Nothing Phone (2) - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 17 Jul 2023 05:28:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nothing Phone (2) सारखा दिसणारा Infinix GT 10 Pro आला समोर; लाँचपूर्वीच फोट लीक https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-lookalike-infinix-gt-10-pro-images-leaked-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-lookalike-infinix-gt-10-pro-images-leaked-india-launch-soon/#respond Mon, 17 Jul 2023 05:28:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22406 Infinix आता नथिंग कंपनीच्या मार्गावर चालणार असल्याचं दिसत आहे. कंपनी आता आपल्या नव्याकोऱ्या जीटी सीरिजमध्ये दोन फोन्स लाँच करणार आहे. आगामी Infinix GT 10 Pro आणि GT 10 Pro+ मध्ये नथिंग फोन सारखी डिजाईन आणि ट्रान्सपरंट बॅक पॅनल मिळू शकतो. हे फोन्स गेमिंगवर लक्ष केंद्रित करतील. Infinix GT 10 Pro सर्वप्रथम येणार भारतात GSMArena च्या […]

The post Nothing Phone (2) सारखा दिसणारा Infinix GT 10 Pro आला समोर; लाँचपूर्वीच फोट लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix GT 10 Pro मध्ये नथिंग फोन सारखा पारदर्शक बॅक पॅनल दिसत आहे.
  • ह्या सीरिजमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी चिपसेटसह दोन फोन येतील.
  • ह्या फोन्समध्ये 108 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल.

Infinix आता नथिंग कंपनीच्या मार्गावर चालणार असल्याचं दिसत आहे. कंपनी आता आपल्या नव्याकोऱ्या जीटी सीरिजमध्ये दोन फोन्स लाँच करणार आहे. आगामी Infinix GT 10 Pro आणि GT 10 Pro+ मध्ये नथिंग फोन सारखी डिजाईन आणि ट्रान्सपरंट बॅक पॅनल मिळू शकतो. हे फोन्स गेमिंगवर लक्ष केंद्रित करतील.

Infinix GT 10 Pro सर्वप्रथम येणार भारतात

GSMArena च्या रिपोर्टनुसार, सीरिजमधील वॅनिला मॉडेल Infinix GT 10 Pro पुढील महिन्यात सर्वप्रथम भारतात लाँच होईल. ह्यात वरच्या दर्जाचे गेमिंग फिचर परवडणाऱ्या किंमतीत दिले जातील असा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये अर्धपारदर्शक डिजाईन आणि दोन कलर ऑप्शन असलेले फोनचे फोटोज दाखवण्यात आले आहेत. परंतु इनफिनिक्स जीटी 10 प्रोमध्ये एलईडी स्ट्रिप्स दिसत नाहीत त्यामुळे बहुतेक हा नथिंग फोन प्रमाणे चमकणार नाही.

रिपोर्ट्सनुसार फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी सीरिजचा चिपसेट दिला जाईल. तसेच ह्यात 108 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सर आणि रिंग फ्लॅश लाइट डिजाईनसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. इनफिनिक्सनं हा फोन PUBG, MLBB आणि Free Fire सारख्या लोकप्रिय गेम्समध्ये चांगला अनुभव मिळावा ह्यासाठी ऑप्टिमाइज केला आहे. डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित एक्सओएस 13 वर चालेल ज्याला एक अँड्रॉइड अपग्रेड आणि दोन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट मिळतील.

Infinix GT 10 Pro, GT 10 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : दोन्ही फोनमध्ये 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल.
  • चिपसेट : Infinix GT 10 Pro मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 1300 चिपसेट दिला जाईल तर GT 10 Pro+ मध्ये डायमेन्सिटी 8050 चिपसेटचा समवेश केला जाईल.
  • कॅमेरा : दोन्ही फोन्समध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळेल. तर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
  • रॅम आणि स्टोरेज : GT 10 Pro मध्ये 8GB RAM/128GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल तर GT 10 Pro+ सोबत 8GB/256GB स्टोरेज दिली जाऊ शकते.

The post Nothing Phone (2) सारखा दिसणारा Infinix GT 10 Pro आला समोर; लाँचपूर्वीच फोट लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-lookalike-infinix-gt-10-pro-images-leaked-india-launch-soon/feed/ 0
ट्रान्सपरंट बॉडी असलेला Nothing Phone (2) भारतात लाँच; सुधारित डिजाइन आणि ताकदही वाढली https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launched-in-india-know-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launched-in-india-know-price-specifications-sale-offer-details/#respond Tue, 11 Jul 2023 15:53:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22339 नथिंग कंपनीचा दुसरा ट्रान्सपरंट स्मार्टफोन Nothing Phone (2) भारतात लाँच झाला आहे. डिवाइसमध्ये आधीपेक्षा चांगली डिजाइन आणि दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु होईल. चला जाणून घेऊया स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, किंमत आणि डिजाइनची माहिती. Nothing Phone (2) डिजाइन हा डिवाइस ट्रान्सपरंट बॅक पॅनलसह आला आहे. ह्यात जास्त एलईडी लाइट्स देण्यात आल्या […]

The post ट्रान्सपरंट बॉडी असलेला Nothing Phone (2) भारतात लाँच; सुधारित डिजाइन आणि ताकदही वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nothing Phone (2) भारतासह जागतिक बाजारात आला आहे.
  • आता बॅक पॅनलमध्ये 33 एलईडी लाइट जास्त आहेत.
  • फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट मिळतो.

