OTT - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 25 Apr 2023 04:06:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 JioCinema साठी लवकरच द्यावे लागू शकतात पैसे; सब्सक्रिप्शन प्लॅनची माहिती झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-subscription-plan-details-leaked-price-start-rs-2-one-day-validity/ https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-subscription-plan-details-leaked-price-start-rs-2-one-day-validity/#respond Tue, 25 Apr 2023 04:06:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20435 JioCinema सध्या सर्व युजर्ससाठी फ्री आहे. परंतु, कंपनी आपल्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सब्सक्रिप्शन प्लॅन लागू करणार आहे. अजूनतरी जियो सिनेमाच्या प्रीमियम प्लॅनच्या किंमतीची कोणतीही अधिकृत घोषणा कंपनीनं केली नाही. याची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. परंतु काही सोशल मीडिया ईन्फ्लूएंसर्सनी JioCinema Premium च्या किंमती सोशल मीडिया रेडिटवर शेयर केल्या आहेत. चला पुढे सविस्तर जाणून घेऊया. […]

The post JioCinema साठी लवकरच द्यावे लागू शकतात पैसे; सब्सक्रिप्शन प्लॅनची माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • JioCinema वर लवकरच सब्सक्रिप्शन लागू होणार आहे.
  • IPL 2023 संपल्यावर जियोसिनेमावर कंटेंट बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील.
  • रिपोर्टनुसार जियोसिनेमाचे तीन प्रकारचे सब्सक्रिप्शन असतील.

JioCinema सध्या सर्व युजर्ससाठी फ्री आहे. परंतु, कंपनी आपल्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सब्सक्रिप्शन प्लॅन लागू करणार आहे. अजूनतरी जियो सिनेमाच्या प्रीमियम प्लॅनच्या किंमतीची कोणतीही अधिकृत घोषणा कंपनीनं केली नाही. याची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. परंतु काही सोशल मीडिया ईन्फ्लूएंसर्सनी JioCinema Premium च्या किंमती सोशल मीडिया रेडिटवर शेयर केल्या आहेत. चला पुढे सविस्तर जाणून घेऊया.

Reddit वर समोर आलेल्या लीकनुसार जियोसिनेमाचे तीन सब्सक्रिप्शन समोर आले आहेत. विशेष म्हणजे यातील बेस प्लॅनची किंमत 2 रुपये असेल, ज्याची वैधता 1 दिवस आणि दोन डिवाइसचा सपोर्ट मिळेल. परंतु याची खरी किंमत 29 रुपये आहे. तसेच 3 महिन्यांच्या गोल्ड प्लॅनची किंमत 99 रुपये आणि यात देखील दोन डिवाइसचा सपोर्ट देण्यात येईल, ज्याची मूळ किंमत 299 रुपये आहे. हे देखील वाचा: 16GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो Vivo Y36 4G; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

त्याचबरोबर जियोसिनेमाच्या प्लॅटिनम प्लॅनची किंमत 599 रुपये आहे जो 12 महिन्यांच्या वैधतेसह येतो. याची मूळ किंमत 1,199 रुपये आहे. JioCinema प्लेटिनम प्लॅनमध्ये लाइव्ह शो वगळता सर्व कंटेंट अ‍ॅड-फ्री मिळेल. ज्यावरून अंदाज लावला जात आहे की JioCinema डेली आणि गोल्ड प्लॅन अ‍ॅड-सपोर्टेड कंटेंट देतील. तसेच यावरून स्पष्ट झालं आहे की सर्व तीन प्लॅन हाय क्वॉलिटीसह येतील.

नावही बदलणार

एका रिपोर्टनुसार JioCinema चे नाव ‘JioVoot’ होऊ शकते. परंतु कंपनीनं याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. कंपनीच्या मीडिया आणि कंटेंट बिजनेसचे अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की जियोसिनेमा आपल्या प्लॅटफॉर्मवर 100 पेक्षा जास्त चित्रपट आणि वेब सीरीज जोडण्याची योजना बनवत आहे.

जितो धन धना धन स्पर्धा

यंदा आयपीएलजी मजा वाढली आहे कारण टाटा आयपीएल 2023 जियो सिनेमावर मोफत टेलीकास्ट केली जात आहे. जिथे युजर्स मोफत आयपीएलचा लाभ घेऊ शकतात. तसेच रिलायन्स जियोनं एक नवीन ‘जितो धन धना धन’ कॉन्टेस्ट देखील सुरु केलं आहे. या कॉन्टेस्ट अंतगर्त युजर्स कारसह इतर अनेक भेटवस्तू जिंकू शकतात. ज्यात आतापर्यंत अनेक विजेत्यांना कार मिळाली आहे. हे देखील वाचा: लाँचपूर्वीच गीकबेंचवर दिसला Vivo S17 Pro, डिमेन्सिटी 7200 आणि 8जीबी रॅमसह येऊ शकतो बाजारात

जर तुम्ही ‘जीतो धन धना धन’ कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर आयपीएलच्या मॅच दरम्यान तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनवर पोट्रेट मोडमध्ये प्रत्येक मॅच बघावी लागेल. जिथे प्रत्येक ओव्हर नंतर एक प्रश्न विचारला जाईल. सर्व प्रश्नांसाठी चार ऑप्शन दिले जातील. ज्यात सर्वात जास्त वर्षांची उत्तरे देणाऱ्या युजरला विजेता घोषित केलं जाईल.

