सॅमसंग घेऊन येत आहे 64-मेगापिक्सल वाला स्मार्टफोन, शाओमीला मिळेल टक्कर

सध्या स्मार्टफोन इंडस्ट्री मध्ये वाढते कॉम्पिटिशन पाहता कंपन्या ग्राहकांना जास्तीत जास्त चांगले फीचर फोन मध्ये देण्याचे प्रयत्न करत आहेत. सर्वात जास्त जे फीचर ग्राहकांना आकर्षीत करतो तो आहे फोनचा कॅमेरा. कॅमेऱ्याच्या बाबतीत आता पर्यंत सोनीचा 48-मेगापिक्सल आईएमएक्स586 सेंसर सर्वात दमदार मानला जात होता. पण आता याला टक्कर देण्यासाठी सॅमसंग पुढे आली आहे.

सॅमसंग ने स्मार्टफोन्स साठी 64-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर सादर केला आहे. हा सेंसर नॉर्मल कंडीशन मध्ये 64-मेगापिक्सल आणि कमी प्रकाशात 16-मेगापिक्सलचे फोटो क्लिक करेल. चांगल्या फोटोग्राफी साठी सॅमसंगचा 64MP ISOCELL Bright GW1 सेंसर रेमोजेक ऐल्गोरिदम आणि पिक्सल मर्जिंग टेट्रासेल टेक्नॉलजीचा वापर करेल. सोबत कंपनी ने यात 100dB पर्यंतचा रियलटाइम HDR सपोर्ट सादर केला आहे.

पण सॅमसंग ने याचा खुलासा केला नाही कि कंपनी हा सेंसर कोणत्या डिवाइस मध्ये सादर करेल. पण समोर आलेले काही रिपोर्ट्स पाहून वाटत आहे कि हा सेंसर गॅलेक्सी एस सीरीज आणि गॅलेक्सी नोट सीरीजच्या आगामी डिवाइस मध्ये दिला जाऊ शकतो.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक सेंसर बिजनसच्या एग्जिक्यूटिव वाइस प्रेसिडेंट यॉन्गिन पार्क ने म्हटले, ‘गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईल फोन कॅमेरा रेकॉर्डिंग आणि महत्वाचे क्षण शेयर आणि कॅप्चर करण्याचे मुख्य साधन बनला आहे. हि नवीन टेक्नोलॉजी यूजर्सना चांगल्या स्मार्टफोन्स फोटोग्राफीचा अनुभव देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here