नथिंग कंपनीचा दुसरा ट्रान्सपरंट स्मार्टफोन Nothing Phone (2) भारतात लाँच झाला आहे. डिवाइसमध्ये आधीपेक्षा चांगली डिजाइन आणि दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु होईल. चला जाणून घेऊया स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, किंमत आणि डिजाइनची माहिती.

Nothing Phone (2) डिजाइन

हा डिवाइस ट्रान्सपरंट बॅक पॅनलसह आला आहे. ह्यात जास्त एलईडी लाइट्स देण्यात आल्या आहेत. कॅमेरा मॉड्यूलमध्ये देण्यात आलेली फ्लॅश लाइट देखील मोठी आहे. डिवाइसच्या उजवीकडे पावर बटन मिळतो तर वॉल्यूम अप-डाउन बटन डावीकडे देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर आधीच्या तुलनेत 33 एलईडी लाइट जास्त आहेत.

Nothing Phone (2) स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनमध्ये 6.7 इंचाचा एफएचडी प्लस ओएलईडी LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेवर 120Hz रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशन, HDR 10+, 10 बिट कलर, 240Hz टच सॅम्पलिंग रेट टेक्नॉलॉजी सारखे फीचर्स आहेत. सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देखील आहे.
  • प्रोसेसर : नवीन नथिंग फोनमध्ये बेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट मिळतो. हा प्रोसेसर 4 नॅनोमीटर प्रोसेसवर चालतो तसेच चांगल्या ग्राफिक्ससाठी एड्रिनो 720 जीपीयू आहे.
  • स्टोरेज : डिवाइस 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतो.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ह्यात 50 मेगापिक्सलचा IMX890 प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. जोडीला 50 मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

  • बॅटरी : कंपनीनं 4700एमएएचची बॅटरी दिली आहे. जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
  • ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित Nothing OS 2.0 वर चालतो.
  • सुरक्षा : फोनमध्ये सुरक्षेसाठी ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आणि आयपी रेटिंग सादर करण्यात आली आहे. तसेच युजर्सना फोनमध्ये 3 वर्ष अँड्रॉइड अपडेट आणि 4 वर्ष सिक्योरिटी अपडेट्स मिळतील.

The post ट्रान्सपरंट बॉडी असलेला Nothing Phone (2) भारतात लाँच; सुधारित डिजाइन आणि ताकदही वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launched-in-india-know-price-specifications-sale-offer-details/feed/ 0
Nothing Phone 2 च्या लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स आणि किंमत झाली लीक, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-price-and-specifications-leaked-before-11-july-india-launch/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-price-and-specifications-leaked-before-11-july-india-launch/#respond Thu, 06 Jul 2023 12:23:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22266 नथिंग कंपनीचा दुसरा स्मार्टफोन Nothing Phone 2, 11 जुलैला सादर होण्यासाठी तयार आहे. ज्याची टीजर इमेज कंपनीनं शेयर केली आहे. आता डिवाइसच्या लाँचपूर्वीच टिपस्टरनं फोनच्या फुल स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. जी तुम्ही पुढे वाचू शकता. Nothing Phone (2) किंमत (लीक) टिप्स्टरनुसार हा फोन 42,000 किंवा 43,000 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. विशेष […]

The post Nothing Phone 2 च्या लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स आणि किंमत झाली लीक, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nothing Phone (2) 11 जुलैला सादर होणार आहे.
  • ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट असू शकतो.
  • 50 मेगापिक्सलची IMX890 प्रायमरी लेन्स मिळू शकतो.

नथिंग कंपनीचा दुसरा स्मार्टफोन Nothing Phone 2, 11 जुलैला सादर होण्यासाठी तयार आहे. ज्याची टीजर इमेज कंपनीनं शेयर केली आहे. आता डिवाइसच्या लाँचपूर्वीच टिपस्टरनं फोनच्या फुल स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. जी तुम्ही पुढे वाचू शकता.

Nothing Phone (2) किंमत (लीक)

टिप्स्टरनुसार हा फोन 42,000 किंवा 43,000 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. विशेष म्हणजे ही किंमत फोनच्या टॉप मॉडेलची असू शकते. ज्यात 8GB रॅम + 256GB स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच बेस व्हेरिएंट सुमारे 38,000 रुपयांपर्यंत सादर केला जाऊ शकतो.

Nothing Phone (2) स्पेसिफिकेशन्स (लीक)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर टिपस्टर योगेश ब्रारनं Nothing Phone (2) चे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमत सांगितली आहे.

  • डिस्प्ले : फोनचा डिस्प्ले पाहता ह्यात 6.7 इंचाचा एफएचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. डिस्प्लेवर 120Hz रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशन असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  • प्रोसेसर : नवीन फोनचा प्रोसेसर पाहता ह्यात इंडस्ट्रीचा बेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट दिला जाऊ शकतो.
  • सुरक्षा : फोनमध्ये सुरक्षेसाठी ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आणि आयपी रेटिंग दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ह्यात 50 मेगापिक्सलची IMX890 प्रायमरी कॅमेरा लेन्स OIS सपोर्टसह दिली जाऊ शकते. तसेच 50 मेगापिक्सलचा (UW) (JN1) सेन्सर मिळू शकतो.
  • बॅटरी : डिवाइस 4700एमएएचची बॅटरी सपोर्टसह येऊ शकतो. ह्या बॅटरीसह 33W किंवा 15W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित Nothing OS 2.0 वर चालू शकतो.
  • अन्य : फोनमध्ये युजर्सना 3+4 वर्षांचे सिक्योरिटी आणि ओएस अपडेट्स दिले जाऊ शकतात.
  • स्टोरेज : स्टोरेज ऑप्शन बाबत ह्या लीकमध्ये माहिती मिळाली नाही, परंतु हा डिवाइस 8GB पर्यंत रॅम + 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे.

