गूगल ने पाठवले मीडिया इन्वाईट, 9 ऑक्टोबरला लॉन्च होतील पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल

गूगल च्या पिक्सल स्मार्टफोन्स बद्दल खुप दिवसांपासून लीक्स येत आहेत. वेगवेगळ्या रिपोर्ट्स मधून पिक्सल 3 सीरीजच्या स्मार्टफोन्सचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स सोबत लॉन्च डेट पण समोर येत आहेत. पण गूगल लवकरच या सर्व चर्चेला पूर्णविराम देणार आहे. गूगल ने स्वतः च मीडिया इन्वाईट पाठवून पिक्सल 3 सीरीजच्या लॉन्च डेट ची माहिती दिली आहे. गूगल ने सांगितले आहे की येत्या 9 ऑक्टोबरला गूगल आपले नवीन टेक्नोलॉजी असलेले डिवाईस टेक जगासमोर सादर करेल.

गूगल ने पाठवलेल्या मीडिया इन्वाईट मध्ये सांगण्यात आले आहे की कंपनी येत्या 9 ऑक्टोबरला एका मोठ्या ईवेंट चे आयोजन करणार आहे. हा ईवेंट न्यूयार्क मधील स्परींग स्टूडियो मध्ये आयोजित करण्यात येईल. गूगल ने मीडिया इन्वाईट मध्ये स्पष्टपणे सांगितले नाही की या ईवेंट च्या मंचावरून कंपनी कोणती मोठी घोषणा करणार आहे किंवा कोणता डिवाईस लॉन्च करेल. पण 9 ऑक्टोबरला पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल स्मार्टफोन लॉन्च होतील याची शक्यता जास्त आहे.

गूगल ने मीडिया इन्वाईट सोबत एक जीफ टीजर पण शेयर केला आहे ज्यात ‘आय लव एनवाय’ लिहिण्यात आले आहे. तसेच ईवेंट ची वेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता आहे. विशेष असण्याचे कारण म्हणजे पिक्सल आणि पिक्सल एक्सएल फर्स्ट जेनेरेशन ला एचटीसी कंपनी ने एफसीसी वर सब्मिट केले होते. तर पिक्सल 2 आणि पिक्सल 2एक्सएल एचटीसी व एलजी ने एक साथ एफसीसी मध्ये रजिस्टर केले होते. पण यावेळी पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल स्वतः गूगल ने एफसीसी वर रजिस्टर केले आहेत. त्यामुळे बोलले जात आहे की गूगल ने स्वतः आगामी पिक्सल डिवाईसेज डिजाईन केले असतील.

गूगल पिक्सल 3 एक्सएल च्या समोर आलेल्या फोटोज वरून समजले आहे की हा फोन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च होईल जो 1440+ पिक्सल ला सपोर्ट करेल. फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम चा असेल तसेच एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस वर्जन एंडरॉयड 9 पाई सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. गूगल पिक्सल 3 एक्सएल च्या नॉच मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा सेंसर किंवा 3डी फेस रेक्ग्नेशन सेंसर असू शकतो.

समोर आलेल्या फोन च्या फोटो मध्ये फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटन थोडा वर आहे तर वाल्यूम रॉकर पावर बटन च्या खाली आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पिक्सल 3एक्सएल च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला गूगलचा लोगो आहे. तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी आहे. ​गूगल पिक्सल 3 आणि पिक्सल 3एक्सएल संबधित इतर सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here