64-एमपी चा कॅमेरा असलेल्या Samsung Galaxy A70s सह Galaxy A30s आणि Galaxy A20s पण होतील भारतात लॉन्च

Samsung भारतात जगातील पहिला रोटेटिंग स्लाईडर पॅनल असलेला स्मार्टफोन Galaxy A80 घेऊन येत आहे. हा फोन कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर लिस्ट झाला आहे. सॅमसंगने या फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा केला नाही, पण Galaxy A80 बाजारात येण्याआधी कंपनीचा दुसरा स्मार्टफोन Galaxy A70S ची बातमी इंटरनेट वर वायरल झाली आहे. समोर येत आहे कि सॅमसंग भारतात Galaxy A70s स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि या डिवाईस सोबत कंपनी Galaxy A30s आणि Galaxy A20s पण बाजारात आणेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज संबंधित हि बातमी एमएसपी वेबसाइट ने कवर केली आहे. या टेक वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये सूत्रांच्याआधारावर सांगितले आहे कि Samsung भारतात आपली गॅलेक्सी ए सीरीज अजून मजबूत बनवत तिचा विस्तार कारण्याची योजना बनवत आहे. या योजनेतर्गत कंपनी देशात Galaxy A70s आणि Galaxy A30s व Galaxy A20s स्मार्टफोन लॉन्च करेल. हा स्मार्टफोन्स सध्या बाजारात येणार नाही, पण गॅलेक्सी ए सीरीजच्या या फोनचा इंडिया लॉन्च या वेबसाइटने निश्चित असल्याचे सांगितले आहे.

रिपोर्ट नुसार Samsung Galaxy A70s भारतात तीन कलर वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. यात ब्लॅक, वाईट आणि लेवेंडर कलर असतील. तसेच Samsung Galaxy A30s पण Galaxy A70s सारख्याच कलर वेरिएंट्स मध्ये बाजारात येईल. तसेच गॅलेक्सी सीरीजचे स्वस्त स्मार्टफोन Galaxy A20s Samsung ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएंट्स मध्ये लॉन्च करू शकते. विशेष म्हणजे हे तिन्ही स्मार्टफोन दुसऱ्या सहामाहीत भारतात लॉन्च केले जातील.

Samsung Galaxy A70s
Galaxy A70s स्मार्टफोन पाहता हा 64-मेगापिक्सलची पावर असलेल्या रियर कॅमेरा सेंसर ने सुसज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. गॅलेक्सी ए70एस जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल जो इतकी पावर असलेल्या कॅमेरा सेंसर वर लॉन्च होईल. विशेष म्हणजे Samsung ने अलीकडेच ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन केले होते. या टेक्नॉलॉजीद्वारे कोणताही स्मार्टफोन 64-मेगापिक्सल पर्यंतचे फोटो कॅप्चर करू शकतो. आणि Galaxy A70s या सेंसर सह येऊ शकतो. विशेष म्हणजे हे रेज्ल्यूशन आतापर्यंत जगात लॉन्च झालेल्या कोणत्याही स्मार्टफोन पेक्षा कितीतरी मोठे आहे.

Samsung Galaxy A80
सॅमसंग द्वारा भारतात लॉन्च केला जाणारा Galaxy A80 पाहता हा जगातील पहिला रोटेटिंग स्लाईडर पॅनल वाला स्मार्टफोन आहे जो आता भारतीय बाजारात पण येणार आहे. प्राप्त माहितीनुसार कंपनी येत्या 15 जूनला भारतात Galaxy A सीरीजचा हा स्मार्टफोन लॉन्च करेल. Galaxy A80 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. पहिल्या वेरिएंटची किंमत 39,990 रुपये असेल तर दुसरा वेरिएंट 44,990 रुपयांमध्ये बाजारात येईल. विशेष म्हणजे लॉन्च डेटच्या आधी Samsung देशात पाच शहरांत Galaxy A80 exclusive preview event चे आयोजन पण करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here