The post Nothing Phone 2 च्या लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स आणि किंमत झाली लीक, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-price-and-specifications-leaked-before-11-july-india-launch/feed/ 0
Nothing Phone (2) ची लीक इमेज आली समोर, पाहा कसा असेल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-image-leak-dual-camera-setup-reveal/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-image-leak-dual-camera-setup-reveal/#respond Mon, 03 Jul 2023 07:37:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21853 Nothing कंपनीचा बहुचर्चित स्मार्टफोन Nothing Phone (2), 11 जुलैला लाँच होणार आहे. परंतु त्याआधीच स्मार्टफोनबद्दल अनेक लीक आणि रेंडर समोर आले आहेत. तसेच आजच्या लीकमध्ये टिपस्टरनं ह्या फोनची एक इमेज शेयर केली आहे ज्यात डिवाइसचा कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. चला जाणून घेऊया ह्याबाबत साविसात. Nothing Phone (2) कॅमेरा लीक डीटेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर टिपस्टर […]

The post Nothing Phone (2) ची लीक इमेज आली समोर, पाहा कसा असेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • लीकमध्ये डिवाइसचा कॅमेरा मॉड्यूल पाहता येईल.
  • कॅमेऱ्याच्या बाजूला ड्युअल एलईडी फ्लॅश देखील दिसत आहे.
  • ह्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळू शकते.

Nothing कंपनीचा बहुचर्चित स्मार्टफोन Nothing Phone (2), 11 जुलैला लाँच होणार आहे. परंतु त्याआधीच स्मार्टफोनबद्दल अनेक लीक आणि रेंडर समोर आले आहेत. तसेच आजच्या लीकमध्ये टिपस्टरनं ह्या फोनची एक इमेज शेयर केली आहे ज्यात डिवाइसचा कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. चला जाणून घेऊया ह्याबाबत साविसात.

Nothing Phone (2) कॅमेरा लीक डीटेल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर टिपस्टर पारस गुगलानीनं नथिंग फोन 2 ची इमेज शेयर केली आहे. इमेजमध्ये पाहता येईल की स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. तसेच कॅमेऱ्याच्या बाजूला ड्युअल एलईडी फ्लॅश देखील स्पष्टपणे दिसत आहे. तसेच वरच्या बाजूला एक सेन्सर आहे जो कदाचित मायक्रोफोन असू शकतो.

फोनची डिजाइन पाहता डिवाइस जुन्या नथिंग फोन 1 सारखाच दिसत आहे. फोटोमध्ये पाहू शकता की ह्यात फ्लॅट एज देण्यात आले आहेत. तसेच पूर्वीप्रमाणे ट्रान्सपरंट डिजाइन आणि बॅक पॅनलवर एलईडी लाइट फीचर असल्यामुळे जुन्या फोनचा भास होत आहे.

Nothing Phone (2) चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: नथिंग फोन (2) मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्या खास डिस्प्लेवर 120Hz रिफ्रेश आणि हाय रिजॉल्यूशन दिला जाऊ शकतं. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळू शकतो.
  • प्रोसेसर: चांगल्या परफॉर्मन्ससाठी ह्या फोनमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 ऑक्टा कोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. जो गेमिंग आणि इतर कामांसाठी चांगला ठरू शकतो.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत नवीन नथिंग फोन 2 दोन किंवा तीन स्टोरेज ऑप्शनसह येण्याची शक्यता आहे. ज्यात 8जीबी रॅम + 256जीबी इंटरनल स्टोरेज आणि 12GB रॅम + 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच 8GB + 256GB व्हेरिएंट देखील येऊ शकतो.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत फोन 4,700एमएएचची दीर्घकाळ चालणारी बॅटरी मिळू शकते.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता हा फोन ड्युअल कॅमेरा सह येऊ शकतो. ह्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळू शकते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
  • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.

The post Nothing Phone (2) ची लीक इमेज आली समोर, पाहा कसा असेल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-image-leak-dual-camera-setup-reveal/feed/ 0
Nothing Phone (2) भारतात 11 जुलैला होईल लाँच, पुन्हा घालणार का बाजारात धुमाकूळ? https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launch-date-in-india-11-july/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launch-date-in-india-11-july/#respond Wed, 14 Jun 2023 05:31:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21592 नथिंग ब्रँडनं जेव्हा घोषणा केली की ते दुसरा स्मार्टफोन Nothing Phone (2) देखील घेऊन येत आहेत तेव्हापासून चर्चेला उधाण आलं आहे. तर आज कंपनीनं ह्या स्मार्टफोनची लाँच डेट देखील सांगितली आहे. नथिंग फोन 2 11 जुलैला भारतात लाँच होईल. फोनची लाँच डिटेल आणि लीक स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Nothing Phone (2) लाँच डिटेल […]

The post Nothing Phone (2) भारतात 11 जुलैला होईल लाँच, पुन्हा घालणार का बाजारात धुमाकूळ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • नथिंग फोन 2 11 जुलैला भारतात लाँच होईल.
  • कंपनीनं अधिकृत घोषणा केली आहे.
  • नथिंग फोन (2) क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाईल.

