Exclusive: दिवाळीच्या आधी भारतात लॉन्च होईल Vivo Nex , Oneplus 7T ला देईल टक्कर

दिवाळी पर्यंत भारतीय यूजर्सना एकापेक्षा एक चांगले फोन बघायला मिळणार आहेत, त्याची एकीकडे Samsung Galaxy Note 10 ने सुरवात पण झाली आहे. तर दुसरीकडे Apple आणि Google पण येणार आहेत. याचकाळात Vivo आपला या वर्षातला सर्वात मोठा डिवाइस Nex 3 पण लेकर घेऊन येणार आहे. 16 सप्टेंबरला हा फोन चीन मध्ये लॉन्च केला जाईल पण काही दिवसांतच हा भारतात पण उपलब्ध होईल. 91mobiles ला याची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. सर्वात खास बाब अशी कि याची माहिती कंपनीच्याच एका अधिकाऱ्याकडून मिळाली आहे ज्यांनी आम्हाला नाव न सांगण्याच्या अटीवरून हि बातमी दिली आहे.

त्यांनी सांगितले कि “सप्टेंबर मध्ये भारतीय बाजारात Vivo V17 pro लॉन्च केला जाईल. तर पुढल्या महिन्यात कंपनी नेक्स 3 आणण्याचा प्लान करत आहे. दिवाळीच्या आधी हा फोन कंपनी लॉन्च करू शकते आणि यासाठी आतापासूनच सर्व वीवो अधिकाऱ्यांना नोटिफिकेशन पण देण्यात आली आहे. कंपनी यावेळी हा मर्यादित प्रमाणात हा फोन आणण्याचा प्लान करत आहे. भारतीय बाजारात हा फोन लिमिडेट स्टॉक सह उपलब्ध होईल.”

विशेष म्हणजे कंपनीने सर्वात पहिला Vivo Nex मॉडेल भारतात सादर केला होता. तर दुसरा मॉडेल जो Dual Display सह आला होता तो आला नाही. तर आता Nex 3 घेऊन Vivo येणार आहे. कंपनीने अधिकृतपणे आता पर्यंत कोणतीही माहिती दिली नाही पण इतके समजले आहे कि Vivo V17, V17 Pro आणि Nex 3 सहित इतर काही दुसरे डिवाइस प्लान करत आहे.

Vivo Nex 3 चे स्पेसिफिकेशन

वर सांगितल्याप्रमाणे 16 सप्टेंबर चीन मध्ये वीवो नेक्स 3 लॉन्च केला जाईल. कंपनीने माहिती दिली आहे कि Nex 3 चा 5G मॉडेल पण उपलब्ध होईल. हा कंपनीचा पहिला फोन असेल ज्यात वाटर फॉल डिस्प्ले मिळेल. अलीकडेच वीवो नेक्स 3 चे दोन मॉडेल चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट झाले आहेत ज्यात फोनचे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन उपलब्ध आहेत. लिस्ट केले गेलेल्या फोन मध्ये 6.89 इंचाची AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे.

किंमत

कंपनीने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट सह लिस्ट केला आहे आणि यात 2.96GHz चा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा सध्या मोबाईल साठी सर्वात ताकदवान चिपसेट आहे. वीवो नेक्स 3 दोन रॅम वेरियंट मध्ये सादर केला जाऊ शकतो म्हणजे 8जीबी आणि 12जीबी. सोबत तीन मेमरी ऑप्शन असतील 128GB, 256GB, 512GB.

कॅमेरा पाहता आता पर्यंत मिळालेल्या माहिती नुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येऊ शकतो. कंपनी हा 64 एमपी च्या मेन कॅमेरा सह आणू शकते. तसेच यात सेकेंडरी कॅमेरा 13 एमपी चा असू शकतो. तसेच आता पर्यंत मिळालेल्या माहिती नुसार तीसरा सेंसर पण 13 एमपी चा असेल.

सेल्फी साठी या फोन मध्ये तुम्हाला 16 एमपी चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच पावर बॅकअप साठी वीवो नेक्स 3 मध्ये 4410 एमएएच ची बॅटरी असू शकते.

काय आहे Vivo चा प्लान

वीवो पुढील काही महिन्यात अनेक नवीन फोन सादर करू शकते ज्यात V17, V17 Pro आणि Nex 3 व्यतिरिक्त U सीरीजचे फोन पण असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here