The post JioCinema साठी लवकरच द्यावे लागू शकतात पैसे; सब्सक्रिप्शन प्लॅनची माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-subscription-plan-details-leaked-price-start-rs-2-one-day-validity/feed/ 0
मार्च एंडिंग असलं तरी फुल टू करमणूक करतील ‘हे’ चित्रपट; पुढील महिन्यात येणार OTT वर https://www.91mobiles.com/marathi/upcoming-movies-on-ott-in-march-2023/ https://www.91mobiles.com/marathi/upcoming-movies-on-ott-in-march-2023/#respond Mon, 27 Feb 2023 10:31:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18182 साल 2023 चा तिसरा महीना म्हणजे मार्च सुरु होणार आहे. दर महिन्याप्रमाणे March 2023 मध्ये देखील प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्मवरून मनोरंजनाचा धमाकेदार डोस मिळणार आहे. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्मवर बॅक-टू-बॅक हिंदी चित्रपट रिलीज होण्यासाठी तयार आहेत. पुढील महिन्यात ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची ओटीटी डेब्यू सीरीज फॅमिली ड्रामा ‘गुलमोहर’, ‘वारिसु’चं […]

The post मार्च एंडिंग असलं तरी फुल टू करमणूक करतील ‘हे’ चित्रपट; पुढील महिन्यात येणार OTT वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2023 चा तिसरा महीना म्हणजे मार्च सुरु होणार आहे. दर महिन्याप्रमाणे March 2023 मध्ये देखील प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्मवरून मनोरंजनाचा धमाकेदार डोस मिळणार आहे. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्मवर बॅक-टू-बॅक हिंदी चित्रपट रिलीज होण्यासाठी तयार आहेत. पुढील महिन्यात ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची ओटीटी डेब्यू सीरीज फॅमिली ड्रामा ‘गुलमोहर’, ‘वारिसु’चं हिंदी व्हर्जन आणि अनुष्का शर्माचा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’ देखील स्ट्रीम होईल. चला जाणून घेऊया ओटीटीवर येणाऱ्या आगामी चित्रपटांची माहिती.

Upcoming Hindi movies on OTT in March 2023

  • Gulmohar
  • Varisu (Hindi)
  • Alone
  • Chakda ‘Xpress
  • Bhediya
  • Vikram Vedha
  • Chor Nikal Ke Bhaga

Gulmohar

Gulmohar पुढील महिन्यात 3 मार्चला Disney Plus Hotstar वर रिलीज होणार आहे. या नवीन ओटीटी रिलीजमधून ज्येष्ठ अभिनेत्री Sharmila Tagore यांचा ओटीटी डेब्यू होणार आहे. या फॅमली ड्रामामध्ये Manoj Vajpayee देखील असेल. हे देखील वाचा: तुम्हाला ‘सेल्फी किंग’ बनवेल हा Xiaomi फोन; 5 कॅमेरे आणि आयफोनच्या लूकसह शाओमी 13 लाइट लाँच

Varisu (Hindi)

Varisu (Hindi) अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पुढील महिन्यात 8 मार्चला रिलीज केला जाईल. चित्रपटात Vijay, Rashmika Mandanna, R Sarathkumar, Prabhu, Jayasudha, Prakash Raj, Srikanth आणि Shaam सारखे कलाकार आहेत.

Alone

मल्याळम चित्रपट अलोन (Alone) चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी तयार आहे. हा चित्रपट 3 मार्चला OTT डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज केला जाईल. चित्रपटात मोहनलाल आहेत, ज्यांनी कालीदासनची भूमिका साकारली आहे.

Chakda Xpress

प्रोसित रॉय द्वारे दिग्दर्शित आणि अभिषेक बनर्जी द्वारे लिखित, चकदा एक्सप्रेस चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू झूलन गोस्वामीचं आयुष्य दाखवतो. झूलन यांनी 2022 मध्ये अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. या चित्रपटात अनुष्का शर्मानं त्यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर मार्चमध्ये रिलीज होईल. परंतु अद्याप रिलीज डेटचा खुलासा झाला नाही.

Bhediya

थ्रिलर, हॉरर आणि कॉमेडी असलेला बॉलीवुडचा चित्रपट भेडिया ओटीटी रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. लीक रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट पुढील महिन्यात Jio Cinema आणि Voot वर रिलीज होईल. परंतु अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Vikram Vedha

2022 मधील सर्वात मोठ्या बॉलीवुड चित्रपटांपैकी एक विक्रम वेधा देखील काही आठवड्यांमध्ये ओटीटीवर येऊ शकतो. सैफ अली खान आणि ऋतिक रोशन मल्टी-स्टारर चित्रपट Jio Cinema आणि Voot वर रिलीज केली जाऊ शकतो. परंतु अजून याची ऑफिशियल घोषणा झालेली नाही. हे देखील वाचा: बर्फासारखा थंड राहणारा फोन! पण तुम्हाला खरेदी करता येणार नाही OnePlus चा हा हटके स्मार्टफोन

Chor Nikal Ke Bhaga

Chor Nikal Ke Bhaga Netflix वर पुढील महिन्यात 24 मार्च 2023 ला स्ट्रीम केली जाईल. हा प्लॅन ए प्लॅन बी, रितेश देशमुख आणि तमन्नाह-स्टारर नंतर नेटफ्लिक्स इंडियाचा नवीन ओरिजनल हिंदी चित्रपट असेल. तसेच एखाद्या चित्रपटात पहिल्यांदाच Yami Gautam आणि Sunny Kaushal एकत्र दिसतील.

The post मार्च एंडिंग असलं तरी फुल टू करमणूक करतील ‘हे’ चित्रपट; पुढील महिन्यात येणार OTT वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/upcoming-movies-on-ott-in-march-2023/feed/ 0
पाकिस्तानातील ‘हीरामंडी’ वर आधारित सीरीजचा Teaser झाला रिलीज; कुठे आणि कधी होणार स्ट्रीम, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/heeramandi-trailer-out-release-on-netflix-sanjay-leela-bhansali/ https://www.91mobiles.com/marathi/heeramandi-trailer-out-release-on-netflix-sanjay-leela-bhansali/#respond Mon, 20 Feb 2023 10:31:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17970 बॉलीवुडचे प्रसिद्ध फिल्ममेकर संजय लीला भन्साळी ओटीटीच्या दुनियेत पाऊल टाकण्यासाठी तयार आहेत. ता आपल्या नवीन वेब सीरीजच्या माध्यमातून ओटीटीवर येत आहेत, जिचे नाव ‘हीरामंडी’ आहे. Heeramandir Web Series चा टीजर जारी करून सीरिजचा फर्स्ट लुक व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करण्यात आला आहे, ज्यात बॉलिवुडच्या अनेक मशहूर लोकप्रिय अभिनेत्र्या दिसत आहेत. Heeramandi टीजर संजय लीला भन्साळी […]

The post पाकिस्तानातील ‘हीरामंडी’ वर आधारित सीरीजचा Teaser झाला रिलीज; कुठे आणि कधी होणार स्ट्रीम, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Heeramandi Web Series नेटफ्लिक्सवर रिलीज केली जाईल.
  • ‘हीरामंडी’ पाकिस्तान, लाहौरमधील रेडलाइट एरिया होता, ज्यावर सीरीज बनली आहे.
  • ही वेब सीरीज संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केली आहे.

