Mahindra XUV400 EV - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 05:48:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत https://www.91mobiles.com/marathi/tata-nexon-ev-max-price-cut-after-mahindra-xuv400-ev-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/tata-nexon-ev-max-price-cut-after-mahindra-xuv400-ev-launched-in-india/#respond Fri, 20 Jan 2023 07:51:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17080 Tata Motors नं आपल्या इलेक्ट्रिक कार्स Tata Nexon EV Prime आणि Tata Nexon EV MAX च्या किंमतीत कपातीची घोषणा केली आहे. ही घोषणा Mahindra च्या पहिल्या इलेक्ट्रिक कार XUV400 च्या लाँच नंतर दोन दिवसांनी करण्यात आली आहे. महिंद्राच्या ईव्हीमुळे टाटा मोटर्सची चिंता वाढल्याची चर्चा या प्राइस कटमुळे सुरु झाली आहे आणि मार्केटमध्ये ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित […]

The post XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tata Motors नं Tata Nexon EV Prime आणि Nexon EV MAX ची किंमत कमी केली आहे.
  • Nexon EV MAX च्या टॉप व्हेरिएंटची किंमत आता Rs 18.99 lakh (ex-showroom) झाली आहे.
  • Nexon EV MAX मध्ये आता सॉफ्टवेयर अपडेट नंतर 16km ची रेंज जास्त मिळेल.

Tata Motors नं आपल्या इलेक्ट्रिक कार्स Tata Nexon EV Prime आणि Tata Nexon EV MAX च्या किंमतीत कपातीची घोषणा केली आहे. ही घोषणा Mahindra च्या पहिल्या इलेक्ट्रिक कार XUV400 च्या लाँच नंतर दोन दिवसांनी करण्यात आली आहे. महिंद्राच्या ईव्हीमुळे टाटा मोटर्सची चिंता वाढल्याची चर्चा या प्राइस कटमुळे सुरु झाली आहे आणि मार्केटमध्ये ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपनीनं हे पाऊल उचललं आहे. टाटानं आपल्या Tata Nexon MAX XZ+ Lux variant च्या किंमतीत 85,000 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता हिची प्राइस Mahindra XUV400 EL व्हेरिएंट एवढी झाली आहे.

टाटा मोटर्सनी किंमत कमी आणि रेंज वाढवली

Mahindra XUV400 ची किंमत 15.59 lakh (ex-showroom) रुपयांपासून सुरु होते. तर Nexon EV ची प्रारंभिक किंमत Rs 14.49 lakh (ex-showroom) आहे. इतकेच नव्हे तर Tata Motors नं एक नवीन सॉफ्टवेयर अपडेटच्या मदतीनं Tata Nexon MAX ची रेंज 453km केली आहे जी XUV400 च्या 456km रेंजच्या आसपासच आहे. हे देखील वाचा: आणखी एक स्वस्त रेडमी फोन येणार बाजारात; 5,999 रुपयांच्या Redmi A1 च्या आणखी एका व्हर्जनची बातमी आली

Tata Nexon EV ची नवीन किंमत

Mahindra XUV400 च्या तुलनेत Tata Nexon EV Prime चा वेब व्हेरिएंट 1 लाख रुपये स्वस्त झाला आहे. Tata Nexon EV MAX लाइनअपच्या किंमतीत 85,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. किंमतीतील हा बदल भारत सरकारच्या प्रोडक्शन-लिंक्ड-इंसेंटिव्स (पीएलआई) योजनेच्या माध्यमातून झाला आहे जी देशात ईव्ही निर्मितीवर सब्सिडी देते. तसेच किंमतीती कपात Mahindra XUV400 EV SUV च्या किंमतीचा खुलासा झाल्यावर काही दिवसांनी झाला आहे जी Tata Nexon EV ची प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. हे देखील वाचा: बाजारावरील पकड मजबूत करण्यासाठी सॅमसंगची नवी योजना; Samsung Galaxy A24 लाँचसाठी सज्ज