नथिंग ब्रँडनं जेव्हा घोषणा केली की ते दुसरा स्मार्टफोन Nothing Phone (2) देखील घेऊन येत आहेत तेव्हापासून चर्चेला उधाण आलं आहे. तर आज कंपनीनं ह्या स्मार्टफोनची लाँच डेट देखील सांगितली आहे. नथिंग फोन 2 11 जुलैला भारतात लाँच होईल. फोनची लाँच डिटेल आणि लीक स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Nothing Phone (2) लाँच डिटेल

कंपनीनं अधिकृत घोषणा केली आहे की नथिंग फोन 2 येत्या 11 जुलैला भारतात लाँच होईल. हा आनलाईन इव्हेंट असेल किंवा नाही हे स्पष्ट झालं नाही परंतु कंपनीनं अशी माहिती दिली की Nothing Phone (2) लाँच इव्हेंट 11 जुलैला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा फ्लॅगशिप लाँच कंपनीद्वारे लाइव्ह प्रक्षेपित केला जाईल.

मिळेल Snapdragon 8+ Gen 1

नथिंग फोन (2) क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाईल ज्याची माहिती Carl Pei ह्यांनी आधीच दिली आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट 4नॅनोमीटर फॅब्रिकेशन आर्किटेक्चरवर बनला आहे जो 3.2गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालू शकतो. ह्यात 5जी नेटवर्कसाठी एक्स65 मॉडेम इंटिग्रेटेड आहे. Nothing Phone (1) क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी+ चिपसेटसह आला आहे.

Nothing Phone (2) ची डिजाईन

लाँच डिटेल्स सोबतच शेयर करण्यात आलेल्या टीजर ईमेजवरून स्पष्ट झालं आहे की Nothing Phone (2) ग्लिफ लाइटिंग फीचरसह येईल त्यामुळे कॉल किंवा नोटिफिकेशन आल्यावर कलरफुल लाइट्स चमकतील. ह्या फोनचा बॅक पॅनल देखील नथिंग फोन 1 प्रमाणे ट्रान्सपरंट असेल.

फोनच्या रियर कॅमेरा सेटअपच्या चारही बाजूंनी नोटिफिकेशन लाइटचा शेप आधीपेक्षा थोडा वेगळा आहे. ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. हा फोन रीसायकेबल आणि बायो-बेस्ड प्रोडक्ट्सपासून बनवला जात आहे. ह्यातील 9 सर्किट बोर्ड्समध्ये 100 टक्के रीसायकल टीन, मेन सर्किट बोर्डवर 100 टक्के रीसायकल कॉपर फॉइल आणि 28 स्टील पोर्ट्सवर 90 टक्के रीसायकल स्टीलचा वापर केला जाईल.

Nothing Phone (2) चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.7″ FHD+ 120Hz Display
  • 12GB RAM + 256GB Memory
  • 50MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 4,700mAh Battery
  • डिस्प्ले : नथिंग फोन (2) मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिली जाऊ शकते जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल. ह्यावर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळू शकतो.
  • मेमरी व्हेरिएंट्स : भारतीय बाजारात नवीन नथिंग फोन 12जीबी पर्यंतच्या रॅमसह लाँच केला जाऊ शकतो जोडीला 256जीबी स्टोरेज मिळू शकते. तसेच फोनच्या छोट्या व्हेरिएंट्समध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी मेमरी व 256जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्या फोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी नथिंग फोन (2) मध्ये 4,700एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

The post Nothing Phone (2) भारतात 11 जुलैला होईल लाँच, पुन्हा घालणार का बाजारात धुमाकूळ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launch-date-in-india-11-july/feed/ 0
Nothing Phone (2) च्या भारतीय लाँच आणि डिस्प्ले साइज कन्फर्म, फ्लिपकार्टवरून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-battery-size-confirm-buy-company-sale-on-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-battery-size-confirm-buy-company-sale-on-flipkart/#respond Thu, 01 Jun 2023 06:31:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21304 Nothing Phone (2) स्मार्टफोनच्या लाँचची अधिकृत पुष्टी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीच्या सीईओनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की फोन जुलैमध्ये लाँच होईल. तसेच स्पष्ट झालं आहे की ग्लोबल मार्केटसह हा फोन भारतात देखील येऊ शकतो, ज्याचा खुलासा Flipkart लिस्टिंगवरून झाला आहे. तसेच, कंपनी आता हळूहळू ह्या स्मार्टफोनची माहिती समोर आणत आहे. फ्लिपकार्टवर सह […]

The post Nothing Phone (2) च्या भारतीय लाँच आणि डिस्प्ले साइज कन्फर्म, फ्लिपकार्टवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन बनवताना राइसायकलेबल आणि बायो-बेस्ड मटेरियलचा वापर करण्यात आला आहे.
  • नथिंग फोन 2 मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल.
  • नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोनमध्ये 3 वर्ष Android अपडेट्स दिले जातील.

