Samsung Galaxy A24 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 20 Apr 2023 04:48:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP Camera आणि 8GB RAM सह आला Samsung Galaxy A24; इथे पाहा फुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-launched-know-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-launched-know-specifications-details/#respond Thu, 20 Apr 2023 04:48:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20374 सॅमसंग बद्दल अलीकडेच बातमी आली होती की कंपनी टेक मंचावर आपल्या ‘ए’ सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy A24 लाँच करणार आहे. आता या लो बजेट स्मार्टफोनवरील पडदा हटवत सॅमसंगनं हा ऑफिशियली सादर केला आहे. गॅलेक्सी ए24 सर्वप्रथम व्हिएतनाममध्ये सादर करण्यात आला आहे ज्याचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता. सॅमसंग गॅलेक्सी […]

The post 50MP Camera आणि 8GB RAM सह आला Samsung Galaxy A24; इथे पाहा फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy A24 व्हिएतनाम मध्ये लाँच झाला आहे.
  • हा स्मार्टफोन 50MP Triple Rear Camera ला सपोर्ट करतो.
  • सॅमसंग गॅलेक्सी ए24 व्हिएतनाममध्ये 8GB RAM सह विकला जाईल.

सॅमसंग बद्दल अलीकडेच बातमी आली होती की कंपनी टेक मंचावर आपल्या ‘ए’ सीरीजचा विस्तार करत नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy A24 लाँच करणार आहे. आता या लो बजेट स्मार्टफोनवरील पडदा हटवत सॅमसंगनं हा ऑफिशियली सादर केला आहे. गॅलेक्सी ए24 सर्वप्रथम व्हिएतनाममध्ये सादर करण्यात आला आहे ज्याचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी ए24 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ FHD+ Display
  • Super AMOLED Panel

Samsung Galaxy A24 स्मार्टफोन 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही फोन स्क्रीन सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जिच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. ही फोन स्क्रीन 1000निट्स ब्राइटनेस, 16एम कलरला सपोर्ट करते.

  • 8GB RAM + 128GB Memory
  • 2.2GHz Octa-Core Processor

हा सॅमसंग फोन अँड्रॉइड ओएसवर लाँच झाला आहे जो वनयुआयसह चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइलमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमधील चिपसेटची माहिती अद्याप समोर आली नाही. Samsung Galaxy A24 8जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. यात 1टीबी मायक्रोएसडी कार्डचा सपोर्ट मिळतो.

  • 50MP Triple Rear Camera
  • 13MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A24 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह चालतो. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर 13 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे.

  • 3.5mm Audio Jack
  • 5,000mAh Battery

Samsung Galaxy A24 एक 4जी फोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 3.5एमएम जॅकसह एनएफसी व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा स्मार्टफोन साइड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए24 व्हेरिएंट व प्राइस

Samsung Galaxy A24 व्हिएतनाममध्ये दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या बेस मॉडेलमध्ये 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीनं अजूनही मोबाइलची किंमत सांगितली नाही.

The post 50MP Camera आणि 8GB RAM सह आला Samsung Galaxy A24; इथे पाहा फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-launched-know-specifications-details/feed/ 0
लाँचपूर्वीच गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला Samsung Galaxy A24; स्पेसिफिकेशन्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-listed-google-play-console-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-listed-google-play-console-launch-soon/#respond Tue, 18 Apr 2023 10:34:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20327 Samsung Galaxy A24 तुर्कीमध्ये लवकरच लाँच होणार आहे, असा खुलासा कंपनीनं काही दिवसांपूर्वी केला होता. परंतु, लाँच डेटची माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु, आता फोन गुगल प्ले कंसोल लिस्टिंगवर दिसला आहे. टेक वेब साइट प्राइसबाबाच्या टीमनं डिवाइस SM-A245F मॉडेल नंबरसह स्पॉट केला आहे. तसेच लिस्टिंगमधून फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया […]

The post लाँचपूर्वीच गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला Samsung Galaxy A24; स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • सॅमसंग गॅलेक्सी ए24 लवकरच लाँच केला जाऊ शकतो.
  • गॅलेक्सी ए24 चं सपोर्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर समोर आलं आहे.
  • फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि 5,000एमएएचची बॅटरी असेल.