Tata Nexon EV MAX ची रेंज वाढली

Tata Nexon EV MAX मध्ये एक नवीन सॉप्टवेयर अपडेट देण्यात आला आहे. त्यामुळे कारची रेंज 16km नं वाढली आहे. या अपडेट नंतर कंपनीचा दावा आहे की कार की रेंज 453km होईल. नवीन सॉफ्टवेयर अपडेट बॅकव्हर्ड कंपेटिबल आहे, ज्याचा अर्थ असा की जुने टाटा नेक्सन ईव्ही मॅक्स ग्राहक 15 फेब्रुवारीपासून अतिरिक्त रेंजचा लाभ घेऊ शकतील. कारण टाटा जुन्या वाहनांना नवीन सॉफ्टवेयर सादर करत आहे.

The post XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tata-nexon-ev-max-price-cut-after-mahindra-xuv400-ev-launched-in-india/feed/ 0
456KM सह लाँच झाली Mahindra XUV400 EV; इतकी आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-ev-launched-in-india-prices-sale-photos/ https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-ev-launched-in-india-prices-sale-photos/#respond Tue, 17 Jan 2023 09:08:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16954 महिंद्रानं देशात आपली पहिली इलेक्ट्रिक कार Mahindra XUV400 EV लाँच केली आहे. Mahindra ची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही अनेक शानदार फीचर्स आणि 456KM रेंजसह बाजारात आली आहे. तसेच, कंपनीनं हिची किंमत आणि बुकिंग डिटेलचा देखील खुलासा केला आहे. ही ई-कार भारतातील Tata Nexo Ev Max ला टक्कर देईल. चला जाणून घेऊया या स्वदेशी ईव्ही बाबत सर्वकाही. […]

The post 456KM सह लाँच झाली Mahindra XUV400 EV; इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Mahindra XUV400 EV दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.
  • एक्सयूवी 400 इलेक्ट्रिकची किंमत 15.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरु
  • ईव्हीची बुकिंग कंपनीच्या साइटवर 26 जानेवारी पासून सुरु होईल.

महिंद्रानं देशात आपली पहिली इलेक्ट्रिक कार Mahindra XUV400 EV लाँच केली आहे. Mahindra ची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही अनेक शानदार फीचर्स आणि 456KM रेंजसह बाजारात आली आहे. तसेच, कंपनीनं हिची किंमत आणि बुकिंग डिटेलचा देखील खुलासा केला आहे. ही ई-कार भारतातील Tata Nexo Ev Max ला टक्कर देईल. चला जाणून घेऊया या स्वदेशी ईव्ही बाबत सर्वकाही.

Mahindra XUV 400 EV Price

XUV 400 EV दोन बॅटरी साइज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. या ई-कारच्या 34.5 kwh बॅटरी साइज च्या 3.3 kw व्हर्जनची किंमत 15.99 लाख रुपये (Ex-Showroom) आहे, सोबत 7.2 किलोवॉट चार्जर घेतल्यास या व्हेरिएंटची एक्स शोरुम किंमत 16.49 लाख रुपये होईल. या इलेक्ट्रिक कारच्या टॉप व्हेरिएंट ईएलची एक्स शोरुम किंमत 18.99 लाख रुपये आहे. कंपनीनुसार दोन्ही व्हेरिएंटच्या पहिल्या पाच हजार बुकिंग्सवरच ही किंमत लागू असेल. कारची बुकिंग 26 जानेवारी पासून सुरु होईल. हे देखील वाचा: जबरदस्त! इलेक्ट्रिक अवतारातील Honda Activa लाँचसाठी सज्ज; पुढील आठवड्यात येणार बाजारात

456 किलोमीटर मिळेल रेंज

कंपनीचा दावा आहे की एक्सयूवी 400 इलेक्ट्रिक सिंगल चार्जमध्ये 375 आणि 456 किलोमीटर पर्यंत चालवता येईल. यातील 34.5 किलोवॉटची बॅटरी 375 किलोमीटर आणि 39.4 किलोवॉटची बॅटरी 456 किलोमीटरची रेंज देईल. तसेच कंपनीनं दावा केला आहे की कारची बॅटरी आयपी-67 रेटिंगसह येते. ज्याचा अर्थ असा की ईव्हीची बॅटरी धूळ आणि माती सोबतच पाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित राहू शकते. तसेच हिचा टॉप स्पीड 150KMPH आहे.

