8GB रॅम आणि 32MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy Note 10 Lite झाला 4 हजार रुपयांनी स्वस्त

Samsung ने साल 2019 मध्ये आपली Galaxy Note 10 सीरीज लॉन्च केली होती. या सीरीज मध्ये Galaxy Note 10, Note 10 Plus आणि Galaxy Note 10 Lite सादर केला गेला होता. तसेच आता सॅमसंगने या सीरीजच्या पावरफुल फोन्स पैकी एक गॅलेक्सी नोट 10 लाइटची किंमत कमी केली आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत चार हजार रूपयांची कपात केली आहे. कंपनीने अधिकृत ऑनलाइन फोरम वर कमी किंमतीत फोन लिस्ट केला आहे. पण कंपनीने ऑफिशियल माहिती दिली नाही की या फोनचा प्राइस कट कायम राहणार आहे की एखाद्या ऑफर मध्ये विकला जात आहे. टेक वेबसाइट MySmartPrice नुसार Galaxy Note 10 Lite ची किंमत कायमची कमी करण्यात आली आहे.

नवी किंमत

Galaxy Note 10 Lite चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आधी 38,999 रुपयांमध्ये विकला जात होता, आता हा फोन 34,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल आधी 40,999 रुपयांमध्ये विकला जात होता. पण कपातीनंतर फोन 36,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

नो कॉस्ट ईएमआय

या प्राइस कट व्यतिरिक्त कंपनी नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शन 3,040 रुपये प्रति महिना या दराने देत आहे. तर स्टँडर्ड ईएमआयची सुरवात 1,741 रुपयांपासून होत आहे. स्मार्टफोन Aura Black, Aura Glow आणि Aura Red कलर ऑप्शन मध्ये येतो.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Note10 Lite कंपनीने 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे, ज्याला कंपनीने सिनेमॅटिक इनफिनिटी डिस्प्लेचे नाव दिले आहे. गॅलेक्सी नोट 10 लाइट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो जो फास्ट फोन अनलॉकिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy Note10 Lite दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे ज्यात 6 जीबी रॅम मेमरी आणि 8 जीबी रॅमचा समावेश आहे. हे दोन्ही वेरिएंट्स 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जी माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येते. गॅलेक्सी नोट 10 लाइट एनएफसी व सॅमसंग पे सारख्या फीचर्स सह येतो.

Samsung Galaxy Note10 Lite चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सॅमसंगने फक्त सॉफ्टवेयर नाही तर आउटर लुकच्या बाबतीत पण फोनचा कॅमेरा डिपार्टमेंट खास बनवला आहे. बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/2.2 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/1.7 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलचा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आहे. फ्रंट पॅनल वरील पंच-होल मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Galaxy Note10 Lite सॅमसंग 2.0 यूआई आधारित एंडरॉयडच्या ऍडव्हान्स ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो सॅमसंगच्या 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या एक्सनॉस 9810 चिपसेट वर चालतो. पावर बॅकअपसाठी या डिवाईस मध्ये सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा डिवाईस पण नोट 10 सीरीज मधील फोन्स प्रमाणे ऍडव्हान्स S-Pen सह लॉन्च झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 लाइट वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here