Samsung Galaxy A04e - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 09:49:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP कॅमेरा आणि 4GB रॅम असलेला Samsung Galaxy A04 भारतात लाँच; पाहा किंमत https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a04-launched-in-india-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a04-launched-in-india-price-specifications-details/#respond Mon, 19 Dec 2022 10:17:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16135 Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04e भारतात लाँच झाले आहेत. हे दोन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत यातील गॅलेक्सी ए04 नं 11,999 रुपयांच्या बेस किंमतीत मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे तर ए04ई फक्त 9,299 रुपयांमध्ये आला आहे. हे दोन्ही मोबाइल फोन RAM Plus फीचरसह येतात आणि MediaTek Helio P35 चिपसेटवर चालतात. सॅमसंग गॅलेक्सी ए04 मध्ये 50MP […]

The post 50MP कॅमेरा आणि 4GB रॅम असलेला Samsung Galaxy A04 भारतात लाँच; पाहा किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04e भारतात लाँच झाले आहेत. हे दोन्ही लो बजेट स्मार्टफोन आहेत यातील गॅलेक्सी ए04 नं 11,999 रुपयांच्या बेस किंमतीत मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे तर ए04ई फक्त 9,299 रुपयांमध्ये आला आहे. हे दोन्ही मोबाइल फोन RAM Plus फीचरसह येतात आणि MediaTek Helio P35 चिपसेटवर चालतात. सॅमसंग गॅलेक्सी ए04 मध्ये 50MP Camera आणि 5,000mAh battery ची शक्ती आहे ज्याच्या किंमत व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A04 Price

सॅमसंग गॅलेक्सी ए04 दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये भारतात लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. किंमत पाहता 4GB+64GB स्टोरेजची प्राइस 11,999 रुपये आहे तर 4GB+128GB मॉडेलची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा सॅमसंग मोबाइल Green, Copper आणि Black कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीच्या डोकेदुखीत वाढ; 9,299 रुपयांमध्ये Samsung Galaxy A04e ची एंट्री

Samsung Galaxy A04 Specifications

  • 8GB RAM (4GB+4GB)
  • 50MP Dual Rear Camera
  • MediaTek Helio P35 चिपसेट
  • 5,000mAh battery

सॅमसंग गॅलेक्सी ए04 स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या सॅमसंग फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

नवीन सॅमसंग स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.1 वर लाँच झाला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेटवर चालतो. Samsung Galaxy A04 मध्ये 4जीबी रॅम देण्यात आली आहे जो रॅम प्लस फीचरसह काम करतो. या टेक्नॉलॉजीमुळे इंटरनल रॅम मध्ये अतिरिक्त 4जीबी रॅम जोडता येतो, त्यामुळे गॅलेक्सी फोन 8जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो.

हा स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ स्क्रीनसह लाँच झाला आहे ज्याला कंपनीनं इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले नाव दिलं आहे. ही स्क्रीन पीएलएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 16एम कलर डेप्थला सपोर्ट करते. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. या फोनचे डायमेंशन 164.4 x 76.3 x 9.1एमएम आणि वजन 192ग्राम आहे. हे देखील वाचा: इतकी असेल देशातील पहिल्या 200MP Camer Phone ची किंमत; लाँचपूर्वीच Infinix Zero Ultra माहिती लीक

ड्युअल सिम आणि 4जी एलटीई कनेक्टिव्हिटीसह Samsung Galaxy A04 नं भारतीय बाजारात एंट्री घेतली आहे जो बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह 3.5एमएम जॅक आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आला आहे जी कंपनीनुसार दिवसभराचा बॅकअप देते.

