Redmi Note 12 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 30 Mar 2023 10:24:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi Note 12 4G फोनची भारतात एंट्री; फोनमध्ये 50MP कॅमेऱ्यासह 6GB रॅम https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/#respond Thu, 30 Mar 2023 08:59:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19872 आज शाओमीनं भारतात Redmi Note 12 Series मध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आणलेला Redmi Note 12 4G देशात सादर केला आहे. कंपनीनं Redmi Note 12 4G स्मार्टफोन फक्त 14,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात आला आहे जो 6GB RAM, Snapdragon 685 चिपसेट, 50MP Camera आणि 33W 5,000mAh Battery ला सपोर्ट […]

The post Redmi Note 12 4G फोनची भारतात एंट्री; फोनमध्ये 50MP कॅमेऱ्यासह 6GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Snapdragon 685 चिपसेट असलेला पहिला फोन भारतात.
  • 6GB RAM सह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
  • Redmi Note 12 4G फोन 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो


आज शाओमीनं भारतात Redmi Note 12 Series मध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात आणलेला Redmi Note 12 4G देशात सादर केला आहे. कंपनीनं Redmi Note 12 4G स्मार्टफोन फक्त 14,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात आला आहे जो 6GB RAM, Snapdragon 685 चिपसेट, 50MP Camera आणि 33W 5,000mAh Battery ला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 4G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67 FHD+ Super AMOLED 120Hz Display
  • 6GB RAM + 128GB Storage
  • Qualcomm Snapdragon 685
  • 50MP+8MP+2MP Camera
  • 33W 5,000mAh Battery

रेडमी नोट 12 4जी फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा एक सुपर अ‍ॅमोलेड पॅनल आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1200निट्स पिक ब्राइटनेस, DCI-P3 कलर गेमुट आणि 4,500:000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर चालतो. हे देखील वाचा: Moto G13 4G भारतात लाँच! यात आहे 90Hz डिस्प्ले, MediaTek Helio G85 SoC आणि खूप काही

Redmi Note 12 4G फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 685 चिपसेट देण्यात आला आहे. रेडमी नोट 12 4जी 6GB LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंत UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो. यात वर्च्युअली 5GB अतिरिक्त रॅम पवार मिळवता येईल. तसेच यातील स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येईल.

रेडमी नोट 12 4जी फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 30 दिवस वैधता आणि 30जीबी डेटासह आला Vi चा नवीन प्लॅन

Redmi Note 12 4G ड्युअल सिम फोन आहे. हा फोन आयपी53 रेटेड आहे ज्यामुळे हा काही प्रमाणात वॉटर प्रूफ बनतो. 3.5एमएम जॅक आणि आयआर ब्लास्टर सोबतच स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी यह रेडमी नोट 12 4जी 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

Redmi Note 12 4G ची किंमत

Redmi Note 12 4G दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाॅन्च झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. तर फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंट 16,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. रेडमी नोट 12 ची विक्री 6 एप्रिलपासून सुरु होईल तसेच फोन Sunrise Gold, Lunar Black आणि Ice Blue कलरमध्ये विकत घेता येईल.

The post Redmi Note 12 4G फोनची भारतात एंट्री; फोनमध्ये 50MP कॅमेऱ्यासह 6GB रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-launched-in-india-check-price-specifications-sale-offer-details/feed/ 0
Redmi Note 12 4G जागतिक बाजारात लाँच, Snapdragon 685 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-launched-with-snapdragon-685-in-global-market/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-launched-with-snapdragon-685-in-global-market/#respond Fri, 24 Mar 2023 05:22:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19709 रेडमी नोट 12 4जी भारतात 30 मार्चला लाँच केला जाणार आहे. परंतु त्याआधीच हा हँडसेट ग्लोबल मार्केटमध्ये अधिकृतपणे सादर करण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगन 685 चिपसेटसह येणारा हा जगातील पहिला फोन बनला आहे जो या प्रोसेसरसह आला आहे. रेडमी नोट 12 लाइनअपमध्ये हा पहिला फोन नाही याआधी Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G […]

The post Redmi Note 12 4G जागतिक बाजारात लाँच, Snapdragon 685 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi Note 12 ग्लोबली सादर केला गेला आहे.
  • हा जगातील पहिला फोन ज्यात स्नॅपड्रॅगन 685 चिपसेट आहे.
  • रेडमी नोट 12 मोबाइल एक 4G-ओन्ली डिवाइस आहे.

