शाओमी चा पावरफुल स्मार्टफोन मी मॅक्स 3, 19 जुलै होत आहे  लॉन्च

शाओमी सीईओ लेई जून ने काही दिवसांपूर्वी चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर कंपनी च्या आगामी डिवाईस मी मॅक्स 3 च्या रिटेल बॉक्स चा फोटो शेयर केला होता. या रिटेल बॉक्स वर मॅक्स सह मोठ्या अक्षरात 3 लिहिण्यात आला होता, ज्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की कंपनी लवकरच हा फोन लॉन्च करेल. आता शाओमी ने मी मॅक्स 3 ची लॉन्च डेट जाहीर केली आहे. शाओमी चा हा पावरफुल फोन 19 जुलै ला टेक बाजारात सादर केला जाईल.

शाओमी चे ग्लोबल प्रवक्ता डोनोवॅन ने आपल्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून मी मॅक्स 3 च्या लॉन्च ची माहिती दिली आहे. या ट्वीट मध्ये सांगण्यात आले आहे की कंपनी पुढच्या गुरुवारी म्हणजे 19 जुलै ला मी मॅक्स 3 टेक बाजारात लॉन्च करेल. एका लीक नुसार मी मॅक्स 3 शाओमी 1,699 चीनी युआन मध्ये लॉन्च करेल. हि किंमत भारतीय करंसी नुसार 18,000 रुपयांच्या आसपास असेल. विशेष म्हणजे ही किंमत फोनची बेस किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण फोन च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि याच्या किंमती साठी 19 जुलै ची वाट बघावी लागेल.

शाओमी मी मॅक्स 3 बद्दल समोर आलेल्या लीक नुसार मी मॅक्स 3 मध्ये 6.99-इंचाचा मोठा फुलएचडी+ एलसीडी ​डिस्प्ले मिळू शकतो तसेच हा मेटल डिजाईन सह सादर केला जाईल. पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन 3जीबी, 4जीबी आणि 6जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च होईल तसेच या वेरिएंट्स मध्ये 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. सर्व वेरिएंट्स मध्ये 128जीबी पर्यंतचा माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

मी मॅक्स 3 मधील चिपसेट ची माहिती देण्यात आली नाही पण आधी समोर आलेल्या लीक मध्ये सांगण्यात आले होते की हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 10 सह सादर केला जाईल. त्याचबरोबर हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल. तसेच वेईबो वर ताजा लीक मध्ये मी मॅक्स 3 मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला प्रोसेसर दिला जाणार असल्याची बाब समोर आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता या लीक नुसार मी मॅक्स 3 चा डुअल रियर कॅमेरा एआई क्षमता वाला असेल ज्यात सोनी आईएमएक्स363 सेंसर असू शकतो. फोन मध्ये एम्प्लीफायर स्पीकर्स असतील तसेच फोन मध्ये इंन्फ्रारेड टेक्निक पण असेल. ताजा लीक मध्ये सांगण्यात आले आहे की शाओमी मी मॅक्स 3 मध्ये 5,500एमएएच ची बॅटरी देण्यात येईल जी फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here