बॉलीवुडचे प्रसिद्ध फिल्ममेकर संजय लीला भन्साळी ओटीटीच्या दुनियेत पाऊल टाकण्यासाठी तयार आहेत. ता आपल्या नवीन वेब सीरीजच्या माध्यमातून ओटीटीवर येत आहेत, जिचे नाव ‘हीरामंडी’ आहे. Heeramandir Web Series चा टीजर जारी करून सीरिजचा फर्स्ट लुक व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करण्यात आला आहे, ज्यात बॉलिवुडच्या अनेक मशहूर लोकप्रिय अभिनेत्र्या दिसत आहेत.

Heeramandi टीजर

संजय लीला भन्साळी यांच्या अपकमिंग वेब सीरीज हीरामंडीचा टीजर जारी करण्यात आला आहे. 18 फेब्रुवारीला OTT प्लॅटफॉर्म Netflix नं हीरामंडीचा फर्स्ट लुक जारी केला गेला आहे. सीरिजच्या फर्स्ट लुकमध्ये एकत्र अनेक बॉलिवुड अभिनेत्र्या दाखवण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप या सीरिजच्या रिलीज डेटचा खुलासा झाला नाही. हे देखील वाचा: दूरदर्शनच्या जुन्या मालिका येणार ऑनलाइन; प्रसार भारतीसाठी तयार होत आहे नवीन OTT प्लॅटफॉर्म

Heeramandi Star Cast

या वेब सीरीजमध्ये मनीषा कोयराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेगल सारख्या शानदार बॉलिवुड अभिनेत्र्या असतील. तसेच सीरीजच्या फर्स्ट लुकमध्ये सर्व रॉयल लुकमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. सीरीजचा टीजर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चाना उधाण आलं आहे.

Heeramandi स्टोरी

आगामी वेब सीरीज हीरामंडीची गोष्ट भारतीय स्वातंत्र्य पूर्व काळातील आहे. ज्यात सध्याच्या पाकिस्तानातील Heeramandi जागेची गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा एक रेडलाइट एरिया होता जो ‘शाही मोहल्ला’ नावाने देखील ओळखला जातो. फाळणीच्या आधी ‘हीरामंडी’ च्या वेश्या देशभरात प्रसिद्ध होत्या. बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा करण जोहरच्या कलंकमध्ये हिरांमंडीच्या नावाचा उल्लेख आला होता. त्यानंतर आता भन्साळी यांची सीरिज येत आहे. हे देखील वाचा: सर्वांच्या हातात असेल हा लो बजेट स्मार्टफोन; Redmi 12C ची लाँच डेट आली

या परिसराला राजकीय, सामाजिक इतिहास असल्याचे सांगितलं जातं. मुघलांच्या काळात अफगाणिस्तान, उजबेकिस्तानमधून हिरामंडीमध्ये मुली वेश्याव्यवसायासाठी आणल्या जात. ती एक मोठी बाजारपेठ होती. त्याकाळात वेश्याव्यवसायाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिले जात होते. मुघलकाळात या व्यवसायाकडे सांस्कृतिक भूमिकेतून पाहिलं गेलं. राजा महाराजांचे मनोरंजन करण्यासाठी तो भाग प्रसिद्ध होता. ‘हीरामंडी’ हे नाव शीख महाराजा रणजीत सिंह यांचे मंत्री हीरा सिंह डोगरा यांच्या नावावरून ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं. ‘हीरा सिंह’ यांनी याच जागेवर धान्याची एक मंडई स्थापन केली होती. जिचं नंतर रूपांतर वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या हीरामंडीमध्ये झालं.

The post पाकिस्तानातील ‘हीरामंडी’ वर आधारित सीरीजचा Teaser झाला रिलीज; कुठे आणि कधी होणार स्ट्रीम, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/heeramandi-trailer-out-release-on-netflix-sanjay-leela-bhansali/feed/ 0
दूरदर्शनच्या जुन्या मालिका येणार ऑनलाइन; प्रसार भारतीसाठी तयार होत आहे नवीन OTT प्लॅटफॉर्म https://www.91mobiles.com/marathi/govt-plans-to-launch-to-ott-platform-for-prasar-bharti-content/ https://www.91mobiles.com/marathi/govt-plans-to-launch-to-ott-platform-for-prasar-bharti-content/#respond Fri, 17 Feb 2023 12:43:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17932 OTT च्या दिशेनं प्रेक्षकांचा वाढत असलेलं ओढा पाहून आता लवकरच प्रसार भारतीचा कंटेंट देखील एका एक नवीन ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येईल. केंद्र सरकार आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्ये मोठा बदल करण्याचा विचार करत आह. प्रेक्षकांची संख्या पुन्हा एकदा वाढवण्यासाठी प्रसार भारतीच्या कंटेंटसाठी स्वतंत्र OTT Platform सुरु करण्याची योजना बनवत आहे. इंटरनेटविना मोबाइलवर पाहता येईल टेलिव्हिजन > माहिती […]

The post दूरदर्शनच्या जुन्या मालिका येणार ऑनलाइन; प्रसार भारतीसाठी तयार होत आहे नवीन OTT प्लॅटफॉर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांमध्ये घसरण होत आहे.
  • सरकार प्रसार भारतीचा एक ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करण्याचा निर्णय घेत आहे.
  • इंटरनेटविना मोबाइलवर टेलिव्हिजन पाहण्याची देखील सुविधा दिली जाईल.

