Samsung Galaxy Note 10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy Note 10 Lite झाला 4 हजार रुपयांनी स्वस्त https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-lite-price-cut-8gb-ram-32mp-selfie-camera/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-lite-price-cut-8gb-ram-32mp-selfie-camera/#respond Tue, 12 Jan 2021 11:13:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9619 Galaxy Note 10 Lite चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आधी 38,999 रुपयांमध्ये विकला जात होता, आता हा फोन 34,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

The post 8GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy Note 10 Lite झाला 4 हजार रुपयांनी स्वस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने साल 2019 मध्ये आपली Galaxy Note 10 सीरीज लॉन्च केली होती. या सीरीज मध्ये Galaxy Note 10, Note 10 Plus आणि Galaxy Note 10 Lite सादर केला गेला होता. तसेच आता सॅमसंगने या सीरीजच्या पावरफुल फोन्स पैकी एक गॅलेक्सी नोट 10 लाइटची किंमत कमी केली आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत चार हजार रूपयांची कपात केली आहे. कंपनीने अधिकृत ऑनलाइन फोरम वर कमी किंमतीत फोन लिस्ट केला आहे. पण कंपनीने ऑफिशियल माहिती दिली नाही की या फोनचा प्राइस कट कायम राहणार आहे की एखाद्या ऑफर मध्ये विकला जात आहे. टेक वेबसाइट MySmartPrice नुसार Galaxy Note 10 Lite ची किंमत कायमची कमी करण्यात आली आहे.

नवी किंमत

Galaxy Note 10 Lite चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आधी 38,999 रुपयांमध्ये विकला जात होता, आता हा फोन 34,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल आधी 40,999 रुपयांमध्ये विकला जात होता. पण कपातीनंतर फोन 36,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

नो कॉस्ट ईएमआय

या प्राइस कट व्यतिरिक्त कंपनी नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शन 3,040 रुपये प्रति महिना या दराने देत आहे. तर स्टँडर्ड ईएमआयची सुरवात 1,741 रुपयांपासून होत आहे. स्मार्टफोन Aura Black, Aura Glow आणि Aura Red कलर ऑप्शन मध्ये येतो.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Note10 Lite कंपनीने 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, ज्याला कंपनीने सिनेमॅटिक इनफिनिटी डिस्प्लेचे नाव दिले आहे. गॅलेक्सी नोट 10 लाइट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो जो फास्ट फोन अनलॉकिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy Note10 Lite दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे ज्यात 6 जीबी रॅम मेमरी आणि 8 जीबी रॅमचा समावेश आहे. हे दोन्ही वेरिएंट्स 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जी माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येते. गॅलेक्सी नोट 10 लाइट एनएफसी व सॅमसंग पे सारख्या फीचर्स सह येतो.

Samsung Galaxy Note10 Lite चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंगने फक्त सॉफ्टवेयर नाही तर आउटर लुकच्या बाबतीत पण फोनचा कॅमेरा डिपार्टमेंट खास बनवला आहे. बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/2.2 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/1.7 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलचा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आहे. फ्रंट पॅनल वरील पंच-होल मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Galaxy Note10 Lite सॅमसंग 2.0 यूआई आधारित एंडरॉयडच्या ऍडव्हान्स ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंगच्या 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या एक्सनॉस 9810 चिपसेट वर चालतो. पावर बॅकअपसाठी या डिवाईस मध्ये सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा डिवाईस पण नोट 10 सीरीज मधील फोन्स प्रमाणे ऍडव्हान्स S-Pen सह लॉन्च झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 लाइट वीडियो

The post 8GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy Note 10 Lite झाला 4 हजार रुपयांनी स्वस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-lite-price-cut-8gb-ram-32mp-selfie-camera/feed/ 0
6,000 रुपये स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy Note 10 आणि Note 10+, जाणून घ्या कुठे आणि कसे घ्यावे विकत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-plus-6000-discount-paytm-cashback-offer-price-sale-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-plus-6000-discount-paytm-cashback-offer-price-sale-india/#respond Thu, 12 Sep 2019 13:28:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5293 5 टक्क्यांचा अतिरिक्त कॅशबॅक पण देत आहे, ज्यासाठी एचडीएफसी बॅंकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करावे लागेल.

The post 6,000 रुपये स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy Note 10 आणि Note 10+, जाणून घ्या कुठे आणि कसे घ्यावे विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात आपली ‘नोट सीरीज’ वाढवत पावरफुल डिवाईस Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ लॉन्च केले होते. हे दोन्ही डिवाईस हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात जे फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आले आहेत. दमदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या या स्मार्टफोन्सची किंमत पण हाई बजेट आहे. पण आता Samsung आपल्या फॅन्सना Galaxy Note 10 आणि Note 10+ डिवाईस स्वस्तात विकत घेण्याची संधी देत आहे. गॅलेक्सी नोट सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोन्सचे सर्व मॉडेल्स थेट 6,000 रुपये स्वस्तात विकत घेता येतील.

Samsung चे हे डिवाईसेज डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म Paytm वर स्वस्तात विकत घेता येतील. पेटीएम वर Galaxy Note 10 आणि Note 10+ चे सर्व वेरिएंट डिस्काउंट सह सेल साठी लिस्ट करण्यात आले आहेत. Paytm ने गॅलेक्सी नोट 10 सीरीजचे सर्व मॉडेल्स आणि वेरिएंट्स वर थेट 6,000 रुपयांची सूट दिली आहे. या डिस्काउंट सोबत पेटीएम 5 टक्क्यांचा अतिरिक्त कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआई ऑफर पण देत आहे.