Nothing Phone (2) स्मार्टफोनच्या लाँचची अधिकृत पुष्टी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीच्या सीईओनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की फोन जुलैमध्ये लाँच होईल. तसेच स्पष्ट झालं आहे की ग्लोबल मार्केटसह हा फोन भारतात देखील येऊ शकतो, ज्याचा खुलासा Flipkart लिस्टिंगवरून झाला आहे. तसेच, कंपनी आता हळूहळू ह्या स्मार्टफोनची माहिती समोर आणत आहे.

फ्लिपकार्टवर सह लिस्ट झाला Nothing Phone (2)

फ्लिपकार्टवर फोनसाठी वेगळी मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे. परंतु अजूनही इंडिया लाँच बद्दल साइटवर कोणतीही माहिती मिळाली नाही. तर दुसरीकडे Nothing नं आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलच्या माध्यमातून Nothing Phone (1) फोनच्या उत्तराधिकारी Nothing Phone (2) संबंधित नवीन माहिती दिली आहे.

Nothing Phone (2) चे स्पेसिफिकेशन्स

  • या फोनमध्ये जुन्या फोनच्या तुलनेत 0.15 इंच मोठा डिस्प्ले मिळेल. म्हणजे नंथिंग फोन 1 मध्ये 6.55-इंचाची डिस्प्ले साइज होती तर नथिंग फोन 2 मध्ये 6.7-इंचाची स्क्रीन असेल.
  • कंपनीनं कंफर्म केलं आहे की ते आपल्या ह्या नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोनला 3 वर्ष Android अपडेट्स देतील.
  • तसेच फोनमध्ये 4 वर्ष युजर्सना सिक्योरिटी पॅच अपडेट मिळतील.
  • फोन 4,700mAh बॅटरीसह बाजारात येईल. म्हणजे कंपनीनं जुन्या फोन पेक्षा 200mAh बॅटरी वाढवली आहे.
  • ह्याआधी Carl Pei अधिकृतपणे सांगितलं आहे की Nothing Phone (2) फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येईल.

रिसायकलेबल मटेरियलपासून बनतील फोनचे पार्ट्स

अलीकडेच ट्विट करून कंपनीनं माहिती दिली आहे की कंपनी जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन फोनच्या जास्तीत जास्त पार्ट्समध्ये तिप्पट रिसायकलेबल आणि बायो-बेस्ड प्रोडक्ट्सचा वापर करत आहे. 9 सर्किट बोर्ड्समध्ये 100 टक्के रीसायकल टीन, मेन सर्किट बोर्डवर 100 टक्के रीसायकल कॉपर फॉइल आणि 28 स्टील पोर्ट्स वर 90 टक्के रीसायकल स्टीलचा वापर केला गेला आहे.

प्लास्टिक फ्री पॅकेजिंग सह येईल नथिंग फोन 2

इतकेच नव्हे तर नथिंग फोन 2 मध्ये प्लास्टिक फ्री पॅकेजिंग दिली जाईल, जी @FSC_IC मिक्स सर्टिफाइड असेल. ह्यात 60 टक्के रीसायकल फायबरचा वापर केला जाईल. तसेच फोनमध्ये अ‍ॅल्युमिनियम फ्रेम दिली जाईल, जी 100 टक्के रिन्यूएबल एनर्जीपासून बनवला गेला आहे.

The post Nothing Phone (2) च्या भारतीय लाँच आणि डिस्प्ले साइज कन्फर्म, फ्लिपकार्टवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-battery-size-confirm-buy-company-sale-on-flipkart/feed/ 0
4,700mAh battery सह Nothing Phone (2) जुलैमध्ये होईल लाँच, Carl Pei नं केलं कन्फर्म https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-confirmed-to-launch-in-july-2023-with-4700mah-battery-confirm-buy-ceo-carl-pei/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-confirmed-to-launch-in-july-2023-with-4700mah-battery-confirm-buy-ceo-carl-pei/#respond Fri, 26 May 2023 06:37:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21209 Nothing Phone (2) च्या लाँचवर कंपनीनं खूप आधीच शिक्कामोर्तब केला होता. आता कंपनी सीईओनी लेटेस्ट इंटरव्यू दरम्यान या फोनची लाँच टाइमलाइन कंफर्म केली आहे. इतकेच नव्हे तर सीईओ Carl Pei नं लाँचपूर्वीच ह्या फोनच्या बॅटरी फीचर्सचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे याआधी कंफर्म झालं आहे की फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येईल. नथिंग फोन […]

The post 4,700mAh battery सह Nothing Phone (2) जुलैमध्ये होईल लाँच, Carl Pei नं केलं कन्फर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Carl Pei नं एका इंटरव्यूमध्ये फोन लाँच टाइमलाइन कंफर्म केली आहे.
  • Nothing Phone (2) मध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर असेल.
  • Nothing Phone (2) मध्ये 12GB RAM मिळू शकतो.

Nothing Phone (2) च्या लाँचवर कंपनीनं खूप आधीच शिक्कामोर्तब केला होता. आता कंपनी सीईओनी लेटेस्ट इंटरव्यू दरम्यान या फोनची लाँच टाइमलाइन कंफर्म केली आहे. इतकेच नव्हे तर सीईओ Carl Pei नं लाँचपूर्वीच ह्या फोनच्या बॅटरी फीचर्सचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे याआधी कंफर्म झालं आहे की फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येईल.

