17 ऑक्टोबरला भारतात येत आहे पावरफुल फीचर्स आणि कमी किंमत असलेला Pixel 4a

गूगलने नवीन पिक्सल 5 आणि पिक्सल 4ए 5 जी लॉन्च केले आहेत. पण हे फोन्स भारतात येणार नाहीत. त्याऐवजी गूगल भारतात गूगल पिक्सल 4ए लॉन्च करेल, त्यासाठी कंपनीने पूर्णपणे तयारी केली आहे. कंपनीने लॉन्च डेटची पण माहिती दिली आहे. Google Pixel 4a भारतात 17 ऑक्टोबरला लॉन्च होईल आणि ग्राहकांसाठी हा फोन फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी सादर केला जाईल. लॉन्च डेटच्या आधी फ्लिपकार्ट वर फोनची एक माइक्रोसाइट बनली होती, ज्यात पिक्सल 4ए ची लॉन्च डेट समजली नव्हती.

किंमत सोडता फोन संबंधित जवळपास सर्व माहिती समोर आली आहे कारण कंपनीने ऑगस्ट मध्ये हा फोन ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केला होता. तसेच स्मार्टफोन्स यूजर्सची प्रतीक्षा कमी करत गूगलने आपल्या पिक्सल 5 आणि गूगल पिक्सल 4ए 5 जी फोनची पण घोषणा या इवेंट मध्ये केली होती.

Google Pixel 4a

गूगल पिक्सल 4ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.81 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वर डावीकडे पंच-होल आहे. Google Pixel 4a मध्ये आलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडीआर आणि 443पीपीआई ला सपोर्ट करतो.

Google Pixel 4a एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो. कंपनीने हा फोन 6 जीबी जीबी रॅम सह बाजारात आणला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन प्रीलोडेड गूगल असिस्टेंट सह येतो ज्या सोबत लाईव कॅप्शन सपोर्ट आणि रियल टाईम ट्रांसस्क्रीप्ट सारखे फीचर्स पण गूगल पिक्सल 4ए मध्ये देण्यात आले आहेत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Google Pixel 4a चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलच्या वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो एचडीआर+, पोर्टरेट मोड, नाईट साईट, ओआईएस आणि वीडियो स्टेबलाइजेशन सारख्या फीचर्स सह येतो. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Google Pixel 4a 4जी वोएलटीई सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहे ज्या सोबत फोन मध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 3,140एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. गूगल पिक्सल 4ए जेट ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here