अशी आहे नवीन किंमत

पेटीएम ऑफर बद्दल बोलायचे तर या प्लॅटफॉर्म वरून Galaxy Note 10 स्मार्टफोन विकत घेतल्यास फोन साठी 63,999 रुपये द्यावे लागतील. हा स्मार्टफोन 8जीबी रॅम सोबत 256जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च झाला होता ज्याची खरी किंमत 69,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे 79,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Galaxy Note 10+ 12जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज वेरिएंट Paytm वर ऑफर अंतर्गत 73,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy Note 10+ चा 12जीबी रॅम व 512जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 89,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण पेटीएम वर हा स्मार्टफोन वेरिएंट ऑफर अंतर्गत 83,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होत आहे.

असा मिळेल फायदा

Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ वर Paytm देत असलेल्या ऑफर अंतर्गत कंपनीने 6,000 रुपयांचा डिस्काउंट कॅशबॅकच्या स्वरूपात देत आहे. स्मार्टफोनच्या खरेदीवर यूजरला MOBSAM6K प्रोमोकोड अप्लाई करावा लागेल, ज्यानंतर आपोआप फोन प्राइज 6,000 कमी होईल. विशेष म्हणजे 6 हजारांचा हा कॅश बॅक पेटीएम वॉलेट मधेच क्रेडिट होईल आणि याचा वापर पेटीएम वर रिचार्ज, बिल पेमेंट आणि शॉपिंग साठी करता येईल.

हे पण बेनिफिट आहेत

6,000 रुपयांच्या कॅशबॅक सोबतच Paytm Samsung Galaxy Note 10 आणि Note 10+ च्या खरेदीवर 5 टक्क्यांचा अतिरिक्त कॅशबॅक पण देत आहे, ज्यासाठी एचडीएफसी बॅंकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करावे लागेल. त्याचबरोबर Samsung नोट सीरीजचे हे दोन्ही मॉडेल्स पेटीएम वर नो कास्ट ईएमआई सह पण विकत घेता येतील.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 प्लस वीडियो

The post 6,000 रुपये स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy Note 10 आणि Note 10+, जाणून घ्या कुठे आणि कसे घ्यावे विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-plus-6000-discount-paytm-cashback-offer-price-sale-india/feed/ 0
256जीबी स्टोरेज आणि पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च झाले Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-note-10-launched-in-india-know-price-launch-offers/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-note-10-launched-in-india-know-price-launch-offers/#respond Tue, 20 Aug 2019 13:41:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5070 सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 ची भारतात किंमत 69,999 रुपये ठेवण्यात आली आहे

The post 256जीबी स्टोरेज आणि पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च झाले Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने आज भारतात आपले दोन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ लॉन्च केले आहेत. कंपनीने या महिन्याच्या सुरवातीला हे दोन्ही स्मार्टफोन्स न्यूयॉर्क मध्ये सादर केले होते. लॉन्चच्या आधीच सॅमसंगने या दोन्ही डिवाइसच्या भारतीय किंमतींची माहिती पण दिली होती. चला जाणून घेऊया या दोन्ही फोनची वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स.

प्री-बुकिंग

फोनची प्री-बुकिंग 8 ऑगस्टला सुरु झाली होती जी 22 ऑगस्ट पर्यंत चालू राहील. ऑरा ग्लो, ऑरा वाइट आणि ऑरा ब्लॅक कलर मध्ये आलेला हा फोन विकत घेऊ इच्छित असलेले ग्राहक सॅमसंगच्या वेबसाइट सोबतच फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम आणि टाटा क्लिक वर प्री-बुक करू शकतात.

किंमत आणि सेल

किंमत पाहता सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 ची भारतात किंमत 69,999 रुपये ठेवण्यात आली आहे जी 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज वेरियंटची आहे. तसेच गॅलेक्सी नोट 10+ च्या 12जीबी रॅम+256जीबी वेरिएंटची किंमत 79,999 रुपये आहे. फोनचा 12जीबी रॅम+512जीबी स्टोरेज असलेल्या टॉप वेरियंटची किंमत 89,999 रुपये आहे. दोन्ही फोन 23 ऑगस्ट पासून सॅमसंग ई-स्टोर, फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम, टाट क्लिक आणि रिटेल स्टोर वर मिळेल.

प्री-बुकिंग ऑफर्स

फोनची प्री-बुकिंग वर अनेक आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. जर तुम्ही फोन प्री-बुक केला तर तुम्हाला याच्या बुकिंग वर गॅलेक्सी बड्स 9,999 रुपयांच्या ऐवजी 4,999 रुपयांमध्ये मिळतील. तसेच फोन प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना 19,990 रुपयांचा Galaxy Watch Active फक्त 9,999 रुपयांमध्ये मिळेल.

रिटेल आउटलेट आणि सॅमसंगच्या साइट वर फोन HDFC बॅंकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना 6,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. इतकेच नव्हे तर दुसऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर पण कॅशबॅक, नो-कॉस्ट ईएमआई आणि एक्स्ट्रा 10% दिला जात आहे.

स्पेसिफिकेशन्स

Galaxy Note 10 आणि Note 10 Plus बद्दल बोलायचे तर दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये पंच-होल डिजाइन सह इनफिनिटी-ओ डाइनॅमिक AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे जी HDR10+ सर्टिफाइड आहे. तसेच दोन्ही फोन मध्ये सॅमसंगचा 7एनएम Exynos 9825 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच हे हँडसेट एंडरॉयड 9 पाई वर बेस्ड OneUI ऑपरेटिंग सिस्टम वर चालतात.