नथिंग फोन (2) लाँच टाइमलाइन आणि बॅटरी डिटेल्स

Nothing चे सीईओ Carl Pei यांनी Forbes ला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये फोन बाबत महत्वाची माहिती शेयर केली आहे. ह्या इंटरव्यू दरम्यान सीईओनी सांगितलं आहे की हा डिवाइस जुलैमध्ये लाँच केला जाईल. तसेच, नथिंगचा हा फोन 4700mAh बॅटरीसह येईल.

नथिंग फोन (2) उपलब्धता

तसेच Pei नं इंटरव्यूमध्ये सांगितलं आहे की Phone (2) यूएससह ग्लोबली उपलब्ध होईल. गेल्यावर्षी Phone (1) ग्लोबली लाँच झाल्यानंतर देखील अनेक महिने यूएसमध्ये उपलब्ध झाला नाही. तसेच ह्याआधी कार्ल पेईनी सांगितलं होतं की हा फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये येईल. तसेच ह्यावेळी कंपनी यूएस मार्केटवर लक्ष देणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

नथिंग फोन (2) चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • लीकनुसार, Nothing Phone (2) मध्ये 120हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो.
  • नथिंग फोन 12जीबी रॅम आणि 8जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो.
  • तसेच, फोनचा 256जीबी आणि 512जीबी स्टोरेज व्हेरिएंट बाजारात येऊ शकतो.

नथिंग फोन (2) डिजाइन (लीक)

Nothing Fold (2) मध्ये ट्रान्सपरंट बॉडी मिळू शकते. हा फोन पहिल्या व्हर्जन प्रमाणे ग्लिफ लाइटिंग फीचरसह येऊ शकतो, अशी चर्चा आहे. ह्या वेगवेगळ्या रंगाच्या लाइट्स बाहेरून दिसत नाहीत परंतु कॉल किंवा नोटिफिकेशन आल्यावर चमकतात. तसेच ह्या फोनमध्ये वनप्लसच्या अलर्ट स्लाइडर प्रमाणे वेगळा डेडिकेटेड बटन देखील मिळू शकतो.

The post 4,700mAh battery सह Nothing Phone (2) जुलैमध्ये होईल लाँच, Carl Pei नं केलं कन्फर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-confirmed-to-launch-in-july-2023-with-4700mah-battery-confirm-buy-ceo-carl-pei/feed/ 0
Nothing Phone (2) बेंचमार्किंग साइटवर झाला लिस्ट, महत्वाच्या माहितीचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-listed-on-geekbench-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-listed-on-geekbench-specifications-leaked/#respond Wed, 17 May 2023 05:22:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20929 Nothing Phone (2) संबंधित अलीकडेच कंपनीनं खुलासा केला होता की हा मोबाइल ‘समर 2023’ म्हणजे जून, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात लाँच होईल. तर आता हा आगामी नथिंग फोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. ही लिस्टिंग 16 मे ची आहे ज्यात नथिंग फोन (2) च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. नथिंग फोन […]

The post Nothing Phone (2) बेंचमार्किंग साइटवर झाला लिस्ट, महत्वाच्या माहितीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
  • ह्यात Snapdragon 8 सीरीज चिपसेट दिसला आहे.
  • लिस्टिंगमध्ये 12GB RAM मॉडेल समोर आला आहे.

Nothing Phone (2) संबंधित अलीकडेच कंपनीनं खुलासा केला होता की हा मोबाइल ‘समर 2023’ म्हणजे जून, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात लाँच होईल. तर आता हा आगामी नथिंग फोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. ही लिस्टिंग 16 मे ची आहे ज्यात नथिंग फोन (2) च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.

नथिंग फोन (2) गीकबेंच लिस्टिंग

  • बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर हा फोन Nothing A065 मॉडेल नंबरनं सर्टिफाइड झाला आहे.
  • ह्याला सिंगल-कोरमध्ये 1253 बेंचमार्क स्कोर तर मल्टी-कोर मध्ये 3833 बेंचमार्क स्कोर मिळाला आहे.
  • Nothing Phone (2) गीकबेंचवर अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टमसह दाखवण्यात आला आहे.
  • गीकबेंचवर फोनच्या मदरबोर्ड सेक्शनमध्ये ‘taro’ लिहिण्यात आलं आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन1 चिपसेट दर्शवतो.
  • मोबाइल फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर असल्याचा खुलासा देखील झाला आहे ज्याची बेस फ्रिक्वेंसी 1.8गीगाहर्ट्ज असेल.
  • नथिंग फोन (2) चा प्रोसेसर 3.0गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालू शकतो.
  • बेंचमार्किंग साइटवर Nothing Phone (2) 12जीबी रॅमसह सर्टिफाइड झाला आहे.

नथिंग फोन (2) चे फीचर्स (संभाव्य)

  • ट्रान्सपरंट बॉडी
  • प्रीमियम डिजाईन
  • ग्लिफ लाइट
  • अलर्ट स्लायडर

Nothing Fold (2) एक प्रीमियम फोन असेल जो नथिंग फोन 1 पेक्षाही जास्त अ‍ॅडव्हान्स बनवला जात आहे. या फोनमध्ये पण ‘नथिंग’ ब्रँडची ओळख म्हणजे ट्रांसपेरेंट बॉडी मिळेल. मोबाइलमध्ये वापरण्यात आलेल्या ट्रान्सपरंट बॉडी एलिमेंटमुळे यातील हार्डवेयर पार्ट्स फोन बॉडीच्या बाहेरून पाहता येतात.