Mahindra XUV 400 चा लुक

ही कंपनीच्या सर्वात सेफेस्ट कार पैकी एक XUV300 प्रमाणे दिसते. या कारमध्ये महिंद्राचा नवीन लोगो देण्यात आला आहे. Mahindra XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही साइजच्या बाबतीत महिंद्रा XUV300 पेक्षा मोठी आहे त्यामुळे ही पूर्णपणे एक SUV आहे. या नवीन एसयूव्हीची लांबी 4.2 मीटर आहे. Mahindra XUV 400 सॅटिन कॉपर फिनिश मध्ये ड्युअल टोन रूफ ऑप्शनसह आर्कटिक ब्लू, एवरेस्ट व्हाइट, गॅलेक्सी ग्रे, नेपोली ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्लू अशा पाच कलर ऑप्शनमध्ये येते. हे देखील वाचा: ती पुन्हा आली! LML कंपनीनं सादर केली शानदार इलेक्ट्रिक स्कूटर Star

Mahindra XUV 400 चे फीचर्स

Mahindra XUV 400 EV चे फीचर्स पाहता यात इलेक्ट्रिक सनरूफ, डिजिटल इंस्ट्रुमेंटल क्लस्टर, एरोडायनॅमिक डिजाइन असेलेले 17-इंचाचे अलॉय व्हील, ड्युअल-जोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, रेन सेंसिंग वायपरसह ऑटो हेडलॅम्प, टाइप-सी चार्जिंग आउटलेट आणि अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

The post 456KM सह लाँच झाली Mahindra XUV400 EV; इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-ev-launched-in-india-prices-sale-photos/feed/ 0
Mahindra XUV400 EV आवडली नाही? मग या 5 Electric Cars चा विचार करता येईल, पाहा लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-ev-competition-electric-cars-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-ev-competition-electric-cars-in-india/#respond Fri, 16 Sep 2022 13:36:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13205 Mahindra नं अलीकडेच भारतात आपली compact EV SUV Mahindra XUV400 सादर केली आहे. ही इलेक्ट्रिक कार सादर झाल्यानंतर भारतातील इलेक्ट्रिक कार बाजार (Indian EV market) मोठ्याप्रमाणावर बदलेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. परंतु या कारच्या विक्रीसाठी अजून बराच काळ आहे आणि तुम्हाला जर अशीच ईव्ही हवी असेल तर भारतात अनेक पर्याय आहेत. सध्या बाजारात उपलब्ध […]

The post Mahindra XUV400 EV आवडली नाही? मग या 5 Electric Cars चा विचार करता येईल, पाहा लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Mahindra नं अलीकडेच भारतात आपली compact EV SUV Mahindra XUV400 सादर केली आहे. ही इलेक्ट्रिक कार सादर झाल्यानंतर भारतातील इलेक्ट्रिक कार बाजार (Indian EV market) मोठ्याप्रमाणावर बदलेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. परंतु या कारच्या विक्रीसाठी अजून बराच काळ आहे आणि तुम्हाला जर अशीच ईव्ही हवी असेल तर भारतात अनेक पर्याय आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Tata Nexon EV twins, the MG ZS EV, Hyundai Kona EV आणि आगामी BYD Atto 3 या कार महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारला सहज टक्कर देतात.