रेडमी नोट 12 4जी भारतात 30 मार्चला लाँच केला जाणार आहे. परंतु त्याआधीच हा हँडसेट ग्लोबल मार्केटमध्ये अधिकृतपणे सादर करण्यात आला आहे. स्नॅपड्रॅगन 685 चिपसेटसह येणारा हा जगातील पहिला फोन बनला आहे जो या प्रोसेसरसह आला आहे. रेडमी नोट 12 लाइनअपमध्ये हा पहिला फोन नाही याआधी Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G जागतिक बाजारात आले आहेत. चला जाणून घेऊया या सीरिजमधील सर्वात नवीन स्मार्टफोनविषयी.

Redmi Note 12 ची किंमत

हा नवीन स्मार्टफोन 4/6/8GB रॅम आणि 64/128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. डिवाइसच्या बेस व्हर्जनची किंमत 199 युरो (जवळपास 17,000 रुपये) आहे आणि स्मार्टफोनच्या मिड व्हर्जनची किंमत 229.99 युरो (जवळपास 20,600 रुपये) आहे. तर 128 जीबी स्टोरेजच्या मोठ्या मॉडेलची किंमत 249.99 युरो (जवळपास 22,000 रुपये) आहे. कंपनीनं हा फोन आइस ब्लू, ओनेक्स ग्रे आणि मिंट ग्रीन कलरमध्ये सादर केला आहे. हे देखील वाचा: 32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन फक्त 12,499 रुपयांमध्ये! Tecno Spark 10 Pro ची भारतात एंट्री

Redmi Note 12 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Redmi Note 12 4G मध्ये 6.67-इंच AMOLED FHD+ 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे जो सीरीजच्या इतर डिवाइसमध्ये देखील आहे. स्क्रीनची पीक ब्राईटनेस 1,200 निट्स, एक DCI-P3 कलर गेमुट आणि 4,500:000:1 चा कंट्रास्ट रेशियो आहे. तसेच, यात स्नॅपड्रॅगन 685 चिपसेट आहे, जो जुन्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटचा अपग्रेडेड व्हर्जन आहे. तसेच फोन 4GB / 6GB / 8GB LPDDR4x RAM आणि 128GB / 256GB UFS 2.2 स्टोरेजसह आला आहे. जोडीला एक्स्ट्रा स्टोरेजसाठी, डिवाइसमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 4 एप्रिलला येणार भारतात, जोडीला येतायत OnePlus Nord Buds 2

फोनमध्ये कॅमेरा स्पेक्स पाहता फ्रंटला यात 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. बॅक पॅनलमध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड यूनिट आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच नोट 12 मध्ये 33W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी आहे. डिवाइसच्या डावीकडे असलेल्या पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

The post Redmi Note 12 4G जागतिक बाजारात लाँच, Snapdragon 685 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-launched-with-snapdragon-685-in-global-market/feed/ 0
Redmi 12C आणि Redmi Note 12 4G होऊ शकतात भारतात दाखल; लीकमधून समजली माहिती https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-note-12-4g-india-launch-tipped/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-note-12-4g-india-launch-tipped/#respond Tue, 07 Mar 2023 03:23:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18421 चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi लवकरच भारतासह जगभरात Redmi 12C आणि Redmi Note 12 4G स्मार्टफोन लाँच करण्याची योजना बनवत आहे. कंपनीनं अजूनही या हॅंडसेट्सच्या लाँच डेटची अधिकृत घोषणा केली नाही, परंतु हे फोन्स अनेक सर्टिफिकेशन्स साइट्सवर दिसले आहेत, तसेच लिक्स आणि रिपोर्ट्समधून समोर आले आहेत. आता प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मानं इशारा दिला आहे की […]