Samsung Galaxy A24 तुर्कीमध्ये लवकरच लाँच होणार आहे, असा खुलासा कंपनीनं काही दिवसांपूर्वी केला होता. परंतु, लाँच डेटची माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु, आता फोन गुगल प्ले कंसोल लिस्टिंगवर दिसला आहे. टेक वेब साइट प्राइसबाबाच्या टीमनं डिवाइस SM-A245F मॉडेल नंबरसह स्पॉट केला आहे. तसेच लिस्टिंगमधून फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती…

लिस्टिंगमध्ये समोर आली माहिती

लिस्टिंगनुसार, स्मार्टफोनमध्ये एआरएम माली जी57 जीपीयूसह मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट असेल. तसेच, डिवाइसमध्ये 4GB रॅम असेल आणि हा फोन Android 13 वर चालेल. यात 450 डीपीआय स्क्रीन डेंसिटीसह 1080×2324 एफएचडी डिस्प्ले देण्यात येईल.

तुम्हाला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी 91मोबाइल्सनं या फोनचं सपोर्ट पेज सॅमसंगच्या भारतीय वेबसाइटवर पाहिलं होतं, ज्यामुळे या फोनच्या भारतीय लाँच नजीक असल्याचं समजतं. तसेच अनेक लीक आणि रिपोर्ट्समधून गॅलेक्सी ए-सीरीजच्या या आगामी फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए24 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

मोबाइलमध्ये 1080 x 2408 पिक्सल रेजोल्यूशन असलेली 6.5 इंचाची वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन असू शकते. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली असू शकते जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. सॅमसंग गॅलेक्सी ए24 4जी अँड्रॉइड 13 ओएससह वनयुआय 5 वर सादर केला जाऊ शकतो.

हा मोबाइल फोन मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटसह मार्केटमध्ये येऊ शकतो. फोन 4जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजसह लाँच होऊ शकतो. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. हा स्मार्टफोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला देखील सपोर्ट करू शकतो.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. मागे 50 मेगापिक्सलचा प्रायमरी, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए24 ची संभाव्य किंमत

एक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की हा सॅमसंग फोन $190 यूएस डॉलर (जवळपास 16 हजार रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच काही लीक्सनुसार गॅलेक्सी ए24 या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये बाजारात येऊ शकतो.

The post लाँचपूर्वीच गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला Samsung Galaxy A24; स्पेसिफिकेशन्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-listed-google-play-console-launch-soon/feed/ 0
Samsung Galaxy A24 झाला भारतीय वेबसाइटवर लिस्ट; सपोर्ट पेजवरून लाँच कंफर्म https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-support-page-listed-on-on-indian-website/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-support-page-listed-on-on-indian-website/#respond Tue, 04 Apr 2023 06:33:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19997 Samsung आपल्या लोकप्रिय ‘ए सीरिज’ मध्ये नवीन फोन भारतात लाँच करण्याची योजना बनवत आहे, जो गेले कित्येक दिवस बातम्यांमधून समोर येत आहे. आता 91मोबाइल्सनं सॅमसंगच्या भारतीय वेबसाइटवर Samsung Galaxy A24 चं सपोर्ट पेज पाहिलं आहे, यामुळे लवकरच हा फोन भारतात लाँच होणार हे कंफर्म झालं आहे. या अधिकृत सपोर्ट पेजवरून डिवाइसच्या मॉडेल नंबरची माहिती मिळाली […]

The post Samsung Galaxy A24 झाला भारतीय वेबसाइटवर लिस्ट; सपोर्ट पेजवरून लाँच कंफर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • सॅमसंग गॅलेक्सी ए24 लवकरच भारतात येऊ शकतो.
  • गॅलेक्सी ए24 चं सपोर्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट झालं.
  • फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि 5,000एमएएचची बॅटरी असेल.

Samsung आपल्या लोकप्रिय ‘ए सीरिज’ मध्ये नवीन फोन भारतात लाँच करण्याची योजना बनवत आहे, जो गेले कित्येक दिवस बातम्यांमधून समोर येत आहे. आता 91मोबाइल्सनं सॅमसंगच्या भारतीय वेबसाइटवर Samsung Galaxy A24 चं सपोर्ट पेज पाहिलं आहे, यामुळे लवकरच हा फोन भारतात लाँच होणार हे कंफर्म झालं आहे. या अधिकृत सपोर्ट पेजवरून डिवाइसच्या मॉडेल नंबरची माहिती मिळाली आहे. पुढे आम्ही सॅमसंग गॅलेक्सी A24 बाबत आतापर्यंत समोर आलेली माहिती सांगितली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A24 चं सपोर्ट पेज लाइव्ह