OTT च्या दिशेनं प्रेक्षकांचा वाढत असलेलं ओढा पाहून आता लवकरच प्रसार भारतीचा कंटेंट देखील एका एक नवीन ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येईल. केंद्र सरकार आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्ये मोठा बदल करण्याचा विचार करत आह. प्रेक्षकांची संख्या पुन्हा एकदा वाढवण्यासाठी प्रसार भारतीच्या कंटेंटसाठी स्वतंत्र OTT Platform सुरु करण्याची योजना बनवत आहे.

इंटरनेटविना मोबाइलवर पाहता येईल टेलिव्हिजन >

माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्वा चंद्रा यांनी म्हटलं आहे की सरकार एफएम रेडियो स्टेशनचा नव्याने से लिलाव करणे, ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु करणे आणि डायरेक्ट-टू-मोबाइल (डीटूएम) टेलिव्हिजन प्रक्षेपणाची टेस्टिंग करण्याची योजना बनवत आहे. यातील डीटूएम टेक्नॉलॉजी कोणत्याही इंटरनेटविना मोबाइलवर टेलिव्हिजन स्ट्रीमिंग करण्याची सुविधा देऊ शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग सोसायटी एक्सपोमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म बाबत माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्वा चंद्रा यांनी सांगितलं की, “आम्ही प्रसार भारतीसाठी एक ओटीटी प्लॅटफॉर्म बनवण्याची योजना बनवत आहोत. आमची योजना 2023-24 मध्ये हे प्लॅटफॉर्म आणण्याची आहे.” हे देखील वाचा: “वापर जास्त असेल तर पैसे देखील जास्त द्यावे…”; Vodafone Idea च्या सीईओनं दिला दरवाढीचा इशारा

त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की ग्रामीण आणि सीमेवरील भागातील प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी आगामी आर्थिक वर्षात 600 कोटी रुपये दिले जातील. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आयआयटी-कानपुर आणि अनेक लॅब्सनी कर्तव्य पथ आणि आसपासच्या भागात ट्रांसमीटर स्थापन केले आहेत, ज्यातून दाखवून देण्यात येईल की टेलिव्हिजन सिग्नल थेट मोबाइलवर कशाप्रकारे प्रसारित करता येईल.

जुन्या मालिका पुन्हा पाहता येणार का

आम्हाला आशा आहे की जर प्रसार भारतीसाठी नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म आलं तर त्यात डीडी नॅशनल तसेच डीडी सह्याद्रीवरील जुन्या आणि अविस्मरणीय मालिका आणि शो देखील जोडले जातील. जरी ही माहिती अधिकृतपणे देण्यात आली नाही. परंतु असं झालं तर आपण कधीही दामिनी, तिसरा डोळा, चिमणराव आणि गुंड्याभाऊ, श्वेतांबरा, अस्मिता इत्यादी मराठी कार्यक्रम तसेच रामायण, महाभारत, चाणक्य, शक्तीमान, देख भाई देख, श्रीमान श्रीमति, सर्कस आणि ब्योमकेश बख्शी असे हिंदी शो देखील बघता येतील.

The post दूरदर्शनच्या जुन्या मालिका येणार ऑनलाइन; प्रसार भारतीसाठी तयार होत आहे नवीन OTT प्लॅटफॉर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/govt-plans-to-launch-to-ott-platform-for-prasar-bharti-content/feed/ 0
Vaalvi OTT release date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘वाळवी’ येणार ओटीटीवर; तारीख ठरली https://www.91mobiles.com/marathi/vaalvi-ott-release-date-revealed-when-and-where-to-watch-swwapnil-joshi-and-anita-date-kelkars-dark-comedy-thriller-online/ https://www.91mobiles.com/marathi/vaalvi-ott-release-date-revealed-when-and-where-to-watch-swwapnil-joshi-and-anita-date-kelkars-dark-comedy-thriller-online/#respond Wed, 15 Feb 2023 10:46:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17839 13 जानेवारी 2023 ला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर मराठी चित्रपट (Marathi movie) ‘वाळवी’ ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट ऑनलाइन रिलीज केला जात आहे. येत्या 24 फेब्रुवारीला वाळवी ZEE5 वर उपलब्ध होईल. यात स्वप्नील जोशी, अनिता दाते-केळकर, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे अशी तगडी स्टारकास्ट आहे. Vaalvi On Zee5 वाळवी आयएमडीबीवरील हाय रेटेड मराठी […]

The post Vaalvi OTT release date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘वाळवी’ येणार ओटीटीवर; तारीख ठरली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • डार्क कॉमेडी असलेला मराठी चित्रपट ‘वाळवी’ येतोय ओटीटीवर
  • झी5 वर घर बसल्या पाहता येणार ‘वाळवी’
  • स्वप्नील जोशी, अनिता दाते-केळकर, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे प्रमुख भूमिकेत

13 जानेवारी 2023 ला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर मराठी चित्रपट (Marathi movie) ‘वाळवी’ ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट ऑनलाइन रिलीज केला जात आहे. येत्या 24 फेब्रुवारीला वाळवी ZEE5 वर उपलब्ध होईल. यात स्वप्नील जोशी, अनिता दाते-केळकर, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Vaalvi On Zee5

वाळवी आयएमडीबीवरील हाय रेटेड मराठी चित्रपटांपैकी एक आहे, ज्यात 8.8 रेटिंग मिळाली आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाच्या गोष्टीचं, धक्कातंत्राचं आणि यातील अभिनयाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. येत्या 24 फेब्रुवारी 2023 ला मराठी चित्रपट वाळवी झी5 रिलीज केला जाईल, जो 190 पेक्षा जास्त देशांमधून पाहता येईल. झी5 वर पांडू, झोंबिवली, हर हर महादेव आणि टाइमपास 3 सारखे मराठी चित्रपट देखील आहेत. हे देखील वाचा: अरारारा खतरनाक! फोनवर तीन वर्षांची वॉरंटी; Nokia X30 5G च्या भारतीय लाँचची तारीख ठरली

वाळवीची गोष्ट

वाळवी चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अवनी (अनिता दाते-केळकर) आणि अनिकेत (स्वप्नील जोशी) चित्रपटाच्या सुरुवातीलाच एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. कर्जबाजारीपणावर आत्महत्या हा एकमेव पर्याय आहे असे त्यांना वाटत असते. परंतु हा आत्महत्येचा प्रत्यन नसून अनिकेत आणि त्याची गर्लफ्रेंड देविका (शिवानी सुर्वे) यांनी मिळून अवनीच्या हत्येचा रचलेला कट असतो.