The post Redmi 12C आणि Redmi Note 12 4G होऊ शकतात भारतात दाखल; लीकमधून समजली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi 12C आणि Redmi Note 12 4G स्मार्टफोन लवकरच भारतात येतील.
  • दोन्ही स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसले आहेत.
  • कंपनीनं या दोन्ही हँडसेटच्या लाँचबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi लवकरच भारतासह जगभरात Redmi 12C आणि Redmi Note 12 4G स्मार्टफोन लाँच करण्याची योजना बनवत आहे. कंपनीनं अजूनही या हॅंडसेट्सच्या लाँच डेटची अधिकृत घोषणा केली नाही, परंतु हे फोन्स अनेक सर्टिफिकेशन्स साइट्सवर दिसले आहेत, तसेच लिक्स आणि रिपोर्ट्समधून समोर आले आहेत. आता प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मानं इशारा दिला आहे की लवकरच हे स्मार्टफोन भारतासह जागतिक बाजारात देखील लाँच केले जातील.

Redmi 12C आणि Redmi Note 12 4G भारतीय लाँच

टिपस्टर मुकुल शर्मानं ट्विट केलं आहे की Redmi 12C आणि Redmi Note 12 4G लवकरच जागतिक बाजारात आणि भारतात लाँच केले जातील. मुकुलनं अचूक अशी तारीख मात्र सांगितली नाही. विशेष म्हणजे Redmi 12C आधीच चीनमध्ये लाँच झाला आहे. तर Redmi Note 12 सीरिजमध्ये Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ 5G हे स्मार्टफोन आधीच भारतात आले आहेत. हे देखील वाचा: 21 मार्चला लाँच होऊ शकतो iQOO Z7, लीकमधून समोर आली माहिती

Redmi 12C ची संभाव्य किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

रेडमी 12सी बद्दल सांगण्यात आलं आहे की ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येईल. तसेच बेस मॉडेलमध्ये 3 जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज दिली जाईल तसेच मोठा व्हेरिएंट 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल. लीकनुसार या दोन्ही व्हेरिएंट्सच्या किंमती अनुक्रमे 170 यूरो आणि 200 यूरो असेल. ही किंमत भारतीय करंसीनुसार 15,000 रुपये आणि 17,500 रुपयांच्या आसपास आहे. Redmi 12C ग्लोबल मार्केटमध्ये Ocean Blue, Mint Green आणि Graphite Gray कलरमध्ये लाँच होऊ शकतो.

रेडमी 12सी स्मार्टफोन चीनमध्ये 20.6:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर झाला आहे जो 1650 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.71 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Redmi 12C अँड्रॉइड ओएस आधारित मीयुआय 13 वर चालतो. या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये माली-जी52 एमपी2 जीपीयू देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी रेडमी 12सी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जी सेकंडरी एआय लेन्स सह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे

Redmi Note 12 4G चे संभाव्य स्पेसिफिकेशन

समोर आलेल्या माहितीनुसार, रेडमी नोट 12 4जी फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह लाँच केला जाईल. नाव समोर आले नसले तरी चर्चा आहे की हा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट असू शकतो. या फोनमध्ये लेटेस्ट मीयुआय 14 दिला जाईल. तसेच लीकमध्ये फोनचा 4जीबी रॅम रॅम व्हेरिएंट समोर आला आहे जोडीला 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी या रेडमी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. समोर आलेल्या डिटेलनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल, जोडीला 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Redmi Note 12 4G मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. हे देखील वाचा: Moto G73 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच लीक; जाणून घ्या माहिती

Redmi Note 12 4G मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. हा मोबाइल फोन आयपी53 रेटेड असेल, ज्यामुळे वॉटर व डस्ट प्रूफ बनेल. फोनमध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ व वायफाय सारखे फीचर्स मिळतील. रिपोर्टनुसार हा मोबाइल फोन Onyx Gray, Ice Blue आणि Mint Green कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

