लॉन्च झाला 6.9-इंच डिस्प्ले आणि 5,810एमएएच बॅटरी असलेला लेनोवो वी7, स्मार्टफोन आणि टॅबलेट दोन्हींचे करेल काम

मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 च्या मंचावरून सॅमसंग आणि हुआवई सारख्या टेक कंपन्यांनी फोल्डेबल फोन सादर करून टेक प्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याचप्रमाणे आपल्या फॅन्सना खुश करत टेक कंपनी लेनोवो ने पण असा एक अनोखा डिवाईस सादर केला आहे जो स्मार्टफोन आणि टॅबलेट दोन्ही प्रकारे वापरला जाऊ शकतो. लेनोवोने टॅब वी7 लॉन्च केला आहे जो डिस्प्लेच्या बाबतीत फोल्डेबल फोन सारखा आहे आणि किंमतीच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा स्वस्त आहे.

लेनोवो वी7 ची डिजाईन
लेनोवो ने आपला हा डिवाईस 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले वर सादर केला आहे. लेनोवो वी7 च्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटण देण्यात आलेले नाही. यात सेल्फी कॅमेरा डिस्प्लेच्या वरील बेजल वर आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगर​प्रिंट सेंसर आहे.

लेनोवो वी7 स्पेसिफिकेशन्स
लेनोवो वी7 मध्ये 1080 x 2160 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.9-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनच्या मोठ्या स्क्रीन मुळे हा टॅबलेट प्रमाणे वापरता येतो. कपंनी ने हा फोन एंडरॉयड पाई वर सादर केला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो.

कंपनीने वी7 दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लेनोवो वी7 च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

लेनोवोच्या या फोनची दुसरी मोठी खासियत फोनची बॅटरी आहे. कंपनी ने वी7 5,810एमएएच च्या दमदार बॅटरी सह सादर केला आहे. चार्जिंग साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-पोर्ट पण आहे. डुअल सिम आणि 4जी एलटीई सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर​ देण्यात आला आहे तसेच लेनोवो वी7 ​फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. लेनोवो वी7 250 यूएस डॉलरच्या बेस किंमतीती लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसी अनुसार 17,000 रुपयांच्या आसपास आहे. अशा आहे कि लेनोवो लवकरच भारतात पण वी7 आणेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here