स्क्रीनशॉटमध्ये दाखवल्याप्रमाणे आगामी Samsung Galaxy A24 चा मॉडेल नंबर Samsung SM-A245F/DS आहे आणि याच नंबरसह हा मॉडेल सॅमसंगच्या भारतीय वेबसाइटवर सपोर्ट पेज लाइव्ह करण्यात आलं आहे. सपोर्ट पेजवरून डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती मात्र मिळाली नाही. हे देखील वाचा: अधिकृतपणे समोर आले Redmi Note 12 Pro 4G चे स्पेसिफिकेशन्स; मिळेल 108MP चा कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी A24 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A24 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. डिवाइसमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर मिळू शकतो. तसेच यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असण्याची शक्यता आहे. कंपनी Samsung Galaxy A24 स्मार्टफोन नवीन Android 13 आधारित OneUI 5.0 स्किनवर लाँच करू शकते. हे देखील वाचा: Realme GT Neo 5 SE लाँच! यात आहे 100W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 1.5K डिस्प्ले

डिवाइसचा कॅमेरा सेगमेंट पाहता, सॅमसंग गॅलेक्सी ए24 मध्ये कथितरित्या OIS सह 50MP चा मुख्य कॅमेरा, 5MP चा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. तसेच डिवाइसमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टसह 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे.

The post Samsung Galaxy A24 झाला भारतीय वेबसाइटवर लिस्ट; सपोर्ट पेजवरून लाँच कंफर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-support-page-listed-on-on-indian-website/feed/ 0
अत्यंत स्वस्तात लाँच होईल Samsung Galaxy A24 फोन; Realme ला टक्कर देण्याची प्लॅनिंग https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-4g-phone-launch-details-and-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-4g-phone-launch-details-and-specifications-leaked/#respond Thu, 16 Feb 2023 03:39:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17846 सॅमसंग गॅलेक्सी ‘ए’ सीरीजमध्ये येत्या काही दिवसांत अनेक नवीन मोबाइल फोन येतील. यातील Samsung Galaxy A54 5G आणि Samsung Galaxy A34 5G फोन अनेक लीक्स व सर्टिफिकेशन्समधून समोर आले आहेत. तर आता या सीरीजच्या आणखी एका स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A24 चा देखील खुलासा झाला आहे. गॅलेक्सी ए24 सर्टिफिकेशन्स साइट NBTC वर लिस्ट झाला आहे […]

The post अत्यंत स्वस्तात लाँच होईल Samsung Galaxy A24 फोन; Realme ला टक्कर देण्याची प्लॅनिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy A24 पुढील महिन्यात म्हणजे मार्च मध्ये लाँच होईल.
  • हा एक 4G फोन असेल जो MediaTek Helio G99 वर चालेल.
  • यात 48MP camera आणि 90Hz AMOLED display दिली जाऊ शकते.

सॅमसंग गॅलेक्सी ‘ए’ सीरीजमध्ये येत्या काही दिवसांत अनेक नवीन मोबाइल फोन येतील. यातील Samsung Galaxy A54 5G आणि Samsung Galaxy A34 5G फोन अनेक लीक्स व सर्टिफिकेशन्समधून समोर आले आहेत. तर आता या सीरीजच्या आणखी एका स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A24 चा देखील खुलासा झाला आहे. गॅलेक्सी ए24 सर्टिफिकेशन्स साइट NBTC वर लिस्ट झाला आहे जो पुढील महिन्यात म्हणजे मार्च मध्ये लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy A24 थायलंडच्या सर्टिफिकेशन्स साइट एनबीटीसीवर लिस्ट करण्यात आला आहे. हा मोबाइल फोन SM-A245F/DSN मॉडेल नंबरसह सर्टिफाइड झाला आहे. विशेष म्हणजे या सर्टिफिकेशनमधून फोनच्या नावाचा खुलासा झाला आहे, त्यामुळे हा मोबाइल गॅलेक्सी ए24 नावानं बाजारात येईल, हे स्पष्ट झालं आहे. अशी चर्चा आहे की पुढील महिन्यात मार्चमध्ये कंपनी आपला हा फोन लाँच करेल आणि फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला हा ऑफिशियली टीज केला जाईल. हे देखील वाचा: अरारारा खतरनाक! फोनवर तीन वर्षांची वॉरंटी; Nokia X30 5G च्या भारतात लाँच