The post 50MP कॅमेरा आणि 4GB रॅम असलेला Samsung Galaxy A04 भारतात लाँच; पाहा किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a04-launched-in-india-price-specifications-details/feed/ 0
9,299 रुपयांमध्ये Samsung Galaxy A04e ची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a04e-price-in-india-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a04e-price-in-india-features-and-specifications/#respond Mon, 19 Dec 2022 09:21:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16128 भारतातील विश्वासू स्मार्टफोन ब्रँड पैकी एक म्हणजे सॅमसंग. कंपनीचे स्मार्टफोन किंमतीच्या बाबतीत महागडे असतात परंतु हा एक नॉन चायनीज ब्रँड असल्यामुळे भारतीय याला जास्त पसंती देतात. आज सॅमसंगनं भारतीय बाजारात दोन स्वस्त स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीनं Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04e भारतात लाँच केले आहेत. हे दोन्ही मोबाइल फोन्स लो बजेट सेग्मेंटमध्ये […]

The post 9,299 रुपयांमध्ये Samsung Galaxy A04e ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतातील विश्वासू स्मार्टफोन ब्रँड पैकी एक म्हणजे सॅमसंग. कंपनीचे स्मार्टफोन किंमतीच्या बाबतीत महागडे असतात परंतु हा एक नॉन चायनीज ब्रँड असल्यामुळे भारतीय याला जास्त पसंती देतात. आज सॅमसंगनं भारतीय बाजारात दोन स्वस्त स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीनं Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04e भारतात लाँच केले आहेत. हे दोन्ही मोबाइल फोन्स लो बजेट सेग्मेंटमध्ये आले आहेत जे RAM Plus फीचर, MediaTek Helio P35 चिपसेट आणि 5,000mAh battery सह येतात. यापैकी गॅलेक्सी ए04ई च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती आपण इथे घेणार आहोत.

Samsung Galaxy A04e ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए04ई स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस मॉडेलमध्ये 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 9,299 रुपये आहे. तर स्मार्टफोनचा दुसरा व्हेरिएंट 3जीबी रॅम + 64जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो जो 9,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. सर्वात मोठा Galaxy A04e 4GB RAM +128GB Storage सह आला आहे जो फक्त 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन कंपनीनं Light Blue आणि Copper कलरमध्ये बाजारात सादर केला आहे. हे देखील वाचा: इतकी असेल देशातील पहिल्या 200MP Camer Phone ची किंमत; लाँचपूर्वीच Infinix Zero Ultra माहिती लीक

Samsung Galaxy A04e चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ डिस्प्ले
  • 13MP AI Dual Rear Camera
  • MediaTek Helio P35 चिपसेट
  • 5,000mAh Battery

Samsung Galaxy A04e अँड्रॉइड 12 आउट ऑफ द बॉक्सवर लाँच झाला आहे ज्यात 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. हा मोबाइल RAM Plus feature सह येतो त्यामुळे यातील इंटरनल रॅमला 4जीबीचा एक्स्ट्रा बूस्ट देता येतो आणि हा फोन 8जीबी रॅमची पावरफुल परफॉर्मन्स देऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए04ई ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरसह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा लो बजेट सॅमसंग मोबाइल फोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन पीएलएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 16एम कलरला सपोर्ट करते. या स्क्रीनच्या तीन कडा नॅरो बेजल्ससह येतात तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. गॅलेक्सी ए04ई चे डायमेंशन 164.2 x 75.9 x 9.1एमएम आणि वजन 188ग्राम आहे. हे देखील वाचा: BGMI पुन्हा येणार का भारतात? जाणून घ्या कंपनीची योजना; सुरु केली तयारी

Samsung Galaxy A04e ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स सोबतच या फोनमध्ये 3.5एमएम जॅक देखील देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी हा स्मार्टफोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए04ई मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप-सीनं चार्ज करता येते.

The post 9,299 रुपयांमध्ये Samsung Galaxy A04e ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a04e-price-in-india-features-and-specifications/feed/ 0
Samsung Galaxy A04 सीरिज येऊ शकते भारतीय भेटीला; संभाव्य किंमत लीक https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-galaxy-a04-and-galaxy-a04e-in-india-this-week-specifications-price-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-galaxy-a04-and-galaxy-a04e-in-india-this-week-specifications-price-leaked/#respond Sat, 17 Dec 2022 03:30:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16088 सॅमसंग आपल्या ए सीरिजमध्ये बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करत असते. आता या सीरिजचा विस्तार करण्याची योजना कंपनी बनवत आहे. सॅमसंग दोन नवीन स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04e भारतात लाँच करू शकते. न्यूज एजेंसी IANS नुसार हे दोन्ही स्मार्टफोन याच आठवड्यात भारतीय बाजारात सादर केले जाऊ शकतात ज्यांची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी […]