The post Redmi 12C आणि Redmi Note 12 4G होऊ शकतात भारतात दाखल; लीकमधून समजली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-12c-note-12-4g-india-launch-tipped/feed/ 0
Redmi Note 12 4G येऊ शकतो बाजारात; टिपस्टरनं लीक केली माहिती https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-specifications-leaked/#respond Wed, 01 Mar 2023 12:04:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18302 Xiaomi सबब्रँड Redmi नं आपल्या ‘नोट 12 सीरीज’ अंतगर्त तीन मोबाइल फोन भारतात लाँच केले आहेत जे Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G नावाने सेलसाठी उपलब्ध आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी या सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 12 4G लाँच […]

The post Redmi Note 12 4G येऊ शकतो बाजारात; टिपस्टरनं लीक केली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi Note 12 4G या सीरीजचा चौथा स्मार्टफोन असू शकतो.
  • सध्या Redmi Note 12 5G, Pro आणि Pro+ भारतात विकले जात आहेत.
  • नोट 12 4जी 15 हजारांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Xiaomi सबब्रँड Redmi नं आपल्या ‘नोट 12 सीरीज’ अंतगर्त तीन मोबाइल फोन भारतात लाँच केले आहेत जे Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G नावाने सेलसाठी उपलब्ध आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी या सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 12 4G लाँच करू शकते. नवीन लीकमध्ये नोट 12 4जी फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Redmi Note 12 4G संबंधित हा लीक स्नूपीटेकनं शेयर केला आहे. या टिपस्टरनं आपल्या ट्वीटर हँडलवर रेडमी नोट 12 सीरीजचा एक पोस्टर अपलोड केला आहे ज्यात चार मोबाइल फोन दाखवण्यात आले आहेत. यात Redmi Note 12 5G, Pro आणि Pro+ सह Note 12 4G चा देखील समावेश आहे. हा नवीन फोन आहे जो अजून ग्लोबली लाँच झाला नाही. आशा आहे की कंपनी येत्या काही दिवसांत हा स्मार्टफोन भारतात सादर करेल. हे देखील वाचा: उन्हात रंग बदलणारा मोबाइल फोन Vivo V27 5G आला भारतात; इतकी आहे किंमत

Redmi Note 12 4G चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.67″ 120Hz AMOLED display
  • 50MP Triple Rear Camera
  • 6nm Qualcomm Snapdragon
  • 4GB RAM + 128 GB Storage
  • 33W 5,000mAh battery

समोर आलेल्या माहितीनुसार, रेडमी नोट 12 4जी फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते. फोटोवरून स्पष्ट झालं आहे की यात पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल ज्यात सेल्फी कॅमेरा असलेला होल वरच्या बाजूला मध्यभागी दिला जाईल.

Redmi Note 12 4G बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह लाँच केला जाईल जो 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला असू शकतो. नाव समोर आले नसले तरी चर्चा आहे की हा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट असू शकतो. या फोनमध्ये लेटेस्ट मीयुआय 14 दिला जाऊ शकतो. तसेच लीकमध्ये फोनचा 4जीबी रॅम रॅम व्हेरिएंट समोर आला आहे जोडीला 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

फोटोग्राफीसाठी या रेडमी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. समोर आलेल्या डिटेलनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो, जोडीला 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Redmi Note 12 4G मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. हे देखील वाचा: यंदाही दरवाढीपासून सुटका नाही! एयरटेलचे रिचार्ज प्लॅन महागणार; सुनिल मित्तलनी दिला इशारा

Redmi Note 12 4G मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. हा मोबाइल फोन आयपी53 रेटेड असू शकतो. फोनमध्ये एनएफसी, 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ व वायफाय सारखे फीचर्स मिळू शकतात. रिपोर्टनुसार हा मोबाइल फोन Onyx Gray, Ice Blue आणि Mint Green कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

