Motorola ने लॉन्च केला स्वस्त फोन Moto E6 Play

Motorola ने काल अंर्तराष्ट्रीय मंचावरून एक साथ तीन नवीन स्मार्टफोन अनाउंस केले आहेत. कंपनीने ‘मोटो जी’ सीरीज मध्ये Moto G8 Plus आणि Moto G8 Play लॉन्च केले तर मोटोरोलाने ‘ई सीरीज’ मध्ये पण एक स्वस्त स्मार्टफोन Moto E6 Play आणला आहे. Moto G8 Plus 13,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात पण उपलब्ध होईल तर Moto G8 Play आणि Moto E6 Play सध्या इंडियन मार्केट मध्ये येणार नाहीत. Moto G8 Plus च्या संपूर्ण माहितीसाठी इथे क्लिक करा. मोटोरोलाच्या स्वस्त डिवाईस Moto E6 Play मध्ये काय खास असेल हि माहिती आम्ही खाली दिली आहे.

Moto E6 Play

Moto E6 Play कंपनी द्वारा नॉच तसेच बेजल लेस डिस्प्लेपासून वेगळ्या आणि जुन्या डिजाईन वर सादर केला गेला आहे. हा फोन 16:9 आस्पेक्ट रेशियो सह आला आहे जो 1520 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Motorola ने आपला नवीन फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो. विशेष म्हणजे Moto E6 Play पण या चिपसेट वर लॉन्च झाला आहे.

कंपनीने Moto E6 Play 2 जीबी रॅम सह आणला आहे. हा फोन 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto E6 Play सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चरचा 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Moto E6 Play मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto E6 Play डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. कंपनीने या फोन मध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर दिला नाही पण फेस अनलॉक फीचर द्वारे Moto E6 Play अनलॉक केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Moto E6 Play मध्ये 5वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Moto E6 Play ची किंमत इंडियन करंसीनुसार 8,500 रुपयांच्या आसपास आहे.

Moto G8 Play

Moto G8 Play मध्ये 6.2-इंचाची HD+ (720 x 1,520) नॉच स्क्रीन देण्यात आली आहे. डिवाइस मध्ये 2GHz ऑक्टा-कोर Helio P70 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 2GB रॅम आणि 32GB की इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. फोन मध्ये 13-मेगापिक्सल f/2.0 मेन सेंसर सह दोन 2-मेगापिक्सल शूटर 117-डिग्री वाइड अँगल आणि डेप्थ सेंसिंग साठी आहेत. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Moto G8 Play मध्ये 8-मेगापिक्सलचा सेंसर आहे. त्याचबरोबर Moto G8 Play मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत BRL 1,099 (जवळपास 19,420 रुपये) आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here