The post Samsung Galaxy A04 सीरिज येऊ शकते भारतीय भेटीला; संभाव्य किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग आपल्या ए सीरिजमध्ये बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करत असते. आता या सीरिजचा विस्तार करण्याची योजना कंपनी बनवत आहे. सॅमसंग दोन नवीन स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04e भारतात लाँच करू शकते. न्यूज एजेंसी IANS नुसार हे दोन्ही स्मार्टफोन याच आठवड्यात भारतीय बाजारात सादर केले जाऊ शकतात ज्यांची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. पुढे आम्ही गॅलेक्सी ए04 आणि ए04ई च्या इंडिया लाँचसह इतर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती दिली आहे.

Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04e ची किंमत

Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04e या दोन स्मार्टफोनच्या भारतातील लाँचची अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे या दोन्ही हँडसेटच्या किंमतीची माहिती देणं शक्य नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार हे दोन्ही स्मार्टफोन 10 हजार रुपयांच्या आत सादर केले जाऊ शकतात. असं झाल्यास बजेटमध्ये स्मार्टफोन शोधणाऱ्या लोकांसाठी दोन चांगले पर्याय उपलब्ध होऊ शकतात.

Samsung Galaxy A04 च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5 इंचाचा एचडी+ इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले
  • एक्सनॉस 850 चिपसेट
  • 8 जीबी पर्यंतच्या रॅम
  • 128 जीबी स्टोरेज

सॅमसंग गॅलेक्सी ए04 स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या मोबाइल फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह सॅमसंगचा एक्सनॉस 850 चिपसेट देण्यात आला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये हा स्मार्टफोन 8 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह आला आहे.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A04 च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर मिळेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए04 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A04e च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले
  • हीलियो जी35 चिपसेट
  • 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा
  • 5,000एमएएच बॅटरी

सॅमसंग गॅलेक्सी ए04ई पाहता यात 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट मिळतो. तसेच हा मोबाइल फोन रॅम प्लस टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल, त्यामुळे वचुर्अल रॅमच्या माध्यमातून हा फोन 8 जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकेल.

Samsung Galaxy A04e ड्युअल रियरला सपोर्ट करतो ज्यात 2.2/अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी मिळेल.

The post Samsung Galaxy A04 सीरिज येऊ शकते भारतीय भेटीला; संभाव्य किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-galaxy-a04-and-galaxy-a04e-in-india-this-week-specifications-price-leaked/feed/ 0
Samsung Galaxy M04 गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट; मीडियाटेक प्रोसेसरचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-samsung-galaxy-m04-listed-on-google-play-console-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-samsung-galaxy-m04-listed-on-google-play-console-specifications-leaked/#respond Thu, 01 Dec 2022 05:21:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15549 Samsung Galaxy M04 स्मार्टफोनचं सपोर्ट पेज काही दिवसांपूर्वीच सॅमसंग इंडिया वेबसाइटवर दिसलं आहे. कंपनीनं अद्याप या गॅलेक्सी मोबाइलच्या लाँच बद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु आता बाजारात येण्याआधी हा सॅमसंग स्मार्टफोन गुगल प्ले कंसोलवर देखील लिस्ट झाला आहे. Google Play Console listing मध्ये Samsung Galaxy M04 च्या रॅम आणि प्रोसेसरची माहिती देखील समोर आली आहे […]