फोटोग्राफी साठी गॅलेक्सी नोट 10+ मध्ये 16 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड लेंस सह 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, एक 12 मेगापिक्सलची टेलिफोटो लेंस आणि एक 3डी डेप्थ लेंस देण्यात आली आहे. नोट 10 च्या मागे पण हाच कॅमेरा सेटअप आहे, पण यात 3डी डेप्थ सेंसर नाही.

बॅटरीच्या बाबतीत दोन्ही फोन वेगळे आहेत. गॅलेक्सी नोट 10 मध्ये 3500mAh ची बॅटरी आणि नोट10+ मध्ये 4,300mAh ची बॅटरी आहे. तसेच दोन्ही डिवाइस 25वॉट च्या फास्ट चार्जिंग सह येतात. गॅलेक्सी नोट 10+ चे एक वैशिट्ये असे कि हा 45वॉट च्या फास्ट चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 वीडियो

The post 256जीबी स्टोरेज आणि पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च झाले Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-note-10-launched-in-india-know-price-launch-offers/feed/ 0
Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ च्या भारतीय किंमतीचा खुलासा, इथे करा प्री-बुक https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-and-galaxy-note-10-indian-price-and-know-pre-booking-detailed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-and-galaxy-note-10-indian-price-and-know-pre-booking-detailed/#respond Thu, 08 Aug 2019 15:32:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5009 प्री-बुकिंग करणाऱ्या सर्व ग्राहकांना Galaxy Watch Active फक्त 9,999 रुपयांमध्ये मिळेल. याची खरी किंमत 19,990 रुपये आहे.

The post Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ च्या भारतीय किंमतीचा खुलासा, इथे करा प्री-बुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अमेरिकेतील न्यू यूॉर्क मध्ये आयोजित गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंट मध्ये साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने आपली गॅलेक्सी नोट 10 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने गॅलेक्सी नोट 10 आणि गॅलेक्सी नोट 10+ सादर केला आहे. आता या फोनच्या भारतीय किंमतीचा खुलासा कंपनीने स्वतः केला आहे. किंमती सोबतच कंपनीने प्री-बुकिंग आणि ऑफर्सची माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया कुठे आणि कशी या फोन साठी प्री-बुकिंग करता येईल ते.

भारतीय किंमत

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 (8 जीबी रॅम आणि 256 जीबी) ची किंमत 69,999 रुपये. तर गॅलेक्सी नोट 10+ (12 जीबी रॅम आणि 256 जीबी) ची किंमत 79,999 रुपये आहे. सध्या Note 10 Plus के 512 जीबी वेरिएंटच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. स्मार्टफोन 23 ऑगस्ट पासून मार्केट मध्ये उपलब्ध केला जाईल.

प्री-बुकिंग

सेलच्या आधी तुम्ही या फोन साठी प्री-बुकिंग करू शकाल. प्री-बुकिंग 8 ऑगस्ट पासून सुरु होऊन 22 ऑगस्ट पर्यंत चालेल. इच्छुक ग्राहक सॅमसंग.कॉम/इन, फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम आणि टाट क्लिक वर हे फोन्स प्री-बुक करू शकतील. जर ग्राहकांनी रिटेल आउटलेट आणि सॅमसंग ई-साइट वर एचडीएफसी क्रेडिट कार्डने प्री-बुक केले तर 6,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

तसेच, फ्लिपकार्ट, अमेझॉन इंडिया, पेटीएम, टाटा क्लिक वर ICICI क्रेडिट कार्डने प्री-बुकिंग केल्यावर ग्राहकांना 6,000 रुपयांचा कॅशबॅकमिळेल. प्री-बुकिंग करणाऱ्या सर्व ग्राहकांना Galaxy Watch Active फक्त 9,999 रुपयांमध्ये मिळेल. याची खरी किंमत 19,990 रुपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 आणि गॅलेक्सी नोट 10+ हँडसेट भारतीय बाजारात ऑरा ग्लो, ऑरा व्हाइट आणि ऑरा ब्लॅक कलर मध्ये विकले जातील. तसेच पावर बॅकअप साठी सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी आणि गॅलेक्सी नोट 10+ मध्ये 4,300 एमएएच ची बॅटरी असेल.

गॅलेक्सी नोट 10 आणि गॅलेक्सी नोट 10+ अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतात. एक्सेलेरोमीटर, बॅरोमीटर, जायरो सेंसर, जियोमैगनेटिक सेंसर, हॉल सेंसर, आरजीबी लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर पण यात आहेत.

The post Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ च्या भारतीय किंमतीचा खुलासा, इथे करा प्री-बुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-and-galaxy-note-10-indian-price-and-know-pre-booking-detailed/feed/ 0
Samsung चा सर्वात पावरफुल डिवाईस Galaxy Note 10+ झाला लॉन्च, याच्या ताकदीला नाही तोड https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-plus-officially-launched-feature-specifications-details-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-plus-officially-launched-feature-specifications-details-price/#respond Thu, 08 Aug 2019 08:38:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5000 Samsung Galaxy Note 10+ कंपनीने एज-टू-एज इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर सादर केला आहे.

