Redmi K20 कि Realme X, जाणून घ्या या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये काय फरक आहे

Xiaomi ने आज भारतीय बाजारात आपला फ्लॅगशिप सेग्मेंट वाढवत Redmi सीरीजचा नवीन डिवाईस Redmi K20 Pro लॉन्च केला आहे. या फोन सोबत Redmi K20 पण आला आहे. Redmi K20 सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लॉन्च झालेले पहिले रेडमी फोन आहेत ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi K20 Pro क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो तर Redmi K20 मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट देण्यात आला आहे. Redmi K20 देशात 21,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीच्या बाबतीत Redmi K20 चे थेट टक्कर Realme द्वारा अलीकडेच लॉन्च केल्या गेलेल्या Realme X स्मार्टफोनशी आहे. त्यामुळे स्मार्टफोन यूजर्सला प्रश्न पडला आहे कि Realme X चांगला आहे कि Redmi K20. पुढे आम्ही दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्सचा तुलनात्मक रिपोर्ट तयार केला आहे ज्यावरून समजते कि कोणत्या स्पेसिफिकेशन्स मध्ये कोणता फोन पुढे गेला आहे.

डिजाईन

Redmi K20 आणि Realme X दोन्ही फोनचा फ्रंट लुक जवळपास एकसारखा आहे. दोन्ही डिवाईस बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले वर बनलेले आहेत ज्यात कोणतेही फिजिकल बटण व नॉच नाही. पॉप-अप कॅमेरा दोन्ही मॉडेल्सची प्रमुख यूएसपी आहे. Redmi K20 मध्ये हा कॅमेरा डावीकडून वर येतो तर Realme X मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा मध्यभागी देण्यात आला आहे. दोन्ही फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी वर बनले आहेत.

Redmi K20 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या मध्यभागी वर्टिकल शेप मध्ये आहे. Realme X च्या पण रियर कॅमेऱ्याची प्लेटमेंट अशीच आहे, पण त्यात दोन कॅमेरा सेंसर मिळतील. Redmi K20 च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर व पावर बटण देण्यात आला आहे आणि डाव्या पॅनल पूर्णपणे बटण लेस आहे. तर Realme X च्या डाव्या पॅनल वर पावर बटण आणि उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे.

डिस्प्ले

Redmi K20 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. तसेच Realme X चा आस्पेक्ट रेशियो आणि स्क्रीन रेज्ल्यूशन सारखाच आहे पण या फोन मध्ये डिस्प्ले साईज थोडी मोठी 6.53-इंचाची मिळेल. स्क्रीन प्रोटेक्शन साठी दोन्ही फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट करण्यात आले आहेत. Redmi K20 चा बॅक पॅनल पण गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे परंतु Realme X च्या बॅक पॅनल वर प्रोटक्शन नाही.

एंडरॉयड व प्रोसेसर

Redmi K20 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे तसेच प्रोसेसिंग साठी फोन मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच Realme X पण एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 7 सीरीजच्या चिपसेट वरच चालतो पण हा चिपसेट 710 एसओसी आहे. ग्राफिक्स साठी Realme X मध्ये एड्रेनो 616 जीपीयू देण्यात आला आहे तर Redmi K20 एड्रेनो 640 जीपीयू ला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: फोल्डेबल फोन नंतर सॅमसंग घेऊन येत आहे खास फोन, खेचल्यावर मोठी होईल स्क्रीन

कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi K20 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोन मध्ये एफ/2.4 अर्पचर वाला 13-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि त्याच अपर्चरची 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

दुसरीकडे Realme X डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी Realme X एफ/2.0 अपर्चर वाल्या 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: Exclusive: ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह 15 ऑगस्टला लॉन्च होईल Vivo S1, 17,990 रुपयांपासून होईल किंमत सुरु

बॅटरी

पावर बॅकअप साठी Redmi K20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली जी फास्ट चार्जिंग 18W ला सपोर्ट करते. तर दुसरीकडे रियलमीचा Realme X VOOC फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेल्या 3,765एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

वेरिएंट्स व किंमत

Redmi K20 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये आला आहे. तसेच फोनच्या 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 22 जुलै पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

Realme X दोन वेरिएंट्स मध्ये भारतात लॉन्च केला गेला आहे. यात 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज 16,999 रुपयांमध्ये तर 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये येत्या वाली 24 जुलै पासून विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here