घटस्फोट न देणाऱ्या अवनीपासून सुटका करवून घेण्यासाठी दोघांनी हा घाट घातलेला असतो. यात ते यशस्वी देखील होतात परंतु अवनीचा मृतदेह गायब होतो आणि अनिकेतच्या फोनवर तिचा कॉल येतो. तेव्हा चित्रपटातील गमतीदार भागाला सुरुवात होते. सुबोध भावेने यात एका सायकॅट्रिस्टची भूमिका बजावली आहे. हे देखील वाचा: New OTT releases this week: शाहिद करणार ओटीटीवर पदार्पण; या आठवड्यात येत आहेत जबरदस्त चित्रपट आणि सीरिज

दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की ते प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून भारावून गेले आहेत. लोकांनी एका वेगळ्या प्रयोगाचा आनंद घेतला आणि कौतुकही केलं आहे. वाळवी एक हटके डार्क थ्रिलर कॉमेडी चित्रपट आहे, या पद्धतीचे चित्रपट मराठीत खूप कमी बनतात. झी5 वरील चित्रपटाच्या प्रीमियरमुळे वाळवीच्या डिजिटल प्रवासाची उत्सुकता त्यांनाही आहे. जर अजूनही कोणी हा चित्रपट पहिला नसेल तर नक्कीच हा चित्रपट तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल अशी खात्री त्यांना वाटते.

The post Vaalvi OTT release date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘वाळवी’ येणार ओटीटीवर; तारीख ठरली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vaalvi-ott-release-date-revealed-when-and-where-to-watch-swwapnil-joshi-and-anita-date-kelkars-dark-comedy-thriller-online/feed/ 0
New OTT releases this week: शाहिद करणार ओटीटीवर पदार्पण; या आठवड्यात येत आहेत जबरदस्त चित्रपट आणि सीरिज https://www.91mobiles.com/marathi/ott-this-week-release-for-second-week-of-february-2023/ https://www.91mobiles.com/marathi/ott-this-week-release-for-second-week-of-february-2023/#respond Thu, 09 Feb 2023 07:37:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17655 ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिज बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच हे डिजिटल प्लॅटफॉर्म दर आठवड्याला नवीन चित्रपट आणि शो यादीत जोडत असतात. या आठवड्यात देखील तुमच्या करमणूकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत, जे तुम्ही मोबाइल फोन, टीव्ही किंवा लॅपटॉपवरून आरामात बघू शकता. या आठवड्यात Farzi च्या माध्यमातून शाहिद कपूर ओटीटीवर पदार्पण करत […]

The post New OTT releases this week: शाहिद करणार ओटीटीवर पदार्पण; या आठवड्यात येत आहेत जबरदस्त चित्रपट आणि सीरिज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिज बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच हे डिजिटल प्लॅटफॉर्म दर आठवड्याला नवीन चित्रपट आणि शो यादीत जोडत असतात. या आठवड्यात देखील तुमच्या करमणूकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत, जे तुम्ही मोबाइल फोन, टीव्ही किंवा लॅपटॉपवरून आरामात बघू शकता. या आठवड्यात Farzi च्या माध्यमातून शाहिद कपूर ओटीटीवर पदार्पण करत आहे. तसेच Salaam Venky आणि Thunivu सारखे शानदार चित्रपट देखील ऑनलाइन स्ट्रीम होण्यासाठी तयार आहेत. चला जाणून घेऊया आगामी चित्रपट आणि वेब सीरीज कधी आणि कुठे रिलीज होतील.

New OTT releases this week

  • Farzi
  • Salaam Venky
  • Thunivu
  • Love Shadi Drama
  • Your place Or Mine

Farzi

Shahid Kapoor पहिल्यांदाच OTT Platform डिजिटल डेब्यू करणार आहे. शाहिदची Farzi Web Series या आठवड्यात शुक्रवारी म्हणजे 10 फेब्रुवारीला ऑनलाइन रिलीज केली जाईल. ही सीरीज Amazon Prime Video वर पाहता येईल.

Salaam Venky

झी5 वर बॉलीवुडची दिग्गज अभिनेत्री काजोलचा चित्रपट देखील येत आहे. मोठ्या पडद्यावर रिलीज झाल्यानंतर काजोलचा ‘सलाम वेंकी’ 10 फेब्रुवारीसाठी प्रेक्षकांसाठी ओटीटी (OTT) वर रिलीज केला जाणार आहे.

Thunivu

तामिळ चित्रपट थुनिवु मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातल्यानंतर आता हिंदीत ओटीटी (Thunivu Hindi OTT Release Date) वर येत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार Ajit Kumar चा हा चित्रपट 8 फेब्रुवारीला Netflix प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

Love Shadi Drama

हंसिका मोटवानीनं काही दिवसांपूर्वीच आपल्या बॉयफ्रेंड सोहेल कथूरिया सोबत लग्न केलं होतं. आता हंसिका ‘लव शादी ड्रामा’ सीरीजची ऑनलाइन स्ट्रीमिंग 10 फेब्रुवारीला डिज्नी प्लस हॉटस्टारवर होईल.

Your place Or Mine

जर तुम्ही हॉलीवुड प्रेमी असाल तर या आठवड्यात 10 फेब्रुवारीला रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘यॉर प्लेस आणि माइन’ ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करता येईल.

Not Dead Yet

या इंग्रजी कॉमेडी वेब सीरिजमधून Nell Serrano या तरुणीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तिचं ब्रेकअप झालंय, वय झालंय आणि आर्थिक स्थिती देखील इतकी खास नाही. या सीरिजमधून तिचं जुनं आयुष्य परत मिळवण्यासाठी धडपड करताना डिज्नी प्लस हॉटस्टारवर 9 फेब्रुवारीपासून दिसेल.

