रियलमी घेऊन येत आहे भारतातील पहिला मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट असलेला फोन, लुक असेल शानदार आणि स्पेसिफिकेशन्स असतील दमदार

रियलमी ब्रांड ने भारतात थोड्याच वेळात चांगली फॅन फॉलोविंग बनवली आहे. रियलमी ने काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेले रियलमी 2 आणि रियलमी 2 प्रो इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये हिट झाले आहेत. कमी किंमतीत दमदार स्पेसिफिकेशन्स देणारी हि कंपनी आता लवकरच असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे जो मीडियाटेकच्या लेटेस्ट चिपसेट हेलीयो पी70 वर चालेल. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन भारतातील पहिला असा स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर लॉन्च होईल.

राजधानी मध्ये चालू असलेल्या आईएमसी 2018 ईवेंटच्या मंचावरून रियलमी ने या नवीन स्मार्टफोनची घोषणा केली आहे. रियलमी ने आपल्या आगामी स्मार्टफोनचे नाव आणि याच्या अन्य स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण कंपनीने सांगितले कि काही आठवड्यांत कंपनी असा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे जो मीडियाटेक हेलीयो पी70 वर चालेल. विशेष म्हणजे या चिपसेट वर चालणारा कोणताही स्मार्टफोन सध्या देशात उपलब्द नाही आणि रियलमीच्या या फोनला भारतातील पहिला मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वाला स्मार्टफोन होण्याचा मान मिळेल. कंपनी हा फोन मीड रेंज मध्ये लॉन्च करेल.

रियलमी ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात रियलमी 2 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो कंपनीच्या रियलमी 2 चा अपग्रेडड वर्जन आहे. हा फोन 4जीबी रॅम, 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम सह 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. रियलमी 2 प्रो चा 4जीबी /64जीबी वेरिएंट 13,990 रुपये, 6जीबी/64जीबी वेरिएंट 15,990 रुपये तसेच 8जीबी/128जीबी वेरिएंट 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रियलमी 2 प्रो सोबतच कंपनीने रियलमी सी1 स्मार्टफोन पण लॉन्च केला होता जो 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

रियलमी सी1 नॉच डिस्प्ले सह येतो तर रियलमी 2 प्रो कंपनीने ‘वी’ शेप वाल्या नॉच सह सादर केला आहे. या डिस्प्लेला कंपनी ने ‘ड्यू ड्रॉप डिस्प्ले’ चे नाव दिले आहे. रियलमी 2 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो तर रियलमी सी1 क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर लॉन्च करण्यात आला आहे. रियलमी कंपनी बऱ्याच काळानंतर मीडियाटेक चिपसेट वर आधारित एखादा फोन घेऊन येणार आहे आणि याच फोनच्या माध्यमातून मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये येईल.

रियलमीचा हा आगामी फोन कधी देशात लॉन्च केला जाईल तसेच या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स काय असेल याची माहिती लवकरच तुम्हाला देण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here