Samsung ने सादर केला Galaxy A41, फोन मध्ये आहे 4जीबी रॅम, 25एमपी सेल्फी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेरा

Samsung ने यावर्षीच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपली स्मार्टफोन सिरींजी वाढवत Samsung Galaxy A51 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा डिवाईस मार्केट मध्ये आल्यानंतर काही दिवसांनी बातमी आली होती कि सॅमसंग या सीरीजचे अजून दोन नवीन फोन Samsung Galaxy A41 आणि Samsung Galaxy A31 वर पण काम करत आहे. मागे हे फोन वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स साइट्स वर दिसले होते जिथे बरीच माहिती मिळाली होती. आता यातील एक गॅलेक्सी ए41 सॅमसंगने अंर्तराष्ट्रीय बाजारात ऑफिशियल केला आहे.

Samsung Galaxy A41 कंपनीने अधिकृतपणे सादर केला आहे. सॅमसंग जापानच्या वेबसाइट वर या फोनचा प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे. कंपनीने फोनची किंमत सांगितली नाही पण प्रोडक्ट पेज वर सॅमसंग गॅलेक्सी ए41 च्या लुक व डिजाईन सोबतच या फोनचे स्पेसिफिकेशन्स पण ऑफिशियल करण्यात आले आहेत. आशा आहे कि जापान नंतर हा फोन लवकरच भारतीय बाजारात पण येईल.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy A41 च्या लुक बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला आहे. फोनचा डिस्प्ले तिन्ही बाजुंनी नॅरो बेजल्स सह येतो तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 च्या बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर इथे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा सेटअप पॅनलच्या उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे ज्यात सर्वात वर फ्लॅश लाईट आणि त्या खाली तीन सेंसर आहेत. त्याचप्रमाणे फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर व पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A41 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.1 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शनची माहिती समोर आलेली नाही पण फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड असेल. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 एंडरॉयड ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. सॅमसंग हा फोन वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये वेगवेगळ्या चिपसेट सह लॉन्च करू शकते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A41 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चरच्या 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चरच्या 5 मेगापिक्सल डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Samsung Galaxy A41 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए41 जापानच्या वेबसाइट वर एकाच वेरिएंट मध्ये दिसला आहे. हा वेरिएंट 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो त्यासोबत 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. भारतात फोनचे किती वेरिएंट येतील याबाबत सॅमसंगने अजूनही माहिती दिली नाही. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A41 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए41 आईपी रेटिड आहे ज्यामुळे हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. जापान मध्ये हा फोन ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here