The post New OTT releases this week: शाहिद करणार ओटीटीवर पदार्पण; या आठवड्यात येत आहेत जबरदस्त चित्रपट आणि सीरिज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ott-this-week-release-for-second-week-of-february-2023/feed/ 0
Family Man 3 नव्हे तर Gulmohar बद्दल केली होती मनोज वाजपेयीनं पोस्ट; नवीन चित्रपटाची दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/manoj-bajpayee-family-man-3-release-date-cast-amazon-prime/ https://www.91mobiles.com/marathi/manoj-bajpayee-family-man-3-release-date-cast-amazon-prime/#respond Wed, 08 Feb 2023 06:36:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17602 नवीन अपडेट: मनोज वाजपेयी यांची वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ च्या तिसऱ्या सीजनबद्दल कालपर्यंत आनंद व्यक्त करत असलेले प्रेक्षक आता नाराज झाले आहेत. मंगळवारी मनोज वाजपेयी यांनी इशारा केला होता की या होळीच्या दिवशी ते आपली फॅमिली घेऊन येत आहेत. त्यावरून अंदाज लावण्यात आला होता की द फॅमिली मैन’ का सीजन 3 होळीच्या दिवशी येत […]

The post Family Man 3 नव्हे तर Gulmohar बद्दल केली होती मनोज वाजपेयीनं पोस्ट; नवीन चित्रपटाची दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नवीन अपडेट: मनोज वाजपेयी यांची वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ च्या तिसऱ्या सीजनबद्दल कालपर्यंत आनंद व्यक्त करत असलेले प्रेक्षक आता नाराज झाले आहेत. मंगळवारी मनोज वाजपेयी यांनी इशारा केला होता की या होळीच्या दिवशी ते आपली फॅमिली घेऊन येत आहेत. त्यावरून अंदाज लावण्यात आला होता की द फॅमिली मैन’ का सीजन 3 होळीच्या दिवशी येत आहे. परंतु, असं नाही कारण ते त्यांच्या आगामी चित्रपट Gulmohar बद्दल बोलत होते, जो होळीच्या आसपास रिलीज होत आहे.

मनोज यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला होता. व्हिडीओमध्ये कुठेही सीरीजच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. परंतु फॅमली नाव ऐकताच इंटरनेटवर The Famliy Man 3 Release Date बद्दल बातम्या येऊ लागल्या. परंतु दुसऱ्याच दिवशी बॉलीवुड अ‍ॅक्टरनं आपल्या इन्स्टाग्रामवर अपकमिंग ओटीटी फिल्म Gulmohar चा पोस्टर शेयर केला आहे ज्यात शर्मिला टॅगोर, कावेरी सेठ, सिमरन, सूरज शर्मा, उत्सवी झा देखील दिसत आहेत.

Family Man 3 release date ची वाट पाहत असलेल्या प्रेक्षकांसाठी खुशखबर आली आहे. Manoj Bajpayee यांच्या लोकप्रिय वेब सीरीज The Family Man च्या तिसऱ्या सीजनची रिलीज डेट समोर आली आहे. बॉलीवुड अ‍ॅक्टर मनोज वाजपेयी यांनी स्वतः आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यात त्यांनी ‘फॅमिली’ चा उल्लेख केला आहे. या व्हिडीओवरून अंदाज लावला जात आहे की यंदा होळीच्या दिवशी फॅमली मॅन 3 ची प्रतीक्षा संपणार आहे.

होळीच्या दिवशी रिलीज होणार Family Man 3?

मनोज वाजपेयी यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, “हॅलो, हॅलो, हॅलो, बराच वेळ झाला नाही का? माझं बोलणं नीट ऐका. यंदा होळीच्या वेळी तुमच्या फॅमिलीसाठी येत आहे माझी फॅमिली घेऊन, सोबत राहा.” मनोज वाजपेयी यांनी हा व्हिडीओ शेयर करताना कॅप्शन लिहलं आहे की, ‘फॅमिलीसोबत येत आहे, स्वागत करणार नाही का.” हे देखील वाचा: New OTT releases this week: या आठवड्यात रिलीज होत आहेत या शानदार सीरीज व चित्रपट

मनोज वाजपेयीच्या या व्हिडीओवर फॅमिली मॅन सीरिजमधील अभिनेत्री श्रेया धन्वंतरी आणि अभिनेता शहाब अली यांनी कमेंट केली आहे. यावरून अंदाज लावला जात आहे की यंदा होळी म्हणजे 8 फेब्रुवारीला द फॅमली मॅन 3 रिलीज केली जाईल.

परंतु असं देखील होऊ शकतं की या दिवशी Family Man 3 चा ट्रेलर जारी केला जाईल. हा फक्त अंदाज आहे अद्याप अधिकृत रिलीज डेटबद्दल ठोस माहिती हाती लागली नाही. मनोजनी देखील फॅमली मॅनचं नाव घेतलं नाही. त्यामुळे अजूनतरी स्पष्ट काहीच सांगता येणार नाही.

The post Family Man 3 नव्हे तर Gulmohar बद्दल केली होती मनोज वाजपेयीनं पोस्ट; नवीन चित्रपटाची दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/manoj-bajpayee-family-man-3-release-date-cast-amazon-prime/feed/ 0
यामी गौतमचा जबरदस्त चित्रपट येतोय ऑनलाइन; ZEE5 वर ‘या’ तारखेला स्ट्रीम होणार ‘Lost’ https://www.91mobiles.com/marathi/yami-gautam-movie-lost-to-release-on-zee5-ott-february-16/ https://www.91mobiles.com/marathi/yami-gautam-movie-lost-to-release-on-zee5-ott-february-16/#respond Mon, 06 Feb 2023 07:43:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17517 ‘Lost’ OTT Release: यामी गौतम पुन्हा एकदा एक जबरदस्त नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज न करता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जाईल. यामी गौतम स्टारर ‘Lost’ चित्रपट पुढील आठवड्यात Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पोस्टर समोर आला होता, तर आता आता याचा […]

The post यामी गौतमचा जबरदस्त चित्रपट येतोय ऑनलाइन; ZEE5 वर ‘या’ तारखेला स्ट्रीम होणार ‘Lost’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 16 फेब्रुवारी 2023 ला ऑनलाइन येईल यामी गौतमचा चित्रपट.
  • या चित्रपटात यामी साकारणार पत्रकाराची भूमिका.
  • यामी गौतमचा ‘Lost’ चित्रपट ZEE5 वर स्ट्रीम केला जाईल

‘Lost’ OTT Release: यामी गौतम पुन्हा एकदा एक जबरदस्त नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज न करता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जाईल. यामी गौतम स्टारर ‘Lost’ चित्रपट पुढील आठवड्यात Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पोस्टर समोर आला होता, तर आता आता याचा ट्रेलर व रिलीज डेट देखील समोर आली आहे.

