Xiaomi स्मार्टफोन्सच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या नवीन किंमती

काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला बातमी दिली होती कि जीएसटी वाढल्यामुळे मोबाईल इंडस्ट्री मध्ये गोंधळ उडणार आहे. आता तो दिवस आला आहे जेव्हा जवळपास सर्व मोबाईल फोन कंपन्या आपल्या डिवाइसच्या किंमती वाढवत आहेत. ओप्पो, वीवो, सॅमसंग सोबतच चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने पण आपल्या सर्व डिवाइसच्या किंमती वाढल्याची घोषणा केली आहे.

शाओमीने ट्वीट करून हि माहिती दिली होती कि जीएसटी मध्ये मोठा बदल झाला आहे. जो 12 वरून 18 टक्के करण्यात आला आहे. याच कारणांमुळे आम्ही आमच्या प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल सोर्स कडून शाओमीच्या सर्व फोन्सची नवीन किंवा असे म्हणूया वाढलेल्या किंमतींची माहिती मिळाली आहे.

Xiaomi ने भारतातील रेडमी आणि मी सीरीजच्या सर्व फोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. आम्ही पुढे तुम्हाला फोन्सच्या नवीन किंमतींची माहिती देत आहोत. Xiaomi ने आपल्या फोन्सच्या किंमतीत 2000 रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. तसेच कमीत कमी 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही फोन्स असे पण आहेत, ज्यांच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

शाओमी ने Redmi Go (1GB+16GB), Redmi Note 7 Pro आणि Mi A3 (6GB+128GB) च्या किंमतीत कोणतीही वाढ केली नाही. या फोन्स व्यतिरिक्त सर्व फोन्सच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. खाली दिलेल्या चार्ट मधून तुम्हाला सहज समजले कि फोन्सची जुनी किंमत किती होती आणि नवीन किती आहे.

विशेष म्हणजे नवीन जीएसटी दर फक्त आधी लॉन्च केलेल्या स्मार्टफोन्स वरच नाही तर आगामी स्मार्टफोन वर पण लागू होतील. त्यामुळे नवीन GST दरानंतर कोणत्या फोनची किंमत किती वाढते हे आता बघावे लागेल.

मोबाईल इंडस्ट्री एक्स्पर्ट्सने जीएसटी वाढल्यावर शंका व्यक्त केली होती की किंमत वाढल्यावर स्मार्टफोन मार्केट वर मोठा परिणाम होईल. याह परिणाम थेट मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिश्यावर पडेल. जीएसटी वाढल्यामुळे मोबाईल फोन निर्माता कंपन्यांना मजबुरीने किंमती वाढवाव्या लागत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here