Samsung Galaxy A24 Specifications

  • 6.4″ AMOLED 90Hz display
  • MediaTek Helio G99
  • 25W 4,000mAh battery
  • 48MP triple rear camera

कंपनीनं आतापर्यंत गॅलेक्सी ए24 बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु लीक्स आणि सर्टिफिकेशन्स साइट्सनुसार हा मोबाइल फोन मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हा एक 4जी प्रोसेसर आहे जो 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर चालतो. हा मीडियाटेक प्रोसेसर सामन्यतः मिडबजेट स्मार्टफोन्समध्ये दिला जातो.

Samsung Galaxy A24 बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. फोनची स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली असेल जी सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 4,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर काम करेल. हे देखील वाचा: Vaalvi OTT release date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘वाळवी’ येणार ओटीटीवर; तारीख ठरली

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए24 4जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल जो 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलच्या सेन्सर थर्ड सेन्सरसह येईल. या फोनमध्ये अँड्रॉइड 13 सह वनयुआय 5.0 मिळू शकतो.

The post अत्यंत स्वस्तात लाँच होईल Samsung Galaxy A24 फोन; Realme ला टक्कर देण्याची प्लॅनिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-4g-phone-launch-details-and-specifications-leaked/feed/ 0
Samsung Galaxy A24 लाँचसाठी सज्ज; स्पेसिफिकेशन लीक https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-4g-geekbench-revealed-mediatek-helio-g99-soc/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-4g-geekbench-revealed-mediatek-helio-g99-soc/#respond Fri, 20 Jan 2023 07:44:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17074 सॅमसंग कंपनीनं अलीकडेच भारतीय बाजारात आपले दोन 5जी मोबाइल फोन लाँच केले आहेत जे Galaxy A14 5G आणि Galaxy A23 5G नावानं मार्केटमध्ये आले आहे. आता बातमी आली आहे की कंपनी या सीरीजच्या अजून एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Samsung Galaxy A24 नावानं लाँच होऊ शकतो. हा एक स्वस्त 4जी फोन असेल. कंपनीच्या […]

The post Samsung Galaxy A24 लाँचसाठी सज्ज; स्पेसिफिकेशन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy A24 एक स्वस्त 4जी फोन असेल.
  • हा मोबाइल सर्टिफिकेशन साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
  • फोनमध्ये 4GB RAM सह MediaTek Helio G99 प्रोसेसर मिळू शकतो.

सॅमसंग कंपनीनं अलीकडेच भारतीय बाजारात आपले दोन 5जी मोबाइल फोन लाँच केले आहेत जे Galaxy A14 5G आणि Galaxy A23 5G नावानं मार्केटमध्ये आले आहे. आता बातमी आली आहे की कंपनी या सीरीजच्या अजून एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Samsung Galaxy A24 नावानं लाँच होऊ शकतो. हा एक स्वस्त 4जी फोन असेल. कंपनीच्या घोषणेपूर्वी गॅलेक्सी ए24 चे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.

Samsung Galaxy A24 4G फोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर स्पॉट करण्यात आला आहे. हा फोन SM-A245F मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला आहे. हे गीकबेंच लिस्टिंग 18 जानेवारीचं आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता गॅलेक्सी ए24 4जी फोनला सिंगल-कोर मध्ये 561 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 1943 स्कोर मिळाला आहे. गीकबेंचवरून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा: 7GB RAM च्या पावरसह आला लो बजेट स्मार्टफोन Tecno Spark Go 2023; रेडमी-रियलमीचं टेंशन वाढलं

Samsung Galaxy A24 चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.24″ FHD+ 90Hz AMOLED डिस्प्ले
  • MediaTek Helio G99 प्रोसेसर
  • 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 25W 5,000mAh बॅटरी

सर्टिफिकेशन साइट गीकबेंचसह अन्य लीक्समध्ये समोर आलेले डिटेल्स पाहता गॅलेक्सी ए24 4जी फोन 2.30गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच होऊ शकतो. चर्चा आहे की काही मार्केट्समध्ये हा फोन मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटसह लाँच होऊ शकतो. काही देशांमध्ये हा फोन सॅमसंग एक्सनॉस 7904 प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो.