The post Samsung Galaxy M04 गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट; मीडियाटेक प्रोसेसरचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy M04 स्मार्टफोनचं सपोर्ट पेज काही दिवसांपूर्वीच सॅमसंग इंडिया वेबसाइटवर दिसलं आहे. कंपनीनं अद्याप या गॅलेक्सी मोबाइलच्या लाँच बद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु आता बाजारात येण्याआधी हा सॅमसंग स्मार्टफोन गुगल प्ले कंसोलवर देखील लिस्ट झाला आहे. Google Play Console listing मध्ये Samsung Galaxy M04 च्या रॅम आणि प्रोसेसरची माहिती देखील समोर आली आहे आणि त्यामुळे सॅमसंग गॅलेक्सी एम04 लवकरच भारतात लाँच होऊ शकतो, ही चर्चा जोर धरू लागली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम04 गुगल प्ले कंसोलवर 3जीबी रॅमसह लिस्ट करण्यात आला आहे. इथे फोनमध्ये 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट असल्याचं समजलं आहे त्याचबरोबर 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो. हा सॅमसंग स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच होईल तसेच ग्राफिक्ससाठी या मोबाइल फोनमध्ये पावरवीआर जीई8320 जीपीयू दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनची स्क्रीन 720 × 1600 पिक्सल रिजोल्यूशनवर काम करू शकते. हे देखील वाचा: 325 रुपयांमध्ये घरी आणा रेडमीचा ए वन फोन! स्वस्तात मिळतेय दिवसभर टिकणारी 5000mAh ची बॅटरी

Samsung Galaxy M04 चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलक्सी एम04 बद्दल बोलले जात आहे की हा स्मार्टफोन जागतिक बाजारातील गॅलेक्सी ए04ई चा इंडियन व्हर्जन असू शकतो. Samsung Galaxy A04e चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले इनफिनिटी ‘व्ही’ ला सपोर्ट करतो. या सॅमसंग स्मार्टफोनचे डायमेंशन 164.2 x 75.9 x 9.1एमएम आणि वजन 188ग्राम आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए04ई मध्ये तोच प्रोसेसर देण्यात आला आहे जो गुगल प्ले कंसोलवरील Samsung Galaxy M04 मध्ये दाखवण्यात आला आहे. या फोनचे चिपसेट आणि ग्राफिक्स जीपीयू दोन्ही एकसारखे आहेत. टेक मार्केटमध्ये गॅलेक्सी ए04ई 4जीबी पर्यंतच्या रॅमवर लाँच झाला आहे जो 128जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Corona नंतर समोर आला Zombie Virus! 48000 वर्षांपासून होता बर्फाखाली, नवीन संकटाची चाहूल?

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A04e मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 2.2/अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग मोबाइल 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ड्युअल सिम, 4जी एलटीई आणि 3.5एमएम जॅक सारख्या फीचर्ससह या फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Samsung Galaxy M04 गुगल प्ले कन्सोलवर लिस्ट; मीडियाटेक प्रोसेसरचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-samsung-galaxy-m04-listed-on-google-play-console-specifications-leaked/feed/ 0
Samsung Galaxy M04 चं सपोर्ट पेज वेबसाइटवर लिस्ट; माहिती झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m04-india-launch-soon-support-page-goes-live-with-user-manual/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m04-india-launch-soon-support-page-goes-live-with-user-manual/#respond Tue, 15 Nov 2022 05:21:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14935 सॅमसंग संबंधीत महत्वाची माहिती समोर आली आहे की कंपनी भारतात आपल्या ‘एम’ सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि लवकरच नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M04 भारतात लाँच करू शकते. सॅमसंग गॅलेक्सी ए04 चं सपोर्ट पेज कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे त्यामुळे या सॅमसंग मोबाइल फोनच्या लाँचची माहिती मिळाली आहे. Samsung Galaxy M04 स्मार्टफोन कंपनीच्या […]

The post Samsung Galaxy M04 चं सपोर्ट पेज वेबसाइटवर लिस्ट; माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग संबंधीत महत्वाची माहिती समोर आली आहे की कंपनी भारतात आपल्या ‘एम’ सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि लवकरच नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M04 भारतात लाँच करू शकते. सॅमसंग गॅलेक्सी ए04 चं सपोर्ट पेज कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे त्यामुळे या सॅमसंग मोबाइल फोनच्या लाँचची माहिती मिळाली आहे. Samsung Galaxy M04 स्मार्टफोन कंपनीच्या Samsung Galaxy A04e चा भारतीय व्हर्जन असेल जो लो बजेटमध्ये भारतात लाँच केला जाईल.

