Samsung Galaxy M10, M10s आणि M20 भारतात झाले डिस्कंटिन्यू

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने काही दिवसांपूर्वी GST वाढल्यांनंतर आपल्या जवळपास सर्व स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या होत्या. आता बातमी समोर येत आहे कि कंपनीने साल 2019 मध्ये लॉन्च केलेले Galaxy M10 आणि Galaxy M20 बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही फोन ब्रँडच्या बजेट कॅटगरी मध्ये सादर केले गेले होते. या दोन्ही फोन्स सोबत कंपनीने Galaxy M10s पण डिस्कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला आहे.

टेक वेबसाइट mysmartprice च्या बातमीनुसार कंपनीने Galaxy M10, M10s आणि M20 भारतात डिस्कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅमसंगने गॅलेक्सी एम 10, गॅलेक्सी एम 10 आणि गॅलेक्सी एम 20 आपल्या अधिकृत वेबसाइट वरून काढून टाकले आहेत. तसेच हे डिवाइस अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून पण विकत घेण्यासाठी उपलब्ध नाहीत ज्यावरून समजते कि कंपनीने चुपचाप हे डिवाइस बंद केले आहेत.

हे तीनही डिवाइस बंद झाल्यामुळे आता कंपनी कडे सर्वात अफोर्डेबल स्मार्टफोन Galaxy M30 उरला आहे. या डिवाइसच्या 3GB रॅम मॉडेलची किंमत 9,685 रुपये आहे. एम-सीरीज मध्ये सध्या भारतात Galaxy M30s, Galaxy M21, आणि Galaxy M31 उपलब्ध आहेत.

Samsung ने गेल्या महिन्यात एम सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाइस Galaxy M11 सादर केला होता. स्पेसिफिकेशन्स पाहता सॅमसंग गॅलेक्सी एम11 मध्ये 6.4-इंचाचा एलसीडी एचडी+ रिजोल्यूशन पंच होल डिस्प्ले असेल. फोन मधील चिपसेट बद्दल कंपनीने अधिकृत माहिती दिली नाही. पण असे सांगितले आहे कि Galaxy M11 मध्ये ऑक्टा-कोर सीपीयू असेल, ज्याचा क्लॉक स्पीड 1.8GHz असेल. फोन मध्ये 3GB व 4GB रॅम सह 32GB व 64GB ची स्टोरेज आहे. तसेच डिवाइस मध्ये 3 जीबी आणि 4 जीबी रॅम सह 32 जीबी व 64 जीबी स्टोरेजचा ऑप्शन असेल. त्याचबरोबर हँडसेट स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी एम11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये अपर्चर एफ/1.8 सह 13 मेगापिक्सल प्राइमरी, अपर्चर एफ/2.2 सह 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेंसर आणि अपर्चर एफ/2.4 सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असेल. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8MP f/2.0 अपर्चर असलेला कॅमेरा असेल. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम11 मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच स्मार्टफोन अँड्रॉइड 10 बेस्ड वन यूआई 2.0 वर चालेल. इतकेच नव्हे तर या स्मार्टफोन मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक, जीपीएस, ब्लूटूथ आणि फेस अनलॉक सारखे फीचर्स असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here