Mahindra XUV400 ला टक्कर देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स

Mahindra XUV400 ev competition electric cars in india

1. Tata Nexon EV Prime
2. Tata Nexon EV MAX
3. MG ZS EV
4. Hyundai Kona EV
5. BYD Atto 3

1. Tata Nexon EV Prime

Mahindra XUV400 ev competition electric cars in india Tata nexon ev

टाटा नेक्सॉन ईव्ही प्राइम सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात मजबूत ईव्ही प्रोडक्ट पैकी एक आहे. या कारनं सर्व सेगमेंटमध्ये भारतीय ईव्ही स्पेसमध्ये विक्रीचा 50 टक्के हिस्सा आपल्या नावे केला आहे. टाटाच्या नेक्सॉन ईव्ही प्राइममध्ये स्टाइल, प्रदर्शन, रेंज, आराम आणि सुविधा मिळतात. रेंज बाबत बोलायचं झालं तर टाटा नेक्सॉन ईव्ही प्राइम एकदा चार्ज केल्यावर 312 किमी प्रवास करू शकते. तसेच ही फक्त 9 सेकंदांत 0 ते 100 पर्यंतचा वेग गाठू शकते. ही घरी फुल चार्ज होण्यास सुमारे 8 तास लागतात. Nexon EV Prime मध्ये ऑटो एसी, इलेक्ट्रिक सनरूफ, एयरबॅग, डिजिटल MID, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, अलॉय व्हील, हवेशीर सीट्स आणि अन्य अनेक फीचर्स मिळतात. हिची किंमत Rs 14.99 lakh (ex-showroom) पासून सुरु होते. हे देखील वाचा: OTUA Electric Cargo फुल चार्जमध्ये देणार 300km पर्यंत रेंज; ड्रायवर केबिनमध्ये गारगार एसी

2. Tata Nexon EV MAX

Mahindra XUV400 ev competition electric cars in india tata nexon ev max

Tata Motors नं अलीकडेच आपली इलेक्ट्रिक नेक्सॉनका मोठी रेंज असलेला व्हेरिएंट Nexon EV MAX नावानं सादर केला होता. Tata Nexon EV MAX सिंगल चार्जवर 437km ची रेंज मिळवू शकते. ही 0 ते 100kmph पर्यंतचा स्पीड फक्त 9 सेकंदांत गाठते. Nexon EV MAX मध्ये 140kmph चा टॉप स्पीड मिळतो. Nexon EV MAX मध्ये नवीन alloys, शानदार सस्पेंशन आणि फास्ट चार्जिंगचा ऑप्शन मिळतो. हिची प्रारंभिक किंमत Rs 18.34 lakh (ex-showroom) आहे.

3. MG ZS EV

Mahindra XUV400 ev competition electric cars in india mg zs EV

या सेगमेंटमध्ये MG ZS EV देखील एक लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहे आणि ही Nexon EV ट्विन्स पेक्षा मोठी आहे. MG ZS EV टेक्नॉलॉजीच्या बाबतीत देखील जास्त शानदार आहे. यात पॅनोरमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, डिजिटल MID आणि इंफोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार फीचर्स, हीटेड ORVM, TPMS आणि 17-इंचाचे अलॉय व्हील मिळतात. इतकेच नव्हे तर MG ZS EV फक्त 8.6 सेकंदांत ताशी 100 किमीचा वेग गाठू शकते. तसेच ही ईव्ही एकदा चार्ज केल्यावर 461 किमीची रेंज देते असा दावा करण्यात आला आहे. या कारची प्रारंभी किंमत Price: Rs 22 lakh (ex-showroom) आहे.

4. Hyundai Kona EV

Mahindra XUV400 ev competition electric cars in india hyundai kona

Hyundai Kona EV बाजारात उपलब्ध असलेल्या जुन्या इलेक्ट्रिक कार्स पैकी एक आहे. ही कार आधुनिक डिजाइन आणि फीचर्ससह सादर करण्यात आली आहे. Kona EV मध्ये 136 hp (395 Nm) मोटर मिळते, जिला 39.2kWh लिथियम-आयन बॅटरीची जोड देण्यात आली आहे. ही कार 452km रेंज देऊ शकते. Hyundai Kona EV ची किंमत 23.79 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. हे देखील वाचा: एक-दोन नव्हे तर 10 इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करणार Honda; EV सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ

5. BYD Atto 3

Mahindra XUV400 ev competition electric cars in india byd atto 3

BYD लवकरच भारतीय बाजारात BYD Atto 3 सादर करून ईव्ही मार्केटमध्ये एक नवीन युद्ध छेडू शकते. BYD Atto 3 देखील एक कॉम्पॅक्ट EV SUV असेल की लवकरच CKD रूटच्या माध्यमातून भारतात येईल. BYD Atto 3 201bhp आणि 310Nm इलेक्ट्रिक मोटर आणि 60.5kWh बॅटरी पॅकसह बाजारात येऊ शकते. Atto 3 एकदा चार्ज केल्यावर 480km ची रेंज मिळू शकते. यात 6.6kW AC चार्जरच्या माध्यमातून 9.5 तासांत फुल चार्ज करता येईल. या ईव्ही एसयूव्हीमध्ये एलईडी हेडलॅम्प, 12.8 इंचाचा रोटेटिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पाच इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पावर्ड फ्रंट सीट, वायरलेस चार्जर, एम्बिएंट लाइटिंग, 360 डिग्री कॅमेरा आणि सात एयरबॅग असतील. हिची आरंभिक किंमत Rs 25 lakh (ex-showroom) च्या आसपास असू शकते.

The post Mahindra XUV400 EV आवडली नाही? मग या 5 Electric Cars चा विचार करता येईल, पाहा लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-ev-competition-electric-cars-in-india/feed/ 0
एका चार्जमध्ये 456km ची जबरदस्त रेंज! आली Mahindra ची पहिली Electric SUV Car XUV 400; 150 kmph चा टॉप स्पीड https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-price-feature-range-image-and-booking-in-india-2022/ https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-price-feature-range-image-and-booking-in-india-2022/#respond Fri, 09 Sep 2022 06:07:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12965 Mahindra XUV 400 EV Launch: महिंद्रा (Mahindra) नं अखेरीस भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपली पहिली Electric SUV Car सादर केली आहे. गेले कित्येक दिवस लीक आणि रिपोर्ट्सच्या माध्यमातून माहिती येत होती की कंपनी आपल्या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही महिंद्रा एक्सयूवी400 ईव्ही (XUV 400 EV) वर काम करत आहे. आता ही कार जगासमोर ठेवण्यात आली आहे. महिंद्राच्या या […]

The post एका चार्जमध्ये 456km ची जबरदस्त रेंज! आली Mahindra ची पहिली Electric SUV Car XUV 400; 150 kmph चा टॉप स्पीड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Mahindra XUV 400 EV Launch: महिंद्रा (Mahindra) नं अखेरीस भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपली पहिली Electric SUV Car सादर केली आहे. गेले कित्येक दिवस लीक आणि रिपोर्ट्सच्या माध्यमातून माहिती येत होती की कंपनी आपल्या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही महिंद्रा एक्सयूवी400 ईव्ही (XUV 400 EV) वर काम करत आहे. आता ही कार जगासमोर ठेवण्यात आली आहे. महिंद्राच्या या नवीन इलेक्ट्रिक कार (Mahindra New Electric Car) च्या लाँचमधून स्पष्ट झालं आहे की हिची टक्कर भारतातील टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) शी होईल. दोन्ही कारमध्ये मोठ्या रेंजसह शानदार फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊया या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये मिळणारी रेंज आणि टॉप स्पीड.

Mahindra XUV 400 Price आणि Sale

कंपनीनं एका इव्हेंटच्या माध्यमातून Mahindra XUV 400 EV सादर केली आहे. XUV 400 EV 16 शहरांमध्ये लाँच केली जाईल, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. या कारची टेस्ट ड्राईव्ह डिसेंबर 2022 पासून 16 शहरांमध्ये सुरु होईल आणि जानेवारी 2023 च्या अखेरीस या कारची डिलिव्हरी सुरु होईल. परंतु अजूनतरी या कारची किंमत मात्र समजली नाही. आशा आहे की हिची किंमत TATA Nexon EV Max च्या जवळपास असू शकते. हे देखील वाचा: ठरलं तर! OnePlus टक्कर देण्यासाठी येणार realme GT NEO 3T 5G Phone; सुसाट चार्जींगसह फ्लॅगशिप प्रोसेसर