Samsung Galaxy A24 चा 4जीबी रॅम व्हेरिएंट गीकबेंचवर समोर आला आहे. परंतु हा फोन एकापेक्षा अधिक मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी या सॅमसंग फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. या सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग स्मार्टफोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह मार्केटमध्ये येऊ शकतो. हे देखील वाचा: आणखी एक स्वस्त रेडमी फोन येणार बाजारात; 5,999 रुपयांच्या Redmi A1 च्या आणखी एका व्हर्जनची बातमी आली

Samsung Galaxy A24 4G मध्ये 6.24 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले असल्याचं समोर आलं आहे. सांगण्यात आलं आहे की ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनू शकते असेल तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. परंतु ही नॉच स्क्रीन असेल की पंच-होल, याची माहिती अद्याप समोर आली नाही. तसेच या फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व लाँच संबंधित माहितीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट पाहावी लागेल.

The post Samsung Galaxy A24 लाँचसाठी सज्ज; स्पेसिफिकेशन लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-4g-geekbench-revealed-mediatek-helio-g99-soc/feed/ 0
बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी Samsung सज्ज! 6GB RAM आणि 48MP कॅमेरा असलेल्या Galaxy A24 चे स्पेसिफिकेशन्स लीक https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-might-launch-with-6gb-ram-48mp-camera-exynos-7904-processor-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-might-launch-with-6gb-ram-48mp-camera-exynos-7904-processor-specifications-leaked/#respond Thu, 20 Oct 2022 06:31:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14175 Samsung गेली कित्येक दिवस भारतीय बाजारात सक्रिय नव्हती परंतु काही दिवसांपूर्वी कंपनीनं आपल्या ‘एम’ सीरीजमध्ये नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy M32 Prime Edition लाँच केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम32 प्राइम एडिशन 64MP Camera, 6GB RAM, MediaTek Helio G80 चिपसेट आणि 6,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. सॅमसंग संबंधित एक नवीन बातमी समोर आली आहे की […]

The post बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी Samsung सज्ज! 6GB RAM आणि 48MP कॅमेरा असलेल्या Galaxy A24 चे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung गेली कित्येक दिवस भारतीय बाजारात सक्रिय नव्हती परंतु काही दिवसांपूर्वी कंपनीनं आपल्या ‘एम’ सीरीजमध्ये नवीन मोबाइल फोन Samsung Galaxy M32 Prime Edition लाँच केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम32 प्राइम एडिशन 64MP Camera, 6GB RAM, MediaTek Helio G80 चिपसेट आणि 6,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. सॅमसंग संबंधित एक नवीन बातमी समोर आली आहे की कंपनी लवकरच Samsung Galaxy A24 देखील लाँच करणार आहे.

Samsung Galaxy A24

सॅमसंग गॅलेक्सी ए24 ची माहिती द पिक्सलच्या माध्यमातून समोर आली आहे ज्यांनी फोन लाँचच्या आधीच याचे स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत. फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता, रिपोर्टनुसार Samsung Galaxy A24 स्मार्टफोन 6.24 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल जो सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला असेल, तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत लाँच होऊ शकतो POCO C50; भारतातील लाँचची माहिती लीक

Samsung Galaxy A24 might launch with 6gb ram 48mp camera Exynos 7904 processor specifications leaked

Samsung Galaxy A24 बद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन कंपनीच्या एक्सनॉस 7904 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. जो 14नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला प्रोसेसर आहे, ज्याच्या जोडीला माली जी71 जीपीयू मिळेल. लीकनुसार हा मोबाइल फोन 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. या फोनचे आणखी व्हेरिएंट बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए24 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. लीकनुसार या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळेल. फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. Samsung Galaxy A24 स्मार्टफोन 4,000एमएएच बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो जी 15वॉट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M32 Prime Edition

सॅमसंग गॅलेक्सी एम32 प्राइम एडिशन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही सुपर अ‍ॅमोलेड स्क्रीन आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: अँड्रॉइडच्या मार्गावर Apple! यूएसबी टाइप सी पोर्ट आणि मोठ्या डिस्प्लेसह iPad, iPad Pro 2022 लाँच

सॅमसंग गॅलेक्सी एम32 प्राइम एडिशन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. हा सॅमसंग स्मार्टफोन 6 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी Samsung सज्ज! 6GB RAM आणि 48MP कॅमेरा असलेल्या Galaxy A24 चे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a24-might-launch-with-6gb-ram-48mp-camera-exynos-7904-processor-specifications-leaked/feed/ 0