Honor कंपनी उद्या म्हणजे 14 जानेवारीला भारतात आपल्या ‘एक्स सीरीज’ अंतर्गत नवीन स्मार्टफोन Honor 9X लॉन्च करणार आहे. ऑनरचा हा नवीन स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण लिस्ट केला गेला आहे ज्यावरून समजते कि Honor 9X ची विक्री फ्लिपकार्ट वरच होईल. Honor बऱ्याच दिवसानंतर एखादा डिवाईस भारतात घेऊन येत आहे. त्यामुळे ऑनर फॅन्स या नवीन स्मार्टफोनची वाट बघत आहेत. जर तुम्ही पण ऑनर 9एक्स स्मार्टफोनसाठी उत्सुक असाल तर पुढे आम्ही फक्त या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही तर सोबतच घर बसल्या Honor 9X चा लॉन्च ईवेंट आपल्या फोनवर लाईव कसा बघू शकता हे देखील सांगितले आहे.
Honor 9X चा लॉन्च ईवेंट कंपनीने राजधानी दिल्ली मध्ये आयोजित केला आहे जो उद्या 14 जानेवारीला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. आपल्या फॅन्ससाठी कंपनीने हा ईवेंट इंटरनेट वर लाईव दाखवण्याची तयारी केली आहे. Honor च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि ट्वीटर सोबतच ऑनर 9एक्स लॉन्च यू-ट्यूब वर लाईव बघता येईल. त्याचबरोबर कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण लॉन्च ईवेंट लाईव बघता येईल.
#UpForXtra brilliant smartphone? Then the wait is almost over. Experience the Xtra power, performance and pop-up camera of the #HONOR9X tomorrow!
Launching on 14th January on @Flipkart
Know more: https://t.co/FIjCuQPmW0 pic.twitter.com/mUKoTScQOC— Honor India (@HiHonorIndia) January 13, 2020
असे असतील स्पेसिफिकेशन्स
Honor 9X सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. हे स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केले गेले आहेत जे 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतात. सोबत ग्राफिक्स साठी Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X आणि Honor 9X Pro च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मॉडेल्स मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या दोन्ही सेंसर्स सोबत Honor 9X Pro 8-मेगापिक्सलच्या वाइड एंगल लेंसला पण सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या दोन्ही मॉडेल्स मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.
Honor 9X आणि Honor 9X Pro डुअल सिम फोन आहेत जे 4जी एलटीई ला सपोर्ट करतात. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी Honor 9X सीरीजचे दोन्ही मॉडेल्स साईट माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात तसेच दोन्ही फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ऑनर इंडियाने हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह दाखवला आहे पण आशा आहे कि हा फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात येईल.