Mahindra XUV 400 Look and Design

लुक पाहता ही कार दिसायला कंपनीच्या सर्वात सेफेस्ट कार पैकी एक XUV300 सारखी दिसते. परंतु या कारमध्ये महिंद्राचा नवीन लोगो देण्यात आला आहे. Mahindra XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही साइजच्या बाबतीत महिंद्रा XUV300 पेक्षा मोठी आहे त्यामुळे एक परफेक्ट SUV आहे. या नवीन एसयूव्हीची लांबी 4.2 मीटर आहे. जोडीला Mahindra XUV 400 सॅटिन कॉपर फिनिशमध्ये ड्युअल टोन रूफ ऑप्शन्ससह आर्कटिक ब्लू, एवरेस्ट व्हाइट, गॅलेक्सी ग्रे, नेपोली ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्लू सारख्या पाच कलर ऑप्शनमध्ये येतो.

Mahindra XUV 400 चे फीचर्स

Mahindra XUV 400 EV चे फीचर्स पाहता यात इलेक्ट्रिक सनरूफ, डिजिटल इंस्ट्रुमेंटल क्लस्टर, एरोडायनॅमिक स्वरूपात डिजाइन करण्यात आलेले 17-इंचाचे अलॉय व्हील, ड्युअल-जोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, रेन सेंसिंग वाइपरसह ऑटो हेडलॅम्प, टाइप-सी चार्जिंग आउटलेट आणि अनेक शानदार फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: Airtel 5G Launch: Airtel 5G साठी विकत घ्यावं लागणार का नवीन SIM Card? कंपनीनं दिलं उत्तर

तसेच या इलेक्ट्रिक कारमध्ये एक IP67 कंप्लेंट 39.5 kWh बॅटरी पॅक आणि PSM मोटर आहे जी 149.5 PS ची पीक पावर आणि 310 Nm चा मॅक्सिमम टॉर्क देते. ही कार जबरदस्त रेंजसह सादर करण्यात आली आहे. लाँचच्या वेळी कंपनीनं दावा केला आहे की ही EV सिंगल चार्जमध्ये सुमारे 400-450 किलोमीटर पर्यंत चालू शकते, हिचा टॉप स्पीड 150 kmph असेल.

The post एका चार्जमध्ये 456km ची जबरदस्त रेंज! आली Mahindra ची पहिली Electric SUV Car XUV 400; 150 kmph चा टॉप स्पीड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-price-feature-range-image-and-booking-in-india-2022/feed/ 0
437km रेंज असलेल्या Tata Nexon EV ला टक्कर देईल आनंद महिंद्रांची Mahindra XUV400, टीजर आला समोर https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-ev-teased-ahead-september-8-launch-range-price-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-ev-teased-ahead-september-8-launch-range-price-and-features/#respond Fri, 02 Sep 2022 11:21:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12762 Mahindra Electric XUV 400 Launch: महिंद्रा अँड महिंद्रानं गेल्या महिन्यात 15 ऑगस्टला आपल्या नवीन INGLO इलेक्ट्रिक स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित पाच नवीन इलेक्ट्रिक मॉडेल (Electric Vehicles) सादर केले होते. आता या महिन्यात 8 सप्टेंबरला Mahindra इलेक्ट्रिक मोबिलिटी डिव्हिजन Mahindra XUV400 कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आनंद महिंद्रा यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महिंद्रा ऑटोमोबाइलच्या […]

The post 437km रेंज असलेल्या Tata Nexon EV ला टक्कर देईल आनंद महिंद्रांची Mahindra XUV400, टीजर आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Mahindra Electric XUV 400 Launch: महिंद्रा अँड महिंद्रानं गेल्या महिन्यात 15 ऑगस्टला आपल्या नवीन INGLO इलेक्ट्रिक स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित पाच नवीन इलेक्ट्रिक मॉडेल (Electric Vehicles) सादर केले होते. आता या महिन्यात 8 सप्टेंबरला Mahindra इलेक्ट्रिक मोबिलिटी डिव्हिजन Mahindra XUV400 कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आनंद महिंद्रा यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महिंद्रा ऑटोमोबाइलच्या नवीन इलेक्ट्रिक कार, महिंद्रा एक्सयूव्ही 400 चा एक टीजर शेयर केला आहे. चला जाणून घेऊया या नवीन इलेक्ट्रिक कारची संभाव्य किंमत आणि फीचर्स.