Zee5 ओटीटी प्लॅटफॉर्मनं आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून ‘Lost’ चित्रपटाचा ट्रेलर शेयर केला आहे. या ट्रेलरसह चित्रपटाची स्ट्रीमिंग डेट देखील सांगण्यात आली आहे. यामी गौतमचा Lost चित्रपट 16 फेब्रुवारी 2023 ला Zee5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होईल. लॉस्ट हा सिनेमा गोव्यात आयोजित 53 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला होता. या सिनेमाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. हे देखील वाचा: New OTT releases this week: या आठवड्यात रिलीज होत आहेत या शानदार सीरीज व चित्रपट

‘Lost’ ची गोष्ट

2 मिनिटं 19 सेकंदाच्या या ट्रेलरची सुरूवात होते ती बेपत्ता लोकांच्या विषयापासून. होय, भारतात दररोज दर 2 मिनिटाला 885 लोक हरवतात, बेपत्ता होतात. यामी गौतम या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित असल्याचं सांगण्यात आलं आहे.

‘Lost’ या चित्रपटात यामी गौतम एका ईशान नावाच्या मुलाच्या बातमीवर काम करत आहे, जो हरवला आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की ईशानच्या बातमीवर काम करत असताना यामीला अनेक संकटांचा सामाना करावा लागत आहे, ज्यात अनेक प्रसंग जीवावर बेतणारे दाखवले आहेत. यामी राजकीय आणि ऑफिशियल दबावाखाली काम करत आहे.

हा एक सस्पेंस-थ्रिलर चित्रपट आहे, जो अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी दिग्दर्शित केला आहे. अनिरुद्ध यांनी पिंक सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. यामी गौतम व्यतिरिक्त या चित्रपटात पंकज कपूर प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तसेच राहुल खन्ना, नील आणि तुषार पांडे यासारखे अनेक स्टार्स चित्रपटात आहेत.

गेल्यावर्षी यामीची दोन चित्रपट आले होते. यातील अ थर्सडे डिज्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम करता येईल. तर अभिषेक बच्चन सोबत असलेला यामीचा ‘दसवी’ चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. हे देखील वाचा: सुश्मिता सेनच्या Aarya Season 3 ची शूटिंग झाली सुरु, प्रोमो देखील आला समोर

The post यामी गौतमचा जबरदस्त चित्रपट येतोय ऑनलाइन; ZEE5 वर ‘या’ तारखेला स्ट्रीम होणार ‘Lost’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/yami-gautam-movie-lost-to-release-on-zee5-ott-february-16/feed/ 0
New OTT releases this week: या आठवड्यात रिलीज होत आहेत या शानदार सीरीज व चित्रपट https://www.91mobiles.com/marathi/ott-releases-in-first-week-of-february-2023/ https://www.91mobiles.com/marathi/ott-releases-in-first-week-of-february-2023/#respond Thu, 02 Feb 2023 09:37:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17441 जर तुम्ही त्या प्रेक्षकांपैकी असाल ज्यांना घर बसल्या चित्रपट आणि वेब सीरीज बघायला आवडतात, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातही दर्जेदार चित्रपट आणि वेब सीरिज वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून रिलीज (New OTT releases this week) होणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घर बसल्या मोबाइल फोन, टीव्ही व लॅपटॉपवर बघता […]

The post New OTT releases this week: या आठवड्यात रिलीज होत आहेत या शानदार सीरीज व चित्रपट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही त्या प्रेक्षकांपैकी असाल ज्यांना घर बसल्या चित्रपट आणि वेब सीरीज बघायला आवडतात, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातही दर्जेदार चित्रपट आणि वेब सीरिज वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून रिलीज (New OTT releases this week) होणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घर बसल्या मोबाइल फोन, टीव्ही व लॅपटॉपवर बघता येतील. या आठवड्यात Class पासून Jehanabad of Love & War आणि Black Panther 2 सारखे चित्रपट व सीरीज ऑनलाइन स्ट्रीम होण्यासाठी तयार आहेत. चला जाणून घेऊया आगामी चित्रपट आणि वेब सीरीज कधी आणि कुठे रिलीज होणार.

New OTT releases this week

  • Class
  • Jehanabad – Of Love & War
  • Pamela, a love story
  • Black Panther: Wakanda Forever
  • Viking Wolf

Class

क्लास एक आगामी क्राइम थ्रिलर ड्रामा सीरीज आहे, जी लोकप्रिय स्पॅनिश सीरीज एलीटचं अधिकृत अ‍ॅडाप्टेशन आहे. यात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील धीरज, बल्ली आणि सबा या तीन मुलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ज्यांना दिल्लीतील एका हाय-प्रोफाईल स्कुलमध्ये स्कॉलरशिप मिळते. ही सीरीज 3 फेब्रुवारीपासून Netflix वर पाहता येईल. हे देखील वाचा: Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली; आता प्रीबुक केल्यास भरपूर फायदे

Jehanabad – Of Love & War

सुधीर मिश्रा दिग्दर्शित जहानाबाद – ऑफ लव अँड वॉर एक जबरदस्त क्राइम ड्रामा सीरीज आहे. ही सीरीज वास्तविक घटनांपासून प्रेरित आहे. ही क्राइम ड्रामा थ्रिलर सीरीज निरागस प्रेम आणि वास्तवातील गोंधळ यांच्यातील संघर्षाची गोष्ट दाखवते. सीरीज को 3 फेब्रुवारीला Sony LIV वर रिलीज केली जात आहे.

