Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ च्या भारतीय किंमतीचा खुलासा, इथे करा प्री-बुक

अमेरिकेतील न्यू यूॉर्क मध्ये आयोजित गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंट मध्ये साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने आपली गॅलेक्सी नोट 10 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने गॅलेक्सी नोट 10 आणि गॅलेक्सी नोट 10+ सादर केला आहे. आता या फोनच्या भारतीय किंमतीचा खुलासा कंपनीने स्वतः केला आहे. किंमती सोबतच कंपनीने प्री-बुकिंग आणि ऑफर्सची माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया कुठे आणि कशी या फोन साठी प्री-बुकिंग करता येईल ते.

भारतीय किंमत

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 (8 जीबी रॅम आणि 256 जीबी) ची किंमत 69,999 रुपये. तर गॅलेक्सी नोट 10+ (12 जीबी रॅम आणि 256 जीबी) ची किंमत 79,999 रुपये आहे. सध्या Note 10 Plus के 512 जीबी वेरिएंटच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. स्मार्टफोन 23 ऑगस्ट पासून मार्केट मध्ये उपलब्ध केला जाईल.

प्री-बुकिंग

सेलच्या आधी तुम्ही या फोन साठी प्री-बुकिंग करू शकाल. प्री-बुकिंग 8 ऑगस्ट पासून सुरु होऊन 22 ऑगस्ट पर्यंत चालेल. इच्छुक ग्राहक सॅमसंग.कॉम/इन, फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम आणि टाट क्लिक वर हे फोन्स प्री-बुक करू शकतील. जर ग्राहकांनी रिटेल आउटलेट आणि सॅमसंग ई-साइट वर एचडीएफसी क्रेडिट कार्डने प्री-बुक केले तर 6,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

तसेच, फ्लिपकार्ट, अमेझॉन इंडिया, पेटीएम, टाटा क्लिक वर ICICI क्रेडिट कार्डने प्री-बुकिंग केल्यावर ग्राहकांना 6,000 रुपयांचा कॅशबॅकमिळेल. प्री-बुकिंग करणाऱ्या सर्व ग्राहकांना Galaxy Watch Active फक्त 9,999 रुपयांमध्ये मिळेल. याची खरी किंमत 19,990 रुपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 आणि गॅलेक्सी नोट 10+ हँडसेट भारतीय बाजारात ऑरा ग्लो, ऑरा व्हाइट आणि ऑरा ब्लॅक कलर मध्ये विकले जातील. तसेच पावर बॅकअप साठी सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी आणि गॅलेक्सी नोट 10+ मध्ये 4,300 एमएएच ची बॅटरी असेल.

गॅलेक्सी नोट 10 आणि गॅलेक्सी नोट 10+ अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतात. एक्सेलेरोमीटर, बॅरोमीटर, जायरो सेंसर, जियोमैगनेटिक सेंसर, हॉल सेंसर, आरजीबी लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर पण यात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here