The post Samsung चा सर्वात पावरफुल डिवाईस Galaxy Note 10+ झाला लॉन्च, याच्या ताकदीला नाही तोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आधी दिलेल्या माहितीप्रमाणे 8 ऑगस्टला Samsung चा Galaxy Note 10 येणार होता आणि आज अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये झालेल्या एका इवेंट मध्ये कंपनीने हा लॉन्च केला. सॅमसंगने नोट सीरीज मध्ये यावेळी दोन मॉडेल लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी एस सीरीज प्रमाणे Samsung Galaxy Note 10 सोबत Galaxy Note 10+ सादर केला गेला आहे. दोन्ही फोन मध्ये डिस्प्ले व्यतिरिक्त स्पेसिफिकेशनचा पण थोडा फरक आहे. प्लस मॉडेल थोडा ऍडव्हान्स आहे. पुढे आम्ही Samsung Galaxy Note 10+ बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच जर तुम्हाला Galaxy Note 10 बद्दल जर वाचायचे असेल तर इथे क्लिक करा.

डिस्प्ले व डिजाईन

Samsung Galaxy Note 10+ कंपनीने एज-टू-एज इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर सादर केला आहे. या डिवाईस मध्ये 3040 × 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.8-इंचाचा क्वॉड एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. नोट 10 प्लस चा डिस्प्ले 498पीपीआई सह HDR10+ सर्टिफाइड आहे. Galaxy Note 10+ अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. Galaxy Note 10+ चे डायमेंशन 7.2 x 162.3 x 7.9एमएम आणि वजन 196ग्राम आहे.

रॅम व स्टोरेज

Samsung ने Galaxy Note 10+ 12जीबी रॅम मेमरी वर सादर केला आहे. हा नोट डिवाईस 12जीबी रॅम सह अंर्तराष्ट्रीय बाजारात 256जीबी इंटरनल स्टोरेज आणि 512जीबी इंटरनल मेमरीच्या दोन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. चांगली बाब अशी कि Galaxy Note 10+ मध्ये सिम सोबत माइक्रोएसडी कार्ड पण वापरता येईल.

फोटोग्राफी

Samsung Galaxy Note 10+ क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाल्या 16-मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस सह एफ/1.5-एफ/2.4 अपर्चर वाली 12-मेगापिक्सलची वाइड लेंस, एफ/2.1 अपर्चर वाली 12-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि डेफ्थ विजन वीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. अशाप्रकारे Galaxy Note 10+ एफ/2.2 अपर्चर वाल्या 10-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेरा सपोर्ट करतो.

ओएस व प्रोसेसर

Samsung Galaxy Note 10+ एंडरॉयड आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9.0 पाई वर सादर केला गेला आहे. हा डिवाईस 64बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या सॅमसंगच्या एक्सनॉस 9825 चिपसेट वर चालतो. विशेष म्हणजे भारतात Galaxy Note 10+ इतर चिपसेट सह पण येऊ शकतो.

कनेक्टिविटी व बॅटरी

Samsung Galaxy Note 10+ मध्ये ब्लूटूथ 5, एनएफसी, जीपीएस व वाई-फाई सोबतच यूएसबी टाईप-सी सारखे ऑप्शन्स आहेत. तसेच पावर बॅकअप साठी Samsung Galaxy Note 10+ मध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करते.

किंमत

Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ दोन्ही डिवाईस Aura Glow, Aura White आणि Aura Black कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जे अंर्तराष्ट्रीय बाजारात 23 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होतील.

The post Samsung चा सर्वात पावरफुल डिवाईस Galaxy Note 10+ झाला लॉन्च, याच्या ताकदीला नाही तोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-plus-officially-launched-feature-specifications-details-price/feed/ 0
12जीबी रॅम आणि 5G सपोर्ट सह लॉन्च झाला Samsung Galaxy Note 10, बघा फुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-plus-official-launched-feature-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-plus-official-launched-feature-specifications-details/#respond Thu, 08 Aug 2019 08:07:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4997 Samsung Galaxy Note 10 कंपनीचा पहिला नोट डिवाईस आहे जो इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर सादर केला गेला आहे.

The post 12जीबी रॅम आणि 5G सपोर्ट सह लॉन्च झाला Samsung Galaxy Note 10, बघा फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर आज Samsung ने आपला लेटेस्ट नोट 10 डिवाईस सादर केला आहे. कंपनीने अमेरिकेतील न्यू यार्क मध्ये या फोन साठी एका ईवेंटचे आयोजन केले होते आणि मोठ्या धुमधडाक्यात फोन लॉन्च केला. या इवेंटची सर्वात खास बाब अशी कि कंपनीने नोट सीरीज मध्ये यावेळी दोन मॉडेल सादर केले आहेत. Samsung Galaxy Note 10 सोबत Galaxy Note 10+ आणले आहेत. दोन्ही फोन मध्ये स्क्रीन साइज व्यतिरिक्त थोड्या स्पेसिफिकेशनचा पण फरक आहे. इथे आम्ही सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 बद्दल सविस्तर सांगितले आहे. तर Galaxy Note 10+ च्या माहिती साठी तुम्ही इथे क्लिक करू शकता.

डिस्प्ले आणि डायमेंशन

Samsung Galaxy Note 10 कंपनीचा पहिला नोट डिवाईस आहे जो इनफिनिटी ‘ओ’ डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. या डिवाईस मध्ये 2280 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.3-इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 401पीपीआई सह HDR10+ क्वॉलिटी सपोर्ट करतो. गॅलेक्सी नोट 10 च्या फ्रंट पॅनल वर अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. Galaxy Note 10 चे डायमेंशन 71.8 x 151.0 x 7.9एमएम आहेत व जन 168ग्राम आहे. विशेष म्हणजे Galaxy Note 10 सोबत येणाऱ्या S Pen चे वजन फक्त 3.04ग्राम आहे.