Pamela, a love story

पामेला, अ लव्ह स्टोरी ही सीरीज पॉप कल्चर आयकॉन पामेला अँडरसनच्या आयुष्यवर आधारित आहे. पामेला या सीरीजच्या माध्यमातून आपल्या खऱ्या भावना आणि आपलं सत्य सांगत आहे. हा शो 31 जानेवारीला Netflix वर रिलीज केला गेला आहे.

Black Panther: Wakanda Forever

1 फेब्रुवारीपासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर Black Panther: Wakanda Forever स्ट्रीम करता येईल. चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की कशाप्रकारे वकंडाचा राजा टी’छल्लाच्या मृत्युनंतर राज्याचा कारभार चालतो. हा चित्रपट 2018 च्या ब्लॅक पँथर चित्रपटाचा पुढील भाग आहे. हे देखील वाचा: रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह येतील Vivo V27 आणि Vivo V27 Pro; लाँच पूर्वीच मोठा खुलासा

Viking Wolf

वायकिंग वुल्फ नॉर्वेची पहिला वेयरवोल्फ चित्रपट (वायकिंगुलवेन) आहे, ज्यात एक खतरनाक थ्रिलर गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 3 फेब्रुवारीपासून Netflix वर स्ट्रीम करता येईल.

The post New OTT releases this week: या आठवड्यात रिलीज होत आहेत या शानदार सीरीज व चित्रपट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ott-releases-in-first-week-of-february-2023/feed/ 0
सुश्मिता सेनच्या Aarya Season 3 ची शूटिंग झाली सुरु, प्रोमो देखील आला समोर https://www.91mobiles.com/marathi/aarya-season-3-promo-video-release-soon-on-hotstar/ https://www.91mobiles.com/marathi/aarya-season-3-promo-video-release-soon-on-hotstar/#respond Tue, 31 Jan 2023 06:32:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17356 सुश्मिता सेनच्या धमाकेदार वेब सीरीज Arya चा सीजन 3 लवकरच ओटीटीवर येणार आहे. या वेब सीरीजचे 2 सीजन आधीच Disney Plus Hotstar वर रिलीज झाले आहेत. तर, आता ‘आर्या 3’ चा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोनंतर स्पष्ट झालं आहे की या सीरीजच्या नव्या सीजनची शूटिंग सुरु झाली आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये सुश्मिताचा खूप खतरनाक […]

The post सुश्मिता सेनच्या Aarya Season 3 ची शूटिंग झाली सुरु, प्रोमो देखील आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Arya चा सीजन 3 डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल.
  • Arya Season 3 ची शूटिंग सुरु झाली आहे.
  • Arya मध्ये यावेळी बॉस लेडीच्या रूपात दिसेल सुश्मिता.

सुश्मिता सेनच्या धमाकेदार वेब सीरीज Arya चा सीजन 3 लवकरच ओटीटीवर येणार आहे. या वेब सीरीजचे 2 सीजन आधीच Disney Plus Hotstar वर रिलीज झाले आहेत. तर, आता ‘आर्या 3’ चा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोनंतर स्पष्ट झालं आहे की या सीरीजच्या नव्या सीजनची शूटिंग सुरु झाली आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये सुश्मिताचा खूप खतरनाक अंदाज दिसत आहे. या सीरिजच्या प्रोमोला नेटकऱ्यांनी उचलून धरलं आहे.

Aarya Season 3 Promo Video

डिज्नी प्लस हॉटस्टार आणि सुश्मिता सेन यांनी हा प्रोमो सोशल मीडिया चॅनेल इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. प्रोमोमध्ये सुश्मिता सेनचा खतरनाक लुक समोर आला आहे. काळ्या रंगाचा ओव्हरकोट, डोळ्यांवर गॉगल, एका हातात सिगार आणि दुसऱ्या हातात बंदूक असा तिचा डॅशिंग अवतार प्रोमोमध्ये दिसत आहे. या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ‘ती येत आहे आहे आणि मजबूत इराद्यांसह. हॉट स्टार स्पेशल्सच्या आर्या 3 ची शूटिंग सध्या सुरु आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर लवकरच रिलीज होईल. #AaryaS3OnHotstar’

आर्याचे दोन्ही सीजन प्रेक्षकांना भरपूर आवडले होते. पहिल्या सीजननंतर दुसऱ्या आणि दुसऱ्यानंतर तिसऱ्या सीजनची मागणी करण्यात आली होती, ज्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. अद्याप या सीरिजची रिलीज डेट समोर आली नाही. परंतु असं बोललं जात आहे की यंदा Arya Season 3 रिलीज केला जाईल. माहितीनुसार राम माधवानी निर्मित आर्या सीजन 3 मध्ये सुश्मिता सेन व्यतिरिक्त सिकंदर खेर आणि विकास कुमार देखील असतील. आशा आहे की यावेळी नवीन सीजनमध्ये आणखी नवीन पात्रांचा समावेश केला जाईल.

राजस्थान मध्ये घडणारी ही क्राइम थ्रिलर गोष्ट आर्या सरीन (सुष्मिता) च्या भोवती फिरते जी एका माफिया गँगमध्ये आहे आणि आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लेडी डॉन बनते. या वेब सीरीजमध्ये सुश्मिताच्या भूमिकेचं कौतुक मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे. 2021 मध्ये या सीरिजचा दुसरा सीजन आला होता ज्यात सुश्मिता आपल्या सर्व शत्रूंचा खात्मा करते आणि मुलांना घेऊन देश सोडते. आता सगळं शांत होण्याऐवजी तिचा डाव तिचाय्वर उलटणार आणि तिचा आणखी एक शत्रू आहे, त्याचीच एन्ट्री नव्या सीझनमध्ये दाखवली जाईल.

The post सुश्मिता सेनच्या Aarya Season 3 ची शूटिंग झाली सुरु, प्रोमो देखील आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/aarya-season-3-promo-video-release-soon-on-hotstar/feed/ 0