Honor 9X येत आहे भारतात, फोन मध्ये असेल 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 48एमपी रियर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा

91मोबाईल्सने चीन मध्ये ऑनर कंपनीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगितले होते कि हि टेक कंपनी भारतात आपल्या ‘एक्स सीरीज’ चा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि या अंतर्गत ब्रँडचा नवीन स्मार्टफोन Honor 9X लॉन्च केला जाईल. आज ऑनर इंडियाने पण आमच्या बातमीवर शिकामोर्तब करत अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनी लवकरच भारतात Honor 9X स्मार्टफोन सादर करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून ऑनर 9एक्स च्या लॉन्चची माहिती दिली आहे.

Honor ने ट्वीटर वर टीज करायला सुरवात केली आहे कि कंपनी भारतात आपल्या ‘एक्स सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन आणणार आहे. कंपनीने या स्मार्टफोन आणि याची लॉन्च डेट सांगितली नाही पण असे सांगितले आहे कि लवकरच हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात येईल. Honor हा आगामी स्मार्टफोन हॅशटॅग ItsMyX सह ट्वीट करत आहे. विशेष म्हणजे ऑनर आपल्या एक्स सीरीज अंतर्गत Honor 9X सह Honor 9X Pro पण लॉन्च करू शकते आणि हे फोन्स या महिन्याच्या शेवटपर्यंत भारतीय बाजारात येऊ शकतात.

असा असेल लुक

चीनी मार्केट मध्ये Honor 9X आणि Honor 9X Pro आधीच लॉन्च झाले आहेत. हे दोन्ही मॉडेल बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले वर सादर केले गेले आहेत जे पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करते आहेत. दोन्ही मॉडेल ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात जो बॅक पॅनल वर डावीकडे देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल से फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नाही पण खालच्या बाजूला Honor की ब्रँडिंग आहे. सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या उजव्या साईड पॅनल वर देण्यात आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Honor 9X सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. हे स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केले गेले आहेत जे 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतात. सोबत ग्राफिक्स साठी Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X आणि Honor 9X Pro च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मॉडेल्स मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या दोन्ही सेंसर्स सोबत Honor 9X Pro 8-मेगापिक्सलच्या वाइड एंगल लेंसला पण सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या दोन्ही मॉडेल्स मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.

Honor 9X आणि Honor 9X Pro डुअल सिम फोन आहेत जे 4जी एलटीई ला सपोर्ट करतात. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी Honor 9X सीरीजचे दोन्ही मॉडेल्स साईट माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात तसेच दोन्ही फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. आशा आहे कि भारतात पण हे फोन्स याच स्पेसिफिकेशन्स सह येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here