रॅम व स्टोरेज

Galaxy Note 10 Samsung ने दोन मॉडेल्स मध्ये सादर केला आहे. एक मॉडेल एलटीई ला सपोर्ट करतो तर दुसऱ्या मॉडेल मध्ये 5G सपोर्ट देण्यात आला आहे. नोट 10 च्या एलटीई मॉडेल मध्ये 8जीबी रॅम सह 256जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचबरोबर Galaxy Note 10 चा 5G मॉडेल 12जीबी रॅम मेमरी सह 128जीबी च्या मेमरीला सपोर्ट करतो. पण Galaxy Note 10 मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येणार नाही.

कॅमेरा सेग्मेंट

Samsung Galaxy Note 10 फोटोग्राफी साठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डिवाईसच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर वाली 16-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, एफ/1.5-एफ/2.4 अपर्चर वाली 12-मेगापिक्सलची वाइड लेंस आणि एफ/2.1 अपर्चर वाली 12-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. अशाप्रकारे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Galaxy Note 10 एफ/2.2 अपर्चर वाल्या 10-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

ओएस व प्रोसेसर

Samsung Galaxy Note 10 एंडरॉयड आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे. हा डिवाईस ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या सॅमसंगच्या एक्सनॉस 9825 चिपसेट वर चालतो.

कनेक्टिविटी व बॅटरी

Samsung Galaxy Note 10 4G LTE सोबत 5G ला सपोर्ट करतो. पण या दोन्ही कनेक्टिविटी एकाच मॉडेल मध्ये देण्यात आल्या नाहीत. त्याचप्रमाणे गॅलेक्सी नोट 10 मध्ये ब्लूटूथ 5, एनएफसी, जीपीएस व वाई-फाई सोबत यूएसबी टाईप-सी सारखे ऑप्शन्स उपलब्द आहेत. तसेच पावर बॅकअप साठी Samsung Galaxy Note 10 मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ दोन्ही डिवाईस Aura Glow, Aura White आणि Aura Black कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो अंर्तराष्ट्रीय बाजारात 23 ऑगस्ट पासून पहिल्या सेल साठी उपलब्ध होतील.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 वीडियो

The post 12जीबी रॅम आणि 5G सपोर्ट सह लॉन्च झाला Samsung Galaxy Note 10, बघा फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-plus-official-launched-feature-specifications-details/feed/ 0
Exclusive: 20 ऑगस्टला भारतात लॉन्च होईल Samsung Galaxy Note 10, 22 ऑगस्ट पासून होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-launch-in-india-on-20-august-and-sale-starts-from-22-august/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-launch-in-india-on-20-august-and-sale-starts-from-22-august/#respond Tue, 06 Aug 2019 12:14:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4978 भारतात Samsung Galaxy Note 10 ची प्री बुकिंग आधीच सुरु झाली आहे

The post Exclusive: 20 ऑगस्टला भारतात लॉन्च होईल Samsung Galaxy Note 10, 22 ऑगस्ट पासून होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगच्या बहुप्रतिक्षित फोन Galaxy Note 10 बद्दल गेल्या अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत. कंपनी 7 ऑगस्टला हा ग्लोबल इवेंट मध्ये लॉन्च करणार आहे. या लॉन्च बद्दल कंपनीने खूप आधीच माहिती दिली होती आणि त्याचबरोबर फोन भारतात लॉन्च केला जाणार असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. आज 91मोबाईल्सला याबद्दल एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. कंपनी 20 ऑगस्टला हा भारतात लॉन्च करणार आहे. लॉन्चच्या दोन दिवसानंतर हा फोन सेल साठी उपलब्ध होईल. अर्थात 22 ऑगस्ट पासून भारतात Samsung Galaxy Note 10 चा सेल सुरु होईल.

आम्हाला हि माहिती सॅमसंगमधील एका सुत्रा कडून मिळाली आहे. याआधी पण त्यांनी आम्हाला माहिती दिली आहे जी खरी ठरली आहे. त्यांनी आम्हाला सांगितले कि “आता पर्यंत Samsung Galaxy Note 10 बद्दल माहिती होती कि 23 ला विक्रीसाठी उपलब्द होईल परंतु हा फोन 22 ऑगस्टलाच ग्लोबली सेल साठी उपलब्ध होईल आणि याच दिवसापासून भारतात पण हा उपलब्ध केला जाईल.” त्यांनी किंमतीबद्दल आम्हाला माहिती दिली नाही. पण भारतात Samsung Galaxy Note 10 ची प्री बुकिंग आधीच सुरु झाली आहे आणि आम्ही आधीच याची माहिती दिली होती. आज सॅमसंग इंडियाच्या सपोर्ट पेज वर पण हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे कि फोन लवकरच भारतात लॉन्च केला जाणार आहे.

दोन मॉडेल होतील लॉन्च

आता पर्यंत असे होत होते कि नोट सीरीज मध्ये कंपनी एक फोन लॉन्च करत होती. पंरतु यावेळी दोन मॉडेल लॉन्च होणार आहेत. सॅमंसग गॅलेक्सी नोट 10 सोबतच कंपनी Samsung Galaxy Note 10+ सादर करणार आहे. दोन्ही फोन मध्ये प्रामुख्याने स्क्रीन, मेमरी आणि बॅटरीचा फरक असू शकतो. अलीकडेच एका लीक मध्ये याचा खुलासा केला गेला आहे.

