Aadhaar Card हरवल्यावर किंवा खराब झाल्यावर चिंता करण्याचे कारण नाही, आधार कार्डची नवी कॉपी अश्याप्रकारे मिळवा मोफत

Aadhaar Card भारतीयांची ओळख आहे. अनेक ओळखपत्रांमध्ये आधार कार्डला प्राधान्य दिले जाते. सर्व सरकारी व इतर संस्थांमध्ये तसेच शाळा, हॉस्पिटल, बॅंक व फाइनेंस सर्विसेज मध्ये ओळखपत्र म्हणून आधार कार्ड मागितले जाते. आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून अनेकदा असे ऐकायला मिळते कि त्यांचे आधार कार्ड हरवले आहे किंवा फाटून खराब झाले आहे. त्यामुळे जेव्हा कुठे आधार कार्डची फोटोकॉपी मागितली जाते तेव्हा त्यांना अडचण येते.

आधार कार्ड खराब झाल्यावर आपल्याला त्याचा कुठेही वापर करता येत नाही आणि पुन्हा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी चकरा माराव्या लागतात. पण आज आम्ही तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहोत जिचा वापर करून केल्यास तुम्हाला तुमचा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कुठेही जावे लागणार नाही आणि पैसे पण खर्च करावे लागणार नाहीत. फक्त ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डची नवीन कॉपी म्हणजे इलेक्ट्रॉनिक आधार काढता येतो आणि तो कुठेही आधार कार्ड कॉपीच्या जागी वापरता येतो. आधार कार्ड खराब झाला, हरवला किंवा फाटला तर हि कॉपी प्रत्येक ठिकाणी वापरता येते.

1. सर्वप्रथम आधार कार्डची ऑफिशियल वेबसाइट ओपन करा : uidai.gov.in

2. इथे होम पेजवरच ‘My Aadhaar’ चा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.

3. ‘माय आधार’ सेक्शन मध्ये अनेक पॉईंट्स दिसतील, यातील एक ‘डाउनलोड आधार’ ऑप्शन निवडा आणि क्लिक करा.

4. ‘डाउनलोड आधार’ वर क्लिक करताच नवीन टॅब ओपन होईल, जिथे आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी म्हणजे डिजीटल आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी विचारले जाईल.

5. इथे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तीन ऑप्शन असतील, त्यात Aadhar Number, Enrolment ID (EID) आणि Virtual ID (VID) चा समावेश आहे.

हे देखील वाचा : Jio, Airtel, Vi आणि BSNL नंबरवर DND ऍक्टिव्हेट करण्याची सर्वात सोप्पी पद्धत, काही सेकंदात मिळवा स्पॅम कॉल्सपासून मुक्तता

6. तुमच्याकडे जो रेकॉर्ड उपलब्ध आहे तो निवडा आणि तुमचा पसर्नल आयडी सबमिट करा.

7. नंबर टाकल्यानंतर ‘सेंड ओटीपी’ च्या ऑप्शनवर क्लिक करा, तुमच्या आधार कार्डसह जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर वन टाईम पासवर्ड येईल, तो सबमिट करा.

8. वेबसाइटवर देण्यात आलेला सर्वे पूर्ण करा, नंतर आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल.

9. ‘वेरीफाय अँड डाउनलोड’ वर क्लिक करा, आधार कार्ड पीडीएफ फॉरमेट मध्ये डाउनलोड होईल.

हे देखील वाचा : Realme ने लॉन्च केले दोन पावरफुल 5G स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro, 19,999 रुपये आहे किंमत

10. आधार कार्डची हि कॉपी पासवर्ड प्रोटेक्टेड असेल, त्यामुळे जेव्हा तुम्ही हि तुमच्या फोन किंवा लॅपटॉप इत्यादी मध्ये ओपन कराल तेव्हा तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here