लॉन्चच्या आधीच समोर आले Samsung Galaxy M40 चे फुल स्पेसिफिकेशन्स, 11 जूनला येईल भारतात

Samsung भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करणार आहे. कपंनी येत्या 11 जूनला भारतात एका ईवेंटचे आयोजन करेल ज्याच्या मंचावरून हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. फोन लॉन्चच्या आधीच सॅमसंग स्मार्टफोन बिजनेस इंडिया हेड असीम वारसी यांनी 91मोबाईल्सला Galaxy M40 च्या कॅमेरा सेग्मेंट व फोन किंमती संबंधित महत्वाची माहिती सांगितली आहे. तसेच आता पुन्हा एकदा एका लीकच्या माध्यमातून Samsung Galaxy M40 चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Galaxy M40 चे स्पेसिफिकेशन्स सॅममोबाईल ने आपल्या रिपोर्ट द्वारे शेयर केले आहेत. Samsung Galaxy M40 बद्दल आधीच सांगण्यात आले आहे कि हा फोन इनफिनिटी ओ डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर असतील तर सेल्फी साठी डिस्प्ले वरील होल मध्ये फ्रंट कॅमेरा दिला जाईल. सॅमसंगच्या अधिकाऱ्यांनी असे पण सांगितले आहे कि Galaxy M40 भारतात 20 हजार ते 25 हजार रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच फोन लॉन्चच्या आधी या वेबसाइट ने फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्सचे डिटेल्स पण इंटरनेट वर सार्वजनिक केले आहेत.

स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M40 बद्दल सॅममोबाईल ने सांगितले आहे कि हा फोन इनफिनिटी-ओ डिस्प्ले वर लॉन्च होईल जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार सॅमसंग द्वारा हा फोन एंडरॉयड 9 पाई आउट-आफ-द-बॉक्स वर सादर केला जाईल तसेच हा क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल. रिपोर्टनुसार Galaxy M40 सॅमसंग द्वारा 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल. सोबतच Galaxy M40 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर तसेच 5-मेगापिक्सलच्या तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो फोन डिस्प्ले वरील होल मध्ये असेल. तुम्हाला सांगू इच्छितो कि सॅमसंगने 32-एमपी रियर आणि 16-एमपी सेल्फी कॅमेऱ्याची माहिती दिली आहे.

Samsung Galaxy M40 संबंधित या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी मिळेल. विशेष म्हणजे सॅमसंगचे अधिकारी असीम वारसी आपल्या विधानात सांगितले होते कि हा फोन 4,000एमएएच पेक्षा जास्त बॅटरीला सपोर्ट करेल. त्यामुळे बॅटरी पावर सोबत सॅममोबाईल द्वारा शेयर करण्यात आलेले स्पेसिफिकेशन्स पण किती खरे मानायचे याविषयी संशय आहे.

त्याचबरोबर Galaxy M40 साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा स्मार्टफोन याच ई-कॉमर्स साइट वर विकला जाईल. फोनची किंमत आणि देशात याच्या उपलब्धतेची निश्चित माहिती येत्या 11 जूनला समजेल. खास बातमी अशी कि गॅलेक्सी एम स्मार्टफोन सीरीज अंतर्गत Samsung आता पर्यंत 2 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत. यात Galaxy M10, Galaxy M20 आणि Galaxy M30 स्मार्टफोनचा समावेश आहे. तसेच येत्या 15 जूनला कंपनी भारतात Samsung Galaxy A80 स्मार्टफोन पण लॉन्च करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here