Samsung Galaxy M04 स्मार्टफोनचं सपोर्ट पेज कंपनीच्या इंडियन वेबसाइटवर लिस्ट झालं आहे जे सर्वप्रथम माय स्मार्ट प्राइस वेबसाइटनं स्पॉट केलं आहे. फोनच्या सपोर्ट पेज सोबतच इथे युजर मॅन्युअल देखील अपलोड करण्यात आला आहे. वेबसाइटवर गॅलेक्सी ए04 SM-M045F/DS मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगमध्ये फोनचे फोटो, फीचर, स्पेसिफिकेशन्स किंवा लाँचची माहिती मिळाली नाही, परंतु आशा आहे की आता सॅमसंग लवकरच Galaxy M04 भारतात लाँच करेल. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त 5G फोनची विक्री उद्यापासून; 9,999 रुपयांमध्ये स्वदेशी कंपनी देतेय शानदार फिचर

Samsung Galaxy M04 specifications

सॅमसंग गॅलक्सी एम04 स्मार्टफोन गॅलेक्सी ए04ई चा भारतीय व्हर्जन असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आशा आहे की दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स देखील एक सारखे असतील. सॅमसंग गॅलेक्सी ए04ई चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले इनफिनिटी ‘वी’ ला सपोर्ट करतो. या सॅमसंग स्मार्टफोनचे डायमेंशन 164.2 x 75.9 x 9.1एमएम आणि वजन 188ग्राम आहे.

Samsung Galaxy A04e launched know price specifications camera processor battery ram storage details

Samsung Galaxy A04e अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय कोर 4.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन आयएमजी पावरवीआर जीई8320 जीपीयूला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी ए04ई 4जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी इस सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 2.2/अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: वापरलेल्या स्मार्टफोनला देखील इथे मिळेल जबरदस्त किंमत, घरबसल्या करा सौदा

Samsung Galaxy A04e ड्युअल सिमला सपोर्ट करतो आणि 4जी एलटीईवर चालतो. 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए04ई Black, Orange Copper आणि Light Blue कलरमध्ये मार्केटमध्ये सादर झाला होता त्यामुळे Samsung Galaxy M04 देखील याच ऑप्शन्ससह लाँच होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Samsung Galaxy M04 चं सपोर्ट पेज वेबसाइटवर लिस्ट; माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m04-india-launch-soon-support-page-goes-live-with-user-manual/feed/ 0
Samsung Galaxy M23 5G येऊ शकतो भारतात; सपोर्ट पेज झालं लाइव्ह https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-samsung-galaxy-m23-5g-to-launch-in-india-soon-with-galaxy-a04-and-galaxy-a04e/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-samsung-galaxy-m23-5g-to-launch-in-india-soon-with-galaxy-a04-and-galaxy-a04e/#respond Fri, 28 Oct 2022 11:30:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14428 सॅमसंगनं अलीकडेच भारतीय बाजारात आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीज अंतगर्त Samsung Galaxy M32 Prime Edition स्मार्टफोन लाँच केला आहे जो 11 हजार रुपयांच्या बजेटमध्ये 64MP Camera, 6GB RAM, MediaTek Helio G80 चिपसेट आणि 6,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स देतो. आता बातमी आली आहे की सॅमसंग या सीरीज अंतगर्त अजून एक नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy M23 5G […]

The post Samsung Galaxy M23 5G येऊ शकतो भारतात; सपोर्ट पेज झालं लाइव्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगनं अलीकडेच भारतीय बाजारात आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीज अंतगर्त Samsung Galaxy M32 Prime Edition स्मार्टफोन लाँच केला आहे जो 11 हजार रुपयांच्या बजेटमध्ये 64MP Camera, 6GB RAM, MediaTek Helio G80 चिपसेट आणि 6,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स देतो. आता बातमी आली आहे की सॅमसंग या सीरीज अंतगर्त अजून एक नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy M23 5G भारतात लाँच करू शकते. सॅमसंग गॅलेक्सी एम23 5जी फोनचा सपोर्ट पेज कंपनीच्या इंडियन वेबसाइटवर स्पॉट झाला आहे, त्यामुळे सांगितले जात आहे की येत्या काही दिवसांत Samsung Galaxy M23 5G phone भारतात लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy M23 5G च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.1 वर बनला आहे ज्यात 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750जी चिपसेट देण्यात आला आहे. हा सॅमसंग फोन वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 13 हजारांच्या बजेटमध्ये Redmi चा 5G Phone; क्वॉलकॉमच्या नव्या प्रोसेसरसह Redmi Note 12 5G लाँच

