फक्त 7,999 रुपयांमध्ये विकला जाईल Xiaomi Redmi 9i स्मार्टफोन, 15 सप्टेंबरला होईल भारतात लॉन्च

Xiaomi ने कालच खुलासा केला आहे कि कंपनी भारतीय बाजारात आपल्या ‘रेडमी 9’ सीरीजचा अजून एक नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे, जो येत्या 15 सप्टेंबरला लॉन्च केला जाईल. हा आगामी स्मार्टफोन Redmi 9i नावाने भारतीय बाजारात एंट्री करेल. फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत शाओमी 15 सप्टेंबरला ऑफिशियल करेल पण 91मोबाईल्सने फोन लॉन्चच्या आधीच आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये Xiaomi Redmi 9i ची किंमत सांगितली आहे.

91मोबाईल्सला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे कि Xiaomi द्वारे 15 सप्टेंबरला लॉन्च केला जाणारा Redmi 9i स्मार्टफोन भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये येईल. बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. प्राप्त माहितीनुसार रेडमी 9आई चा बेस वेरिएंट मार्केट मध्ये फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा: Xiaomi Mi 10T Pro येत आहे भारतात, स्पेसिफिकेशन्स आले समोर, किंमत असेल 35,000 रुपयांच्या आसपास

Redmi 9i च्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,999 रुपये असेल. तर फोनच्या 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत अजून समजली नाही. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन तीन कलर वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल ज्यात Midnight Black, Sea Blue आणि Nature Green hues रंगांचा समावेश असेल. लक्षात असू द्या आधी लॉन्च झालेला Redmi 9A स्मार्टफोन पण याच वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला होता.

Xiaomi Redmi 9i ची लॉन्च डेट शेयर करण्यासोबतच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर या फोनचा प्रोडक्ट पेज लाईव केला गेला आहे. इथे दाखवण्यात आलेल्या फोनच्या फोटो वरून समजले आहे कि रेडमी 9आई वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोनच्या वरच्या भागावर 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. तसेच वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजव्या पॅनल वर आहेत. हा फोन मीयूआई 12 वर चालेल.

हे देखील वाचा: Xiaomi ने लॉन्च केला अजून एक स्वस्त स्मार्टफोन Redmi 9AT, यात मिळेल 5,000एमएएच ची मोठी बॅटरी

Xiaomi Redmi 9A

या महिन्यात शाओमीने रेडमी 9 सीरीज अंतर्गत Redmi 9A स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे. भारतीय बाजारात हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्याचा बेस वेरिएंट 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही मॉडेल 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. Xiaomi Redmi 9A चा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरीएंट 6,799 रुपये तर फोनचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरीएंट 7,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचे फुल फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा (Redmi 9A)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here