OPPO Reno 3 Pro चा ग्लोबल वेरिएंट भारतात होईल सर्वात आधी लॉन्च, लाइव इमेज आली समोर

OPPO Reno 3 Pro आणि Reno 3 गेल्या वर्षी कंपनीने डिसेंबर मध्ये लॉन्च केला होता. तसेच 91मोबाईल्सने एक्सक्लूसिव रिपोर्ट दिला होता कि कंपनी या डिवाइसचा प्रो वेरिएंट 44MP डुअल सेल्फी कॅमेरा सह फेब्रुवारी मध्ये भारतात सादर करेल. आता टिप्सटर Ishan Agarwal ने दावा केला आहे कि कंपनी Reno 3 Pro चा ग्लोबल लॉन्च भारतात करेल.

या फोनची लाइव इमेज पण शेयर करण्यात आली आहे. फोन यूनिक ग्रेडिएंट फिनिश आणि कर्व्ड ऐज सह दाखवण्यात आला आहे. फोन चाइनीज वेरिएंट पेक्षा थोडा वेगळा आहे जो गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये लॉन्च केला गेला होता. पण OPPO Reno 3 Pro चा जो फोटो शेयर करण्यात आला आहे तो अर्धा आहे. आशा आहे कि फोनचे स्पेसिफिकेशन्स जवळपास चाइनीज वेरिएंट सारखे असतील.

OPPO Reno 3 Pro

रेनो 3 प्रो बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन पंच-होल डिजाईन सह लॉन्च केला गेला आहे. या फोन मध्ये फुलव्यू बेजल लेस कर्व्ड स्क्रीन देण्यात आली आहे जी उजव्या आणि डाव्याबाजूने बॅक पॅनलकडे वळली आहे. तसेच पंच-होल डिस्प्लेच्या डावीकडे वर आहे. Oppo Reno 3 Pro चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 92:1 आहे तसेच हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येते.

Oppo Reno 3 Pro चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन एंडरॉयड 10 आधारित कलर ओएस 7 वर लॉन्च झाला आहे जो 2.4 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो. फोटाग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

त्याचबरोबर रियर कॅमेरा सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक एंड व्हाईट सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Oppo Reno 3 Pro 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी या स्मार्टफोन मध्ये VOOC 4.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,025 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here