The post Redmi Note 12 4G येऊ शकतो बाजारात; टिपस्टरनं लीक केली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12-4g-specifications-leaked/feed/ 0
आयएमईआय डाटाबेसवर दिसला Redmi Note 12 4G; लवकरच होऊ शकते बाजारात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phone-redmi-note-12-4g-india-launch-details-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phone-redmi-note-12-4g-india-launch-details-leaked/#respond Wed, 18 Jan 2023 11:06:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17015 Xiaomi sub-brand Redmi च्या नोट 12 सीरीजचे तीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी अजून एक नवीन मोेबाइल या सीरीजमध्ये जोडण्याची तयारी करत आहे जो Redmi Note 12 4G नावानं लाँच होऊ शकतो. हा रेडमी फोन सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट झाला आहे त्यामुळे अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच […]

The post आयएमईआय डाटाबेसवर दिसला Redmi Note 12 4G; लवकरच होऊ शकते बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi Note 12 4G फोनची भारतीय लाँचची माहिती लीक
  • हा रेडमी मोबाइल भारतात 8GB RAM सह लाँच होऊ शकतो.
  • या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 चिपसेट मिळू शकतो.

Xiaomi sub-brand Redmi च्या नोट 12 सीरीजचे तीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. आता बातमी आली आहे की कंपनी अजून एक नवीन मोेबाइल या सीरीजमध्ये जोडण्याची तयारी करत आहे जो Redmi Note 12 4G नावानं लाँच होऊ शकतो. हा रेडमी फोन सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट झाला आहे त्यामुळे अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच नोट 12 4जी ग्लोबल मार्केटसह भारतात देखील लाँच करू शकते. पुढे या फोनच्या सर्टिफिकेशनसह संभाव्य स्पेसिफिकेशन्स देखील शेयर करण्यात आले आहेत.

Redmi Note 12 4G लाँच

Redmi Note 12 4G फोन IMEI database मध्ये स्पॉट झाला आहे. इथे फोन Tapas कोडनेमसह लिस्ट करण्यात आला आहे तसेच फोनचे दोन मॉडेल नंबर 23028RA60L आणि 23021RAAEG समोर आले आहेत. सर्टिफिकेशन मध्ये फोन लाँच संबंधित कोणतीही मोठी माहिती समोर आली नाही, परंतु लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की आता हा रेडमी फोन लवकरच ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. परंतु Redmi Note 12 4G भारतात कधी येईल हे देखील स्पष्ट झालं नाही. हे देखील वाचा: Amazon Great Republic Day Sale 2023: 5G स्मार्टफोनवर मिळत आहेत या दमदार डील्स

Redmi Note 12 4G Specifications

रेडमी नोट 12 4जी मॉडेल बद्दल समोर आलेले लीक्स पाहता, असं बोललं जात आहे की हा मोबाइल फोन मीडियाटेकच्या हीलियो जी99 चिपसेटसह ग्लोबल मार्केटमध्ये येऊ शकतो. या फोनचे दोन मेमरी व्हेरिएंट्स मार्केटमध्ये येऊ शकतात. एका मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.

Redmi Note 12 4G फोनमध्ये किती इंचाची स्क्रीन मिळेल हे समजलं नाही परंतु लीकनुसार हा स्मार्टफोन अ‍ॅमोलेड पॅनल डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो ज्यात प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 12 4जी फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Indian Gadget Awards 2022: इथे पाहा मोबाइल अवॉर्डच्या कॅटेगरी आणि त्यातील नॉमिनी

Redmi Note 12 5G

भारतात रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची प्राइस 17,999 रुपये आहे. तर मोठा व्हेरिएंट 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 19,999 रुपये आहे. Qualcomm Snapdragon 4 Gen 1 चिपसेट, 48MP ट्रिपल रियर कॅमेरा, 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला 6.67 इंच एफएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले आणि 33वॉट फास्ट चार्जिंग असलेली 5,000mAh Battery या फोनची खासियत आहे.

The post आयएमईआय डाटाबेसवर दिसला Redmi Note 12 4G; लवकरच होऊ शकते बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-phone-redmi-note-12-4g-india-launch-details-leaked/feed/ 0