Samsung Galaxy Note 10

Samsung Galaxy S10 प्रमाणे यावेळी नोट फोन मध्ये पण तुम्हाला पंच होल डिस्प्ले मिळेल ज्याला कंपनीने इनफिनिटी ओ डिस्प्लेचे नाव दिले आहे. Samsung Galaxy Note 10 मध्ये तुम्हाला 6.3-इंचाची स्क्रीन मिळेल हा फोन 2के डिस्प्ले रेजल्यूशन सह येऊ शकतो. प्रोसेसिंग साठी फोन मध्ये क्वालकॉमचा दमदार स्नॅपड्रॅगॉन 855 किंवा एक्सनोस 9825 चिपसेट मिळेल. भारतात एक्सनोस चिपसेट असलेला फोनच उपलब्ध होईल. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार Samsung Galaxy Note 10 मध्ये तुम्हाला 8जीबी रॅम मेमरी मिळेल तर 256जीबी चा स्टोरेज ऑप्शन असेल. कॅमेरा पाहता या फोन मध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात याचा मेन कॅमेरा सेंसर 12एमपी चा असेल. तसेच सेकेंडरी सेंसर 16एमपी मिळेल. तर तिसरा सेंसर 12एमपी चा असेल. सेल्फी बद्दल कोणतीही खास माहिती अजूनतरी मिळाली नाही पण आता पर्यंत ज्या बातम्या मिळाल्या आहेत त्या नुसार या फोन मध्ये 10एमपी चा फ्रंट कॅमेरा असेल. या फोन मध्ये तुम्हाला 3,600 एमएएच ची बॅटरी मिळेल.

Samsung Galaxy Note 10+

Samsung Galaxy Note 10+ मध्ये तुम्हाला मोठी स्क्रीन मिळेल. हा 6.8—इंचाच्या डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. यात पण पंच होल डिस्प्ले असेल. हा फोन पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 आणि एक्सनोस 9825 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. मेमरी मध्ये फरकअसा असेल कि कंपनी हा 8जीबी रॅम सह 512जीबी मेमरी मध्ये सादर करू शकते. यात पण तुम्हाला 12 एमपी + 16 एमपी + 12 एमपी चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. बॅटरी पावर जास्त आहे. हा फोन 4,300 एमएएच च्या बॅटरी सह येऊ शकतो.

Samsung Galaxy Note 10 वीडियो

The post Exclusive: 20 ऑगस्टला भारतात लॉन्च होईल Samsung Galaxy Note 10, 22 ऑगस्ट पासून होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-launch-in-india-on-20-august-and-sale-starts-from-22-august/feed/ 0
Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ ची किंमत झाली लीक, 7 ऑगस्टला होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-galaxy-note10-plus-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-galaxy-note10-plus-price/#respond Tue, 16 Jul 2019 12:24:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4802 गॅलेक्सी नोट 10 ची किंमत 1,100 डॉलर पासून 1,200 डॉलर पर्यंत असू शकते.

The post Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ ची किंमत झाली लीक, 7 ऑगस्टला होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागील काही दिवसांपासुन Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ बद्दल माहिती समोर येत आहे. तसेच 91मोबाईल्सने अलीकडेच एफसीसी वर आलेला Galaxy Note 10 चा फोटो तुमच्या समोर आणला होता. आता या अपकमिंग हँडसेटची किंमत लीक झाली आहे.

नवीन लीकनुसार, Galaxy Note 10 चा 256जीबी स्टोरेज वेरिएंट युरोपियन मार्केट मध्ये 999 यूरो (जवळपास 77,000 रुपये) मध्ये सादर केला जाईल. तसेच Galaxy Note 10+ ची किंमत पण लीक झाली आहे. WinFuture च्या रिपोर्ट नुसार, गॅलेक्सी नोट 10 ची बेसिक किंमत 999 यूरो (जवळपास 77,000 रुपये) असेल.

Galaxy Note 10+ ची किंमत 1,149 यूरो (जवळपास 89,000 रुपये) असेल. हि किंमत 256 जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये येणाऱ्या फोनची असेल. तसेच रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि गॅलेक्सी नोट 10 सीरीज साठी प्री-ऑर्डर 9 ऑगस्ट पासून सॅमसंगच्या घरच्या मार्केट मध्ये सुरु होईल.

हे देखील वाचा: लहान मुलगी वापरत होती iPhone 6, अचानक लागली आग

तसेच SamMobile च्या रिपोर्ट नुसार सॅमसंग साउथ कोरिया मध्ये फक्त गॅलेक्सी नोट 10 चा 5जी वेरिएंट लॉन्च करेल. तर अंतरराष्ट्रीय बाजारात 5जी आणि 4जी दोन्ही मॉडेल मिळतील. गॅलेक्सी नोट 10 ची किंमत 1.2 मिलियन दक्षिण कोरियाई वॉन (जवळपास 70,000 रुपये) पासून सुरु होऊ शकते, तर गॅलेक्सी नोट 10+ च्या बेस वेरिएंटची किंमत 1.4 मिलियन दक्षिण कोरियाई वॉन (जवळपास 81,500 रुपये) असू शकते.