Mahindra XUV400 या दिवशी होईल लाँच

आनंद महिंद्रांनी गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी व्हिडीओ टीजर शेयर करून ट्वीट केलं, “आज एक खूप शुभ दिवस आहे, त्यामुळे लवकरच अजून एक लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे.” विशेष म्हणजे नवीन XUV400 इलेक्ट्रिक SUV ची टेस्ट ड्राईव्ह गेल्या काही आठवड्यांपासून सुरु होती. टेस्टिंगचे काही फोटो देखील याआधी मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहेत. हे देखील वाचा: दुबईप्रमाणे भारतात देखील स्वस्तात मिळणार iPhone 14 Pro Max; चीनच्या ऐवजी भारतात होणार निर्मिती

Mahindra XUV400 ची संभाव्य किंमत

Mahindra XUV400 काही दिवसांपूर्वी रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान दिसली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Mahindra XUV400 कार 8 सप्टेंबर 2022 ला लाँच केली जाईल. लाँच झाल्यावर ही Tata Nexon EV Prime आणि Tata Nexon EV MAX ला टक्कर देईल. Mahindra XUV400 EV ची किंमत 15 लाख रुपये ते 18 लाख रुपये (सबसिडी आधी एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते.

Mahindra XUV400 ची संभाव्य किंमत

XUV400 मोठ्या प्रमाणवर SsangYong Tivoli आधारित असेल, ज्यावर XUV300 ICE-संचालित SUV आधारित आहे. त्यामुळे XUV400 XUV300 पेक्षा जास्त लांब असेल आणि हिची लांबी जवळपास 4.2m असण्याची शक्यता आहे. XUV300 डायमेंशनल स्वरूपात बदलण्यात आली आहे आणि भारत सरकारकडून 4m लांबी असलेल्या वाहनांवरील कर लाभ मिळवण्यासाठी हिची लांबी 4m पेक्षा कमी करण्यात आली आहे.

जेव्हा प्रश्न कॉस्मेटिक्सचा येतो तेव्हा XUV400 Tivoli आणि XUV300 दोन्ही वेगळ्या ठरतात. XUV400 मध्ये ब्लँक्ड-आउट ग्रिल, कंटूरेड फ्रंट बंपर आणि त्रिकोणी फॉग लॅम्प हाउसिंग मिळण्याची शक्यता आहे. हेडलॅम्प क्लस्टर नव्याने तयार केला गेला आहे. मागील बाजूस, XUV400 मध्ये एलईडीसह रॅप-अराउंड टेल लॅम्पची एक जोडी आणि एक नवीन डिजाइन करण्यात आलेलं टेलगेट मिळेल. साइड प्रोफाईल नवीन अलॉय व्हील्सद्वारे वाढवण्यात येईल आणि XUV400 मध्ये 17-इंचाचा मोठा अलॉयचा एक सेट मिळू शकतो. हे देखील वाचा: 150KM च्या जबरदस्त रेंजसह येतेय Electric Bike; पुढील आठवड्यात होणार लाँच

XUV400 मध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर असण्याची शक्यता आहे जी पुढील चाकांना चालवेल आणि जवळपास 150bhp ची पीक पावर देईल. बॅटरी क्षमतेनुसार दोन पर्याय असतील. XUV400 मध्ये एक अपग्रेडेड इंफोटेनमेंट सिस्टम मिळण्याची शक्यता आहे आणि यात ADAS फंक्शंससह लेटेस्ट ADRENOX प्लॅटफॉर्म देखील मिळू शकतो.

The post 437km रेंज असलेल्या Tata Nexon EV ला टक्कर देईल आनंद महिंद्रांची Mahindra XUV400, टीजर आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mahindra-xuv400-ev-teased-ahead-september-8-launch-range-price-and-features/feed/ 0