नथिंग फोन (2) च्या इंटरनल बॉडी मध्ये एलईडी स्ट्रिप्स फिट कारण्यासासाठी ह्यात ग्लिफ लाइटिंग फीचर दिलं जाऊ शकतं. ह्या वेगवेगळ्या रंगाच्या लाइट्स बाहेरून दिसत नाहीत परंतु कॉल किंवा नोटिफिकेशन आल्यावर चमकतात. ह्या फोनमध्ये वनप्लसच्या अलर्ट स्लाइडरप्रमाणे खास बटन देखील मिळू शकतो

नथिंग फोन (2) चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 120Hz AMOLED display
  • 12GB RAM + 256GB storage
  • 5,000mAh battery
  • Wireless Charging

गीकबेंच लिस्टिंगमध्ये समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्स व्यतिरिक्त लीकमध्ये जी माहिती मिळाली आहे त्यानुसार, ह्या फोनमध्ये 12जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. तसेच फोनचा 8जीबी रॅम व्हेरिएंट देखील लाँच होऊ शकतो. Nothing Phone (2) मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी ह्यात 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जी वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो शकते.

The post Nothing Phone (2) बेंचमार्किंग साइटवर झाला लिस्ट, महत्वाच्या माहितीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-listed-on-geekbench-specifications-leaked/feed/ 0
Nothing Phone (2) चा लाँच कंफर्म; कंपनीनं सांगितलं काही येणार दमदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launch-confirmed-with-transparent-design/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launch-confirmed-with-transparent-design/#respond Thu, 04 May 2023 05:34:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20681 Nothing Phone (1) बाजारात येण्यापूर्वी चर्चेचा विषय ठरला होता. हटके ट्रान्सपरंट डिजाईनमुळे लोकांना खूप आवडला आहे. आज नथिंग ब्रँडनं अधिकृतपणे घोषणा केली आहे की ते आपला दुसरा स्मार्टफोन घेऊन येत आहेत आणि हा मोबाइल Nothing Phone (2) नावानं लाँच होईल. नथिंग फोन (2) लाँचची घोषणा नथिंग कंपनीनं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून नवीन फोन लाँचची घोषणा […]

The post Nothing Phone (2) चा लाँच कंफर्म; कंपनीनं सांगितलं काही येणार दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nothing Phone (2) चं नाव ऑफिशियल झालं आहे.
  • हा फोन जून महिन्यांनंतर मार्केटमध्ये लाँच होईल.
  • यात पण ट्रान्सपरंट बॉडी आणि ग्लिफ लाइट मिळेल.

Nothing Phone (1) बाजारात येण्यापूर्वी चर्चेचा विषय ठरला होता. हटके ट्रान्सपरंट डिजाईनमुळे लोकांना खूप आवडला आहे. आज नथिंग ब्रँडनं अधिकृतपणे घोषणा केली आहे की ते आपला दुसरा स्मार्टफोन घेऊन येत आहेत आणि हा मोबाइल Nothing Phone (2) नावानं लाँच होईल.

नथिंग फोन (2) लाँचची घोषणा

नथिंग कंपनीनं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून नवीन फोन लाँचची घोषणा केली आहे. कंपनीनं ट्वीटमध्ये स्पष्टपणे Nothing Phone (2) च्या नावाचा खुलासा केला आहे. या ट्वीट व्यतिरिक्त कंपनीनं आपल्या ऑफिशियल वेबसाइटवर देखील फोनचं पेज लाइव्ह केलं आहे जे तुम्ही (इथे क्लिक करून) पाहू शकता.

Nothing Phone (2) कब लाँच केला जाईल

कंपनीनं फोनच्या नावाची माहिती देण्यासोबतच असं देखील सांगितलं आहे की Nothing Phone (2) या उन्हाळ्यात बाजारात येईल. नथिंगनं सध्या कोणतीही ठराविक तारीख मात्र सांगितली नाही परंतु स्पष्ट सांगितलं आहे की ब्रँडचा फोन (2) जून, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात बीच लाँच होईल.

नथिंग फोन (2) मधील फिचर

  • ट्रान्सपरंट बॉडी
  • प्रीमियम डिजाईन
  • ग्लिफ लाइट
  • अलर्ट स्लायडर

नथिंग ब्रँडचे सीईओ कार्ल पेई यांनी आधी सांगितलं आहे की Nothing Phone (2) एक प्रीमियम फोन असेल जो जुन्या नथिंग फोन 1 च्या तुलनेत जास्त अ‍ॅडव्हान्स असेल. तसेच या फोनमध्ये आधीप्रमाणे ट्रान्सपरंट बॉडी मिळेल. या मोबाइलमध्ये ट्रान्सपरंट बॉडी एलिमेंटचा वापर केला जाईल ज्यामुळे फोनमधील पार्ट्स बाहेरून पाहता येतील.

Nothing Fold (2) मध्ये ग्लिफ लाइटिंग देखील मिळू शकते. हा एक एलईडी स्ट्रिप्सचा सेट आहे जो फोन बॉडी मध्ये फिट होत तसेच नोटिफिकेशन किंवा कॉल आल्यावर ब्लिंक होतो. या फोनमध्ये एक डेडिकेटेड बटन असू शकतं जे वनप्लसच्या अलर्ट स्लाइडर किंवा आयफोनच्या साइड स्वीच बटन प्रमाणे काम करेल.

