लॉन्चच्या आधीच समोर आली OPPO Reno 3 Pro च्या कॅमेऱ्याची माहिती, फोन मध्ये असेल 2 सेल्फी आणि 4 रियर कॅमेरा

OPPO कंपनी येत्या 2 मार्चला भारतात आपल्या ‘रेनो सीरीज’ चा विस्तार करत नवीन स्मार्टफोन OPPO Reno 3 Pro लॉन्च करेल. शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर रेनो 3 प्रो चे प्रोडक्ट पेज पण बनवण्यात आले आहे जिथे फोनच्या फोटो सोबत अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सचा खुलासा करण्यात आला आहे. OPPO Reno 3 Pro कंपनीचा हाईएंड फोन असले जो पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येईल. फ्लिपकार्ट सोबत कंपनीने आपल्या अधीकृत वेबसाइट वर पण ओपो रेनो 3 प्रो लिस्ट केला आहे जिथे फोनचा लुक, डिजाईन व प्रोसेसर इत्यादि माहिती शेयर करण्यात आली आहे. तर आता लॉन्चच्या आधी ओपो ने OPPO Reno 3 Pro च्या कॅमेऱ्याची माहिती पण ऑफिशियल केली आहे.

कॅमेऱ्याची कमाल

OPPO Reno 3 Pro कंपनीने 6 कॅमेरा सेंसर्स सह लॉन्च केला जाईल. या फोनच्या फ्रंट पॅनल वर 2 सेल्फी कॅमेरा असतील तर बॅक पॅनल वर 4 रियर कॅमेरा सेंसर दिले जातील. फ्रंट कॅमेऱ्याबद्दल बोलायचे तर ओपोच्या या फोन मध्ये 44 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर हा फोन 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसरला सपोर्ट करेल जो एक डेफ्थ सेंसर असेल. Reno 3 Pro चा सेल्फी कॅमेरा अल्ट्रा नाईट मोड सह येईल.

ओपो रेनो 3 प्रो च्या रियर कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल. तसेच फोन मध्ये 13 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या मोनो लेंस सपोर्ट असेल. OPPO Reno 3 Pro च्या रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये दिला जाईल. ज्यात एलईडी लाईट असेल.

लुक व डिजाईन

OPPO Reno 3 Pro च्या लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च होईल. हा फोन बेजल लेस डिजाईन वर बनलेला असेल ज्याच्या तीन कडा पूर्णपणे बॉडी पार्टशी जोडलेल्या असतील तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट दिला जाईल. फोन डिस्प्लेच्या डावीकडे दोन होल असतील आणि यात फोनचे दोन सेल्फी कॅमेरा असतील. फोनच्या रियर पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये कॅमेरा सेंसरची माहिती पण लिहिण्यात आली आहे. रेनो 3 प्रो च्या बॅक पॅनल वर खालच्या बाजूला OPPO ची ब्रँडिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर सोबत पावर बटण देण्यात आला आहे. तसेच OPPO Reno 3 Pro च्या खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आहे ज्याच्या उजवीकडे स्पीकर आणि डावीकडे 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 3 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता फोनच्या फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये हा फोन डुअल पंच-होल म्हणजे दोन सेल्फी कॅमेऱ्यांना सपोर्ट करेल. फोनच्या फ्रंट पॅनल वर प्राइमरी सेल्फी कॅमेरा सेंसर 44 मेगापिक्सलचा दिला जाईल तर दुसरा सेल्फी कॅमेरा सेंसर 2 मेगापिक्सलचा असेल. ओपो नुसार रेनो 3 प्रो चा फ्रंट कॅमेरा Binocular Bokeh Effect सह येईल जो शार्प सेल्फी कॅप्चर करेल. तसेच या फोन मध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला 6.5 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

OPPO Reno 3 Pro भारतात 8 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल ज्या सोबत फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. ओपो हा फोन एकापेक्षा जास्त रॅम व स्टोरेज वेरिएंट्स मध्ये आणू शकते याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. Reno 3 Pro चीन मध्ये एंडरॉयड 10 आधारित कलर ओएस 7 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.4 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो. भारतात पण याच चिपसेटची अपेक्षा आहे.

ओपो रेनो 3 प्रो डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच ओपो ने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन 30W VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. आशा आहे कि या फोन मध्ये 4000एमएएच पेक्षा मोठी बॅटरी मिळेल. किंमत पाहता आशा आहे कि OPPO Reno 3 Pro ची बेस किंमत भारतात 32,000 रुपयांच्या आसपास असेल. कंपनीने स्पष्ट केले आहे कि भारतात हा फोन Aurora Blue, Midnight Black आणि Sky White कलर मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here