काही आठवड्यांपूर्वी हा फोन गीकबेंच वर सर्टिफाइड झाला होता त्या नुसार यात स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सोबतच 6जीबी रॅम असेल. तसेच आता पर्यंत समोर आलेल्या लीक माहिती नुसार गॅलेक्सी नोट 10 मध्ये 6.4-इंचाचा डायनमिक एमोल्ड डिस्प्ले मिळू शकतो आणि हा डिवाइस 128 जीबी स्टोरेज ऑप्शन वाल्या बेस वेरियंट सह येऊ शकतो. सोबतच यात 4,170एमएएच ची बॅटरी असल्याचे पण समोर आले आहे. दुसरीकडे गॅलेक्सी नोट 10 प्रो मॉडेल मध्ये यापेक्षा थोडा मोठा 6.8 इंचाचा एमोल्ड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. बोलले जात आहे कि हा स्टॅंडर्ड 256जीबी स्टोरेज वाला ऑप्शन असेल, ज्याचा अजून एक वेरियंट 1 टीबी मेमरी सह येऊ शकतो. यात पण 4,170एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा: Exclusive : Realme 5 पण होईल भारतात लॉन्च, कंपनी दिवाळीच्या आधी घेऊन येईल हा फोन

इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वीच एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात एका रशियन पब्लिकेशन Hi Tech Mail ने माहिती दिली होती कि गॅलेक्सी नोट 10 ची किंमत 1,100 डॉलर पासून 1,200 डॉलर पर्यंत असू शकते. बोलले जात आहे कि हा कंपनीच्या नोट 10 चा अफोर्डेबल वर्जन असेल, ज्यात रेग्युलर वेरियंट पेक्षा काही कमी फीचर्स दिले जातील.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 वीडियो

The post Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ ची किंमत झाली लीक, 7 ऑगस्टला होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-galaxy-note10-plus-price/feed/ 0
7 ऑगस्टला लॉन्च होईल सॅमसंगचा सर्वात दमदार फोन Galaxy Note 10, बघा काय असेल खास https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-4300mah-battery-specifications-leaked-buttonless-design/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-4300mah-battery-specifications-leaked-buttonless-design/#respond Tue, 02 Jul 2019 12:21:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4718 नोट सीरीज मध्ये येणारा फोन पंच-होल डिस्प्ले सह येईल.

The post 7 ऑगस्टला लॉन्च होईल सॅमसंगचा सर्वात दमदार फोन Galaxy Note 10, बघा काय असेल खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल अबेक दिवसांपासून बातमी समोर येत आहे कि कंपनी आपल्या नोट सीरीजचा पुढील डिवाइस Galaxy Note 10 लवकरच लॉन्च करू शकते. आता असे समोर आले आहे कि कंपनी हा फोन 7 ऑगस्टला सादर करेल. या इवेंटला कंपनीने अनपॅक्डचे नाव दिले आहे. हा इवेंट कंपनी आपल्या वेबसाइट वर लाइव स्ट्रीम पण करेल.

यात असेल पंच होल

कंपनी ने यूट्यूब वर अनपॅक्ड इवेंटचा टीजर जारी केला आहे. या टीजर मध्ये लॉन्च डेट व्यतिरिक्त फोन मधील कोणत्याही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला नाही. पण असे समजले आहे कि नोट सीरीज मध्ये येणारा फोन पंच-होल डिस्प्ले सह येईल.

सोबतच होतील इतर मॉडेल्स लॉन्च

असे बोलले जात आहे कि Samsung Galaxy Note 10 सह Galaxy Note 10 Pro ऐवजी Galaxy Note 10+ लॉन्च करू शकते. Galaxy S10 सीरीज सोबत पण कंपनीने असेच केले होते, गॅलेक्सी एस10 सह Galaxy S10+ आणला होता. तसेच कंपनी दोन गॅलेक्सी नोट मॉडेल सह 5जी वेरिएंट पण घेऊन येऊ शकते.

अशी असू शकते किंमत

अजूनतरी कंपनीने अधिकृतपणे स्मार्टफोन्सच्या किंमतीची कोणतीही माहिती दिली नाही. पण काही रिपोर्ट्स नुसार Samsung Galaxy Note10 $1,100 (जवळपास 76,000 रुपये) आणि $1,200 (जवळपास 83,000 रुपये) मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. गेल्यावर्षी Note 9 कंपनीने $1,000 (जवळपास 69,000 रुपये) च्या सुरवातीच्या किंमतीत लॉन्च केला होता.

हे देखील वाचा: 7 ऑगस्टला लॉन्च होईल सॅमसंगचा सर्वात दमदार फोन Galaxy Note 10, बघा काय असेल खास

अलीकडेच Samsung Galaxy Note 10+ चा कथित हॅन्ड्स ऑन फोटो लीक झाला होता. याआधी बोलले जात होते कि Samsung च्या आगामी स्मार्टफोनचे नाव Galaxy Note 10 Pro असू शकते. फोटो मध्ये हँडसेटच्या फ्रंट पॅनल वर होल-पंच डिस्प्ले आहे जो यावर्षी लॉन्च झालेल्या Galaxy S10 मध्ये देण्यात आलेल्या एमोलेड पॅनल-सपोर्टेड इनफिनिटी-ओ डिस्प्ले प्रमाणे असू शकतो. हॅन्ड्स ऑन फोटो मध्ये Galaxy Note 10+ मॉडेलच्या मागे एलईडी फ्लॅश आणि टाइम-ऑफ-फ्लाइट सह वर्टिकल कॅमेरा सेटअपची झलक पण दिसली होती.