Nothing Phone (2) चे स्पेसिफिकेशन्स

  • Qualcomm Snapdragon 8 series SoC
  • 12GB RAM + 256GB storage

नथिंग फोन (2) बद्दल कंपनीनं सांगितलं आहे की हा मोबाइल फोन क्वॉलकॉमच्या 8 सीरीज मधील स्नॅपड्रॅगन चिपसेटसह लाँच होईल. आशा आहे की यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो. तसेच या फोनमध्ये 12जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज देखील दिली जाऊ शकते.

  • 120Hz AMOLED display
  • 5,000mAh battery

समोर आलेल्या लीक्स नुसार Nothing Phone (2) मध्ये अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते. तसेच वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देखील नवीन नथिंग फोनमध्ये मिळू शकतो.

The post Nothing Phone (2) चा लाँच कंफर्म; कंपनीनं सांगितलं काही येणार दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-launch-confirmed-with-transparent-design/feed/ 0
Nothing Phone (2) लवकरच येऊ शकतो भारतात; BIS वेबसाइटवर लिस्ट झाला फोन https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-spotted-on-bis-certification-website-india-launch-imminent/ https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-spotted-on-bis-certification-website-india-launch-imminent/#respond Mon, 27 Mar 2023 09:26:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19786 नथिंगनं अलीकडेच आपला नथिंग फोन (2) स्मार्टफोन येणार असल्याची माहिती दिली होती. असं बोललं जात आहे की हा एक अपर मिड-रेंज स्मार्टफोन असेल आणि स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसरसह येऊ शकतो. तसेच डिवाइस Q2/Q3 2023 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. आता ऑफिशियल रिलीजपूर्वी हा मोबाइल फोन भारतीय BIS सर्टिफिकेशन ऑथोरिटी वेबसाइटवर दिसला आहे, ज्यामुळे हा […]

The post Nothing Phone (2) लवकरच येऊ शकतो भारतात; BIS वेबसाइटवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Nothing Phone (2) भारतीय BIS सर्टफिकेशन वेबसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे.
  • BIS च्या लिस्टिंगमुळे फोनच्या भारतीय लाँचची शक्यता वाढली.
  • हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो.

नथिंगनं अलीकडेच आपला नथिंग फोन (2) स्मार्टफोन येणार असल्याची माहिती दिली होती. असं बोललं जात आहे की हा एक अपर मिड-रेंज स्मार्टफोन असेल आणि स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसरसह येऊ शकतो. तसेच डिवाइस Q2/Q3 2023 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. आता ऑफिशियल रिलीजपूर्वी हा मोबाइल फोन भारतीय BIS सर्टिफिकेशन ऑथोरिटी वेबसाइटवर दिसला आहे, ज्यामुळे हा भारतात लाँच होणार असल्याचा इशारा मिळाला आहे.

BIS वर लिस्ट झाला नथिंग फोन (2)

नथिंग फोन (2) (नथिंग AIN065 मॉडेल नंबरसह अलीकडेच इंडियन BIS सर्टिफिकेशनवरून सर्टिफाइड करण्यात आला आहे. बीआयएस सर्टिफिकेशन लिस्टिंगमधून आम्हाला डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्सची कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित झाली आहे की डिवाइस लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉनवर हे आहेत बेस्ट सेलिंग अफोर्डेबल आणि मिड रेंज स्मार्टफोन, पाहा लिस्ट

एखाद्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर मॉडेल नंबरसह हा फोन समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच लिस्टिंगमधील ब्रँडचा कल पाहता मॉडेल नंबरवरून नथिंग फोन (2) हे नाव स्पष्ट होत नाही. त्यामुळे ठामपणे सांगता येणार नाही. परंतु कंपनीचा जुना ट्रेंड पाहता असं वाटत आहे की ही लिस्टिंग नथिंग फोन (2) ची आहे.

कंपनीनं कन्फर्म केला Nothing Phone (2) चा लाँच

काही दिवसांपूर्वी बार्सिलोनामध्ये आयोजित मोबाइल वर्ल्ड कॉन्ग्रेस दरम्यान कंपनीचे को-फाउंडर कार्ल पेई यांनी Nothing Phone (2) बद्दल मोठी घोषणा केली होती. त्यांनी सांगितलं आहे की ”नथिंग फोन 2 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन सीरीजसह लाँच केला जाईल आणि हा जुन्या मॉडेलच्या तुलनेत प्रीमियम असेल.” परंतु त्यांनी लाँच डेट बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. हे देखील वाचा: फक्त 8999 रुपयांमध्ये 50MP कॅमेरा आणि 16GB RAM पावर; Infinix Hot 30i भारतात लाँच

Nothing Phone 2 चे स्पेसिफिकेशन (लीक)

Nothing Phone 2 चे स्पेसिफिकेशन्सबद्दल आतापर्यंत कोणतीही मोठी माहिती समोर आली नाही. परंतु इंटरनेटवर जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार पाहता, या फोनमध्ये तुम्हाला 12जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी मिळू शकते. राहिला प्रश्न डिस्प्लेचा तर फोनमध्ये तुम्हाला अ‍ॅमोलेड पॅनल मिळू शकतो. स्क्रीन साइजची माहिती अद्याप समोर आली नाही परंतु लीक रिपोर्टनुसार हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो.

The post Nothing Phone (2) लवकरच येऊ शकतो भारतात; BIS वेबसाइटवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nothing-phone-2-spotted-on-bis-certification-website-india-launch-imminent/feed/ 0