50 mp camera phone samsung galaxy m23 5G to launch in india soon with galaxy a04 and galaxy a04e

Samsung Galaxy M23 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M23 5G ड्युअल सिम फोन आहे जो भारतात 5जी व 4जी दोन्ही नेटवर्कवर काम करेल. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट मिळेल तसेच पावर बॅकअपसाठी हा सॅमसंग मोबाइल 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करेल. भारतात सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी ची प्राइस 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये मिळू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Samsung Galaxy M23 5G येऊ शकतो भारतात; सपोर्ट पेज झालं लाइव्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-samsung-galaxy-m23-5g-to-launch-in-india-soon-with-galaxy-a04-and-galaxy-a04e/feed/ 0
4GB रॅम आणि 5,000mAh च्या बॅटरीसह Galaxy A04e लाँच; किंमत मात्र गुलदस्त्यात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a04e-launched-know-price-specifications-camera-processor-battery-ram-storage-details/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a04e-launched-know-price-specifications-camera-processor-battery-ram-storage-details/#respond Fri, 21 Oct 2022 09:12:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14223 सॅमसंगनं गेल्या महिन्यात आपल्या गॅलेक्सी ‘ए’ सीरीज अंतगर्त Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04s स्मार्टफोन लाँच केले आहेत जे शानदार स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतात. आता या सीरीजचा विस्तार करत कंपनीनं अजून एक नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy A04e सादर केला आहे. परंतु कंपनीनं किंमत सांगितली नाही. सॅमसंग गॅलेक्सी ए04ई स्मार्टफोन ऑफिशियल झाला आहे जो 13MP […]

The post 4GB रॅम आणि 5,000mAh च्या बॅटरीसह Galaxy A04e लाँच; किंमत मात्र गुलदस्त्यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगनं गेल्या महिन्यात आपल्या गॅलेक्सी ‘ए’ सीरीज अंतगर्त Samsung Galaxy A04 आणि Samsung Galaxy A04s स्मार्टफोन लाँच केले आहेत जे शानदार स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतात. आता या सीरीजचा विस्तार करत कंपनीनं अजून एक नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy A04e सादर केला आहे. परंतु कंपनीनं किंमत सांगितली नाही. सॅमसंग गॅलेक्सी ए04ई स्मार्टफोन ऑफिशियल झाला आहे जो 13MP Camera, 4GB RAM, MediaTek Helio G35 आणि 5000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A04e

सॅमसंग गॅलेक्सी ए04ई स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे. सॅमसंगनं या फोन स्क्रीनला इनफिनिटी ‘व्ही’ असं नाव दिलं आहे जिच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. या सॅमसंग स्मार्टफोनचे डायमेंशन 164.2 x 75.9 x 9.1 एमएम आणि वजन 188 ग्राम आहे. हे देखील वाचा: Amazon Great Indian Festival Finale Days sale: बेस्ट स्मार्ट टीव्ही डील्स

Samsung Galaxy A04e launched know price specifications camera processor battery ram storage details

Samsung Galaxy A04e अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय कोर 4.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन आयएमजी पावरवीआर जीई8320 जीपीयूला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी ए04ई 4जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 2.2/अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A04e ड्युअल सिमला सपोर्ट करतो आणि 4जी एलटीईवर चालतो. 3.5 एमएम जॅक व बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगनं गॅलेक्सी ए04ई स्मार्टफोन Black, Orange Copper आणि Light Blue कलरमध्ये लाँच केला आहे.

परंतु कंपनीनं या हँडसेटची किंमत मात्र सांगितली नाही, आशा आहे की लवकरच Samsung Galaxy A04e स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा होईल. तसेच सीरिजमधील इतर हँडसेट प्रमाणे हा देखील स्वस्तात उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. हे देखील वाचा: Okaya नं लाँच केल्या या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर, इंजिनसह रेंज देखील फाडू

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 4GB रॅम आणि 5,000mAh च्या बॅटरीसह Galaxy A04e लाँच; किंमत मात्र गुलदस्त्यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a04e-launched-know-price-specifications-camera-processor-battery-ram-storage-details/feed/ 0