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका विदेशी रिपोर्ट मध्ये दावा केला गेला होता कि सॅमसंगचा आगामी नोट डिवाईस बटनलेस असेल. म्हणजे यात कोणताही फिजिकल बटण दिला जाणार नाही. फोनच्या साइड पॅनल्स वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण जो दिला जातो तो Galaxy Note 10 मॉडेल्स मध्ये नसेल. Samsung आपला हा आगामी डिवाईस बटण ऐवजी टच सेंसर्स सह लॉन्च करू शकते ज्यात फोन बॉडी प्रेस केल्याने पावर ऑन व ऑफ होईल तसेच वॉल्यूम कंट्रोल होईल.

हे देखील वाचा: Xiaomi Redmi Note 7 Pro चा नवीन वेरिएंट आला समोर, 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज सह झाला लॉन्च

Samsung Galaxy Note 10 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung बद्दल बोलले जात आहे कि कंपनी आपला Galaxy Note 10 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करेल जो पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करेल. या दोन्ही मॉडेल्स मध्ये डिस्प्ले साईजचा फरक दिसेल. लीक्स नुसार Galaxy Note 10 मध्ये 6.4-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो तसेच Galaxy Note 10 Pro मध्ये 6.7-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हे दोन्ही मॉडेल एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतील. Galaxy Note 10 मध्ये 586पीपीआई तर Galaxy Note 10 Pro मध्ये 498पीपीई पिक्सल डेनसिटी वाली स्क्रीन मिळेल.

The post 7 ऑगस्टला लॉन्च होईल सॅमसंगचा सर्वात दमदार फोन Galaxy Note 10, बघा काय असेल खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-4300mah-battery-specifications-leaked-buttonless-design/feed/ 0
बघा Samsung Galaxy Note10 चे एक्सक्लूसिव 5K रेंडर आणि 360डिग्री वीडियो https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note10-5k-renders-and-360-degree-video/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note10-5k-renders-and-360-degree-video/#respond Thu, 06 Jun 2019 14:57:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4517 सॅमसंग Galaxy Note 10 मध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक नसेल

The post बघा Samsung Galaxy Note10 चे एक्सक्लूसिव 5K रेंडर आणि 360डिग्री वीडियो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही महिन्यात सॅमसंगच्या स्मार्टफोन Samsung Galaxy Note 10 बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत. आता पर्यंत मिळालेल्या माहिती नुसतं हा स्मार्टफोन दोन वेरियंट मध्ये लॉन्च होईल. एक वेरियंट LTE आणि दुसरा 5G कनेक्टिविटी सह येईल. सॅमसंग च्या या आगामी डिवाईसचा लुक कसा असेल तसेच हा स्मार्टफोन कोणत्या डिजाईन सह येईल, अश्या सर्व माहितीसह 91मोबाईल्स सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 चा एक्सक्लूसिव 360डिग्री वीडियो आणि काही हाई रेजोल्यूशन फोटोज तुमच्यासाठी घेऊन आला आहे.

91मोबाईल्स ने Samsung Galaxy Note 10 च्या या एक्सक्लूसिव मीडिया कंटेंट साठी प्रसिद्ध टिप्सटर ऑनलीक्स शी हात मिळवणी केली आहे आणि सॅमसंगच्या आगामी हाईएंड फ्लॅगशिप डिवाईसचा पहिला लुक तुमच्यासाठी आणला आहे. Samsung Galaxy Note 10 बद्दल बोलायचे तर यात इनफिनिटी ओ डिस्प्ले मध्ये सेल्फी होल असेल. हा राइट साइड ऐवजी सेंटर मध्ये दिला जाईल. तसेच यात 6.3-इंचाचा डिस्प्ले असेल जो Galaxy Note 9 पेक्षा थोडा छोटा असेल. रेंडर मध्ये दोन्ही साइड कर्व्ड एज सह दाखवण्यात आल्या आहेत. तर चारही बाजूला बारीक बेजल आहेत.

अशा आहे कि फोन मध्ये अमोलेड पॅनल सह एचडीआर10+ सपोर्ट आणि 1,440 x 3,040पिक्सल रेजोल्यूशन असेल. मागची बाजू पाहता Samsung Galaxy Note 10 चा रियर पॅनल ग्लास बॅक सह येईल. सोयाबीतच यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. तसेच सॅमसंग Galaxy Note 10 मध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक नसेल आणि बिक्सबी बटण वेगळा दिला जाईल. याआधी 3.5एमएम जॅक Apple, Google, आणि OnePlus ने आपल्या स्मार्टफोन्स मधून काढला आहे.

तसेच फोनच्या डाव्या बाजूला पावर आणि वॉल्यूम बटण असतील. सोबतच बॉटम एज वर स्पीकर ग्रिल, एस-पेन, माइक, टाइप-सी पोर्ट चार्जिंग साठी आणि ई-सिम कार्ड ट्रे असेल. हँडसेट 162.6 x 77.4 x 7.9एमएम साइजचा असेल. @onleaks नुसार Galaxy Note 10 मध्ये एक थिन मेटल फ्रॅम असेल जशी आपण Samsung Galaxy S10 5G मध्ये बघितली आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy Note 10 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855/ Exynos 9820 एसओसी, 12जीबी पर्यंत रॅम आणि एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम असेल. सोबत सॅमसंग Galaxy Note 10 Pro पण लॉन्च केला जाऊ शकतो. हँडसेट बद्दल बोलले जात आहे कि कंपनी यात 6.75-इंचाची स्क्रीन, क्वार्ड कॅमेरा सेटअप (टीओएफ सेंसर) आणि 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देईल.

The post बघा Samsung Galaxy Note10 चे एक्सक्लूसिव 5K रेंडर आणि 360डिग्री वीडियो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note10-5k-renders-and-360-degree-video/feed/ 0