Nokia 8.2 पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लवकरच होईल लॉन्च, Nokia 5.2 पण आला समोर

Nokia ने अलीकडेच भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Nokia 7.2 लॉन्च केला होता. हा फोन 18,599 रुपयांच्या बेस किंमतीत देशात सेल साठी उपलब्ध आहे. तसेच आता बातमी येत आहे कि कंपनी अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत अजून दोन नवीन स्मार्टफोन आणण्याची योजना बनवत आहे. नोकियाच्या या आगामी स्मार्टफोन्सची नावे Nokia 8.2 आणि Nokia 5.2 असल्याचे संगणयत आले आहे. Nokia हे स्मार्टफोन्स वर्षाच्या शेवटी बाजारात आणू शकते.

Nokia संबंधित हि बातमी नोकियामोब नावाच्या विदेशी वेबसाइटने दिली आहे. वेबसाइट रिपोर्टनुसार नोकियाचे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल साल 2019 च्या शेवटी Nokia 8.2 स्मार्टफोन टेक मंचावर सादर करेल. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Nokia 8.2 ‘यूनिक’ फ्रंट कॅमेरा डिजाईन सह येईल. हा यूनिक शब्द पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याशी जोडला जात आहे जो Nokia 8.2 मध्ये दिला जाऊ शकतो.

Nokia 8.2 बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या चिपसेट सह येईल. टेक जगात चर्चा आहे कि Nokia 8.2 स्नॅपड्रॅगॉन 735 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे Nokia ने अजूनतरी आपला कोणताही एंडरॉयड फोन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला नाही. त्यामुळे Nokia 8.2 ब्रँडच पहिला स्मार्टफोन असेल जो या टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. Nokia 5.2 बद्दल सांगण्यात आले आहे कि कंपनी हा स्मार्टफोन पण लवकरच बाजारात आणेल. Nokia 5.2 नॉच डिजाईन सह येईल.

Nokia 7.2

नोकिया 7.2 मध्ये 6.3-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर10 सपोर्ट सह आला आहे. तसेच स्क्रीन वर गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर आहे. फोन मध्ये 4 जीबी/ 6 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. यात 512 जीबी पर्यंत माइक्रोएसडी कार्ड साठी सपोर्ट आहे एचएमडी ग्लोबल ने या फोन मध्ये पण तीन रियर कॅमेरा दिले आहेत. नोकिया 7.2 मध्ये एफ/ 1.79 अपर्चर वाला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 8 .मेगापिक्सलचा वाइड-एंगल शूटर आहे. हँडसेट मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन मध्ये कनेक्टिविटी फीचर म्हणून वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि 4जी एलटीई चा समावेश आहे. Nokia 7.2 च्या 4GB/64GB वेरीएंटची किंमत 18,599 रुपये आणि 6GB/64GB वेरीएंटची किंमत 19,599 रुपये आहे. हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here