6,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाले Realme C12 आणि Realme C15, किंमत फक्त 8,999 रुपयांपासून सुरु

Realme ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन ‘रियलमी सी’ सीरीज मध्ये सादर केला गेले आहेत ज्यांनी Realme C12 आणि Realme C15 नावांसह भारतीय बाजारात पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही फोन लो बजेट सेग्मेंट मध्ये आणले आहेत जे येत्या 24 ऑगस्ट पासून भारतीय बाजारात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होतील.

6,000एमएएच बॅटरी

Realme C12 आणि Realme C15 स्मार्टफोनची सर्वात मोठी यूएसपी फोन मधील पावरफुल बॅटरी आहे. हे दोन्ही फोन 6,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतात. रियलमी सी12 कंपनीने 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह लॉन्च केला आहे तर रियलमी सी15 स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हे दोन्ही स्मार्टफोन रिवर्स चार्जिंग फीचरसह येतात.

Realme C12

रियलमी सी12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी मिनिड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे तर डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Realme C12 एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो रियलमी यूआई सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन जीई8320 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी रियलमी सी12 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme C15

रियलमी सी15 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 10 वर सादर झाला आहे जो रियलमी वन यूआई वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Realme C15 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि एक ब्लॅक एंड वाइट सेंसर आहे. त्यासोबत सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme C12 आणि Realme C15 दोन्ही डुअल सिम फोन आहेत जे 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतात. वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी दोन्ही फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हे डिवाईस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतात.

वेरिएंट्स व किंमत

Realme C15 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे ज्याचा 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. तसेच Realme C12 भारतात 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेजच्या सिंगल वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. रियलमी सी15 येत्या 27 ऑगस्ट तर रियलमी सी12 24 ऑगस्ट पासून विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here