. Redmi Note 7 Pro मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Redmi Note 7 Pro मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन नेबुला रेड, नेप्चुन ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Redmi Note 7 स्पेसिफिकेशन
शाओमी Redmi Note 7 Pro सोबत शाओमी इं​डिया ने Redmi Note 7 स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ​स्टाईल, डिजाईन आणि डिस्प्लेच्या बाबतीत Redmi Note 7 Pro सारखाच आहे. एंडरॉयड 9 पाई सह प्रोसेसिंग साठी Redmi Note 7 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन पण डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.या फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा सॅमसंग प्राइमरी सेंसर तसेच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 7 मध्ये पण पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रूबी रेड, ब्लॅक आणि सफायर ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 1 कोटी पेक्षा जास्त Redmi Note 7 सीरीजचे डिवाइस विकून Xiaomi ने केला गजबचा रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-7-and-redmi-note-7-pro-10-million-smartphones-unit-globally-sold/feed/ 0