256जीबी मेमरी आणि पॉपअप कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor 9X Pro

हुआवई ब्रँड Honor ने बार्सिलोना मध्ये झालेल्या एका इवेंट मध्ये आपले दोन नवीन फोन लॉन्च केले आहेत. कंपनीने Honor 9X Pro आणि Honor View 30 सादर केले आहेत. 9एक्स प्रो अलीकडेच लॉन्च झालेल्या Honor 9X चा ऍडव्हान्स वर्जन आहे. हा फोन मोठ्या स्क्रीन आणि जास्त मेमरी सह सादर केला गेला आहे. कंपनीने यात 256जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी खूप चांगली म्हणता येईल. त्याचबरोबर ऑनरने हा हुआवईच्या नवीन चिपसेटने सुसज्ज केला आहे अर्थात हा आधीपेक्षा जास्त फास्ट आणि स्मार्ट झाला आहे पण सेल्फी स्टाइल तीच पॉपअप ठेवण्यात आली आहे.

Honor 9X Pro चे स्पेसिफिकेशन

डिजाइन आणि डिस्प्ले: ऑनर 9एक्स प्रो च्या डिजाइन मध्ये यावेळी तुम्हाला थोडा बदल दिसेल. कंपनीने यात रियर माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर दिला नाही तर साइड माउंट फिंगरप्रंट स्कॅनर मिळेल. फोनची बॉडी ग्लास फिनिश मध्ये आहे आणि बाजूला रियर कॅमेरा प्लेसमेंट आहे. राहिला प्रश्न डिस्प्लेचा तर कंपनीने यात 6.59 इंचाचा फुलव्यू डिस्प्ले आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2340 x 1080 पिक्सल आहे आणि याचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 92 टक्के आहे. कंपनीने आईपीएस—एलसीडी डिस्प्लेचा वापर केला आहे.

हार्डवेयर: हा फोन हुआवईच्या नवीन कीरीन 810 चिपसेट वर चालतो आणि यात 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेला प्रोसेसर आहे ज्याचा क्लॉक स्पीड 2.2 गीगाहट्र्ज आहे आणि हा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर 6GB चा रॅम आहे. सोबत 256GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मध्ये एक्सपांडेबल मेमरी सपोर्ट आहे आणि तुम्ही 512जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करू शकता.

कॅमेरा: Honor 9X Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि याचा मेन कॅमेरा 48MP चा आहे. कंपनीने सीमॉस सेंसरचा वापर केला आहे आणि हा F/1.8 अपर्चर सह येतो. तसेच यात एआईएस सुपर नाइट मोड आणि एआई वीडियो स्टेबलाइजेशन देण्यात आले आहे. याचा दुसरा सेंसर 8MP चा आहे आणि यात सुपर वाइड अँगल सपोर्ट आहे. एफ/2.4 अपर्चर सह या फोन मध्ये तुम्हाला 120डिग्री अल्ट्रावाइड अँगल आहे. तसेच तीसरा सेंसर 2MP चा आहे आणि हा पण एफ/2.4 अपर्चर सह येतो. हा डेफ्थ सेंसर आहे जो बोके इफेक्ट देतो.

सेल्फीसाठी या फोन मध्ये 16MP चा पॉपअप कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 एपर्चर सह येतो. कंपनीने यात 3डी पोर्टेट लाइटिंग चा वापर केला आहे.

बॅटरी: पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने टाइप—सी पोर्टचा वापर केला आहे.

हा फोन सध्या ग्लोबली लॉन्च केला गेला आहे पण आशा आहे कि काही दिवसांतच हा भारतात पण उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here