आला आहे बॅटरीचा बाप, लॉन्च झाला 18,000एमएएच बॅटरी असलेला पावरफुल फोन, सोबत आहेत 5 कॅमेरा

स्मार्टफोन्सच्या बदलत्या टेक्नॉलॉजीने मोबाईल फोन्सचा डिस्प्ले, लुक व डिजाईन सोबतच यांच्या कॅमेरा व परफॉर्मेंस मध्ये पण मोठे बदलाव झाले आहेत. आज स्लाईडर पॅनल, पॉप-अप कॅमेरा, पंच-होल डिस्प्ले असलेला फोन बाजारात आले आहेत. स्मार्टफोन कितीही पावरफुल असला तर जर फोन मध्ये बॅटरी कमजोर असेल तर सर्व फीचर्स कुचकामी ठरतात. तसे तर टेक कंपन्यांनी 4,000 ते 5,000एमएएच बॅटरी असलेले फोन बाजारात आणले आहेत. पण आज एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून जगासमोर एक असा स्मार्टफोन ने आला आहे जो 18,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

ऐकताना हे जरा विचित्र वाटेल पण हेच सत्य आहे कि 18,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. आणि हा स्मार्टफोन सादर करणारी कंपनी आहे एनर्जाइजर. एमडब्ल्यूसी 2019 मध्ये टेक कंपनी एनर्जाइजर ने आपला नवीन स्मार्टफोन पावर मॅक्स पी18के पॉप सादर केला आहे जो 18,000एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करतो. फोनची बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सह फास्ट चार्जिंग सपोर्ट ​देण्यात आला आहे.

एनर्जाइजर पावर मॅक्स पी18के पॉप चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन 6.2-इंचाच्या फुलएचडी प्लस डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो 2 सेंसरला सपोर्ट करतो. फोनच्या पॉप-अप कॅमेरा मध्ये 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन सेंसर देण्यात आले आहेत. फोनचा रियर कॅमेरा सेटअप पाहता तिथे 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचे तीन कॅमेरा सेंसर आहेत.

पावर मॅक्स पी18के पॉप मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल मेमोरीला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. एंडरॉयड बेस्ड हा फोन 2.0गीगाहर्ट्ज आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक पी70 चिपसेट वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here